भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | Five Year Plans of India (1951 to 2017)_00.1
Marathi govt jobs   »   Study Materials   »   Five Years Plans of India (1951...

भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | Five Year Plans of India (From 1951 to 2017) | Study Material for MPSC

Table of Contents

Five Year Plans of India (From 1951 to 2017): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी जाहिरात जाहीर केली आहे.  MPSC ने यावर्षी एकूण 666 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहे. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही 26 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. तर आता आपल्याकडे MPSC गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. साधारणतः 3 – 3.5 महिने अभ्यासासाठी मिळत आहेत. या वेळेचा उपयोग योग्य रीतीने केला तर PSI, STI आणि ASO या तिन्ही पोस्ट साठीची पूर्व परीक्षा crack करता येईल. या वेळात जेवढा जास्त सराव आणि उजळणी करता येईल तेवढा जास्त सराव आणि उजळणी केली पाहिजे. MPSC परीक्षेसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2021 Series, Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या अंतर्गत आपण दररोज सामान्य ज्ञान या विषयातील परीक्षेला उपयोगी असे विविध Topics चा अभ्यास करणार आहोत. तर चला आजच्या या लेखात आपण पाहुयात Five Years Plans of India (1951 to 2017) | भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)

 

Five Year Plans of India (From 1951 to 2017) | भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)

Five Years Plans of India (From 1951 to 2017): MPSC घेत असलेले सर्व परीक्षांचे जुने पेपर पाहता अर्थशास्त्र या विषयावरील भारताच्या पंचवार्षिक योजना (Five Years Plans of India) या topic वर प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या MPSC च्या सर्व पूर्व परीक्षेत भारताच्या पंचवार्षिक योजना (Five Years Plans of India) या topic वर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण भारताच्या पंचवार्षिक योजना | Five Years Plans of India याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती

पंचवार्षिक योजना – पार्श्वभूमी | Five Year Plans Background

Five Year Plans Background: भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अत्यंत कमी कृषी उत्पादन, औद्योगिक क्षेत्राचा अल्प विकास आणि फाळणी मुळे निर्माण झालेली सुरक्षेची समस्या या पार्श्वभूमीवर भारताने आर्थिक विकासाचा कोणता मार्ग अवलंबवावा यावर स्वातंत्राच्या आधीपासून चर्चा-विनिमय घडत होते. भांडवली अर्थव्यवस्थेत झालेल्या प्रचंड हानीमुळे आणि देशातील नेत्यांवर असलेल्या समाजवादाच्या प्रभावामुळे भारताने नियोजन पूर्वक विकासाचा मार्ग अवलंबला. या लेखात आपण नियोजनाचा इतिहास आणि 1951 पासून सुरु झालेल्या पंचवार्षिक योजनांचा आढावा घेणार आहोत.

राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप

भारतातील नियोजनाचा इतिहास | History of Planning India

History of Planning India:

एम.विश्वेश्वरय्या योजना (M. Vishwesharaiya Plan) 

 • पुस्तकThe Planned Economy of India (1934)
 • नियोजनबद्ध औद्योगिकीकरणावर भर
 • कृषी क्षेत्रावारचे अवलंबित्व कमी करणे

फिक्की योजना (FICCI Plan)

 • 1934 – एन.आर.सरकार यांच्या अध्यक्षतेखाली योजना
 • मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध
 • राष्ट्रीय नियोजन आयोगाची गरज
 • केन्सवादी विचारसरणीचा अवलंब

काँग्रेस योजना (Congress Plan)

 • 1938 – हरिपुरा अधिवेशनात राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना (अध्यक्ष-जवाहरलाल नेहरू)
 • 1950 साली स्थापन झालेल्या नियोजन आयोगाची आधीची संस्था

मुंबई योजना (Bombay Plan)

 • मुंबईतील 8 उद्योगपतींनी ‘A Plan of Economic Development of India’ हा आराखडा तयार केला
 • तीव्र औद्योगिकीकरण
 • लघूउद्योग विकास

गांधी योजना (Gandhian Plan)

 • 1944 – नारायण अग्रवाल यांनी गांधीवादी विचारसरणी आधारित
 • ग्रामीण विकास, लघू उद्योग, कुटीर उद्योग यांना महत्त्व
 • आर्थिक विकेंद्रीकरण

जनता योजना (Janta Plan)

 • 1945 – एम. एन. रॉय यांनी मांडली
 • मार्क्सवादी समाजवादी योजना
 • मुलभूत सुविधांसाठी नियोजन आवश्यक
 • कृषी व उद्योग दोन्हीवर भर

सर्वोदय योजना (Sarvoday Plan)

 • 1950 – जयप्रकाश नारायण यांनी मांडली
 • कृषी, जमीन सुधारणा, विकेंद्रीकरण या गांधीवादी विचारसरणीवर आधारित
 • अहिंसक पद्धतीने शोषणमुक्त समाजाची निर्मिती

सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी

भारताचा नियोजन आयोग | Planning Commission of India

 

Planning Commission of India: भारताच्या नियोजन आयोगाच्या स्थापना, रचना, कार्ये इ पाहुयात.

 • स्थापना – 15 मार्च 1950 (सरकारच्या आदेशाद्वारे [GR])
 • प्रभाव – रशियाच्या नियोजन योजना (Gross Plan)
 • रचना
 • अध्यक्ष – पंतप्रधान (पदसिद्ध) [ पहिले -जवाहरलाल नेहरू]
 • उपाध्यक्ष – केंद्र सरकारद्वारे नियुक्त [ पहिले – गुलझारीलाल नंदा]
 • पदसिद्ध सदस्य – 10 केंद्रीय मंत्री (कॅबिनेट मंत्री)
 • कार्ये
 • देशातील संसाधनांचे आणि साधनसामग्रीचे मूल्यमापन करून या साधनांचा सुयोग्य, समतोल व कार्यक्षम वापर करणे.
 • सरकारला नियोजन करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात सहाय्य करणे
 • आर्थिक विकास साध्य करणे
 • रोजगाराच्या संधी निर्माण करणे
 • आर्थिक-सामाजिक विषमता कमी करणे

RBI ची पतनियंत्रणाची साधन

नियोजनाबद्दल इतर महत्वाची माहिती | Other Important Information about Planning

Other Important Information about Planning:

 • योजना आयोगाचे सध्याचे प्रारूप: निती आयोग (National Institution for Transforming India)
 • राष्ट्रीय विकास आयोग: 6 ऑगस्ट 1952 (अध्यक्ष : प्रधानमंत्री, सदस्य: सर्व राज्यांचे मुख्यमंत्री)
 1. गैर घटनात्मक आणि गैर वैधानिक संस्था.
 2. सर्वोच्च धोरण बनविणारी संस्था
 3. वर्षातून किमान दोन सभा.
 • महाराष्ट्रात जिल्हा स्तरावर नियोजन- 5 व्या पंचवार्षिक योजनेपासून (1974)
 • महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ (1972) (अध्यक्ष: मुख्यमंत्री, उपाध्यक्ष: बाबासाहेब कुपेकर) तिन्ही वैधानिक विकास मंडळांचे अध्यक्ष सदस्य, 6 तज्ञ व्यक्ती.
 • जिल्हा स्तरीय नियोजन यंत्रणा : घटनात्मक दर्जा कलम (243 ZD)
 • महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियम,1998 (अध्यक्ष: पालकमंत्री, सचिव: जिल्हाधिकारी)
 • महानगर नियोजन समिती अधिनियम, 1999
 • महाराष्ट्र राज्यात 2006 पासून जिल्हा नियोजन समित्या कार्यरत.

मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे

Five Year Plans (1951 ते 2017) | पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)

Five Year Plans (1951 ते 2017) : 1951 ते 2017 पर्यंतच्या सर्व पंचवार्षिक योजनांची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

1st Five Year Plan | पहिली पंचवार्षिक योजना – पुनरुत्थान योजना

1st Five Year Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956
 • अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू
 • उपाध्यक्ष – गुलजारीलाल नंदा
 • प्रतिमान – हेरॉड-डोमर मॉडेल (बिग पुश सिद्धांत) – मोठी भांडवली गुंतवणूक
 • उद्दिष्टे – 
 • राष्ट्रीय उत्पन्नात 2.1 % वार्षिक वाढ (एनएनपी आधारित)
 • कृषी क्षेत्राचा विकास (31% खर्च कृषी व सिंचन क्षेत्रावर)
 • चलनवाढ आटोक्यात आणणे
 • 1955-56 अखेर अन्नधान्य उत्पादन 61.6 MT करणे
 • योजनेचे साध्य –
 • राष्ट्रीय उत्पन्न – 3.6 % (वार्षिक वृद्धीदर)
 • चलनवाढीचा दर कमी झाला
 • अन्नधान्य उत्पादन – 66.9 MT
 • संथ औद्योगिक वाढ
 • सार्वजनिक खर्चाचे वितरण – 1) कृषी व सिंचन, 2) वाहतूक व दळणवळण, 3) सामाजिक सेवा
 • महत्त्वाच्या घडामोडी
 • आंध्र राज्याची निर्मिती (1953)
 • युजीसी ची स्थापना (1953)
 • पहिली आयआयटी खरगपूर येथे स्थापन (1951)
 • समुदाय विकास कार्यक्रम सुरु (1952)
 • राष्ट्रीय विस्तार योजना (1953)
 • दामोदर खोरे विकास प्रकल्प – टेनेसी खोरे प्रकल्पाच्या धर्तीवर
 • भाक्रा – नांगल धरण – सतलज नदीवर (1955)
 • हिराकूड धरण – महानदी वर
 • स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना (1955)
 • ICICI ची स्थापना (1955)
 • सिंद्री खत कारखाना (झारखंड) (1951)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य 

2nd Five Year Plan | दुसरी पंचवार्षिक योजना– भौतिकतावादी योजना

2nd Five Year Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961
 • अध्यक्ष – जवाहरलाल नेहरु
 • उपाध्यक्ष – टी टी कृष्णाम्माचारी
 • प्रतिमान – तीव्र औद्योगिकीकरण भर ; भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक ; रोजगार निर्मिती साठी लघु उद्योगांवर भर (महालोनोबीस मॉडेल)
 • उद्दिष्ट-
 • 4.5% वार्षिक वृद्धीदर
 • वाहतूक व दळणवळण सर्वाधिक खर्च
 • साध्य
 • 4.2% वार्षिक वृद्धीदर
 • मोठ्या प्रमाणात चलनवाढ
 • अन्नधान्य उत्पादन – 82 mt
 • मध्यम औद्योगिक वाढ
 • महत्त्वाच्या घडामोडी
 • महाराष्ट्र राज्य निर्मिती
 • दुसरे औद्योगिक धोरण(समाजवादी समाजरचना) 1956
 • BHEL ची निर्मिती
 • नांगल आणि रुरकेला खत कारखाना -1961
 • भिलाई लोह पोलाद उद्योग (रशिया च्या मदतीने)
 • रुरकेला लोह पोलाद उद्योग (जर्मनी च्या मदतीने)
 • दुर्गापूर लोह पोलाद उद्योग (ब्रिटन च्या मदतीने)
 • आयआयटी कायदा – 1956
 • एलआयसी ची स्थापना (1956)
 • बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची स्थापना (1957)

RBI ची पतनियंत्रणाची साधन

3rd Five Year Plan | तिसरी पंचवार्षिक योजना- कृषी व उद्योग योजना

3rd Five Year Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966
 • अध्यक्ष – जवाहरलाल नेहरु आणि लालबहादूर शास्त्री
 • उपाध्यक्ष – सी एम त्रिवेदी आणि अशोक मेहता
 • प्रतिमान – सुखमोय चक्रवर्ती आणि महलोनोबिस प्रतिमान
 • उद्दिष्टे –
 • 5.6% वार्षिक वृद्धीदर
 • सार्वजनिक खर्च – 1) वाहतूक व दळणवळण 2) उद्योग 3) कृषी व सिंचन
 • साध्य –
 • 2.8% वार्षिक वृद्धीदर
 • चलनवाढ झाली
 • अन्नधान्य उत्पादन घटले
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्ध
 • गोवा मुक्तिसंग्राम (1961)
 • नागालँड ची स्थापना (1963)
 • कृषी किंमत आयोगाची स्थापना (1965 – प्रो.दांतवाला)
 • भारतीय अन्न महामंडळ ची स्थापना (1964)
 • आयडीबीआय आणि युटीआय ची स्थापना (1964)

Plan Holiday | योजना अवकाश / योजना सुटी- तीन वार्षिक योजना (स्वावलंबन योजना)

Plan Holiday:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969
 • अध्यक्ष –इंदिरा गांधी
 • उपाध्यक्ष – अशोक मेहता आणि डी आर गाडगीळ
 • प्रतिमान – महलोनोबिस प्रतिमान
 • उद्दिष्टे –
 • 5% वार्षिक वृद्धीदर
 • दुष्काळ व युद्धातून सावरणे
 • साध्य –
 • वार्षिक वृद्धीदर -3.9%
 • चलनवाढ वाढदर आधी वाढला आणि नंतर उतरला
 • अन्नधान्य उत्पादन -94 mt
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • रुपयाचे अवमूल्यन (1966) -36.5%
 • पंजाब-हरियाणा ची निर्मिती (1966)
 • हरितक्रांती ची सुरुवात
 • एचवायव्हीपी कार्यक्रम (1966-67) – तांदूळ, गहू, मका, ज्वारी, बाजरी या पिकांसाठी

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे)

4th Five Year Plan | चौथी पंचवार्षिक योजना – स्थैर्यासह आर्थिक वाढ व आर्थिक स्वावलंबन

4th Five Year Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974
 • अध्यक्ष –इंदिरा गांधी
 • उपाध्यक्ष – धनंजय गाडगीळ, सी.सुब्रमण्यम, दुर्गप्रसाद धर
 • प्रतिमान – अ‍ॅलन मान व अशोक रुद्र प्रतिमान (खुले सातत्य प्रतिमान)
 • उद्दिष्टे –
 • 5.7% वार्षिक वृद्धीदर (NDP आधारित)
 • सर्वाधिक खर्च कृषी व सिंचन आणि त्यानंतर उद्योग आणि वाहतूक दळणवळण.
 • संपत्ती व आर्थिक विकेंद्रीकरण आणि प्रादेशिक विकासावर भर
 • शिक्षण व मनुष्यबळ विकासावर भर

साध्य –

 • वार्षिक वृद्धीदर – 3.3% (10 व्या पंचवार्षिक योजने नुसार 2.05%)
 • अन्नधान्य उत्पादन – 104.7 Mt
 • चलनवाढ तीव्र
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • पाहिले शिक्षण धोरण (1968)
 • भारत-पाकिस्तान युद्ध (1971)
 • MRTP (1969)& FERA ACT(1973)
 • अनुकूल व्यापार तोल- 1972-73
 • बोकारो लोह पोलाद उद्योग (रशियाच्या मदतीने)
 • SAIL ची निर्मिती (1973)
 • ऑपरेशन फ्लड (1970)
 • अवर्षणप्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम (1973-74)
 • बँकांचे राष्ट्रीयीकरण (1969)
 • अग्रणी बँक योजना (1969)

हिमालयातील महत्वाच्या खिंडी

5th Five Year Plan | पाचवी पंचवार्षिक योजना- दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता

5th Five Year Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1973 ते 31 मार्च 1978
 • अध्यक्ष –इंदिरा गांधी
 • उपाध्यक्ष – दुर्गप्रसाद धर, पी एन हक्सर
 • प्रतिमान – अ‍ॅलन मान व अशोक रुद्र प्रतिमान (खुले सातत्य प्रतिमान)
 • उद्दिष्टे –
 • 4.4% वार्षिक वृद्धीदर(GDP आधारित)
 • गरिबी हटाओ
 • सार्वजनिक खर्च -1) उद्योग 2)कृषी व सिंचन 3)ऊर्जा

साध्य –

 • वार्षिक वृद्धीदर -4.8%
 • भरमसाठ चलनवाढ (25%)
 • अन्नधान्य उत्पादन – 126mt

महत्त्वाच्या घडामोडी – 

 • पोखरण चाचणी (1974)
 • सिक्कीम ला राज्याचा दर्जा
 • 42 वी घटना दुरुस्ती आणि आणीबाणी ची सुरुवात
 • अनुकूल व्यापरतोल (1976-77)
 • पाहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण (1976)
 • TRYSEM, ICDS आणि DDP या योजना सुरू झाल्या
 • RRB ची स्थापना (1975)
 • HDFC ची स्थापना (1977)

भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव 

Rolling Plan | सरकती योजना – जनता दलची योजना

Rolling Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980
 • अध्यक्ष – मोरारजी देसाई आणि चरणसिंग
 • उपाध्यक्ष – डी. टी. लकडावाला
 • प्रतिमान – गुन्नार मिर्डाल प्रतिमान
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना (1978)
 • कामासाठी अन्न योजना (1979)

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये- वने व वनांचे प्रकार 

6th Five Year Plan | सहावी पंचवार्षिक योजना- दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती

6th Five Year Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985
 • अध्यक्ष –इंदिरा गांधी आणि राजीव गांधी
 • उपाध्यक्ष – एन डी तिवारी , शंकरराव चव्हाण आणि पी व्ही नरसिंहराव
 • प्रतिमान – अ‍ॅलन मान व अशोक रुद्र प्रतिमान आणि लक्ष्य समूह (टार्गेट ग्रुप) संकल्पना वापरण्यास सुरुवात
 • उद्दिष्टे – 
 • 5.2% वार्षिक वृद्धीदर
 • सार्वजनिक खर्च – 1) ऊर्जा 2) कृषी व सिंचन 3) उद्योग
 • दारिद्र्य निर्मूलन
 • साध्य – 
 • वार्षिक वृद्धीदर -5.7%
 • अन्नधान्य उत्पादन – 145 mt
 • चलनवाढ आटोक्यात आली
 • औद्योगिक वृद्धीदर कमी
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • भोपाळ गॅस दुर्घटना (1984)
 • एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (1980)
 • राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (1980)
 • ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांसाठी विकास योजना(1982)
 • बँकांचे राष्ट्रीयीकरण (1980)
 • नाबार्ड ची स्थापना (1982)

7th Five Year Plan | सातवी पंचवार्षिक योजना- रोजगार निर्मितीजनक योजना

7th Five Year Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990
 • अध्यक्ष – राजीव गांधी आणि व्ही पी सिंग
 • उपाध्यक्ष – मनमोहन सिंग , पी शिवशंकर , माधवसिंग सोळंकी आणि रामकृष्ण हेगडे
 • प्रतिमान – ब्रह्मानंद – वकील प्रतिमान (वेज गुड्स मॉडेल) आणि खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात आले
 • उद्दिष्टे –  
 • वार्षिक वृद्धीदर – 5%
 • सार्वजनिक खर्च – 1) ऊर्जा 2)कृषी व सिंचन 3) सामाजिक सेवा
 • साध्य – 
 • वार्षिक वृद्धीदर- 6%
 • अन्नधान्य उत्पादन – 171 mt
 • चलनवाढ वाढत गेली
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • इंदिरा आवास योजना (1985)
 • ग्रामीण क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी CAPART ची स्थापना (1986)
 • जवाहर रोजगार योजना (1989)
 • नेहरू रोजगार योजना (1989)
 • दुसरे शिक्षण धोरण (1986)
 • खडू फळा मोहीम (1987)
 • राष्ट्रीय गृह बँकेची स्थापना (1988)

महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली

Yearly Plans  | वार्षिक योजना- स्वावलंबन योजना

Yearly Plans:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1990 ते 31 मार्च 1991 आणि 1 एप्रिल 1991 ते 31 मार्च 1992
 • अध्यक्ष –चंद्रशेखर आणि नरसिंहराव
 • उपाध्यक्ष – मधू दंडवते , मोहन धारिया आणि प्रणब मुखर्जी
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • एलपीजी मॉडेल स्वीकारले आणि नवीन औद्योगिक धोरण
 • हर्षद मेहता घोटाळा (1991)
 • सेबी ची स्थापना (1992)
 • रुपयाचे अवमूल्यन
 • रुपया चालू खात्यावर अर्ध-परिवर्तनीय

8th Five Year Plan | आठवी पंचवार्षिक योजना- मनुष्यबळ विकास योजना

8th Five Year Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997
 • अध्यक्ष – नरसिंहराव आणि एच डी देवेगौडा
 • उपाध्यक्ष – प्रणब मुखर्जी आणि मधू दंडवते
 • प्रतिमान – उ-खा-जा किंवा राव-मनमोहन प्रतिमान आणि जॉन मिलर मॉडेल
 • उद्दिष्टे –  
 • मानवी विकासाला सर्वाधिक प्राधान्य
 • वार्षिक वृद्धीदर -5.6%
 • सार्वजनिक खर्च – 1) ऊर्जा 2) सामाजिक सेवा 3) कृषी व सिंचन
 • साध्य – 
 • वार्षिक वृद्धीदर – 6.7%
 • संरचनात्मक समायोजन सुधारणा
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • 73 वी आणि 74 वी घटनादुरुस्ती (1993)
 • रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय
 • खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम(1993)
 • मध्यान्ह आहार योजना(1995)
 • गंगा कल्याण कार्यक्रम (1997)

9th Five Year Plan | नववी पंचवार्षिक योजना- सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ

9th Five Year Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002
 • अध्यक्ष –आय.के.गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी
 • उपाध्यक्ष – मधू दंडवते, जसवंत सिंग आणि के.सी.पंत
 • उद्दिष्टे –  
 • वार्षिक वृद्धीदर – 6.5%
 • सार्वजनिक खर्च – 1) उद्योग 2) ऊर्जा 3) सामाजिक सेवा
 • साध्य – 
 • वार्षिक वृद्धीदर – 5.5%
 • चलनवाढ कमी झाली
 • अन्नधान्य उत्पादन – 212 mt
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • पोखरण अणू चाचणी II (1998)
 • कारगिल युद्ध (1999)
 • FEMA कायदा (2000)
 • स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना (1997)
 • स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना (1999)
 • पंतप्रधान ग्रामोदय योजना (2000-01) – आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण, विद्युतीकरण, पेयजल,
 • पोषण यावर भर देऊन मानवी विकास
 • सर्व शिक्षा अभियान (2000-01)
 • संपूर्ण स्वच्छता अभियान (1999)

महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते: घाटाचे नाव व जोडली जाणारी ठिकाणे

10th Five Year Plan | दहावी पंचवार्षिक योजना- शिक्षण योजना / लोकांची योजना

10th Five Year Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007
 • अध्यक्ष – अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग
 • उपाध्यक्ष – के सी पंत आणि मॉंटेकसिंग अहलुवालिया
 • उद्दिष्टे –  
 • वार्षिक वृद्धीदर – 7.9%
 • कृषी क्षेत्र- अर्थव्यवस्थेचे प्रेरक बळ आणि गाभा क्षेत्र
 • MDGs चा प्रभाव होता
 • सामाजिक, आर्थिक व लैंगिक सबलीकरण
 • राज्यांना विकासाचे मोजता येणारे लक्ष्य
 • 50 दशलक्ष रोजगारनिर्मिती
 • औद्योगिक उत्पादन 10% वृद्धीदर
 • सार्वजनिक खर्च – 1)सामाजिक सेवा 2) ऊर्जा 3)वाहतूक दळणवळण
 • साध्य – 
 • वार्षिक वृद्धीदर – 7.7%
 • औद्योगिक वृद्धीदर -8.2%
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना(2004)
 • भारत- अमेरिका नागरी अणू करार (2005)
 • भारत निर्माण योजना (2005) गृहनिर्माण, सिंचन, पेयजल, रस्ते, विद्युतीकरण, दूरसंचार यांवर भर
 • जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान योजना (2005)
 • FRBM कायदा (2004)
 • जननी सुरक्षा योजना (2005)
 • एनआरएचएम (2005)

सर्वोच्च न्यायालय: न्यायाधीशांची पात्रता व नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य

11th Five Year Plan | अकरावी पंचवार्षिक योजना- गतिशील आणि सर्वसमावेशक विकास

11th Five Year Plan:

 • कार्यकाल – एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012
 • अध्यक्ष –मनमोहन सिंग
 • उपाध्यक्ष – मॉंटेकसिंग अहलुवालिया
 • उद्दिष्टे –  
 • वार्षिक वृद्धीदर-9%
 • दरडोई जीडीपी वृद्धीदर – 7.6%
 • दारिद्र्य 10% ने कमी करणे
 • सुशिक्षित बेरोजगारी 5% च्या खाली आणणे
 • विद्यार्थ्यांची गळतीप्रमाण 20% वर आणणे
 • साक्षरता -85% करणे
 • उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 15% करणे
 • शिशु मृत्यदर 28 व माता मृत्यदर 100 पर्यंत कमी करणे
 • एकूण जननदर 2.1 आणणे
 • 2009 पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणीपुरवठा
 • 2009 पर्यंत सर्व खेडी व दारिद्र्य रेषेखालील लोकांना विजजोडणी करून देणे
 • 2012 पर्यंत सर्वांना ब्रॉडबँड सेवा पुरविणे
 • वने व आच्छादित क्षेत्रात 5% वाढ करणे
 • ऊर्जा कार्यक्षमता 20% ने वाढविणे
 • 2011 पर्यंत सर्व नद्या व शहरी घनकचरा व्यवस्थापन करून स्वच्छ करणे
 • सार्वजनिक खर्च- 1) ग्रामीण विकास      2) वाहतूक व ऊर्जा     3) शिक्षण
 • साध्य – 
 • 92% खेड्यांना वीज
 • 70% बीपीएल लोकांना वीज
 • 69% भारतनिर्माण योजना पूर्ण
 • शिशू मृत्युदर – 40
 • मातामृत्यू दर – 167
 • जननदर- 2.3
 • साक्षरता – 73%
 • वार्षिक वृद्धीदर – 7.9%
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • जागतिक आर्थिक मंदी (2008)
 • मुंबई हल्ला (2008)
 • साक्षर भारत अभियान (2009)
 • शिक्षण हक्क कायदा (2009)
 • प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रम (2010)
 • राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (2009)
 • NAPCC ची सुरुवात (2008)

12th Five Year Plan | बारावी पंचवार्षिक योजना- गतिशील, अधिक समावेशक आणि शाश्वत विकास

12th Five Year Plan:

 • कार्यकाल – 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017
 • अध्यक्ष –मनमोहन सिंग (2017 पर्यंतच)
 • उपाध्यक्ष – मॉंटेकसिंग अहलुवालिया (2017 पर्यंतच)
 • उद्दिष्टे –   
 • जीडीपी वृद्धीदर 8.2%
 • कृषी वृद्धीदर – 4%
 • उत्पादन वृद्धीदर – 10%
 • दारिद्र्य 10% ने कमी करणे
 • 50 दशलक्ष रोजगार निर्मिती
 • सरासरी शैक्षणिक वर्षात 7 वर्षे वाढ
 • शैक्षणिक असमानता दूर करणे
 • माता मृत्युदर 1 , शिशु मृत्यूदर 25 व बाल लिंगगुणोत्तर 950 पर्यंत करणे
 • जननदर 2.1 आणणे
 • सिंचित क्षेत्राचे प्रमाण 103 दशलक्ष हेक्टर करणे
 • ग्रामीण टेलीडेन्सीटी 70% करणे
 • वायूउत्सर्जन 25% कमी करणे
 • वनच्छादित क्षेत्रात 1 दशलक्ष हेक्टर ची वाढ करणे
 • 30000 मेगावॅट पुनर्निर्मिती क्षम ऊर्जा
 • सार्वजनिक खर्च – 1)ग्रामीण विकास 2) शिक्षण 3) वाहतूक व ऊर्जा
 • साध्य – 
 • वृद्धीदर – 6.9%
 • शिशु मृत्युदर – 34 (2016)
 • माता मृत्यूदर – 130 (2016)
 • जननदर – 2.3 (2016)
 • महत्त्वाच्या घडामोडी – 
 • एनएसडीएम आणि एनएसडीए ची स्थापना
 • राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती कार्यक्रम (2013)
 • राष्ट्रीय कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान अभिमान (2014)
 • उन्नत भारत अभियान (2014)
 • पढे भारत बढे भारत (2014)
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान (2013)

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण पंचवार्षिक योजना या प्रकरणाची उजळणी करू शकता. येणाऱ्या MPSC संयुक्त पूर्व परीक्षेत या घटकावर आधारित कमीत कमी एक प्रश्न विचारला जातो त्यामुळे या लेखाचा आपल्याला फायदा होईल.

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तुम्हाला हेही बघायला आवडेल

वित्तीय आणीबाणी: कलम 360

मूलभूत कर्तव्ये: कलम 51A

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

राज्यातील राष्ट्रपती राजवट: कलम 356

मूलभूत कर्तव्ये: कलम 51A | Fundamental Duties: Article 51A

राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार 

1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय

सर्वोच्च न्यायालय: न्यायाधीशांची पात्रता व नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य

ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल

भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी, 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश 2021

RBI ची पतनियंत्रणाची साधन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य 

राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या

हिमालयातील महत्वाच्या खिंडी

भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव 

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये- वने व वनांचे प्रकार 

भारतातील सर्वात मोठे राज्य 2021: क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार सर्व राज्यांची यादी

पंतप्रधान: अधिकार व कार्यें आणि मंत्रिमंडळ

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers in Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds and Types of clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks in India – State-wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List of Countries and their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उ

Latest Job Alert:

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या रिक्त पदसंख्येत वाढ

IBPS Clerk 2021 अधिसूचना जाहीर | IBPS Clerk 2021 Notification Out

SBI PO अधिसूचना 2021 | SBI PO Notification 2021

IBPS PO 2021 अधिसूचना जाहीर

FAQ- Five Year Plans | पंचवार्षिक योजना

Q1. योजना आयोगाची स्थापना कधी झाली?

उत्तर: योजना आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली.

Q2. राष्ट्रीय विकास आयोगाची स्थापना कधी झाली?

उत्तर: राष्ट्रीय विकास आयोगाची स्थापना 6 ऑगस्ट 1952 रोजी झाली.

Q3. योजना आयोगाचे सध्याचे प्रारूप कोणते?

उत्तर: योजना आयोगाचे सध्याचे प्रारूप निती आयोग आहे.

Q4. निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?

उत्तर: निती आयोगाचे अध्यक्ष प्रधानमंत्री असतात.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | Five Year Plans of India (1951 to 2017)_50.1
यशदा संयुक्त पूर्व परीक्षा विशेष बॅच

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑक्टोबर 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.

Was this page helpful?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Change PasswordJoin India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?