Marathi govt jobs   »   Maharashtra Nagar Palika Bharti 2023   »   नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3 जाहीर, पुढे ढकललेल्या परीक्षांचे वेळापत्रक तपासा

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3 जाहीर

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3 जाहीर: महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयाने दिनांक 07 नोव्हेंबर 2023 च्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क, महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/लेखापरीक्षक गट क व महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य गट क या संवर्गाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयाने दिनांक 07 नोव्हेंबर 2023 रोजी नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3 जाहीर केले आहे. नगर परिषद संचालनालयाने एकूण 1782 रिक्त पदांचा भरतीसाठी नगर परिषद भरती 2023 जाहीर केली होती. आता नगर परिषद वेळापत्रक 2023 भाग 3 जाहीर करण्यात आले आहे. आज आपण या लेखात नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3: विहंगावलोकन

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3 जाहीर झाले असून त्यासंबंधी नगर परिषद संचालनालयाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. या लेखात नगर परिषद वेळापत्रकाबद्दल माहिती देण्यात आली आहे.

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
संचालनालय महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय
भरतीचे नाव नगर परिषद भरती 2023
सेवा
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क
एकूण रिक्त पदे 1782
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
लेखाचे नाव नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3
परीक्षेची तारीख  22 व 24 नोव्हेंबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahadma.maharashtra.gov.in

नगर परिषद भरती 2023

नगर परिषद भरती 2023: महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेमध्ये गट क संवर्गातील एकूण 1782 रिक्त पदाच्या भरतीसाठी 13 जुलै 2023 रोजी नगर परिषद भरती 2023 जाहीर झाली होती. नगर परिषद भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नगर परिषद भरती 2023 अधिसूचना

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3 आणि इतर महत्वाच्या तारखा

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3ची  तारीख 2023 दिनांक 07 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली असून नगर परिषद भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

नगर परिषद भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
नगर परिषद भरती 2023 अधिसूचना 13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 25 ऑक्टोबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023
नगरपरिषद वेळापत्रक 2023 परीक्षा 2 03 व 09 नोव्हेंबर 2023
नगरपरिषद वेळापत्रक 2023 परीक्षा 3 22 व 24 नोव्हेंबर 2023
नगर परिषद निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3

खालील तक्त्यात नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3 देण्यात आले आहे.

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3
महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क 22 नोव्हेंबर 2023 सत्र 2 – दु. 1 ते 3
महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/लेखापरीक्षक गट क  24 नोव्हेंबर 2023
  • सत्र 1 – स. 9 ते 11
  • सत्र 2 – दु. 1 ते 3
महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य गट क 24 नोव्हेंबर 2023 सत्र 3 – संध्या. 5 ते 7

 

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3 बद्दल माहिती देणारे प्रसिद्धीपत्रक

नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023 पदभरतीची जाहिरात दि. 13 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

राज्यभर सुरु असलेल्या विविध आंदोलनांमुळे काही जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले होते. इंटरनेट सुविधा व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही भागात बंद असल्यामुळे दि. 02 नोव्हेंबर 2023 व दि. 03 नोव्हेंबर 2023 होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसेच सदर परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील असे संदर्भिय प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क, महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/लेखापरीक्षक गट क व महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य गट क संवर्गांची ऑनलाईन परीक्षा ही दि. 22 व 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. 07 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झालेले प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 (07 नोव्हेंबर 2023 चे प्रसिद्धीपत्रक)

नगर परिषद प्रवेशपत्र 2023 लिंक 

उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नगर परिषद प्रवेशपत्र 2023 डाऊनलोड करू शकतात.

नगर परिषद प्रवेशपत्र 2023 लिंक 

नगर परिषद भरती परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

नगर परिषद भरती 2023 मधील सर्व पदांसाठी मध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. नगर परिषद परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असतील. नगर परिषद भरती परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नगर परिषद भरती 2023 बद्दल इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Nagar Parishad
नगर परिषद भरती 2023 फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे का?

होय, नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे.

नगर परिषद परीक्षेची तारीख भाग 3 2023 कधी जाहीर झाली?

नगर परिषद परीक्षेची तारीख भाग 3 2023 07 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

नगर परिषद भरती परीक्षा 2023 भाग 3 कधी घेण्यात येणार आहे?

नगर परिषद भरती परीक्षा 2023 भाग 3 दिनांक 22 व 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.