Marathi govt jobs   »   Study Materials   »   राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – उद्दिष्टे, धोरणे, आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर: जिल्हा परिषद व आरोग्य भरती साठी उपयुक्त

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)

आरोग्य सेवेशी निगडीत संपूर्ण भारतात सुरू झालेले महत्त्वाचे अभियान म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM). या अभियानाचे महत्त्व म्हणजे देशातील सर्व वर्गांचा विचार करून याची रचना केली गेली आहे. जिल्हा परिषद भरती 2023 च्या दृष्टीने हा घटक फार महत्वाचा आहे. जिल्हा परिषद भरती मधील बहुतांशी पदांसाठी तांत्रिक विषय महत्वाचा आहे. त्यास एकूण 40 टक्के वेटेज आहे. त्यामुळे अड्डा 247 मराठी आपणासाठी या तांत्रिक विषयातील महत्वाच्या टॉपिकची एक लेख मालिका आणत आहे. आज आपण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या टॉपिक बद्दल माहिती पाहणार आहे.

जिल्हा परिषद 07 दिवसाचा रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान: विहंगावलोकन

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) 12 एप्रिल 2005 रोजी ग्रामीण लोकसंख्येला, विशेषतः असुरक्षित गटांना सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाबद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात मिळावा.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय तांत्रिक विषय (जिल्हा परिषद परीक्षा) / जनरल नॉलेज
लेखाचे नाव राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु 12 एप्रिल 2005
NHRM अंतर्गत महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग 08

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

भारतामध्ये सुरुवातीपासून शहरी भागांमध्ये आरोग्य सुविधा यांच्यामध्ये सातत्याने प्रगती होत गेली पण ग्रामीण भागात याचा पाहिजे तसा विस्तार झाला नाही याचे मुख्य कारण होते शिक्षणाचा अभाव, वाढती लोकसंख्या,  आरोग्य विषयी अनास्था या सर्व कारणांमुळे  शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधा योग्य पद्धतीने पोहोचल्या नव्हत्या.  या सर्वाचा विचार करता केंद्र शासनाने संपूर्ण देशात 12 एप्रिल 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) सुरु केले आहे. आरोग्यावर परिणाम करणाऱया महत्वाच्या घटकांचा (उदा. आहार, परिसर स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, महिला व बालविकास इत्यादी) बाबींचा या  अभियानामध्ये एकत्रित विचार करण्यात आला आहे.

खाजगी क्षेत्रातील आरोग्य सेवेवर नियंत्रण नसल्याने आरोग्य सेवेवरील खर्चात वाढ झाली असून ती ग्रामीण भागातील जनतेस न परवडण्याजोगी आहे. देशाला निरनिराळ्या आरोग्यविषयक पेचप्रसंगास सामोरे जावे लागल्याने आरोग्य सेवेच्या खर्च आणि जनतेच्या अपेक्षांमध्ये वाढ होते.

दुर्गम ग्रामीण भागात गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याचे आव्हान अधिक महत्वाचे आहे. सदर प्रश्नाचे गांभिर्य व व्याप्ती लक्षात घेता लहान योजनांवर लक्ष केंद्रीत करणे पुरेसे नाही. सार्वजनिक आरोग्य सेवेचे सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायरी व गूणवत्तापुर्ण सेवेत रुपांतरीत करणे अत्यंत आवश्यक आहे. याच भावनेतून देशातील आरोग्य अभियान संकल्पनेचा विकास झाला.

अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

राष्ट्रीय आरोग्य अभियान

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे उद्दिष्टे

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) ची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.

  • देशातील ग्रामीण भागातील जनतेस प्रभावी,सहजसाध्, गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करुन देणे, आरोग्य निर्देशक व संसाधन यामध्ये मागे असलेल्या 18 राज्यावर विशेष लक्ष.
  • 18 विशेष लक्ष असणाऱया राज्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तिस गढ, हिमाचल प्रदेश, झारखंड, जम्मु आणि काश्मिर, मणीपूर, मिझोराम, मेघालय, मध्यप्रदेश, नागालँण्ड, ओरीसा, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तरांचल व उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
  • सार्वजनिक खर्चाच्या 0.9% (जीडीपी) वरुन 2 ते 3% (GDP) पर्यंत आरोग्यावर वाढ करणे.
  • योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे यासाठी आरोग्य यंत्रणेच्या संरचनेत बदल करणे.
  • परंपरागत उपचार पध्दतीचे पुर्नजीवन आणि आयुष चा सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या मुख्यप्रवाहात समावेश करणे.
  • आरोग्य, पोषण, स्वच्छ पाणीपुरवठा, स्त्री-पुरुष समानता इ. च्या समावेशासह जिल्हास्तरावर विकेंद्रीकरण पध्दतीने आरोग्य सेवेचे प्रभावी एकत्रिकरण.
  • आंतर राज्य व आंतर जिल्हा आरोग्य असमानता या बाबीवर निवेदन करणे.
  • प्रगतीच्या दृष्टीने लक्ष निर्धारित करणे व तसा सार्वजनिक अहवाल सादर करणे.
  • ग्रामीण भागातील जनतेस, विशेषतः गरीब स्त्रिया व बालके यांना सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची धोरणे

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची 5 महत्वाची धोरणे खालीलप्रमाणे आहेत.

  • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे राज्यांमध्ये आवश्यक असे परिवर्तन करणेसाठी राज्यांच्या बळकटीकरणाचा प्रयत्न आहे. हे अभियान राज्यांना राज्यातील त्यांच्या स्थानिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य देण्यात आले आहे. यामूळे राज्य अभियानासाठी नियोजन व अंमलबजावणी चे विकेंद्रीकरण करतील जेणेकरुन गरजेप्रमाणे व सामाजिक आधार असणारे असे जिल्हा आरोग्य कृती आराखडा राज्यात आरोग्य विभागात होणारे महत्वपुर्ण परिवर्तनाचे आधार असतील.
  • राज्य हे स्थानिक बाबींचे निराकरण करणेकरिता नाविन्यपूर्ण योजना हाती घेतील.
  • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत केलेले विकेंद्रीकरण लक्षात घेता, राज्यांना, पंचायत राज्य संस्थांना पुरेसे प्रशासकिय / वित्तिय अधिकार प्रदान करणे गरजेचे आहे.
  •  दरवर्षी राज्यांना अभियानाच्या कालावधीत आरोग्य विभागावर होणारे खर्च कमीत कमी १० कोटी रु. पर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
  • राज्यांना आरोग्यविषयक बाबी हाताळण्यासाठी कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. राज्याकडून अपेक्षा आहे की ते परस्पर संमतीने निश्चित केलेल्या टप्प्यांची पूर्तता करतील याची नोंद राज्यासोबत करण्यात आलेल्या करारात करण्यात येईल.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) - उद्दिष्टे, धोरणे, आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर_4.1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची धोरणे

भारतातील सर्वात लांब पूल 2023

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा उद्देश

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा उद्देश खालीलप्रमाणे आहेत.

  • माता व बालमृत्यू दर कमी करणे.
  • अन्न व पोषण, स्वच्छ व आरोग्यदायी बनविण्यासाठी सार्वजनिक सुविधा उपलब्ध करुन देणे आणि माता व बाल आरोग्य तसेच लसीकरण हे ध्येय समोर ठेवून सार्वजनिक आरोग्य सेवा पुरविणे.
  • संसर्गजन्य व असंसर्गजन्य तसेच स्थानिक रोगांच्या साथीचा प्रतिकार व नियंत्रण ठेवणे.
  • एकात्मिक प्राथमिक आरोग्य सुविधांचा वापर वाढविणे.
  • लोकसंख्या स्थिरता व लिंग आणि लोकसंख्येचे प्रमाण राखणे.
  • स्थानिक परंपरागत आरोग्य पध्दती सक्षम करणे व आयुषला मुख्य प्रवाहात आणणे.
  • आरोग्यदायी जीवनाचा प्रचार व प्रसार करणे.
  • संघटीत कार्यक्रम पध्दत
  • सार्वजनिक आरोग्य सुविधा व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी व त्यांच्यावर नियंत्रण स्थानिक पंचायत संस्थाना प्रशिक्षण देऊन स्वायत बनविणे.
  • महिला आरोग्य कार्यकर्ता (आशा) मार्फत घराघरांपर्यंत सुधारलेल्या आरोग्य सेवांचा वापर वाढविणे.
  • ग्रामपंचायतीतील गाव आरोग्य समिती मार्फत गावाचा आरोग्य आराखडा तयार करणे.
  • बंदमुक्त निधीतून उपकेंद्राला स्थानिक नियोजन करण्यासाठी सक्षम करणे आणि बहुउद्देशीय कार्यकर्त्यांची उपलब्धता वाढविणे.
  • प्राथामिक आरोग्य केंद्र व सामाजिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण करणे आणि प्रत्येक 1 लाख लोकसंख्येमागे 30 ते 50 रुग्ण बेड क्षमता असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करुन आजारावर उपचार करुन आरोग्यदायी जीवनासाठी प्रयत्न करणे.
  • जिल्हा आरोग्य अभियानातंर्गत एकत्रित जिल्हा आरोग्य आराखडा तयार व अंमलबजावणी करणे यात पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्यदायीपणा व पोषणाचा समावेश करणे.
  • जिल्हा आरोग्य अभियानांतर्गत एकत्रित जिल्हा आरोग्य आराखडा तयार व अंमलबजावणी करणे
मुंबई विद्यापीठ भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

महाराष्ट्र हे भारतातील उत्तम विकसित राज्यांपैकी एक मानले जाते. तथापि, संपूर्ण दृष्टीने अजूनही इतर काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या आरोग्य स्थितीत मोठी तफावत आहे. जिल्ह्यांमध्ये लक्षणीय बदल आहेत, ज्यासाठी जिल्हा विशिष्ट लक्ष्य निश्चित करणे आवश्यक आहे. मिशनने या समस्यांचे निराकरण करण्याची संधी प्रदान केली आहे. भारत सरकारच्या आदेशानुसार, राज्य आरोग्य मिशनची स्थापना सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. पहिले  15 ऑक्टोबर 2005 ला ठराव मांडण्यात आला . त्यानंतर, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने केंद्र सरकारसोबत काही सुधारणांसह सामंजस्य कराराला मंजुरी दिली आणि 16 जानेवारी 2006 रोजी केंद्र सरकारला सामंजस्य करार सादर करण्यात आला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य आरोग्य सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे; सरकारनुसार जीओएम. दिनांक 24 ऑक्टोबर 2005 चा ठराव त्यानुसार, सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा आरोग्य मिशन आणि जिल्हा आरोग्य सोसायट्यांची स्थापना करण्यात आली आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व उभ्या सोसायट्या अनुक्रमे राज्य आरोग्य सोसायटी आणि जिल्हा आरोग्य सोसायट्यांमध्ये विलीन झाल्या आहेत. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) - उद्दिष्टे, धोरणे, आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर_6.1
महाराष्ट्रातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

महाराष्ट्रात आरोग्य विभागाचे आठ प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर,  अकोला  व नागपूर  या विभागांचा समावेश होतो.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) चे आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर खाली देण्यात आले आहे. यावरूनच महाराष्ट्रातील आरोग्य विभागाचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आले.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) - उद्दिष्टे, धोरणे, आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर_7.1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
राष्ट्रीय आरोग्य अभियान
महाराष्ट्रातील लोकजीवन
भारतीय संविधानाची उद्देशिका
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023)
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधी सुरू करण्यात आले?

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) 12 एप्रिल 2005 रोजी सुरू करण्यात आले

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे उद्दिष्ट काय आहे?

मिशनचे उद्दिष्ट लोकांसाठी दर्जेदार आरोग्य सेवेची उपलब्धता आणि त्यात सुधारणे हे आहे

भारतातील ग्रामीण भागात आपण आरोग्यसेवा कशी सुधारू शकतो?

सुधारित राहणीमान, विघटनकारी तंत्रज्ञानाचा वापर, इतर ग्रामीण आरोग्य सुविधांसह सहकारी व्यवस्था आणि सतत प्रशिक्षण यामुळे डॉक्टर आणि परिचारिकां यांच्या मार्फत भारतातील ग्रामीण भागात आपण आरोग्यसेवा सुधारता येईल.