Supreme Court, Jurisdiction and Powers Of SC: In this article candidates can see detail information about Supreme Court. We have provided the Jurisdiction and Powers of Supreme Court. This article is very helpful for upcoming Talathi and other Saral seva bharti Exams.
Supreme Court | |
Article Name | Jurisdiction and Powers of Supreme Court |
Useful for | Competitive Exams |
Category | Study Material |
Supreme Court: स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या अंतर्गत आपण दररोज सामान्य ज्ञान विषयातील परीक्षेला उपयोगी असे विविध Topics चा अभ्यास करणार आहोत. तर चला आजच्या या लेखात आपण राज्यशास्त्र या विषयावरील सर्वोच्च न्यायालय: सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र व अधिकार | Supreme Court: Jurisdiction and Powers Of SC यावर चर्चा करणार आहोत.
Types of Amendments & Constitutional Amendment Process in India- Article 368
Supreme Court: Jurisdiction and Powers Of SC: सर्वोच्च न्यायालयाचे(Supreme Court) अधिकारक्षेत्र म्हणजे त्याच्या खटले चालविण्याच्या व त्यांवर निकाल देण्याच्या अधिकाराची व्याप्ती होय. भारताच्या घटनेने सर्वोच्च न्यायालयाला खूप व्यापक अधिकारक्षेत्र व अधिकार प्रदान केलेले आहेत. ते अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे एक फेडरल कोर्ट म्हणूनही कार्य करते, तसेच ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्स प्रमाणे अपिलाचे अंतिम न्यायालय म्हणूनही कार्य करते. तसेच, ते घटनेचा संरक्षणकर्ता व घटनेचा अंतिम अर्थ लावण्याच्या कार्याबरोबरच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदार म्हणूनही कार्य करते.
सर्वोच्च न्यायालयाला घटनेने प्रदान केलेल्या अधिकारक्षेत्र व अधिकारांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे:
Important Rivers in Maharashtra
Supreme Court: Jurisdiction and Powers Of SC: सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकारक्षेत्राची तरतूद कलम 131 मध्ये देण्यात आली आहे. फेडरल कोर्ट या नात्याने सर्वोच्च न्यायालय(Supreme Court) भारताच्या संघराज्यातील विविध घटकांमधील तंट्यांवर निकाल देते. हे तंटे पुढील प्रकारचे असू शकतात:
वरील प्रकारचे तंटे सोडविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राला प्रारंभिक अधिकारक्षेत्र असे म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाचे हे अधिकारक्षेत्र असमावेशक व प्रारंभिक(exclusive and original) स्वरूपाचे आहे. इतर कोणतेही न्यायालय अशा तंट्यांवर निर्णय देऊ शकत नाही, म्हणून ते असमावेशक आहे, तर असे तंटे थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल करता येतात, म्हणून त्याला प्रारंभिक अधिकारक्षेत्र असे म्हणतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकारक्षेत्राच्या व्याप्तीमध्ये पुढील बाबींचा समावेश होणार नाही:
Chief Minister Role and Function
Supreme Court: Jurisdiction and Powers Of SC: घटनेने सर्वोच्च न्यायालयाला नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा संरक्षक व हमीदार बनविले आहे. म्हणजेच, घटनेच्या कलम 32 अन्वये नागरिकांचे मूलभूत हक्क बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास विविध प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे. उदा. हेबियस कॉर्पस, मँडमस, प्रोहिबिशन, सर्शिओराराय आणि को वारंटो. यालाच सर्वोच्च न्यायालयाचे(Supreme Court) प्राधिलेख अधिकारक्षेत्र असे म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाचे प्राधिलेख अधिकारक्षेत्र हे सुद्धा प्रारंभिक अधिकारक्षेत्रच आहे, कारण हक्कांचे उल्लंघन घालेला व्यक्ती थेट (directly) सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो, त्याला अपिलाच्या मार्गाने जाण्याची आवश्यकता नसते.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा प्राधिलेख अधिकार ‘प्रारंभिक असला तरी ‘असमावेशक’ (exclusive) नाही, तर उच्च न्यायालयाबरोबर ‘समवर्ती’ (concurrent) आहे, कारण घटनेने असे प्राधिलेख काढण्याचा अधिकार कलम 226 अन्वये उच्च न्यायालयासुद्धा दिलेला आहे.
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या प्राधिलेख काढण्याच्या अधिकारांमध्ये फरक आहे तो पुढीलप्रमाणे: सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्क बजावण्यासाठीच प्राधिलेख काढू शकते, तर उच्च न्यायालय मूलभूत हक्क बजावण्याबरोबरच इतरही उद्देशांसाठी काढू शकते. म्हणजेच, उच्च न्यायालयाचे प्राधिलेख अधिकारक्षेत्र सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रापेक्षा अधिक व्यापक आहे.
Supreme Court, Jurisdiction and Powers Of SC: सर्वोच्च न्यायालय मूलत: अपिलाचे न्यायालय म्हणून कार्य करते. त्यानुसार, उच्च न्यायालय आणि प्रशासकीय न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराला त्याचे अपिलाचे किंवा पुनर्विचाराचे अधिकारक्षेत्र असे म्हणतात.
सर्वोच्च न्यायालयास अपिलाचे व्यापक अधिकारक्षेत्र प्राप्त असून अशा अपिलांचे पुढील चार गट केले जातात:
Supreme Court: Jurisdiction and Powers Of SC: घटनेच्या कलम 143 अन्वये, राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील दोन बाबतीत सल्ला मागण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे:
Supreme Court: Jurisdiction and Powers Of SC: कलम 129 अन्वये, सर्वोच्च न्यायालय(Supreme Court) हे अभिलेख न्यायालय(A Court of Record) असेल आणि त्यास अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. अभिलेख न्यायालय या नात्याने सर्वोच्च न्यायालयास पुढील दोन अधिकार असतात:
Social Reformers of Maharashtra- Part 1
Supreme Court: Jurisdiction and Powers Of SC: केंद्र तसेच राज्यांच्या कायद्यांची तसेच कार्यकारी आदेशांची घटनात्मकता तपासण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारास न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात. जर असे कायदे किंवा कार्यकारी आदेश घटनेच्या तरतुदींशी विसंगत(ultra-vires) असल्याचे आढळले तर, ते अवैध, घटनाविरोधी व निरुपयोगी असून त्यांचा प्रभाव शून्यवत(null and void) असल्याचे घोषित करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो. एखाद्या कायद्याच्या किंवा कार्यकारी आदेशाच्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात पुढील आधारांवर आव्हान देता येऊ शकते:
Social Reformers of Maharashtra – Part 2
Supreme Court: Jurisdiction and Powers Of SC: सर्वोच्च न्यायालयाचे(Supreme court) इतर अधिकार पुढीलप्रमाणे:
Q.1 सर्वोच्च न्यायालयास प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे का ?
Ans. हो, कलम 32 नुसार,सर्वोच्च न्यायालयास प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे.
Q.2 राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?
Ans. राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.
Q.3 राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागण्याचा अधिकार आहे का ?
Ans: कलम 143 नुसार, राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागण्याचा अधिकार आहे.
Q.4 सर्वोच्च न्यायालय: सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र व अधिकार याची माहिती कुठे मिळेल?
Ans.सर्वोच्च न्यायालय: सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र व अधिकार याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
Yes, as per Article 32, the Supreme Court has the power to issue writs.
Information on the topic of Political Science can be found on Adda247 Marathi app and website.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 1 मे 2024 पासून लागू होणार…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…
Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…
राष्ट्रीय बातम्या चिनी आयातीवर भारताचे अवलंबित्व: ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने चिनी आयातीवरील भारताच्या अवलंबनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे,…