Marathi govt jobs   »   Study Materials   »   Information about Maharashtra Government Health Schemes

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजना | Maharashtra Government Health Schemes : Study material for Arogya and ZP Bharti 2021

Maharashtra Government Health Schemes : Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य व जिल्हा परिषद परीक्षे मध्ये तांत्रिक विषयांमध्ये एकूण 40 प्रश्न विचारले जातात  त्यात सगळ्यात जास्त विचारला जाणारा टॉपिक म्हणजे सरकारी योजना. यावर एकूण 9-10 प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा विषय गेम चेंजर ठरू शकतो.  याचा अभ्यास करणे आपल्याला फार आवश्यक आहे. Adda 247 मराठी, सर्व तांत्रिक विषयाचे  टॉपिक कव्हर करणार आहे. आज आपण आरोग्य विभागाशी निगडीत महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांबद्दल या लेखांमध्ये माहिती बघणार आहोत जे तुमच्या मार्कांमध्ये वाढ करू शकतात.

Maharashtra Government Health Schemes : Study material for Arogya and ZP Bharti 2021 | महाराष्ट्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजना : आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य

Maharashtra Government Health Schemes : Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य विभाग व जिल्हा परिषद विभागामध्ये तांत्रिक विषयामध्ये विविध योजना येतात हे आपण पाहिलेले आहे.  आज आपण या लेखांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या योजनांची माहिती पाहणार आहोत जेणेकरून हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला दोन-तीन मार्कांचा नक्की फायदा होईल. तसेच याआधी  आपण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये  येणाऱ्या विविध योजना/ कार्यक्रम  याबद्दल थोडक्यात पण महत्त्वाची माहिती बघितली आहे. त्याच्या सर्व लिंक खाली  दिल्या आहे.

महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

Maharashtra Government Health Schemes | महाराष्ट्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध  योजना

Maharashtra Government Health Schemes: आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाशी निगडीत विविध योजना व मिशन पैकी दोन महत्त्वाच्या योजनांची (Scheme) व एका मिशनची (Mission)  माहिती बघणार आहोत.  त्या खालील प्रमाणे आहेत.

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana (MJPJAY))
  • राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन (Rajmata Jijau Mother-Child Health & Nutrition Mission)
  • भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना (Bharatratna Dr. A. P. J. Abdul Kalam Amrut Aahar Yojana)

जिल्हा परिषद भरती मागील वर्षांच्या परीक्षेचे विश्लेषण पाहण्यसाठी येथे क्लिक करा.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana (MJPJAY) | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana (MJPJAY): राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत 1 ऑक्टोबर 2016 रोजी संपत होती. त्यामुळे राज्य शासनाने या जुन्या योजनेच्या धर्तीवर नविन उपचारांचा समावेश असलेली एक नवीन महात्मा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY),  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त सुरू करण्याचा निर्णय घेतला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 4 ऑगस्ट 2016 रोजी जारी करण्यात आला.

Maharashtra Health Schemes
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

सुरवात: 2016

लाभार्थी

महात्मा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) या योजनेचा लाभ कोणत्या गटाला मिळेल याची माहिती खाली देण्यात आली आहे.

  • दारिद्र्य रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना , अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका धारक व दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक (रु.1 लाखापयंत वार्षिक उत्पन्न असलेली) कुटुंबे (शासकीय,निमशासकीय कर्मचारी व आयकरदाते वगळून)
  • औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा असे एकूण १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रक शेतकरी कुटुंबे.
  • शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी,  महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक तसेच अधिस्विकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब.

खर्चाची मर्यादा

  • योजनेंतर्गत समाविष्ट उपचार पद्धतीवरील उपचारांसाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा सरंक्षण रक्कम प्रतिवर्ष प्रती कुटुंब रु. 2 लाख एवढी आहे.
  • मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा प्रती वर्ष / प्रती कुटुंब रु. 3 लाख आहे. यामध्ये दात्याचा समावेश असेल.

फायदे

या योजनेत 971 शस्त्रक्रिया, उपचारपद्धती आणि प्रक्रिया समाविष्ट आहेत ज्या खालील 30 श्रेणींमध्ये येतात:

  1. सामान्य शस्त्रक्रिया
  2. ईएनटी शस्त्रक्रिया
  3. नेत्ररोग शस्त्रक्रिया
  4. स्त्रीरोग आणि प्रसूती शस्त्रक्रिया
  5. ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया
  6. सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी
  7. कार्डियाक आणि कार्डिओथोरॅसिक शस्त्रक्रिया
  8. बालरोग शस्त्रक्रिया
  9. जननेंद्रिय प्रणाली
  10. न्यूरोसर्जरी
  11. सर्जिकल ऑन्कोलॉजी
  12. वैद्यकीय ऑन्कोलॉजी
  13. रेडिएशन ऑन्कोलॉजी
  14. प्लास्टिक सर्जरी
  15. बर्न्स
  16. पॉली ट्रॉमा
  17. प्रोस्थेसेस
  18. गंभीर काळजी
  19. सामान्य औषध
  20. संसर्गजन्य रोग
  21. बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
  22. हृदयरोग
  23. नेफ्रोलॉजी
  24. न्यूरोलॉजी
  25. पल्मोनोलॉजी
  26. त्वचाविज्ञान
  27. संधिवात
  28. एंडोक्राइनोलॉजी
  29. गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी
  30. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी

नेटवर्क हॉस्पिटल

सरकारने सर्व नेटवर्क रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र नियुक्त केले आहे. हे आरोग्यमित्र रेफरल कार्ड, हेल्थ कार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रे तपासते. जर सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर, नेटवर्क हॉस्पिटल रुग्णाला दाखल करते आणि विमा कंपनीला ऑनलाईन प्री-ऑथोरायझेशन विनंती पाठवते. पूर्व प्राधिकरण विनंतीवर 24 तासांच्या आत प्रक्रिया केली जाते. आणीबाणीच्या प्रकरणांमध्ये, नेटवर्क हॉस्पिटला त्वरित मंजुरी दिली जाऊ शकते.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Rajmata Jijau Mother-Child Health & Nutrition Mission | राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन

Rajmata Jijau Mother-Child Health & Nutrition Mission: महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जिथे कुपोषणाशी लढण्याचे कार्य मिशनसारखे राबवण्यात येत आहे आणि याच उद्देशाने राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आहे.

Maharashtra Health Schemes
राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन

सुरवात: 2005

आरोग्य आणि पोषण मिशनचे टप्पे

आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा 2005 मध्ये आणि दुसरा टप्पा नोव्हेंबर 2011 मध्ये आखण्यात आला होता. या मिशनचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून त्यासाठी गर्भधारणेपासून पहिल्या 1000 दिवसांचे नियोजन केले जाते.

आरोग्य आणि पोषण मिशनला अर्थसहाय्य

राजमाता जिजाऊ मिशन ही एक तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था असून संपूर्णत: युनिसेफच्या अर्थसाहाय्यावर चालते. याचा मुख्य हेतू महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आय. सी. डी. एस. आयुक्तालय यांच्या मध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणणे हा आहे.

उद्दिष्टे: या मिशनची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

  • पहिले १००० दिवसांचे अनन्य साधारण महत्व पटवून देणे.
  • एक ‘विचार गट’ म्हणून कार्य करणे आणि शासनाला धोरण निश्चिती करण्याकरिता वास्तविक पुराव्यावर आधारीत सल्ला देणे.
  • कुपोषण कमी करण्याचे सामाइक उद्दिष्ट साध्य करण्याकरिता विविध विभांगात एककेंद्राभिमुखता/एकवाक्यता आणणे.

केंद्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजनांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Bharatratna Dr. A. P. J. Abdul Kalam Amrut Aahar Yojana | भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना

Bharatratna Dr. A. P. J. Abdul Kalam Amrut Aahar Yojana: अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के आहे.

स्त्रियांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्याने याचा परिणाम बाळाच्या वजनावर होतो. शिवाय जन्मानंतर पहिले तीन महिने बालक पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्याने या कालावधीत मातेचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे.

Maharashtra Health Schemes
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना

या पार्श्वभूमीवर शासनातर्फे अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून  प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ चौरस आहार उपलब्ध करून देण्यात येतो.

सुरवात: 2015

योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल.
  • अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थींना 1 डिसेंबर 2015 पासून चौरस आहार देण्यात येणार आहे.
  • राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यात 85 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे.
  • एकूण 16 हजार 30 अंगणवाडी आणि 2013 मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य धोरणा बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Study material for Arogya and ZP Bharti 2021 | आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य

Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 मध्ये तांत्रिक विषयाला 40 % वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का  अभ्यास असणे आवश्यक आहे. कारण हाच विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी तांत्रिक विषयातील सर्व टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आरोग्य भरतीच्या गट क च्या 24 ऑक्टोबर 2021 व गट ड च्या 31 ऑक्टोबर 2021 ला होणाऱ्या व आगामी जिल्हा परिषदेच्या  पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तांत्रिक विषयातील टॉपिक 

National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs Central Government Health Schemes

Q1. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुरवात कधी झाली?

Ans. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुरवात 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली.

Q2. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनचा दुसरा टप्पा कधी सुरु झाला?

Ans. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनचा दुसरा टप्पा नोव्हेंबर 2011 ला सुरु झाला.

Q3. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशासाठी आहे?

Ans. अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. ही समस्या दूर करण्यासाठी गरोदर मातांना चौरस आहार देण्यात येतो.

Q4. आरोग्य भरती व जिल्हा परिषद भरतीचे तांत्रिक विषयातील घटक मला कुठे पाहायला मिळतील?

Ans. Adda247 मराठीच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला यासंबंधी सर्व माहिती मिळणार आहे. 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Full Length Mock Online Test Series
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पदांसाठी टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

When was the Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana started?

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana started on 01 October 2016.

When did the second phase of Rajmata Jijau Maternal and Child Health and Nutrition Mission begin?

The second phase of Rajmata Jijau Maternal and Child Health and Nutrition Mission started in November 2011.

Bharat Ratna Dr. A. P. J. What is Abdul Kalam Amrit Ahar Yojana for?

Low birth weight babies are more likely to be born due to a lack of dietary calories and protein in the scheduled area. To overcome this problem, pregnant mothers are given a diet.

Where can I see the technical aspects of Health Recruitment and Zilla Parishad Recruitment?

You will find all the information on the official website of Adda247 Marathi.