Marathi govt jobs   »   Study Materials   »   Information about Nutrition and Food

पोषण आणि आहार | Nutrition and Food: Study Material for Arogya and ZP Bharti 2021

Nutrition and Food: Study Material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य व जिल्हा परिषद परीक्षा मध्ये तांत्रिक विषयांमध्ये एकूण 40 प्रश्न विचारले जातात. यातील महत्त्वाचा घटक म्हणजे पोषण व आहार. हा घटक तांत्रिक विषय सोबत सामान्य विज्ञान या विषयात देखील येतो त्यामुळे याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण विविध सरकारी आरोग्यविषयक योजना या अन्नातील घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांवर आहेत. त्यामुळे यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून याचा अभ्यास करणे आपल्याला फार आवश्यक आहे. आज आपण पोषण व आहाराबद्दल (Nutrition and Food) या लेखांमध्ये माहिती बघणार आहोत जे तुमच्या मार्कांमध्ये वाढ करू शकतात.

Nutrition and Food : Study Material for Arogya and ZP Bharti 2021 | पोषण आणि आहार : आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य

Nutrition and Food : Study Material for Arogya and ZP Bharti 2021:  वाढ आणि विकास सर्वसामान्य तऱ्हेने होण्यासाठी सुयोग्य पोषण आवश्यक असते. कुपोषणामुळे केवळ शारीरिक वाढ व विकास नव्हे त व्यक्तिच्या बौद्धिक क्षमतेवर तसेच आकलन शक्ती व वर्तनावर विपरीत परिणाम होतात. गरोदरपणात स्त्रीचे कुपोषण झाल्यास गर्भावर त्याचे वाईट परिणाम होतात. जसे की, मृत अपत्याचा जन्म, अपुऱ्या दिवसाचे मूल, पूर्ण दिवसाचे पण अपुऱ्या वाढीचे मुल इ. बालपणीच्या पूर्वार्धात कुपोषणामुळे शारीरिक व मानसिक वाढ मंद होते. अशी बालके (माईल स्टोन) फार हळुहळु वाढतात. माईल स्टोन म्हणजे – ठराविक कालावधीत बालकांच्या शारीरिक व मानसिक वाढ व विकासाने गाठलेल्या टप्पा अशी मुले शाळेतल्या अभ्यासातही मागे पडतात. प्रौढामध्ये देखिल सुयोग्य आरोग्य आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी चांगल्या पोषणाची आवश्यकता असते. थोडक्यात आपणास असे म्हणता येईल की, पोषणाचे बरे वाईट परिणाम माणसाच्या आयुष्यावर जन्मापासून मृत्यू पर्यंत होत असतात.

महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

Nutrition and Food: Dietary elements or basics | पोषण आणि आहार : आहाराचे घटक किंवा मूलतत्त्वे

Nutrition and Food: Dietary elements or basics: सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांच्या वाढ व इतर सर्व कामासाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात आणि या कामासाठी उपयोगी पडणाऱ्या अन्न घटकांना पोषकतत्वे म्हणतात. आपण खातो त्या विविध अन्नपदार्थांमध्ये ही पोषक तत्त्वे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. आपल्या अन्नातील पोषकतत्वे खालीलप्रमाणे आहेत. 

nutrition and food
पोषक अन्न घटक
  1. उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. (मुख्यत: पिठूळ पदार्थ)
  2. शरीराच्या घडणीसाठी लागणारे पदार्थ: प्रथिने.
  3. चयापचयासाठी व प्रतिकारशक्तीसाठी सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असणारी विविध जीवनसत्त्वे
  4. क्षार : लोह, चुना, इत्यादी खनिज पदार्थ
  5. पाणी (रोजची गरज एक ते दीड लिटर)
  6. मलविसर्जनासाठी व पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारा चोथा

जिल्हा परिषद भरती मागील वर्षांच्या परीक्षेचे विश्लेषण पाहण्यसाठी येथे क्लिक करा.

Nutrition and Food: Dietary element – Carbohydrates | पोषण आणि आहार : आहाराचे घटक – कर्बोदके

Nutrition and Food:Dietary element – Carbohydrates: शरीरातले प्रत्येक काम पार पाडण्यासाठी कार्यशक्तीची गरज लागते. मोटारसायकलला जसे पेट्रोल लागते, इंजिनाला डिझेल, कोळसा लागतो, पंपाला वीज लागते, मोबाईल फोनला जसे चार्जिंग लागते तशीच शरीराला या कार्यशक्तीची गरज असते. ही कार्यशक्ती उष्मांकाच्या भाषेत समजावून घेऊया. एक उष्मांक म्हणजे एक कॅलरी. आहारशास्त्रात किलो कॅलरी हे माप वापरतात. एक किलो कॅलरी म्हणजे एक लिटर पाण्याचे तापमान एक सेंटीग्रेडने वाढवायला जेवढी कार्यशक्ती (उष्णता) लागते तेवढी. आपल्याला माहीत आहेच, की सर्व विश्वातली शक्ती किंवा ऊर्जा ही निरनिराळया स्वरूपांत बदलू शकते.उदा. सूर्याची प्रखर उष्णता किंवा आग पाण्याची वाफ करते आणि ही वाफ कोंडून ती शक्ती वापरता येते. समुद्रावर तयार होणारे वारे लाटा निर्माण करतात आणि या लाटा किंवा वारा वापरून (पाणचक्की, पवनचक्कीने) वीज तयार करता येते. ही वीज वापरून अनेक प्रकारची कामे करता येतात. म्हणजेच ऊर्जा किंवा कार्यशक्ती ही अनेक रूपांत मिळते.

स्त्रोत: फळे, भाज्या आणि मध, साखर मध्ये सुक्रोज आणि दुधात लैक्टोज, तर कॉम्प्लेक्स पॉलीसेकेराइड्स अन्नधान्य, बाजरी, डाळी

Nutrition and Food: Dietary element – Protin | पोषण आणि आहार : आहाराचे घटक – प्रथिने

Nutrition and Food: Dietary element – Protin: प्रथिने ही नत्रयुक्त आम्लांची (nitric acid) बनलेली असतात. शरीराच्या बांधणीत प्रथिने हा मुख्य घटक असतो. याशिवाय शरीरातल्या अनेक कामांसाठी प्रथिने ही यंत्रे,हत्यारे आणि उपकरणे म्हणून वापरली जातात. आपण स्नायूंचे उदाहरण घेऊ या. स्नायू अनेक तंतूंचे बनलेले असतात. हे स्नायूतंतू म्हणजे विशिष्ट अणुरचना असणारी दोन प्रकारची प्रथिने असतात. त्यांचे वैशिष्टय म्हणजे ती एकमेकांवर सरकून स्नायूंची लांबी कमी होते (स्नायूंचे आकुंचन) आणि परत सैल होण्यासाठी ती प्रथिने एकमेकांपासून लांब सरकतात. हे काम प्रथिनांमुळेच होते.

दुसरे उदाहरण श्वसनाचे. रक्तातल्या तांबडया पेशीत हिमोग्लोबीन नावाचे प्रथिन असते. या प्रथिनाला प्राणवायूचे आकर्षण असते व त्यामानाने कार्बवायूचे कमी आकर्षण असते. या विशिष्ट गुणधर्मामुळे फुप्फुसात रक्तपेशी प्राणवायू घेऊन कार्बवायू सोडतात.

स्त्रोत : तृणधान्ये, बाजरी आणि डाळींचे मिश्रण, दुध, अंडी, मांस

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Nutrition and Food: Dietary element – Vitamins and minerals | पोषण आणि आहार: आहाराचे घटक – जीवनसत्व व खनिजे

Nutrition and Food: Dietary element – Vitamins and minerals: जीवनसत्त्वे ही रासायनिक संयुगे असतात जी शरीराला कमी प्रमाणात आवश्यक असतात. ते आहारात असणे आवश्यक आहे कारण ते शरीरात संश्लेषित केले जाऊ शकत नाही. शरीरातील असंख्य प्रक्रियांसाठी आणि त्वचा, हाडे, नसा, डोळा, मेंदू, रक्त आणि श्लेष्मल त्वचा यांच्या संरचनेसाठी जीवनसत्त्वे आवश्यक असतात. ते एकतर पाण्यात विरघळणारे किंवा चरबी-विद्रव्य असतात.

खनिजे शरीरातील द्रव आणि ऊतींमध्ये आढळणारे अजैविक घटक आहेत. महत्त्वपूर्ण मॅक्रो खनिजे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सल्फर आहेत, तर जस्त, तांबे, सेलेनियम, मोलिब्डेनम, फ्लोरीन, कोबाल्ट, क्रोमियम आणि आयोडीन हे सूक्ष्म खनिजे आहेत. ते त्वचा, केस, नखे, रक्त आणि मऊ ऊतकांच्या देखभाल आणि अखंडतेसाठी आवश्यक आहेत. ते तंत्रिका पेशींचे संचरण, acidसिड/बेस आणि द्रव संतुलन, एंजाइम आणि संप्रेरक क्रियाकलाप तसेच रक्ताच्या गोठण्याच्या प्रक्रियेस देखील नियंत्रित करतात.

केंद्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजनांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जीवनसत्वे स्त्रोत व त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार

जीवनसत्व

(Vitamins)

शास्त्रीय नाव

(Scientific Name)

शरीराला आवश्यक का आहे?

(What we use it for?)

स्त्रोत

(Sources)

कमतरतेमुळे होणारे आजार

(Difficiency due to lack of vitamins) 

A रेटिनॉल

(Retinol)

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणे हिरव्या भाज्या जसे कि पालक, मेथी, हरबरा, दुध, मका, मोड आलेले कडधान्य रातांधळेपणा
B-1 थायमिन

(Thymin)

B जीवनसत्व विकारांसोबत चयापचय क्रियेत सहभागी होते हिरव्या भाज्या जसे कि पालक,  हरबरा, दुध, मांस, अंडी, काजू, बटाटा, सफरचंद, चिकू
  • बेरीबेरी
  • डायरिया
  • पेलाग्रे
B-2 रायबोफ्लेवीन

(Rayaboflevin)

B-3 निओक्सिन

(Niacin)

B-5 पँटोथिनिक ऍसिड

(Pantothenic Acid)

B-7 बायोटीन

(Biotin)

B-9 फॉलीक ऍसिड

(Folic Acid)

 

B-12 कोबालमिन

(Cobalamin)

C अँस्कॉर्बिक ऍसिड

(Ascorbic acid)

  • कुठलीही जखम लवकरात लवकर भरण्यास मदत होते.
  • जेवणातील जास्तीत जास्त लोह शोषून घेते.
  • रक्तातील केश वाहिन्यांची कार्यक्षमता वाढवितो.
आंबट फळे, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, पेरू, चिंच स्कर्व्ही
D कॅल्शिफेरॉल

(Calciferol)

  • हाडे मजबूत करणे
  • हाडे व दाताचा विकास करून मजबूत करणे
  • जखम झाल्यानंतर रक्त लवकर थांबणे (जमा होणे)
कोवळे सूर्यकिरण, अंडी, मासे, कॉड लिव्हर ऑइल
  • मूडधूस,
  • रिकेट्स
  • ऑस्टियोमलेशिया

 

E टोकोफ़ेरल

(Tocopherol)

चरबीयुक्त पदार्थांना सामोरे जाणाऱ्या ऊती आणि पेशीच्या पडद्याच्या निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. वनस्पती तेल आणि इतर अनेक खाद्यपदार्थ प्रजनन क्षमता कमी होणे

Nutrition and Food: Balance Diet | पोषण आणि आहार: संतुलित आहार

Nutrition and Food: Balance Diet: संतुलित आहाराच्या कल्पनेप्रमाणे जेवणात पिठूळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने,क्षार, जीवनसत्त्वे या सर्वांचा पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी या धान्यांबरोबर डाळी, शेंगदाणे, भाजीपाला, फळभाजी, फळे, तेल, तूप इतक्या गोष्टी आवश्यक असतात. हे पदार्थ अगदी रोज नाही तरी आठवडयातून दोन-तीन वेळेस अदलून बदलून मिळावेत. दूध हा तसा संपूर्ण पण महाग आहार आहे. दूध, शेंगदाणे, इत्यादींतून मिळणारी प्रथिने तुलनेने ‘महाग’ प्रथिने आहेत आणि ज्वारी, बाजरीतून मिळणारी प्रथिने स्वस्त आहेत. प्राणिज पदार्थ, मांस, मासे, अंडी ही महाग प्रथिने आहेत. त्यातल्या त्यात अंडे सर्वात स्वस्त व परिपूर्ण प्राणिज प्रथिन आहे.

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजनांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चौरंगी आहार कल्पना

आहारशास्त्र सर्वांना सोपे करून सांगण्यासाठी चौरंगी आहार ही कल्पना चौरस आहार म्हणून सांगता येईल. चौरंगी म्हणजे चार रंग. पांढरा, पिवळा हिरवा, लाल. कोणत्याही जेवणात हे चार रंग असावे म्हणजे आहार चौरस होतो.

food pyramid
संतुलित आहार पिरॅमिड

पांढरा – भात, कांदा, लसूण, अंडे, दूध, फ्लॉवर, कोबी
पिवळा – भाकरी, चपाती, वरण, पिवळी फळे, लिंबू, भोपळा, पेरु
हिरवा – हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या
लाल – फळभाज्या, (टोमॅटो), गाजर, मांस, मिरची
(यातील मांसाहारी पदार्थ ऐच्छिक आहेत) ही कल्पना वापरून आहारात समतोलता आणता येते.

Study material for Arogya and ZP Bharti 2021 | आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य

Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 मध्ये तांत्रिक विषयाला 40 % वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का  अभ्यास असणे आवश्यक आहे. कारण हाच विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी तांत्रिक विषयातील सर्व टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आरोग्य भरतीच्या गट क च्या 24 ऑक्टोबर 2021 व गट ड च्या 31 ऑक्टोबर 2021 ला होणाऱ्या व आगामी जिल्हा परिषदेच्या  पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तांत्रिक विषयातील टॉपिक 

National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Latest Job Alert:

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या रिक्त पदसंख्येत वाढ

IBPS Clerk 2021 अधिसूचना जाहीर | IBPS Clerk 2021 Notification Out

SBI PO अधिसूचना 2021 | SBI PO Notification 2021

FAQs Census of India: Important Points of India Census 2011

Q1. विटामिन B-1 चे शास्त्रीय नाव काय?

Ans. विटामिन B-1 चे शास्त्रीय नाव थायमिन असे आहे.

Q2. कोवळ्या सूर्यकिरणातून कोणते विटामिन मिळते?

Ans. कोवळ्या सूर्यकिरणातून विटामिन D मिळते.

Q3. संतुलित आहार म्हणजे काय?

Ans. जेवणात पिठूळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने,क्षार, जीवनसत्त्वे या सर्वांचा पुरेसा समावेश असलेला आहार म्हणजे संतुलित आहार.

Q4. आरोग्य भरती व जिल्हा परिषद भरतीचे तांत्रिक विषयातील घटक मला कुठे पाहायला मिळतील?

Ans. Adda247 मराठीच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला यासंबंधी सर्व माहिती मिळणार आहे. 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Full Length Mock Online Test Series
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पदांसाठी टेस्ट सिरीज

Sharing is caring!