Governor General of British India before 1857 | Study material for MPSC_00.1
Marathi govt jobs   »   Study Materials   »   Governor General of British India before...

ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल, 1857 च्या आधीचे | Governor General of British India before 1857

Table of Contents

Governor General of British India before 1857: MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी एकूण 390 रिक्त पदे जाहीर केले आहेत. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ही 2 जानेवारी 2022 ला घेणार आहे. महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021 यापरीक्षेची जाहिरात नोव्हेंबर मध्ये निघणार आहे, हे MPSC ने जाहीर केले आहे , त्याचप्रमाणे MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021, इ परीक्षा MPSC लवकरच जाहीर करणार आहे. तर या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2021 Series, Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या अंतर्गत आपण दररोज सामान्य विषयातील परीक्षेला उपयोगी असे विविध Topics चा अभ्यास करणार आहोत. तर चला आजच्या या लेखात आपण पाहुयात ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधी) | Governor General of British India (Before 1857)

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या 

Governor General of British India before 1857 | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल, 1857 च्या आधीचे

Governor-General of British India: MPSC घेत असलेले सर्व परीक्षांचे जुने पेपर पाहता इतिहास या विषयात स्वतंत्रपणे व्हॉईसरॉय व गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या कार्यकाळाशी संबंधित थेट प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या MPSC च्या सर्व पूर्व परीक्षेत व्हॉईसरॉय व गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या कार्यकाळाशी संबंधित  प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

भारतात व्यापाराच्या उद्देशाने लंडनमध्ये 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. राणीने सुरुवातीस 15 वर्षासाठी या कंपनीस पूर्वेकडील देशांशी व्यापाराची सनद दिली. 1609 मध्ये राजा जेम्स पहिला यांनी कंपनीला अमर्याद कालावधीसाठी व्यापाराचा अधिकार दिला. कंपनीच्या वतीने गव्हर्नर जनरल भारताचे काम पहात होते. आपण बघूयात ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल पुढील प्रमाणे:

भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव

Governor General of British India- Robert Clive | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल- रॉबर्ट क्लाईव्ह

Governor General of British India before 1857 | Study material for MPSC_50.1
रॉबर्ट क्लाईव्ह

Governor-General of British India: रॉबर्ट क्लाईव्हच्या (757-1760, दुसऱ्यांदा 1765-1767)  कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

 • 1757 ते 1760 व 1765 ते 1767 या काळात क्लाईव्ह दोनवेळा बंगालचा गव्हर्नर बनला.
 • प्लासीच्या युद्धात विजय (1757)
 • 1765 मध्ये क्लाईव्हने बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. ऑगस्ट 1765 मध्ये क्लाईव्हने अलाहाबाद तहान्वये बादशहा शहाआलमकडून बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतांच्या दिवाणीचे अधिकार मिळविले. हे अधिकार प्रत्यक्ष कंपनीच्या वतीने वापरण्याऐवजी नबाबाच्या वतीने वापरण्याचा निर्णय घेतला. नबाबाला जबाबदार असे दोन नायब दिवाण नेमून क्लाईव्हने त्यांच्यावर कंपनीसाठी सारा वसूल करण्याची जबाबदारी सोपविली.
 • दुहेरी राज्यव्यवस्थेनुसार’ वसुलीचे सर्व अधिकार कंपनीकडे आले, परंतु त्याची जबाबदारी मात्र नबाबाकडे राहिली थोडक्यात, कोणत्याही परिश्रमांशिवाय कंपनीला दिवाणी व फौजदारी असे दोन्ही अधिकार प्राप्त झाले.

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे

Governor General of British India- Warren Hastings | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज 

Governor General of British India before 1857 | Study material for MPSC_60.1
वॉरन हेस्टिंग्ज

Governor-General of British India: वॉरन हेस्टिंग्जच्या(1772-1785)  कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

 • क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली (1772)
 • रेग्युलेटिंग ॲक्ट (1773): यानुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला व त्याला मुंबई व मद्रास प्रांतांच्या गव्हर्नरांवर नियंत्रण ठवण्याचे अधिकार प्राप्त झाले. यानुसार वॉरन हेस्टिंग्ज पहिला गव्हर्नर जनरल बनला. त्याच्या मदतीसाठी चार सदस्यीय समिती नेमन्यात आली आली.
 • पहिले इंग्रज मराठा युध्द (1775-82): साल्हबाईचा (1782) तहानुसार मराठ्यांना ठाणे व साष्ठी ही ठिकाणे मिळाली.
 • दुसरे म्हैसूर युध्द: इंग्रज-हैदर (1780) व इंग्रज-टिपु सुलतान (1782).1784 च्या मंगलोर तहाने हे युद्ध थांबले.
 • कलकत्त्यात ‘सरकारी टाकसाळ सुरू’ कागदी चलनाचा प्रयोग अयशस्वी.
 • याच्याच काळात कंपनीला मीठ बनवायचा अधिकार.
 • 1781-कलकत्ताला अरेबिया व पर्शियन भाषांच्या शिक्षणासाठी मदरसाची स्थापना केली. हेस्टिंग्जला  अरबी व फारसी माहिती असून तो बंगाली बोलायचा.
 • त्याने चार्ल्स विल्कीन्सनच्या प्रथम गीता अनुवादाला प्रस्तावना लिहिली.
 • हेस्टिग्जने संन्याशांच्या बंडावर नियंत्रण लादले. ज्याचा उल्लेख बंकिमचंद्राच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत आहे.
 • विवाह कर बंद केले.
 • गुलामगिरीची प्रथा समाप्त केली.
 • पिट्स इंडिया ॲक्ट (1784): ब्रिटिश संसदेच्या या कायद्यानुसार कंपनीवर देखरेख ठेवणाऱ्या ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ या कायमस्वरुपी नियामक मंडळाची निर्मिती झाली. कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलला निर्णायक अधिकार प्राप्त होऊन मुंबई व मद्रासचे गव्हर्नर्स त्याच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले. या कायद्यानुसार ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ला इस्ट इंडिया कंपनीस भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार देण्यात आला.  पिट्स इंडिया ॲक्टमुळे ब्रिटिश पार्लमेंटला भारतातील कंपनी प्रशासनावर अप्रत्यक्ष नियंत्रण राखण्यात यश मिळाले.
 • कर वसुलीसाठी कर समिती/ रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना केली.

पंतप्रधान: अधिकार व कार्यें आणि मंत्रिमंडळ 

Governor General of British India- Lord Cornwallis | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल- लॉर्ड कॉर्नवॉलिस 

Governor General of British India before 1857 | Study material for MPSC_70.1
लॉर्ड कॉर्नवॉलिस

Governor-General of British India: लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या(प्रथम 1786-1793, दुसऱ्यांदा- 1805)  कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

 • तिसरे म्हैसूर युध्द – इंग्रज-टिपू सुलतान (1790-92), 1792 च्या श्रीरंगपट्टणमच्या तहाने हे युध्द संपले.
 • कॉर्नवॉलिसने भारतात मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवून त्यांना खासगी व्यापार करण्यास प्रतिबंध केला.
 • प्रशासनाच्या सोयीसाठी भारतीय प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख बनविला.
 • भारतात इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (ICS) ही परीक्षा सुरु करून त्यामार्फत सनदी अधिकाऱ्यांची भरती केली. कॉर्नवालिस यास ‘भारतीय नागरी सेवांचा जनक’ (Father of Indian Civil Services) असे म्हणतात.
 • बंगाल प्रांतात कायमधारा पध्दतीचा स्वीकार (1793): कॉर्नवालिसने सुरूवातीस दहा वर्षांच्या कराराने जमीनदारांना जमिनीचे वाटप केले. परंतू 1793 मध्ये सर जॉन शोअरच्या साथीने यावर पुन्हा अभ्यास करून त्याने जमीनदारांना जमिनीचे कायमचे मालकीहक्क दिले.
 • कॉनवालिस कोड ही नवी संहिता तयार केली.
 • 1805 मध्ये कॉर्नवॉलीस पुन्हा गव्हर्नर जनरलपदी आला. ऑक्टोबर 1805 मध्ये तापामुळे उत्तर प्रदेशातील गाझिपूर येथे त्याचा मृत्यू झाला.

हिमालयातील महत्वाच्या खिंडी

Governor General of British India- Sir John Shore | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल- सर जॉन शोअर

Governor General of British India before 1857 | Study material for MPSC_80.1
सर जॉन शोअर

Governor-General of British India: सर जॉन शोअरच्या(1793-1798) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

 • 1793 चा चार्टर ॲक्ट
 • खर्डाचे युद्ध – निजाम व मराठ्यांमधे (1795).
 • अहमदशहा अब्दालीचा नातू ‘झमनशहाचे’ भारतावर आक्रमण.

Governor General of British India – Lord Richard Wellesley | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल- लॉर्ड रिचर्ड वेलस्ली

Governor General of British India before 1857 | Study material for MPSC_90.1
लॉर्ड रिचर्ड वेलस्ली

Governor-General of British India: लॉर्ड रिचर्ड वेलस्लीच्या(1798-1805) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

 • तैनाती फौज/साहाय्यक संधी (Subsidiary Alliance) ची सुरुवात. ही सर्वात प्रथम निजामने स्वीकारली (1798).
 • हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलियम महाविद्यालयाची स्थापना (1800).
 • चौथे म्हैसूर युद्ध (1799) यात टीपूचा मृत्यू
 • दुसरे मराठा युद्ध (1803-1805).
 • 1802 ला बसई (Basin) चा तह पेशव्यांनी तैनाती फौज स्वीकारली.
 • 1803 साली लॉर्ड लेकने दिल्ली व आग्य्रावर कब्जा करून मुगल सम्राट शाहआलमला ताब्यात घेतले.
 • तंजौर (1799), सुरत (1800), कर्नाटक (1801) ताब्यात घेतले.
 •  वेलस्ली ब्रिटनच्या संसदेचा सदस्य होता.
 • नेपोलियन व इंग्लंडमधे झालेल्या अमिन्सच्या तहानुसार पाँडिचेरी फ्रेंचांना परत (1802).
 • शेतसारा धान्याऐवजी पैशात स्वीकारण्यास सुरुवात .

Governor General of British India- Minto | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल- लॉर्ड मिंटो

Governor-General of British India: लॉर्ड मिंटोच्या(1807-1813) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

 • रणजीत सिंहसोबत 1809 चा अमृतसरचा करार.
 • 1813 चा चार्टर ॲक्ट.

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा

Governor General of British India- Lord Hastings | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल- लॉर्ड हेस्टिंग्ज

Governor-General of British India: लॉर्ड हेस्टिंग्जच्या(1813-23) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

 • नेपाळशी युद्ध झाले (1814-16) यातील विजया मुळे त्याचे नाव ठेवले ‘मार्किस ऑफ हेस्टिंग्ज'(इंग्लंडमधील उमरावांची पदवी).नेपाळशी सुगौलीचा करार (1823).
 • तिसरे मराठा युद्ध (1817-18) पेशवे पद समाप्त, 1818 ला मुंबई प्रातांची निर्मिती.
 • मद्रासमधे 1820 ला रयतवारी व्यवस्था-मुन्रो व रीडद्वारा.
 • कायमधारा पद्धत बंद
 • कलेक्टरांना पुन्हा न्यायिक अधिकार दिला.
 • पंजाब व आग्रा येथे महालवारी – मॅकन्शीद्वारा

Governor General of British India- Lord William Bentinck | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल- लॉर्ड विल्यम बेंटिंग

Governor General of British India before 1857 | Study material for MPSC_100.1
लॉर्ड विल्यम बेंटिंग

Governor-General of British India: लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या(1823-33) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

 • 1829 – सती प्रथा विरोधी कायदा( प्रथम बंगाल नंतर मुंबई मद्रास)
 • बेंटिंग च्या काळात इनाम कमिशनची(1828) स्थापना झाली.
 • 1833 ला मेकॉलेच्या अध्यक्षतेखालील  कमिशनची स्थापना झाली.
 • अलाहाबाद येथे उच्च मुलकी आणि फौजदारी न्यायालय ग्रँड ट्रंकरोडच्या निर्मितीस सुरुवात.

Governor General of British India-  Charles Metcalfe | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल- चार्ल्स मेंटाकाफ

Governor-General of British India: चार्ल्स मेंटाकाफच्या(1835-36) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

 • वयाची सोळा वर्ष पूर्ण व्हायच्या आत भारतात कलकत्यात दाखल झाला. त्यांनी चक्क एका शीख महिलेशी लग्न केले. लाहोरला असताना त्यांनी फाशीची शिक्षा बंद केली होती. भारताबरोबरच्या राजकीय व्यवहारात ते आक्रमक व ‘फॉरवर्ड पॉलिसी’ ठेवणारे होते.
 • याने वृत्तपत्रावरील बंधने काढली. त्यामुळे वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा जनक म्हटला जातो.

Governor General of British India- Lord Harding First | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल- लॉर्ड हार्डिंग पहिला

Governor-General of British India: लॉर्ड हार्डिंग पहिला(1844-1848) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

 • भारतात प्रथमच शासकीय कार्यालयाने रविवारची सुट्टी जाहीर केली.
 • मध्य भारतातील गोंड जमातीतील नरबळी द्यायची प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.

लिपिक टंकलेखक, महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2011-2019

Governor General of British India- Lord Dalhousie | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल- लॉर्ड डलहौसी

Governor General of British India before 1857 | Study material for MPSC_110.1
लॉर्ड डलहौसी

Governor-General of British India: लॉर्ड डलहौसीच्या(1846-1856) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

 • तो स्कॉटलंडमधील राजपुत्र होता. नियुक्तीच्या वेळी त्याचे वय 36 वर्षे होते. भारतीय राज्याचे ब्रिटिश साम्राज्यातील विलीनीकरण करण्याची कोणतीही संधी त्याने वाया घातली नाही. त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती. त्याच्या कामाच्या व्यापकतेमुळे त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हटले जाते.
 • खालसा पद्धतीने राज्यांचे विलीनीकरण- सातारा, जयपुर, संबळपूर, बघाट, उदयपूर, झाशी, नागपूर, अवध
 • दुसरे शीख युद्ध(1848-49),पंजाबचे विलीनीकरण(1849)
 • नानासाहेब पेशवे यांची पेन्शन बंद केली.
 • सिमल्याला वर्षातील काही दिवस राजधानी म्हणून घोषित केले
 • डलहौसीचे संस्थाने खालसा धोरण पूर्वी लॉर्ड ऑकलंड या गव्हर्नर जनरल ने स्वीकारले होते.
 • लष्करातील बदल- बंगाल तोफखान्याच्या मुख्यालय कलकत्त्याहून मेरठ  आणले. सेनेचे मुख्यालय सिमला केले सैन्यात इंग्रजांची संख्या वाढून भारतीयांची कमी केली.
 • गव्हर्नर जनरलला त्याच्या कामात मदतीसाठी बंगालमध्ये एक लेफ्टनंट गव्हर्नर नियुक्त केला.
 • अभियांत्रिकी विद्यालय रुरकी येथे स्थापन केले.
 • पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे(1853) येथे सुरु केली.
 • ग्रँड ट्रॅक रोड ची दुरुस्ती केली.
 • पोस्ट ऑफिस ॲक्ट(1854)- पहिल्यांदा तिकीट सुरू केले.
 • सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना
 • विधवा पुनर्विवाह कायदा
 • 1853 चार्टर ॲक्ट – स्पर्धा परीक्षेची सुरुवात
 • मुक्त व्यापार नीतीचा समर्थक- खुल्या व्यापाराच्या तत्त्वाने भारतातील सर्व बंदरे मुक्त म्हणून घोषित करण्यात आली.

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तुम्हाला हेही बघायला आवडेल

RBI ची पतनियंत्रणाची साधन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य 

राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या

हिमालयातील महत्वाच्या खिंडी

भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव 

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये- वने व वनांचे प्रकार 

भारतातील सर्वात मोठे राज्य 2021: क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार सर्व राज्यांची यादी

पंतप्रधान: अधिकार व कार्यें आणि मंत्रिमंडळ

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers in Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds and Types of clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks in India – State-wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List of Countries and their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs Governor General of British India (Before 1857)

Q.1गव्हर्नर जनरल या टॉपिक वर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेवर प्रश्न येतात का ?

Ans. हो, गव्हर्नर जनरल या टॉपिक वर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेवर प्रश्न येतात.

Q.2 इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 कॉनवालिस कोड ही नवी संहिता कोणी तयार केली?

Ans: कॉनवालिस कोड ही नवी संहिता लॉर्ड कॉर्नवॉलिस ने तयार केली.

Q.4  गव्हर्नर जनरल याची माहिती कुठे मिळेल?

Ans. गव्हर्नर जनरल याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Governor General of British India before 1857 | Study material for MPSC_120.1
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑक्टोबर 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.

Was this page helpful?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Change PasswordJoin India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?