Marathi govt jobs   »   Study Materials   »   Public Finance: Fiscal Policy, Budgetary Procedure,...

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions | Study Material for MPSC

Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions: सार्वजनिक वित्त किंवा पब्लिक फायनान्स म्हणजे सरकारला मिळणारे सर्व उत्पन्न (जमा) आणि सरकारद्वारे केले जाणारे सर्व व्यय (खर्च) यांचा अभ्यास होय. देशाची अर्थव्यवस्था चालविण्यासाठी सार्वजनिक वित्त हा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. राजकोषीय धोरणानुसार सरकार आपल्या सार्वजनिक वित्ताचे (Public Finance) व्यवस्थापन करत असते. कर व करेतर महसूल, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक खर्च आणि वित्तीय प्रशासन ही राजकोषीय धोरणाची (Fiscal Policy) प्रमुख अंगे/साधने आहेत. या लेखात आपण सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions | Study Material for MPSC यावर चर्चा करणार आहोत.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions | सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या 

Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक कक्ष अधिकारी (ASO)- 100 पदे, राज्य कर निरीक्षक (STI)- 190 पदे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI)- 376 पदे अशा एकूण 666 पदांसाठी  MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात जाहीर केली आहे. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही 26 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे. MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी एकूण 390 रिक्त पदांसाठी आयोगाने जाहिरात दिली आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ही 2 जानेवारी 2022 ला होणार आहे. त्याचप्रमाणे MPSC ने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021, इ स्पर्धा परीक्षांची लवकरच जाहिरात निघणार आहे. तर या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2021 Series, Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे.  या अंतर्गत आपण दररोज सामान्य ज्ञान विषयातील परीक्षेला उपयोगी असे विविध Topics चा अभ्यास करणार आहोत. तर चला आजच्या या लेखात आपण सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions | Study Material for MPSC यावर सविस्तर चर्चा करणार आहोत.

आवर्तसारणी : मूलद्रव्ये, गण, गुणधर्म आणि नियम

Objectives of Fiscal Policy | राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे

 • संसाधनांचे उपलब्धीकरण आणि वाटणी
 • आर्थिक वाढ व विकासाला चालना देणे
 • आर्थिक तफावत दूर करणे
 • रोजगार निर्मिती करून सामाजिक व आर्थिक विकास
 • किंमतीचे नियमन करून चलनवाढ आटोक्यात ठेवणे

भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | Five Years Plans of India (From 1951 to 2017)

Budget: Definition and Types | अर्थसंकल्प: व्याख्या आणि प्रकार

भारतात संविधानाच्या कलम 112 नुसार वार्षिक विवरणपत्र किंवा Annual Financial Statement अर्थात बजेट (अर्थसंकल्प) मांडला जातो. हा अर्थसंकल्प रोख तत्त्वावर तयार केला जातो आणि त्यात अर्थसंकल्पीय वर्षातील जमा आणि खर्च यांचे विश्लेषण दिलेले असते.तसेच विविध उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार ने सुरू केलेल्या किंवा सुरू करू इच्छिणाऱ्या विविध योजनांची माहिती व त्यांना अपेक्षित खर्च याचे विवरण या अर्थसंकल्पात दिलेले असते.अर्थसंकल्पाचे प्रकार खालीलप्रमाणे;

Types of Budget | अर्थसंकल्पाचे प्रकार

1. पारंपरिक अर्थसंकल्प | Traditional Budget

यात शासनाला एकूण किती खर्च करायचा आहे याची आकडेवारी दिलेली असते. मागील वर्षातील खर्चाचे आकडे आधारभूत धरले जातात तर खर्चाचे प्रमाण ठरवणे याला प्राधान्य असते. खर्च कसा होईल व त्यावर नियंत्रण कसे ठेवता येईल तसेच खर्च करण्यासाठी क्षेत्राचा प्राधान्यक्रम ठरविण्याची जबाबदारी मंत्रालयांची किंवा विभागांची असते. या अर्थसंकल्पात कल्याणकारी तत्त्वाचा अवलंब केला जातो.

2. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प | Outcome Budget

केलेल्या खर्चाने काय साध्य होणार आहे हे ठरवले जाते व त्यानुसार अर्थसंकल्प मांडला जातो. या मध्ये प्रामुख्याने पुढील आर्थिक वर्षतील उद्दिष्टे अथवा लक्ष्य दिलेले असतात. भौतिक लक्ष्य ठरवून ते साध्य करणे याला प्राधान्य दिले जाते. यामुळे खर्च व निष्पत्ती यांची सांगड घालता येते व आवश्यक सुधारणा करता येतात. भारतात 2005-06 चा अर्थसंकल्प हा फलनिष्पत्ती अर्थसंकल्प होता.

3. शून्यधारीत अर्थसंकल्प | Zero based Budget:

पीटर पिहर ला शून्याधारीत अर्थसंकल्पाचा जनक मानले जाते. या अर्थसंकल्पात खर्च करण्याची कारणे दिलेली असतात.या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या कोणत्याही आकड्यांचा आधार घेतला जात नाही तर प्रत्येक जमा व खर्चाचा नव्याने विचार करून ते मांडले जातात. यामध्ये अनावश्यक व अवास्तव खर्च टाळला जातो व त्यामुळे अर्थसंकल्प अधिक परिणामकारक होतो.1986 ला या अर्थसंकल्पाचा वापर भारतात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला तर 1987-88 साली शून्यधारीत अर्थसंकल्प राबविण्यात आलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य 

Budgetary Definitions and Deficits | अर्थसंकल्पीय व्याख्या आणि तुटी

वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाअंतर्गत असणारा अर्थसंकल्प विभाग वार्षिक अंदाजपत्रक तयार करतो. या कामाची सुरुवात अर्थसंकल्पीय परिपत्रक काढून ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात खालील दस्तावेज मांडले जातात.

1. वार्षिक वित्तीय विवरण: – यात भारताचा संचित निधी- जमा व खर्च, भारताच्या संचित निधीमधील प्रभारीत खर्च, आकस्मिक निधी- जमा व खर्च, लोकलेखा निधी- जमा व खर्च.

2. FRBM कायद्यानुसार 4 विवरणपत्र

3. फलनिष्पत्ती अर्थसंकल्पा चे विविरणपत्र

Budgetary Expenditure and Income Structure | अर्थसंकल्पीय खर्च आणि जमा याचे स्वरूप

 A.अर्थसंकल्पीय जमा

Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions_40.1
अर्थसंकल्प जमा

B. अर्थसंकल्पीय खर्च

Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions_50.1
अर्थसंकल्पीय खर्च

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Different Deficits | विविध तूट

सार्वजनिक वित्ताचा अभ्यास करतांना विविध तुटीचा अभ्यास करावा लागतो. परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे खूप महत्त्वाचे आहे कारण यावर एखादा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. खाली दिलेल्या टेबल मध्ये विविध तुटी आणि त्यांचे व्याख्येस्वरूपी सूत्र दिले आहे याचा विद्यार्थ्यांना उजळणी करतांना निश्चित फायदा होईल.

अनु.क्र. तुटीचा प्रकार व्याख्या (सूत्र)
01 अर्थसंकल्पीय तूट

(Budgetary Deficit)

अर्थसंकल्पीय खर्च – अर्थसंकल्पीय जमा

(Budgetary Expenditure- Budgetary Receipts)

महसुली तूट + भांडवली तूट

(Revenue Deficit + Capital Deficit)

02 महसुली तूट

(Revenue Deficit)

महसूली खर्च – महसुली जमा

(Revenue Expenditure – Revenue Receipts)

03 परिणामी महसुली तूट

(Effective Revenue Deficit)

महसुली तूट – अनुदाने

(Revenue Deficit – Grants in Aid)

04 भांडवली तूट

(Revenue Deficit)

भांडवली खर्च – भांडवली जमा

(Capital Expenditure – Capital Receipts)

05 राजकोषीय तूट

(Fiscal Deficit)

1. सरकारने घेतलेले कर्ज (Debt)

2. अर्थसंकल्पीय तूट + कर्ज (Budgetary Deficit+ Debt)

3. खर्च – (महसूली जमा + भांडवली जमा) [Expenditure – (Revenue Deficit + Revenue Deficit)]

4. खर्च – (महसुली जमा + पुन: प्राप्ती + सार्वजनिक मालमत्तेच्या विक्रीची रक्कम) [Expenditure – (Revenue Receipts + Loan Recovery + Sale of Public Assets)]

06 प्राथमिक तूट

(Primary Deficit)

राजकोषीय तूट – व्याज

(Fiscal Deficit – Interest Payment)

07 चलनविषयक तूट

(Monetized Deficit)

केंद्रीय बँकेकडून घेतलेले कर्ज / अग्रिम

(Surplus / Debt taken from Central Bank {RBI})

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या

Public Finance: Deficit Financing | सार्वजनिक वित्त: तुटीचा अर्थभरणा 

Public Finance- Deficit Financing: सरकारने आपल्या अर्थसंकल्पात एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च जास्त दाखवून मुद्दाम निर्माण केलेती तूट ज्या मार्गांनी भरून काढली जाते, त्याला तुटीचा अर्थभरणा असे म्हणतात.

अर्थसंकल्पीय तुटीची संकल्पना मागे पडल्याने तुटीच्या अर्थभरण्याने भरून काढण्यात येणारी तूट म्हणजे राजकोषीय तूट होय.

राजकोषीय तूट(Fiscal Deficit) भरून काढण्याचे स्त्रोत : राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी दोन मार्गांचा वापर जातो.

 • बाजार कर्ज (market borrowing): यामध्ये सरकारने घेतलेल्या अंतर्गत तसेच बाह्य कर्जांचा समावेश होतो. अंतर्गत कर्जे जनता, व्यापारी बँका इत्यादींकडून घेतली जातात, तर बाह्य कर्जे परकीय सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था इत्यादींकडून घेतली जातात.
 • तुटीचा अर्थभरणा (deficit financing) : यामध्ये सरकार ट्रेझरी बिले किंवा बाँड्सचा वापर करून रिझर्व्ह बँकेकडून कर्जे घेते. रिझर्व्ह बँक त्याआधारे नवीन चलन छापून सरकारला देते. या प्रक्रियेला ‘तुटीचा अर्थभरणा’ असे म्हणतात.

यांपैकी बाजार कर्जे हा अधिक चांगला स्त्रोत आहे. कारण गुत त्यामुळे चलन पुरवठ्यात भर पडत नाही. याउलट तुटीच्या सट्टे अर्थभरण्यामुळे अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठा वाढून चलनवाढीचा दबाव निर्माण होतो.

तूटीच्या अर्थभरण्याचे (deficit financing) दुष्परिणाम:

 • सरकारी खर्चात प्रचंड वाढ सरकार आपला महसुली खर्च महसूली उत्पन्नातून भागविण्यास असमर्थ ठरते.
 • चलनवाढ / भाववाढ: हा तुटीच्या अर्थभरण्याचा सर्वात महत्वाचा दुष्परिणाम आहे. तुटीच्या अर्थभरण्याने चलन पुरवठा वाढतो, त्यामुळे लोकांच्या हातातील पैसा वाढल्याने वस्तू व सेवांची मागणी व त्यामुळे किंमती वाढतात.
 • सक्तीची बचतः किंमत वाढीमुळे निश्चित उत्पन्न असणाऱ्या लोकांचा वस्तू व सेवांचा उपभोग कमी होतो. त्यामुळे सक्तीची बचत होते. उच्च उत्पन्न गटातील लोकांचा उपभोग मात्र वाढत असतो. (त्यांच्या हातातील उत्पन्न वाढत असल्याने)
 • खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदलः श्रीमंत लोकांकडील पैसा वाढल्याने चैनीच्या वस्तूंची मागणी वाढते. त्यामुळे गुंतवणुकीचा प्रवाह चैनीच्या वस्तूंचे उत्पादन, , नागरी बांधकाम, नट तुटीच्या सट्टेबाजी इ. अनुत्पादक बाबींकडे वळतो. शेती, उद्योग इ. आवश्यक क्षेत्रांना गुंतवणुकीचा दुय्यम दर्जा मिळतो.
 • बँकांची पतनिर्मिती वाढतेः बँकाकडील ठेवींमध्ये वाढ झाल्याने त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढून त्यांची पतनिर्मिती प्रक्रिया वाढीस लागते.

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण सार्वजनिक वित्त या प्रकरणाची उजळणी करू शकता. येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेत या घटकावर आधारित कमीत कमी 2 प्रश्न विचारला जातो त्यामुळे या लेखाचा आपल्याला फायदा होईल.

सर्वोच्च न्यायालय: न्यायाधीशांची पात्रता व नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तुम्हाला हेही बघायला आवडेल

उच्च न्यायालय: न्यायाधीशांची पात्रता व नेमणूक, उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य 

भारताची संसद: लोकसभा 

भारताच्या महत्त्वपूर्ण लष्करी संयुक्त युद्धासरावांची यादी

घटनादुरुस्तीचे प्रकार आणि भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रिया: कलम 368 

वित्तीय आणीबाणी: कलम 360

राज्यातील राष्ट्रपती राजवट: कलम 356

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य 

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या

राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार

सर्वोच्च न्यायालय: सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र व अधिकार 

घटनादुरुस्तीचे प्रकार आणि भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रिया: कलम 368 

सर्वोच्च न्यायालय: न्यायाधीशांची पात्रता व नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य

पंतप्रधान: अधिकार व कार्यें आणि मंत्रिमंडळ

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers in Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds and Types of clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks in India – State-wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List of Countries and their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Latest Job Alert:

संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या रिक्त पदसंख्येत वाढ

IBPS Clerk 2021 अधिसूचना जाहीर | IBPS Clerk 2021 Notification Out

SBI PO अधिसूचना 2021 | SBI PO Notification 2021

IBPS PO 2021 अधिसूचना जाहीर

FAQS Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions

Q.1 अर्थसंकल्पाचे प्रकार किती आहेत ?

Ans: पारंपरिक अर्थसंकल्प, फलनिष्पत्ती अर्थसंकल्प आणि शून्यधारीत अर्थसंकल्प असे 3 प्रकार आहेत.

Q.2 अर्थशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. अर्थशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी कोणत्या मार्गांचा वापर केला जातो?

Ans:राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी बाजार कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा या मार्गांचा वापर केला जातो.

Q.4 सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या याची माहिती कुठे मिळेल?

Ans. सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions_60.1
यशदा संयुक्त पूर्व परीक्षा विशेष बॅच

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Download your free content now!

We have already received your details!

Public Finance: Fiscal Policy and Budgetary Procedure and Definitions_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.