Marathi govt jobs   »   Study Materials   »   Five Years Plans of India (1951...

Five Year Plans of India (From 1951 to 2017): Study Material for Talathi Bharti 2023 | भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)

Table of Contents

Five Year Plans of India

Five Year Plans of India (From 1951 to 2017): Five-Year Plans (FYPs) were centralized economic and social growth programs. Joseph Stalin, president of the erstwhile USSR, implemented the first Five-Year Plan in the late 1920s. India too followed the socialist path but here the planning was not as comprehensive since the country had both public and private sectors. In this article you will get detailed information about the Five Year Plans of India List of Five Year Plans of India with important information.

Five Year Plans of India
Category Study Material
Covered Exam All Competitive Exams
Article Name Five Year Plans of India
Five-Year Plans Covered 1951-2014

Five Year Plans of India (From 1951 to 2017)

Five Year Plans of India (From 1951 to 2017): 1947 पासून 2017 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था नियोजन संकल्पनेवर (Five Year Plans of India) आधारित होती. नियोजन आयोगाने (1951-2014) आणि एनआयटीआय आयोग (2015-17) यांनी विकसित केलेल्या, अंमलात आणलेल्या आणि देखरेखीच्या पंचवार्षिक योजनांच्या (Five Year Plans of India) माध्यमातून हे पार पाडले गेले. प्रधानमंत्रिपदाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून कमिशनकडे नामित उपसभापती असतात, ज्यांचेकडे कॅबिनेट मंत्रीपद असते. बाराव्या योजनेत मार्च 2017 मध्ये मुदत पूर्ण झाली. चौथ्या योजनेपूर्वी राज्य संसाधनांचे वाटप पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ यंत्रणेऐवजी योजनाबद्ध पद्धतींवर आधारित होते, ज्यामुळे गाडगीळ सूत्र 1969 मध्ये स्वीकारले गेले. तेव्हापासून सूत्रांच्या सुधारित आवृत्त्या राज्याच्या योजनांसाठी केंद्रीय सहाय्य वाटप निश्चित करण्यासाठी वापरल्या जात आहेत. 2014 मध्ये निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नव्या सरकारने नियोजन आयोगाचे विघटन करण्याची घोषणा केली आणि त्याऐवजी त्याची जागा बदलली. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षामध्ये या पंचवार्षिक योजनेवर (Five Year Plans of India) प्रश्न विचारल्या जातात. आगामी MPSC घेत असलेल्या परीक्षा तसेच सरळसेवा परीक्षा जसे कि, तलाठी भरती (Talathi Bharti 2023), कृषी विभाग भरती (Krushi Vibhag Bharti 2023) व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा Topic आहे. आज आपण या लेखात 1947 पासून 2017 पर्यंत राबविण्यात आलेल्या सर्व पंचवर्षीय योजनेबद्दल (Five Year Plans of India) माहिती पाहणार आहे.

Panchvarshik Yojana in Marathi | भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)

Five Years Plans of India (From 1951 to 2017): MPSC घेत असलेले सर्व परीक्षांचे जुने पेपर पाहता अर्थशास्त्र या विषयावरील भारताच्या पंचवार्षिक योजना (Five Years Plans of India) या topic वर प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या MPSC च्या सर्व पूर्व परीक्षेत भारताच्या पंचवार्षिक योजना (Five Years Plans of India) या topic वर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण भारताच्या पंचवार्षिक योजना | Five Years Plans of India याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

List Of First Ranked States In Mineral Production

Nuclear Power Plant in India 2022
Adda247 Marathi App

Five-Year Plans Background | पंचवार्षिक योजना – पार्श्वभूमी

Five Year Plans Background: भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अत्यंत कमी कृषी उत्पादन, औद्योगिक क्षेत्राचा अल्प विकास आणि फाळणी मुळे निर्माण झालेली सुरक्षेची समस्या या पार्श्वभूमीवर भारताने आर्थिक विकासाचा कोणता मार्ग अवलंबवावा यावर स्वातंत्राच्या आधीपासून चर्चा-विनिमय घडत होते. भांडवली अर्थव्यवस्थेत झालेल्या प्रचंड हानीमुळे आणि देशातील नेत्यांवर असलेल्या समाजवादाच्या प्रभावामुळे भारताने नियोजन पूर्वक विकासाचा मार्ग अवलंबला. या लेखात आपण नियोजनाचा इतिहास आणि 1951 पासून सुरु झालेल्या पंचवार्षिक योजनांचा आढावा घेणार आहोत.

History of Planning India भारतातील नियोजनाचा इतिहास

History of Planning India: 

एम.विश्वेश्वरय्या योजना (M. Vishwesharaiya Plan) 

  • पुस्तकThe Planned Economy of India (1934)
  • नियोजनबद्ध औद्योगिकीकरणावर भर
  • कृषी क्षेत्रावारचे अवलंबित्व कमी करणे

फिक्की योजना (FICCI Plan)

  • 1934 – एन.आर.सरकार यांच्या अध्यक्षतेखाली योजना
  • मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध
  • राष्ट्रीय नियोजन आयोगाची गरज
  • केन्सवादी विचारसरणीचा अवलंब

काँग्रेस योजना (Congress Plan)

  • 1938 – हरिपुरा अधिवेशनात राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना (अध्यक्ष-जवाहरलाल नेहरू)
  • 1950 साली स्थापन झालेल्या नियोजन आयोगाची आधीची संस्था

मुंबई योजना (Bombay Plan)

  • मुंबईतील 8 उद्योगपतींनी ‘A Plan of Economic Development of India’ हा आराखडा तयार केला
  • तीव्र औद्योगिकीकरण
  • लघूउद्योग विकास

गांधी योजना (Gandhian Plan)

  • 1944 – नारायण अग्रवाल यांनी गांधीवादी विचारसरणी आधारित
  • ग्रामीण विकास, लघू उद्योग, कुटीर उद्योग यांना महत्त्व
  • आर्थिक विकेंद्रीकरण

जनता योजना (Janta Plan)

  • 1945 – एम. एन. रॉय यांनी मांडली
  • मार्क्सवादी समाजवादी योजना
  • मुलभूत सुविधांसाठी नियोजन आवश्यक
  • कृषी व उद्योग दोन्हीवर भर

सर्वोदय योजना (Sarvoday Plan)

  • 1950 – जयप्रकाश नारायण यांनी मांडली
  • कृषी, जमीन सुधारणा, विकेंद्रीकरण या गांधीवादी विचारसरणीवर आधारित
  • अहिंसक पद्धतीने शोषणमुक्त समाजाची निर्मिती

Planning Commission of India | भारताचा नियोजन आयोग

Planning Commission of India: भारताच्या नियोजन आयोगाच्या स्थापना, रचना, कार्ये इ पाहुयात.

  • स्थापना – 15 मार्च 1950 (सरकारच्या आदेशाद्वारे [GR])
  • प्रभाव – रशियाच्या नियोजन योजना (Gross Plan)
  • रचना
  • अध्यक्ष – पंतप्रधान (पदसिद्ध) [ पहिले -जवाहरलाल नेहरू]
  • उपाध्यक्ष – केंद्र सरकारद्वारे नियुक्त [ पहिले – गुलझारीलाल नंदा]
  • पदसिद्ध सदस्य – 10 केंद्रीय मंत्री (कॅबिनेट मंत्री)
  • कार्ये
  • देशातील संसाधनांचे आणि साधनसामग्रीचे मूल्यमापन करून या साधनांचा सुयोग्य, समतोल व कार्यक्षम वापर करणे.
  • सरकारला नियोजन करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात सहाय्य करणे
  • आर्थिक विकास साध्य करणे
  • रोजगाराच्या संधी निर्माण करणे
  • आर्थिक-सामाजिक विषमता कमी करणे

Important Articles Of Indian Constitution

Other Important Information about Planning | नियोजनाबद्दल इतर महत्वाची माहिती

Other Important Information about Planning: नियोजनाबद्दल इतर महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • योजना आयोगाचे सध्याचे प्रारूप: निती आयोग (National Institution for Transforming India)
  • राष्ट्रीय विकास आयोग: 6 ऑगस्ट 1952 (अध्यक्ष : प्रधानमंत्री, सदस्य: सर्व राज्यांचे मुख्यमंत्री)
  1. गैर घटनात्मक आणि गैर वैधानिक संस्था.
  2. सर्वोच्च धोरण बनविणारी संस्था
  3. वर्षातून किमान दोन सभा.
  • महाराष्ट्रात जिल्हा स्तरावर नियोजन- 5 व्या पंचवार्षिक योजनेपासून (1974)
  • महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ (1972) (अध्यक्ष: मुख्यमंत्री, उपाध्यक्ष: बाबासाहेब कुपेकर) तिन्ही वैधानिक विकास मंडळांचे अध्यक्ष सदस्य, 6 तज्ञ व्यक्ती.
  • जिल्हा स्तरीय नियोजन यंत्रणा : घटनात्मक दर्जा कलम (243 ZD)
  • महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियम,1998 (अध्यक्ष: पालकमंत्री, सचिव: जिल्हाधिकारी)
  • महानगर नियोजन समिती अधिनियम, 1999
  • महाराष्ट्र राज्यात 2006 पासून जिल्हा नियोजन समित्या कार्यरत.

Classical And Folk Dances Of India

Five Year Plans (1951 ते 2017) | पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)

Five Year Plans (1951 ते 2017) : 1951 ते 2017 पर्यंतच्या सर्व पंचवार्षिक योजनांची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

1st Five Year Plan in India | पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली

1st Five Year Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956
  • अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू
  • उपाध्यक्ष – गुलजारीलाल नंदा
  • प्रतिमान – हेरॉड-डोमर मॉडेल (बिग पुश सिद्धांत) – मोठी भांडवली गुंतवणूक
  • उद्दिष्टे – 
  • राष्ट्रीय उत्पन्नात 2.1 % वार्षिक वाढ (एनएनपी आधारित)
  • कृषी क्षेत्राचा विकास (31% खर्च कृषी व सिंचन क्षेत्रावर)
  • चलनवाढ आटोक्यात आणणे
  • 1955-56 अखेर अन्नधान्य उत्पादन 61.6 MT करणे
  • योजनेचे साध्य –
  • राष्ट्रीय उत्पन्न – 3.6 % (वार्षिक वृद्धीदर)
  • चलनवाढीचा दर कमी झाला
  • अन्नधान्य उत्पादन – 66.9 MT
  • संथ औद्योगिक वाढ
  • सार्वजनिक खर्चाचे वितरण – 1) कृषी व सिंचन, 2) वाहतूक व दळणवळण, 3) सामाजिक सेवा
  • महत्त्वाच्या घडामोडी
  • आंध्र राज्याची निर्मिती (1953)
  • युजीसी ची स्थापना (1953)
  • पहिली आयआयटी खरगपूर येथे स्थापन (1951)
  • समुदाय विकास कार्यक्रम सुरु (1952)
  • राष्ट्रीय विस्तार योजना (1953)
  • दामोदर खोरे विकास प्रकल्प – टेनेसी खोरे प्रकल्पाच्या धर्तीवर
  • भाक्रा – नांगल धरण – सतलज नदीवर (1955)
  • हिराकूड धरण – महानदी वर
  • स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना (1955)
  • ICICI ची स्थापना (1955)
  • सिंद्री खत कारखाना (झारखंड) (1951)

2nd Five Year Plan in India | दुसरी पंचवार्षिक योजना- भौतिकतावादी योजना

2nd Five Year Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961
  • अध्यक्ष – जवाहरलाल नेहरु
  • उपाध्यक्ष – टी टी कृष्णाम्माचारी
  • प्रतिमान – तीव्र औद्योगिकीकरण भर ; भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक ; रोजगार निर्मिती साठी लघु उद्योगांवर भर (महालोनोबीस मॉडेल)
  • उद्दिष्ट-
  • 4.5% वार्षिक वृद्धीदर
  • वाहतूक व दळणवळण सर्वाधिक खर्च
  • साध्य
  • 4.2% वार्षिक वृद्धीदर
  • मोठ्या प्रमाणात चलनवाढ
  • अन्नधान्य उत्पादन – 82 mt
  • मध्यम औद्योगिक वाढ
  • महत्त्वाच्या घडामोडी
  • महाराष्ट्र राज्य निर्मिती
  • दुसरे औद्योगिक धोरण(समाजवादी समाजरचना) 1956
  • BHEL ची निर्मिती
  • नांगल आणि रुरकेला खत कारखाना -1961
  • भिलाई लोह पोलाद उद्योग (रशिया च्या मदतीने)
  • रुरकेला लोह पोलाद उद्योग (जर्मनी च्या मदतीने)
  • दुर्गापूर लोह पोलाद उद्योग (ब्रिटन च्या मदतीने)
  • आयआयटी कायदा – 1956
  • एलआयसी ची स्थापना (1956)
  • बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची स्थापना (1957)

3rd Five Year Plan in India | तिसरी पंचवार्षिक योजना- कृषी व उद्योग योजना

3rd Five Year Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966
  • अध्यक्ष – जवाहरलाल नेहरु आणि लालबहादूर शास्त्री
  • उपाध्यक्ष – सी एम त्रिवेदी आणि अशोक मेहता
  • प्रतिमान – सुखमोय चक्रवर्ती आणि महलोनोबिस प्रतिमान
  • उद्दिष्टे –
  • 5.6% वार्षिक वृद्धीदर
  • सार्वजनिक खर्च – 1) वाहतूक व दळणवळण 2) उद्योग 3) कृषी व सिंचन
  • साध्य –
  • 2.8% वार्षिक वृद्धीदर
  • चलनवाढ झाली
  • अन्नधान्य उत्पादन घटले
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्ध
  • गोवा मुक्तिसंग्राम (1961)
  • नागालँड ची स्थापना (1963)
  • कृषी किंमत आयोगाची स्थापना (1965 – प्रो.दांतवाला)
  • भारतीय अन्न महामंडळ ची स्थापना (1964)
  • आयडीबीआय आणि युटीआय ची स्थापना (1964)

Plan Holiday | योजना अवकाश / योजना सुटी- तीन वार्षिक योजना (स्वावलंबन योजना)

Plan Holiday:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969
  • अध्यक्ष –इंदिरा गांधी
  • उपाध्यक्ष – अशोक मेहता आणि डी आर गाडगीळ
  • प्रतिमान – महलोनोबिस प्रतिमान
  • उद्दिष्टे –
  • 5% वार्षिक वृद्धीदर
  • दुष्काळ व युद्धातून सावरणे
  • साध्य –
  • वार्षिक वृद्धीदर -3.9%
  • चलनवाढ वाढदर आधी वाढला आणि नंतर उतरला
  • अन्नधान्य उत्पादन -94 mt
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • रुपयाचे अवमूल्यन (1966) -36.5%
  • पंजाब-हरियाणा ची निर्मिती (1966)
  • हरितक्रांती ची सुरुवात
  • एचवायव्हीपी कार्यक्रम (1966-67) – तांदूळ, गहू, मका, ज्वारी, बाजरी या पिकांसाठी

List Of First Ranked States In Mineral Production

4th Five Year Plan in India | चौथी पंचवार्षिक योजना – स्थैर्यासह आर्थिक वाढ व आर्थिक स्वावलंबन

4th Five Year Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974
  • अध्यक्ष –इंदिरा गांधी
  • उपाध्यक्ष – धनंजय गाडगीळ, सी.सुब्रमण्यम, दुर्गप्रसाद धर
  • प्रतिमान – अ‍ॅलन मान व अशोक रुद्र प्रतिमान (खुले सातत्य प्रतिमान)
  • उद्दिष्टे –
  • 5.7% वार्षिक वृद्धीदर (NDP आधारित)
  • सर्वाधिक खर्च कृषी व सिंचन आणि त्यानंतर उद्योग आणि वाहतूक दळणवळण.
  • संपत्ती व आर्थिक विकेंद्रीकरण आणि प्रादेशिक विकासावर भर
  • शिक्षण व मनुष्यबळ विकासावर भर

साध्य –

  • वार्षिक वृद्धीदर – 3.3% (10 व्या पंचवार्षिक योजने नुसार 2.05%)
  • अन्नधान्य उत्पादन – 104.7 Mt
  • चलनवाढ तीव्र
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • पाहिले शिक्षण धोरण (1968)
  • भारत-पाकिस्तान युद्ध (1971)
  • MRTP (1969)& FERA ACT(1973)
  • अनुकूल व्यापार तोल- 1972-73
  • बोकारो लोह पोलाद उद्योग (रशियाच्या मदतीने)
  • SAIL ची निर्मिती (1973)
  • ऑपरेशन फ्लड (1970)
  • अवर्षणप्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम (1973-74)
  • बँकांचे राष्ट्रीयीकरण (1969)
  • अग्रणी बँक योजना (1969)

5th Five Year Plan in India | पाचवी पंचवार्षिक योजना- दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता

5th Five Year Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1973 ते 31 मार्च 1978
  • अध्यक्ष –इंदिरा गांधी
  • उपाध्यक्ष – दुर्गप्रसाद धर, पी एन हक्सर
  • प्रतिमान – अ‍ॅलन मान व अशोक रुद्र प्रतिमान (खुले सातत्य प्रतिमान)
  • उद्दिष्टे –
  • 4.4% वार्षिक वृद्धीदर(GDP आधारित)
  • गरिबी हटाओ
  • सार्वजनिक खर्च -1) उद्योग 2)कृषी व सिंचन 3)ऊर्जा

साध्य –

  • वार्षिक वृद्धीदर -4.8%
  • भरमसाठ चलनवाढ (25%)
  • अन्नधान्य उत्पादन – 126mt

महत्त्वाच्या घडामोडी – 

  • पोखरण चाचणी (1974)
  • सिक्कीम ला राज्याचा दर्जा
  • 42 वी घटना दुरुस्ती आणि आणीबाणी ची सुरुवात
  • अनुकूल व्यापरतोल (1976-77)
  • पाहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण (1976)
  • TRYSEM, ICDS आणि DDP या योजना सुरू झाल्या
  • RRB ची स्थापना (1975)
  • HDFC ची स्थापना (1977)

Rolling Plan in India | सरकती योजना – जनता दलची योजना

Rolling Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980
  • अध्यक्ष – मोरारजी देसाई आणि चरणसिंग
  • उपाध्यक्ष – डी. टी. लकडावाला
  • प्रतिमान – गुन्नार मिर्डाल प्रतिमान
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना (1978)
  • कामासाठी अन्न योजना (1979)

6th Five Year Plan in India | सहावी पंचवार्षिक योजना- दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती

6th Five Year Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985
  • अध्यक्ष –इंदिरा गांधी आणि राजीव गांधी
  • उपाध्यक्ष – एन डी तिवारी , शंकरराव चव्हाण आणि पी व्ही नरसिंहराव
  • प्रतिमान – अ‍ॅलन मान व अशोक रुद्र प्रतिमान आणि लक्ष्य समूह (टार्गेट ग्रुप) संकल्पना वापरण्यास सुरुवात
  • उद्दिष्टे – 
  • 5.2% वार्षिक वृद्धीदर
  • सार्वजनिक खर्च – 1) ऊर्जा 2) कृषी व सिंचन 3) उद्योग
  • दारिद्र्य निर्मूलन
  • साध्य – 
  • वार्षिक वृद्धीदर -5.7%
  • अन्नधान्य उत्पादन – 145 mt
  • चलनवाढ आटोक्यात आली
  • औद्योगिक वृद्धीदर कमी
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • भोपाळ गॅस दुर्घटना (1984)
  • एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (1980)
  • राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (1980)
  • ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांसाठी विकास योजना(1982)
  • बँकांचे राष्ट्रीयीकरण (1980)
  • नाबार्ड ची स्थापना (1982)

7th Five Year Plan in India | सातवी पंचवार्षिक योजना- रोजगार निर्मितीजनक योजना

7th Five Year Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990
  • अध्यक्ष – राजीव गांधी आणि व्ही पी सिंग
  • उपाध्यक्ष – मनमोहन सिंग , पी शिवशंकर , माधवसिंग सोळंकी आणि रामकृष्ण हेगडे
  • प्रतिमान – ब्रह्मानंद – वकील प्रतिमान (वेज गुड्स मॉडेल) आणि खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात आले
  • उद्दिष्टे –  
  • वार्षिक वृद्धीदर – 5%
  • सार्वजनिक खर्च – 1) ऊर्जा 2)कृषी व सिंचन 3) सामाजिक सेवा
  • साध्य – 
  • वार्षिक वृद्धीदर- 6%
  • अन्नधान्य उत्पादन – 171 mt
  • चलनवाढ वाढत गेली
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • इंदिरा आवास योजना (1985)
  • ग्रामीण क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी CAPART ची स्थापना (1986)
  • जवाहर रोजगार योजना (1989)
  • नेहरू रोजगार योजना (1989)
  • दुसरे शिक्षण धोरण (1986)
  • खडू फळा मोहीम (1987)
  • राष्ट्रीय गृह बँकेची स्थापना (1988)

Yearly Plans in India  | वार्षिक योजना- स्वावलंबन योजना

Yearly Plans:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1990 ते 31 मार्च 1991 आणि 1 एप्रिल 1991 ते 31 मार्च 1992
  • अध्यक्ष –चंद्रशेखर आणि नरसिंहराव
  • उपाध्यक्ष – मधू दंडवते , मोहन धारिया आणि प्रणब मुखर्जी
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • एलपीजी मॉडेल स्वीकारले आणि नवीन औद्योगिक धोरण
  • हर्षद मेहता घोटाळा (1991)
  • सेबी ची स्थापना (1992)
  • रुपयाचे अवमूल्यन
  • रुपया चालू खात्यावर अर्ध-परिवर्तनीय

8th Five Year Plan in India | आठवी पंचवार्षिक योजना- मनुष्यबळ विकास योजना

8th Five Year Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997
  • अध्यक्ष – नरसिंहराव आणि एच डी देवेगौडा
  • उपाध्यक्ष – प्रणब मुखर्जी आणि मधू दंडवते
  • प्रतिमान – उ-खा-जा किंवा राव-मनमोहन प्रतिमान आणि जॉन मिलर मॉडेल
  • उद्दिष्टे –  
  • मानवी विकासाला सर्वाधिक प्राधान्य
  • वार्षिक वृद्धीदर -5.6%
  • सार्वजनिक खर्च – 1) ऊर्जा 2) सामाजिक सेवा 3) कृषी व सिंचन
  • साध्य – 
  • वार्षिक वृद्धीदर – 6.7%
  • संरचनात्मक समायोजन सुधारणा
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • 73 वी आणि 74 वी घटनादुरुस्ती (1993)
  • रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय
  • खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम(1993)
  • मध्यान्ह आहार योजना(1995)
  • गंगा कल्याण कार्यक्रम (1997)

9th Five Year Plan in India | नववी पंचवार्षिक योजना- सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ

9th Five Year Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002
  • अध्यक्ष –आय.के.गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी
  • उपाध्यक्ष – मधू दंडवते, जसवंत सिंग आणि के.सी.पंत
  • उद्दिष्टे –  
  • वार्षिक वृद्धीदर – 6.5%
  • सार्वजनिक खर्च – 1) उद्योग 2) ऊर्जा 3) सामाजिक सेवा
  • साध्य – 
  • वार्षिक वृद्धीदर – 5.5%
  • चलनवाढ कमी झाली
  • अन्नधान्य उत्पादन – 212 mt
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • पोखरण अणू चाचणी II (1998)
  • कारगिल युद्ध (1999)
  • FEMA कायदा (2000)
  • स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना (1997)
  • स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना (1999)
  • पंतप्रधान ग्रामोदय योजना (2000-01) – आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण, विद्युतीकरण, पेयजल,
  • पोषण यावर भर देऊन मानवी विकास
  • सर्व शिक्षा अभियान (2000-01)
  • संपूर्ण स्वच्छता अभियान (1999)

First Anglo-Maratha War- Background, Causes, Treaty and Outcome

10th Five Year Plan of India | दहावी पंचवार्षिक योजना- शिक्षण योजना / लोकांची योजना

10th Five Year Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007
  • अध्यक्ष – अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग
  • उपाध्यक्ष – के सी पंत आणि मॉंटेकसिंग अहलुवालिया
  • उद्दिष्टे –  
  • वार्षिक वृद्धीदर – 7.9%
  • कृषी क्षेत्र- अर्थव्यवस्थेचे प्रेरक बळ आणि गाभा क्षेत्र
  • MDGs चा प्रभाव होता
  • सामाजिक, आर्थिक व लैंगिक सबलीकरण
  • राज्यांना विकासाचे मोजता येणारे लक्ष्य
  • 50 दशलक्ष रोजगारनिर्मिती
  • औद्योगिक उत्पादन 10% वृद्धीदर
  • सार्वजनिक खर्च – 1)सामाजिक सेवा 2) ऊर्जा 3)वाहतूक दळणवळण
  • साध्य – 
  • वार्षिक वृद्धीदर – 7.7%
  • औद्योगिक वृद्धीदर -8.2%
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना(2004)
  • भारत- अमेरिका नागरी अणू करार (2005)
  • भारत निर्माण योजना (2005) गृहनिर्माण, सिंचन, पेयजल, रस्ते, विद्युतीकरण, दूरसंचार यांवर भर
  • जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान योजना (2005)
  • FRBM कायदा (2004)
  • जननी सुरक्षा योजना (2005)
  • एनआरएचएम (2005)

11th Five Year Plan of India | अकरावी पंचवार्षिक योजना- गतिशील आणि सर्वसमावेशक विकास

11th Five Year Plan:

  • कार्यकाल – एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012
  • अध्यक्ष –मनमोहन सिंग
  • उपाध्यक्ष – मॉंटेकसिंग अहलुवालिया
  • उद्दिष्टे –  
  • वार्षिक वृद्धीदर-9%
  • दरडोई जीडीपी वृद्धीदर – 7.6%
  • दारिद्र्य 10% ने कमी करणे
  • सुशिक्षित बेरोजगारी 5% च्या खाली आणणे
  • विद्यार्थ्यांची गळतीप्रमाण 20% वर आणणे
  • साक्षरता -85% करणे
  • उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 15% करणे
  • शिशु मृत्यदर 28 व माता मृत्यदर 100 पर्यंत कमी करणे
  • एकूण जननदर 2.1 आणणे
  • 2009 पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणीपुरवठा
  • 2009 पर्यंत सर्व खेडी व दारिद्र्य रेषेखालील लोकांना विजजोडणी करून देणे
  • 2012 पर्यंत सर्वांना ब्रॉडबँड सेवा पुरविणे
  • वने व आच्छादित क्षेत्रात 5% वाढ करणे
  • ऊर्जा कार्यक्षमता 20% ने वाढविणे
  • 2011 पर्यंत सर्व नद्या व शहरी घनकचरा व्यवस्थापन करून स्वच्छ करणे
  • सार्वजनिक खर्च- 1) ग्रामीण विकास      2) वाहतूक व ऊर्जा     3) शिक्षण
  • साध्य – 
  • 92% खेड्यांना वीज
  • 70% बीपीएल लोकांना वीज
  • 69% भारतनिर्माण योजना पूर्ण
  • शिशू मृत्युदर – 40
  • मातामृत्यू दर – 167
  • जननदर- 2.3
  • साक्षरता – 73%
  • वार्षिक वृद्धीदर – 7.9%
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • जागतिक आर्थिक मंदी (2008)
  • मुंबई हल्ला (2008)
  • साक्षर भारत अभियान (2009)
  • शिक्षण हक्क कायदा (2009)
  • प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रम (2010)
  • राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (2009)
  • NAPCC ची सुरुवात (2008)

Forests In Maharashtra

12th Five Year Plan of India | बारावी पंचवार्षिक योजना- गतिशील, अधिक समावेशक आणि शाश्वत विकास

12th Five Year Plan:

  • कार्यकाल – 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017
  • अध्यक्ष –मनमोहन सिंग (2017 पर्यंतच)
  • उपाध्यक्ष – मॉंटेकसिंग अहलुवालिया (2017 पर्यंतच)
  • उद्दिष्टे –   
  • जीडीपी वृद्धीदर 8.2%
  • कृषी वृद्धीदर – 4%
  • उत्पादन वृद्धीदर – 10%
  • दारिद्र्य 10% ने कमी करणे
  • 50 दशलक्ष रोजगार निर्मिती
  • सरासरी शैक्षणिक वर्षात 7 वर्षे वाढ
  • शैक्षणिक असमानता दूर करणे
  • माता मृत्युदर 1 , शिशु मृत्यूदर 25 व बाल लिंगगुणोत्तर 950 पर्यंत करणे
  • जननदर 2.1 आणणे
  • सिंचित क्षेत्राचे प्रमाण 103 दशलक्ष हेक्टर करणे
  • ग्रामीण टेलीडेन्सीटी 70% करणे
  • वायूउत्सर्जन 25% कमी करणे
  • वनच्छादित क्षेत्रात 1 दशलक्ष हेक्टर ची वाढ करणे
  • 30000 मेगावॅट पुनर्निर्मिती क्षम ऊर्जा
  • सार्वजनिक खर्च – 1)ग्रामीण विकास 2) शिक्षण 3) वाहतूक व ऊर्जा
  • साध्य – 
  • वृद्धीदर – 6.9%
  • शिशु मृत्युदर – 34 (2016)
  • माता मृत्यूदर – 130 (2016)
  • जननदर – 2.3 (2016)
  • महत्त्वाच्या घडामोडी – 
  • एनएसडीएम आणि एनएसडीए ची स्थापना
  • राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती कार्यक्रम (2013)
  • राष्ट्रीय कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान अभिमान (2014)
  • उन्नत भारत अभियान (2014)
  • पढे भारत बढे भारत (2014)
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान (2013)

Mahalanobis draft was adopted in which five year plan? | महालनोबीस प्रारुप कोणत्या पंचवार्षिकयोजनेत स्वीकारण्यात आले?

Mahalanobis draft was adopted in which five-year plan: जर पहिली पंचवार्षिक योजना कृषी आणि उर्जेवर केंद्रित असेल, तर दुसरी पंचवार्षिक योजना सार्वजनिक क्षेत्राच्या विकासावर आणि जलद औद्योगिकीकरणावर केंद्रित असेल. सांख्यिकीशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस यांनी मसुदा तयार केला, दुसऱ्या योजनेला महालनोबिस योजना असेही म्हणतात.

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण पंचवार्षिक योजना या प्रकरणाची उजळणी करू शकता. येणाऱ्या MPSC संयुक्त पूर्व परीक्षेत या घटकावर आधारित कमीत कमी एक प्रश्न विचारला जातो त्यामुळे या लेखाचा आपल्याला फायदा होईल.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

इतर अभ्यास साहित्य
लेखाचे नाव वेबलिंक अँप लिंक
आम्ल व आम्लारी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील धरणे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
रोग व रोगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील लोकजीवन वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
वनस्पतीची रचना आणि कार्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
जागतिक आरोग्य संघटना वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
शब्दसंपदा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पृथ्वीवरील महासागर वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताची क्षेपणास्त्रे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील महारत्न कंपन्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील प्रथम व्यक्तींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकसभा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आपली सौरप्रणाली वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ढग व ढगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

When was the Planning Commission established?

The Planning Commission was established on 15th March, 1950.

When was the National Development Commission established?

The National Development Commission was established on August 6, 1952.

What is the current model of Planning Commission?

The current model of the Planning Commission is NITI Aayog.

Who is the Chairman of the NITI Aayog?

The Prime Minister is the Chairman of the NITI Aayog.