Marathi govt jobs   »   Study Materials   »   Various Corporation in Maharashtra:

Various Corporation in Maharashtra, महाराष्ट्रातील विविध महामंडळे

Various Corporation in Maharashtra: The state of Maharashtra was created on 01 May 1960. A total of 55 Corporations were established in Maharashtra from time to time with the aim of speeding up the development of Maharashtra. The corporation in Maharashtra was established in Maharashtra with the aim of promoting development in various sectors. In this article, You will see information about Various Corporations in Maharashtra with their establishment year and Headquarters

Various Corporation in Maharashtra
Category Study Material
Subject Static General Awareness
Covered Exam All Competitive Exams
Article Name Various Corporation in Maharashtra

Various Corporation in Maharashtra

Various Corporation in Maharshtra: महाराष्ट्र राज्याची निर्मिती 01 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळावी या उद्देशाने वेळोवेळी महाराष्ट्रात एकूण 55 मंडळांची स्थापना करण्यात आली. विविध क्षेत्रातील विकासाला चालना मिळावी या हेतूने महाराष्ट्रात Corporation in Maharshtra ची स्थापना करण्यात आली. या महामंडळाचे कामकाजाचे क्षेत्र आणि अधिकार यांच्या स्थापनेपासून ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार Corporation in Maharshtra ला दिशानिर्देश व आर्थिक सहाय्य करते. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षामध्ये Various Corporation in Maharshtra त्यांची स्थापना वर्षे आणि मुख्यालय यावर प्रश्न विचारल्या जातात. आज या लेखात आपण Various Corporation in Maharshtra बद्दल माहिती पाहणार आहे.

Marathi Saralsewa Mahapack
Marathi Saralsewa Mahapack

Various Corporation in Maharashtra | महाराष्ट्रातील विविध महामंडळे

Various Corporation in Maharshtra: महाराष्ट्रातील विविध महामंडळे त्यांची स्थापना वर्षे आणि मुख्यालय यासंबंधी माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

अ. क्र. महामंडळाचे नाव स्थापना ठिकाण
1 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) 1961 मुंबई
2 महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (MSEB) 1960 मुंबई
3 महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळ (MIDC) 1 ऑगस्ट 1962 मुंबई
4 महाराष्ट्र राज्य औधोगिक व गुंतवणूक महामंडळ (SICOM) 31 मार्च 1966 मुंबई
5 महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (MSFC) 01 एप्रिल 1962 मुंबई
6 महाराष्ट्र राज्य लघुउधोग विकास महामंडळ (MSSIDC) 1962 मुंबई
7 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन (MSEC) 1978 मुंबई
8 महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोधोग मंडळ (MSKVIB) 1962 मुंबई
9 महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (MWC) 1957 पुणे
10 मराठवाडा विकास महामंडळ 1967 औरंगाबाद
11 पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ 1970 पुणे
12 कोकण विकास महामंडळ 1970 नवी मुंबई
13 विदर्भ विकास महामंडळ 1970 नागपूर
14 महाराष्ट्र कृषी उधोग विकास महामंडळ (MAIDC) 1965 पुणे
15 महाराष्ट्र राज्य वस्त्रोधोग महामंडळ 1966 मुंबई
16 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ 1971 नागपूर
17 महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ 1972 मुंबई
18 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MAHABEEJ) 1976 अकोला
19 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) 1975 मुंबई
20 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळ (MHADA) 05 डिसेंबर 1977 वांद्रे पूर्व (मुंबई)

 

Nuclear Power Plant in India 2022
Adda247 Marathi App

Information about Corporation in Maharashtra | महाराष्ट्रातील विविध महामंडळाबद्दल माहिती

Information about Corporations in Maharashtra: महाराष्ट्रातील प्रमुख महामंडळाबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC): महाराष्ट्र राज्यामध्ये मोटारींद्वारा प्रवाशांची व्यापारी तत्त्वावर वाहतूक करण्याकरिता 1961 साली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना झाली. यावेळेस महामंडळाकडे 1982 गाड्या होत्या; ज्या मार्गांवरून त्या धावत होत्या त्यांची एकंदर लांबी 74440 किमी. होती व दैनिक सरासरी प्रवासी 4.72 लाख होते. 1981-82 या वर्षात महामंडळाच्या सर्व प्रवासी गाड्यांनी धावलेल्या अंतरांची बेरीज 79.94 कोटी किमी. होती. महामंडळाच्या गाड्यांचा सरासरी भारांक (लोड फॅक्टर) 85 च्या जवळपास असतो

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (MSEB): ही महाराष्ट्र शासनाची विद्युत निर्मिती व पुरवठा करणारी कंपनी आहे. एम.एस.ई.बी.ची स्थापना 20 जून 1960 रोजी करण्यात आली. तेव्हापासून मुंबई वगळता राज्यातील वीज निर्मिती, तिचे पारेषण व वितरण करण्याचे काम एम.एस.ई.बी.कडून केले जात होते. परंतु 2003 चा विद्युत कायदा अस्तित्वात आल्यानंतर एम.एसई.बी.ची पुनर्रचना होऊन दि. 6 जून 2005 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.

 

महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळ (MIDC): महाराष्ट्रामध्ये उद्योगांची शीघ्र व सुव्यवस्थित प्रस्थापना तसेच वाढ व्हावी, या हेतूंनी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास विधी, 1961 नुसार 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ उभारले. महामंडळाने या क्षेत्रांसाठी रोज 17.5 कोटी गॅलन गाळलेले पाणी पुरविण्याची व्यवस्था केली आहे व ही पाणी विक्री महामंडळाच्या जवळजवळ सर्व उत्पन्नाचे साधन आहे.

महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (MSFC): महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या मुंबई राज्य वित्त महामंडळाचा महाराष्ट्रातील वारसदार म्हणून 1 एप्रिल 1962 पासून हे महामंडळ कार्यान्वित झाले. मुंबई राज्य वित्त महामंडळाची स्थापना राज्य वित्त निगम विधेयकानुसार 1953 मध्ये झाली होती व तो देशातील एक सर्वांत जुना वित्तीय निगम होता. 4 ऑगस्ट 1964 पासून गोवा, दमण, दीव या केंद्रशासित प्रदेशाचा महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या कार्यक्षेत्रात अंतर्भाव झाला आहे.

महाराष्ट्र राज्य लघुउधोग विकास महामंडळ (MSSIDC): भारतातील या क्षेत्रातील संस्थामधील एक अग्रेसर संस्था. 1962 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मालकीची खाजगी मर्यादित कंपनी या स्वरूपात महामंडळाची स्थापना झाली. 1971 मध्ये त्याचे सार्वजनिक मर्यादित कंपनीत रूपांतर झाले व त्याच्या एक कोटी रु. हून अधिक भरणा झालेल्या भांडवलापैकी 92.7 लाख रु. महाराष्ट्र शासनाने व 7.5 लाख रुपये गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या शासनाने पुरविले.

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोधोग मंडळ (MSKVIB): मुंबई खादी आणि ग्रामोद्योग अधिनियम, 1960 नुसार संगठित राज्य बोर्ड मध्ये खादी आणिग्रामोद्योग विनियमन साठी प्रोत्साहन, संगठन, विकास प्रदान करण्यासाठीमहाराष्ट्र राज्य खादी ग्रामोधोग मंडळाची (MSKVIB) स्थापना झाली.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (MWC): महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून, राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माण करून औद्योगिक व कृषी क्षेत्रास, अन्नधान्याची नासाडी होउ नये म्हणून, साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी या महामंडळाची निर्मीती केलेली आहे.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (MAIDC): या महामंडळाची स्थापना 15 डिसेंबर 1965 रोजी झाली. देशभर शेतीच्या यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य व सेवा त्याचप्रमाणे आधुनिक शेती अवजारांचे उत्पादन व वाटप करण्याविषयीच्या केंद्र शासनाच्या योजनेनुसार भारतात अशी एकूण 17 महामंडळे 31 मार्च 1983 पर्यंत स्थापन झालेली होती;

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MAHABEEJ): महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजेच महाबीज हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून, महामंडळाद्वारे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिचे बियाणे उपलब्ध करून दिल्या जाते. महामंडळाचे मुख्यालय अकोला येथे आहे.या महामंडळाची स्थापना हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत सन 1971 मध्ये झाली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC): महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्थापिलेले महामंडळ आहे. महाराष्ट्रात पुरातन कला व शिल्प, निसर्गसौंदर्य धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणे, वन्य पशुपक्ष्यांची अभयारण्ये इ. पर्यटकांसाठी आकर्षक स्थळे आहेत. मुंबई शहर जगाच्या प्रमुख सामुद्री व हवाई मार्गांवर असून ते भारतातील इतर शहरांशी खुष्कीच्या व हवाई मार्गांनी जोडलेले असल्याने भारताला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी 54 टक्के पर्यटक मुंबईला व महाराष्ट्राला भेट देतात. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटनव्यवसायाला चालना देऊन त्याचा विकास करण्यासाठी व तत्संबंधीच्या शासकीय बाबींची योग्य व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन संचालनालय नेमलेले आहे.

 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळ (MHADA): ‘मुंबई इमारत दुरस्ती व पुनर्रचना’ आणि ‘महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधारणा’ ही संविधिमान्य स्वायत्त मंडळे तत्संबंधीच्या अनुक्रमे 1969 व 1973 मधील कायद्यांन्वये प्रस्थापिली. नंतर 1976 मध्ये या सर्व कायद्यांचे एकत्रीकरण, सुधारणा व मंडळांच्या कार्याचे सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास’ हा कायदा करुन या नावाचे स्वायत्त संविधिमान्य प्राधिकरण 5 डिसेंबर 1977 रोजी प्रस्थापिले. या प्राधिकरणामुळे वर उल्लेखिलेल्या सर्व मंडळांच्या योजना तसेच दुर्बल घटकांसाठी घरबांधणीचा कार्यक्रम, झोपडपट्टीयांना सुविधा पुरविणे, भूसंपादन व भूसुविधा, नागरी विभागांत जागा व सुविधा प्राप्त करुन देणे व उच्च उत्पन्न गटांसाठी गृहनिर्मिती, ही सर्व कार्ये सुसूत्रित होत आहेत.

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

See Also,

Article Name Web Link App Link
Nationalized Banks List 2022 Click here to View on Website  Click here to View on App
The World’s 10 Smallest Countries 2022 Click here to View on Website  Click here to View on App
State Wise List Of Highest Mountain Peaks In India Click here to View on Website  Click here to View on App
Parliament Of India: Lok sabha Click here to View on Website  Click here to View on App
Supreme Court Click here to View on Website  Click here to View on App
Country And Currency List 2022 Click here to View on Website  Click here to View on App
AMRUT Mission Click here to View on Website  Click here to View on App
National Animal of India Click here to View on Website  Click here to View on App
Bird Sanctuary In India 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Important Rivers in Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
States And Their Capitals, 28 States And 8 Union Territories In India 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Types Of Winds Click here to View on Website  Click here to View on App
President’s Rule In A State Click here to View on Website  Click here to View on App
Mahatma Jyotirao Phule Death Anniversary 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Satavahana Dynasty: History, Ruler, And Other Important Facts Click here to View on Website  Click here to View on App
Important Boundary Lines Click here to View on Website  Click here to View on App
Indian Constitution: Framing, Sources, Parts, Articles, And Schedules Click here to View on Website  Click here to View on App
Importance of Plant Nutrients Click here to View on Website  Click here to View on App
Hill Stations In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Important Events Of the Indian Freedom Struggle Click here to View on Website  Click here to View on App
Revolt Of 1857 In India And Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Dams In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Profit And Loss Formula, Sample Questions Click here to View on Website  Click here to View on App
Jnanpith Awards 2022 Click here to View on Website  Click here to View on App
List of Indian Cities on Rivers Banks Click here to View on Website  Click here to View on App
Chief Minister of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Computer Awareness Click here to View on Website  Click here to View on App
River System in Konkan Region of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Fundamental Duties: Article 51A Click here to View on Website  Click here to View on App
List of Prime Ministers of India From 1947-2022 Click here to View on Website  Click here to View on App
Internal Structure Of Earth Click here to View on Website  Click here to View on App
Atmosphere Layers Click here to View on Website  Click here to View on App
Parlament of India: Rajya Sabha Click here to View on Website  Click here to View on App
Classical and Folk Dances of India Click here to View on Website  Click here to View on App
Largest Countries in the World by Area 2022 Click here to View on Website  Click here to View on App
World Largest Freshwater lake Click here to View on Website  Click here to View on App

FAQ: Various Corporation in Maharashtra

Q1. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना कधी झाली?

Ans: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना 1961 मध्ये झाली.

Q2. महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली?

Ans: महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळाची स्थापना 01 ऑगस्ट 1962 मध्ये झाली.

Q3. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना कधी झाली?

Ans: महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना 1957 मध्ये झाली.

Q4. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना कधी झाली?

Ans: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना 1976 मध्ये झाली

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247 Prime Pack
adda247 Prime Pack

Sharing is caring!

FAQs

When was the Maharashtra State Road Transport Corporation established?

Maharashtra State Road Transport Corporation was established in 1961.

When was the Maharashtra Industrial Development Corporation established?

Maharashtra Industrial Development Corporation was established on 01 August 1962.

When was the Maharashtra State Wakhar Corporation established?

Maharashtra State Wakhar Corporation was established in 1957.

When was Maharashtra State Seed Corporation established?

Maharashtra State Seed Corporation was established in 1976