Marathi govt jobs   »   Study Materials   »   Clouds and Types of Clouds

ढग व ढगांचे प्रकार (Clouds and Types of clouds) | Study Material for MPSC Group B and Group C

Clouds and Types of cloud

Clouds are given different names according to their size, shape, height. There are many types of Clouds which are also known ढग in Marathi. This article is about clouds and types of clouds, as well the methods of clouds. 

Clouds and Types of clouds | ढग व ढगांचे प्रकार

ढग व ढगांचे प्रकार (Clouds and Types of clouds) Study Material for MPSC Group B and Group C: General Awareness, General Knowledge आणि Maharashtra Static GK या सारख्या विषयांवर MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, तलाठी, पोलीस कॉन्स्टेबल या सर्व परीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. म्हणूनच दररोज आम्ही तुमच्यासाठी महत्वाचे असणारे Study Material घेऊन येत असतो. परीक्षांमध्ये ज्या भागावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात ते म्हणजे आपल्याला हवं असलेले General Knowledge. तर चला रोज आपण आपल्या परीक्षांसाठी महत्वाचे असलेल्या विषयांचा अभ्यास करूयात. आज या लेखात आपण पाहुयात Clouds and Types of clouds | ढग व ढगांचे प्रकार.

Condensation and Solidification means what | सांद्रीभवन आणि घनीभवन म्हणजे काय?

 • वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरुपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते.
 • हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनसाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात.
 • दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत.

Read More: नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

ढग व ढगांचे प्रकार | Clouds and Types of clouds

ढग व ढगांचे प्रकार (Clouds and Types of clouds) : ढग हा वातावणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात (उर्ध्वगामी प्रवाहामुळे). दवबिंदू तापमान पातळीदेखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते.

ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एकापाठोपाठ घडत असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्रसपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात.

Clouds and Types of Clouds - ढग व ढगांचे प्रकार (Dhaganche Prakar)_40.1
Types of clouds | ढगांचे प्रकार

ढगांचे प्रकार | Types of clouds

ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे तीन मुख्य प्रकार करता येतात. 

1) अतिउंचीवरील ढग : ढगांची उंची सुमारे 7000 ते 14000 मी. दरम्यान

2) मध्यम उंचीचे ढग:  उंची सुमारे 2000 ते 7000 मी. दरम्यान.

3) कमी उंचीचे ढग : 2000 मी. पेक्षा कमी उंची.

 

1) जास्त उंचीवरील ढग :

हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरस (Cirrus), सिरोक्युम्युलस (Cirrocumulus) आणि सिरोस्ट्रेटस (Cirrostratus) या प्रकारामध्ये केले जाते.

 • सिरस (Cirrus) : हे मुख्यतः तंतुमय असतात.
 • सिरोक्युम्युलस (Cirrocumulus) : या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते.
 • सिरोस्ट्रेटस (Cirrostratus) : हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. – यांच्याभोवती बरेचदा तेजोमंडल असते.

 

2) मध्यम उंचीवरील ढग :

यात अल्टोक्युम्युलस (Altocumulus)अल्टोस्ट्रेटस (Altostratus) या ढगांचा समावेश होतो.

 • अल्टोक्युम्युलस (Altocumulus): हे स्तरांच्या स्वरुपात असून तरंगासारखी रचना असते, बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात.
 • अल्टोस्ट्रेटस (Altostratus) : यात कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते.

Read More: भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

3) कमी उंचीवरील ढग :

यात पाच वेगवेगळे प्रकार केले जातात.

 • स्टॅटोक्युम्युलस (Stratocumulus): त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके असतात.
 • स्ट्रेटस् (Stratus): या ढगात देखील थर असतात. यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एकसमान असतो.
 • निम्बोस्ट्रेटस (Nimbostratus): गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. हे ढग जाड थरांचे असतात
 • क्युम्युलस ढग (Cumulus): – भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. घुमटाकार व अवाढव्य असतात. हे ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढलो की त्यांचे क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये रुपांतर होते.
 • क्युम्युलोनिम्बस ढग (Cumulonimbus): हे ढग वादळाचे निदर्शक आहेत. हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. या ढगात गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात. वादळी पावसांसह कधीकधी गारपीटही होते, पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात. जेव्हा ढगातील हवा फार थंड असते, तेव्हा हे थेंब गोठतात व गारा स्वरुपात जमिनीवर येतात.

ढगांचे प्रकार

साधारण उंची (मी.)

सिरस (Cirrus)

सिरोस्ट्रॅंटस (Cirro-Stratus)

सिरोक्युम्युलस (Cirro-cumulus)

7000 ते 14000

अल्टो स्ट्रॅटस (Alto-stratus)

अल्टो क्युमुलस (Alto-Cumulus)

2000 ते 7000

स्ट्रॅटोक्युमुलस (Strato-cumulus)

स्ट्रॅटस् (Strutus)

निम्बोस्ट्रॅटस (Nimbostratus)

2000 पेक्षा कमी

क्युम्युलस (Cumulus)

क्युम्युलोनिम्बस (Cumulonimbus)

विस्तार कमी जास्त असतो

 

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तुम्हाला हेही बघायला आवडेल

वित्तीय आणीबाणी: कलम 360

मूलभूत कर्तव्ये: कलम 51A

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

राज्यातील राष्ट्रपती राजवट: कलम 356

मूलभूत कर्तव्ये: कलम 51A | Fundamental Duties: Article 51A

राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार 

1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय

सर्वोच्च न्यायालय: न्यायाधीशांची पात्रता व नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य

ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल

भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी, 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश 2021

RBI ची पतनियंत्रणाची साधन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य 

राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या

हिमालयातील महत्वाच्या खिंडी

भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव 

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये- वने व वनांचे प्रकार 

भारतातील सर्वात मोठे राज्य 2021: क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार सर्व राज्यांची यादी

पंतप्रधान: अधिकार व कार्यें आणि मंत्रिमंडळ

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers in Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds and Types of clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks in India – State-wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List of Countries and their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Clouds and Types of Clouds - ढग व ढगांचे प्रकार (Dhaganche Prakar)_50.1
MAHARASHTRA MAHA PACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Clouds and Types of Clouds - ढग व ढगांचे प्रकार (Dhaganche Prakar)_70.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

Clouds and Types of Clouds - ढग व ढगांचे प्रकार (Dhaganche Prakar)_80.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.