Marathi govt jobs   »   Job Notification   »   Van Vibhag Bharti

वन विभाग भरती 2023, विविध संवर्गातील 2417 पदांसाठी अर्ज करा

Van Vibhag Bharti 2023 | वन विभाग भरती 2023

वन विभाग भरती 2023

वन विभाग भरती 2023: महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी वन विभाग उत्तरतालिका 2023 जाहीर केली. वन विभागाची परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे आपली वन विभाग उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र वन विभागाने विविध संवर्गातील एकूण 2417 पदाच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 जाहीर केली. वनरक्षक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 10 जून 2023 पासून सक्रीय करण्यात आली होती. या लेखात आपण वन विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात वन विभाग भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल माहिती दिली आहे.

वन विभाग भरती 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र वन विभागाने एकूण 2417 पदांसाठी वन विभाग भरती जाहीर केली आहे. यासाठीउमेदवार अर्ज 10 जून 2023 ते 03 जुलै 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात.  वन विभाग भरती 2023 चा संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

वन विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव वन विभाग भरती 2023
पदांची नावे
  • Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्चश्रेणी))
  • Stenographer (Lower Grade) ((लघुलेखक (निम्नश्रेणी))
  • Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • Sr. Statistics Assistant (वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक)
  • Jr. Statistics Assistant (कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक)
  • Surveyor (सर्व्हेअर)
  • Accountant (लेखापाल)
  • Forest Guard (वनरक्षक)
वन विभाग अधिसूचना 2023 08 जून 2023
एकूण रिक्त पदे 2417
निवड प्रक्रिया
  • ऑनलाईन परीक्षा
  • शारीरिक चाचणी (फक्त वनरक्षक  पदासाठी)
  • कौशल्य चाचणी (लघुलेखक पदासाठी)
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 जून 2023 ते 03 जुलै 2023
परीक्षेची तारीख 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन विभाग भरती 2023 अधिसूचना PDF

वनरक्षक भरती 2023 अधिसूचना PDF: 08 जून 2023 रोजी वन विभाग भरती 2023 अधिसूचना PDF जाहीर करण्यात आली. लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक पदाच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली होती. पदानुसार वेगवेगळ्या पदासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. सर्व पदांच्या अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग भरती 2023 अधिसूचना
पदाचे नाव अधिसूचना PDF
Accountant (लेखापाल) येथे क्लीक करा
Forest Guard (वनरक्षक) येथे क्लीक करा
Surveyor (सर्वेक्षक) येथे क्लीक करा
Stenographer (लघुलेखक), Statistics Assistant (Junior and Senior) (सांख्यिकी सहाय्यक (कनिष्ठ व वरिष्ठ)), Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) येथे क्लीक करा

वन विभाग भरती 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख वाढविण्यात आल्याची नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग भरती 2023 मुदतवाढ नोटीस

adda247
वन विभाग टेस्ट सिरीज

वन विभाग भरती परीक्षेची तारीख व इतर महत्वाच्या तारखा

वन विभाग भरती परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 10 जून 2023 रोजी सक्रीय झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 03 जुलै 2023 आहे. वन विभाग भरती 2023 सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.

वन विभाग भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
वन विभाग भरती 2023 अधिसूचना 08 जून 2023
वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 10 जून 2023
वन विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023

03 जुलै 2023

वन विभाग परीक्षा 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वन विभाग निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
वनरक्षक शारीरिक चाचणी 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

वन विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांची संख्या

वन विभाग भरती रिक्त पदे 2023: महाराष्ट्रात वन विभागात लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक या सर्व संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

Post Name (पदाचे नाव) Vacancy (रिक्त पदे)
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्चश्रेणी)) 13
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी)) 23
Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) 08
Sr. Statistics Assistant (वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक) 05
Jr. Statistics Assistant (कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक) 15
Surveyor (सर्वेक्षक) 86
Accountant (लेखापाल) 129
Forest Guard (वनरक्षक) 2138
Total 2417
पदानुसार वन विभाग भरती रिक्त पदे 2023 बद्दल माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Adda247 App
Adda247 Marathi Application

वनरक्षक भरती 2023: अर्ज शुल्क

अर्ज शुल्क: वन विभाग भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
  • मागास प्रवर्ग: रु. 900/-
  • माजी सैनिक: शून्य
adda247
वनराई वनरक्षक बॅच

वन विभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

वन विभाग भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व शारीरिक निकष खाली देण्यात आले आहे.

शैक्षणिक पात्रता

Post (पदाचे नाव) Education Qualification (शैक्षणिक पात्रता)
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्चश्रेणी))
  • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
  • लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट
  • इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी))
  • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
  • लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट
  • इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियंत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Sr. Statistics Assistant (वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक)
  • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Jr. Statistics Assistant (कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक)
  • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदवी धारण करणे आवश्यक आहे
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Surveyor (सर्वेक्षक)
  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) उत्तीर्ण केलेली असावी.
  • मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Forest Guard (वनरक्षक)
  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  • माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  • नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
Accountant (लेखापाल)
  • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वन विभाग भरती 2023 मधील वनरक्षक पदासाठी आवश्यक वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 27 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 18 ते 32 वर्षे

इतर संवर्गातील रिक्त पदांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

टीप: वन विभाग भरती 2023 मधील वनरक्षक पदाच्या अधिसूचनेत प्राविण्यपात्र खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा 32 वर्षे दर्शविण्यात आली होती पण आता यासंबंधी शुद्धीपत्रक जाहीर झाले असून आता प्राविण्यपात्र खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा 34 वर्षे करण्यात आली आहे. वन विभागाचे शुध्दीपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

वन विभाग भरती 2023 प्राविण्यपात्र खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादेबद्दल शुध्दीपत्रक 

शारीरक निकष

वन विभाग भरती 2023 मध्ये वनरक्षक पदास आवश्यक असणारे शारीरिक निकष खालीलप्रमाणे आहे.

मापदंड  पुरुष  महिला
उंची 163 सेमी 150 सेमी
छाती 79 सेमी (84 सेमी फुगवून) लागू नाही
वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात

वनरक्षक पदासाठी उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केले असावे.

Van Vibhag Forest Guard Eye
वन रक्षक दुष्टी निकष
adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

ऑनलाईन अर्ज लिंक: वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक दिनांक 10 जून 2023 रोजी सक्रीय झाली आहे. वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 03 जुलै 2023 होती आता वन विभाग ऑनलाईन अर्ज लिंक निष्क्रिय करण्यात आली आहे.

वन विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक निष्क्रिय)

वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आला आहे.

  • सर्वप्रथम वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahaforest.gov.in ला भेट द्या
  • तिथे भरती प्रक्रिया या टॅब वर क्लीक करा.
  • आता नवीन पेज ओपन होईल. तेथील ऑनलाईन लिंक वर क्लीक करा
  • To Register समोरील क्लिक हिअर वर क्लीक करा.
  • आता ऑनलाईन फॉर्म ओपन होईल.
  • सर्व माहिती योग्यरित्या भरा.
  • अर्ज शुल्क भरा व अर्जाची प्रिंट काढून घ्या.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023: वन विभाग भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

वन विभाग अभ्यासक्रम 2023

वन विभाग अभ्यासक्रम 2023: वन विभाग परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला वन विभाग अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. वन विभागाच्या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. वन विभाग अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग अभ्यासक्रम 2023

वन विभाग प्रवेशपत्र 2023

दिनांक 25 जुलै 2023 रोजी वन विभाग प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. सध्या लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल आणि सर्वेक्षक पदांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग प्रवेशपत्र 2023

वन विभाग उत्तरतालिका 2023

दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र वन विभागाने वन विभाग उत्तरतालिका 2023 जाहीर केली आहे. वन विभाग उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक, वन विभाग उत्तरतालिका कशी डाउनलोड करावी आणि ज्या उमेदवारांना उत्तरतालीकेवर काही आक्षेप असेल तर त्यांनी आक्षेप कसे घ्यावे याबद्दल माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग उत्तरतालिका 2023

वन विभाग भरती 2023 ची निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया: वन विभाग भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती केल्या जाणार असून याची पहिले ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्यानंतर वनरक्षक पदाची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. वन विभाग भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • ऑनलाईन परीक्षा
  • शारीरिक चाचणी (फक्त वनरक्षक पदासाठी)
  • कौशल्य चाचणी (फक्त लघुलेखक पदांसाठी)
  • कागदपत्र तपासणी
  • वैद्यकीय चाचणी
वन विभाग भरती 2023
अड्डा47 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247
वन विभाग टेस्ट सिरीज

FAQs

वन विभाग भरती 2023 ची अधिसूचना कधी प्रसिद्ध झाली?

वन विभाग भरती 2023 ची अधिसूचना दिनांक 07 जून 2023 रोजी प्रसिद्ध झाली.

वनविभाग भरती 2023 अंतर्गत वनरक्षक पदांच्या किती रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत?

वनविभाग भरती 2023 अंतर्गत वनरक्षक पदांच्या एकूण 2138 जागा जाहीर झाल्या आहेत.

वनविभाग भरती 2023 साठी पात्रता निकष काय आहे?

वनविभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष पदानुसार या लेखात देण्यात आले आहे.

वन विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क किती आहे?

वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रु. 1000 आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी रु. 900 एवढे अर्ज शुल्क आहे.