Marathi govt jobs   »   Study Materials   »   Mahatma Jyotirao Phule Biography, Activities, Social...

Mahatma Jyotirao Phule Biography, Activities, Social work, Quotes, महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवनचरित्र आणि सामाजिक कार्य

Mahatma Jyotirao Phule is the greatest Social Reformer of Maharashtra. In this article, you will get detailed information about Mahatma Phule like their Biography, Activities, Social work, and Quotes. He led the movement against the prevailing caste restrictions in India. He revolted against the domination of the Brahmins and struggled for the rights of peasants and other low-caste people. Mahatma Jyotiba Phule was also a pioneer for women’s education in India and fought for the education of girls throughout his life.

Mahatma Jyotirao Phule
Category Study Material
Exam All Competitive Exams
Subject History (Social Reformers)
Name Mahatma Jyotirao Phule Biography, Activities, Social work, Quotes

Mahatma Jyotirao Phule | महात्मा ज्योतीराव फुले

Mahatma Jyotirao Phule: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा जसे की, MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि तसेच गट क संयुक्त परीक्षा सोबतच महाराष्ट्रातील इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातील समाजसुधाराकांवर बरेच प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील थोर समाजसुधाराकांपैकी एक म्हणजे महात्मा फुले (Mahatma Jyotirao Phule) आहेत. पुरोगामी विचारांची मांडणी करणारे आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) यांची पुण्यतिथी महाराष्ट्रात दरवषी 28 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येते. आज या लेखात आपण महात्मा ज्योतीराव फुले (Mahatma Jyotirao Phule) यांच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे. 

Mahatma Jyotirao Phule Biography | महात्मा ज्योतीराव फुले यांचे जीवनचरित्र

Mahatma Jyotirao Phule Biography: महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत Mahatma Jyotirao Phule होते.मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले. जोतीरावांच्या (Mahatma Jyotirao Phule) लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. Mahatma Jyotirao Phule यांच्या शिक्षणासंबंधीच्या प्रसिद्ध Quote खालीलप्रमाणे आहे. 

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।

Mahatma Jyotirao Phule Biography
जन्म / Born 11 एप्रिल, 1827
जन्म ठिकाण / Place of Birth सातारा, महाराष्ट्र
वडील / Father गोविंदराव शेरीबा फुले
आई / Mother चिमणाबाई फुले
पत्नी / Spouse सावित्रीबाई फुले
अपत्ये / Childeren यशवंत फुले
मृत्यू / Passed Away 28 नोव्हेंबर 1890 (वय 63)
पुणे, महाराष्ट्र
संघटना / Organizaion सत्यशोधक समाज
प्रमुख स्मारके / Memorial भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे
Mahatma Jyotirao Phule Biography, Activities, Social work, Quotes_40.1
Adda247 Marathi Application

Social Reformers of Maharashtra- Part 1 (भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर आणि सार्वजनिक काका)

Mahatma Jyotirao Phule Social work | महात्मा ज्योतीराव फुले यांचे सामाजिक कार्य

Mahatma Jyotirao Phule Social work: मानवी हक्कावर इ.स.1791 मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव Mahatma Jyotirao Phule यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.

Mahatma Jyotirao Phule Biography, Activities, Social work, Quotes_50.1
महात्मा फुले

‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी (Mahatma Jyotirao Phule) सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे. त्यातील काही महत्त्वाची वचने लिहिली.

 • संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. ‘कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो’, असे त्यांचे मत होते.
 • सर्व गावाच्या, प्रांताच्या, देशाच्या, खंडाच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात, स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे.
 • आपणां सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे.
 • आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री – पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही, अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला ‘सत्यवर्तन करणारा’ म्हणावे.
 • आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री – पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही, त्याप्रमाणे जबरी न करणाऱ्या सत्यवर्तन करणारे म्हणावे.
 • स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदांस, आपल्या सोयऱ्याधायऱ्यांस आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत, आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
 • स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात, परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
 • महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते , ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता. त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता. त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात काय आमूलाग्र बदल घडवून आणायला हवा यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत, याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे. ‘अखंड’ या काव्यप्रकारात त्यांनी ‘मानवाचा धर्म’, आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णुता, सदसदविवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता, इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे. ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले, मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला, त्यामुळे व त्यांच्या समतावादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली. पुढे हा वारसा त्यांच्या अनुयायांनी चालू ठेवला; त्यामुळे सामाजिक समतेचा जागर कायम राहिला.

Social Reformers of Maharashtra- Part 2 (जगन्नाथ शंकरशेट, गोपाळ हरी देशमुख, आणि न्या. महादेव गोविंद रानडे)

Mahatma Jyotirao Phule: Started Schools  | महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळा

Mahatma Jyotirao Phule: Started Schools: महात्मा फुले (Mahatma Jyotirao Phule) यांनी सुरू केलेल्या शाळा व त्यांची वर्ष खालीलप्रमाणे आहे.

 • ऑगस्ट 1948: वयाच्या 21 व्या वर्षी बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. ती 5-6 महिन्यात बंद पडली.
 • 1851: मुलींसाठी दुसरी शाळा चिपळूणकरांच्या वाड्यात सुरू केली.
 • 1852: एक मुलांची आणि एक मुलींची शाळा रास्ता पेठेत सुरू केली.
 • 1852: अस्पृश्य मुलांसाठी भारतातील पहिली शाळा वेताळ पेठेत सुरू केली.
 • 1853: “महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी” ही संस्था सुरू केली.
 • 1853: विश्रामबाग वाड्यात विद्यार्थ्यांची प्रकट परीक्षा. त्यातील यशाबद्दल मेजर कँडींच्या हस्ते त्यांचा सत्कार.

Social Reformers of Maharashtra- Part 3 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

Mahatma Jyotirao Phule: Important Events | ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना

Mahatma Jyotiba Phule: Important Events: ज्योतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना खालीलप्रमाणे आहे.

 • 1849: गृहत्याग.
 • “दक्षिणा फंड कमिटी” ला पत्र लिहण्याची जबाबदारी घेतली.
 • 1856: ब्राम्हणांनी पाठवलेल्या रोढे आणि कुंभार या मारेकर्‍यांकडून हत्येचा प्रसंग.
 • 1860: शेणवी जातीच्या विधवेचा शेणवी विधुरा सोबत पुनर्विवाह घडवून आणला.
 • 1863: पुण्यात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन –> मूल लग्नाचे असो वा बिन-लग्नाचे मातृपद पवित्र आहे.
 • 1865: तुकाराम तात्या पडवळ लिखीत “जातिभेद विवेकसार” या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.
 • 1865: केशवपना विरुद्ध लढा. तळेगाव ढमढेरे येथे नाभिकांचा संप घडवून आणला.
 • 1868: घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
 • 1869: रायगडाला भेट. तेथे शिवरायांचा पोवाडा रचून तो परमहंस मंडळी अध्यक्ष राम बाळकृष्ण जयकर यांना अर्पण केला.
 • 1873: काशिबाई या ब्राम्हण स्त्रीचा मुलगा यशवंत याला दत्तक घेतले.
 • 1873: सत्यशोधक समाज स्थापना. (पहिले अध्यक्ष व कोशाध्यक्ष: ज्योतिबा फुले, सचिव: नारायण राव कडळक)
 • 1983: सिताराम आल्हाट व राधाबाई निंबकर यांचा विवाह भटजी शिवाय पार पाडला.
 • 1876-82: पुणे पालिकेचे सदस्य.
 • 1882: हंटर कमिशनला शिक्षणासंबंधी निवेदन.
 • 1888: ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सन्मानार्थ हरी रावजी चिपळूणकर यांनी आयोजित केलेल्या सभेत शेतकर्‍याच्या वेशात प्रवेश.
 • 1888: कोळीवाडा मुंबई येथे रावसाहेब वडेरकर यांच्या हस्ते त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.

Social Reformers of Maharashtra- Part 4 (लोकमान्य टिळक)

Mahatma Jyotirao Phule: Written Books | ज्योतिबा फुले यांची ग्रंथ संपदा

Mahatma Jyotirao Phule: Written Books ज्योतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) यांची ग्रंथ संपदा खालीलप्रमाणे आहे.

 1. 1855: तृतीय रत्न (नाटक)
 2. 1869: ब्राम्हणांचे कसब (काव्यसंग्रह)
 3. 1873: गुलामगिरी (पहिला ग्रंथ) –> दोन वेगवेगळ्या किंमती. अमेरीकन स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना अर्पण. सुरुवात होमरच्या वचनाने.
 4. 1883: शेतकऱ्यांचा आसूड.
 5. 1884: अस्पृश्यांची कैफियत.
 6. जून 1885: सत्सार भाग 1
 7. ऑक्टोबर 1885: सत्सार भाग 2
 8. ऑक्टोबर 1885: इशारा.
 9. 1889: सार्वजनिक सत्यधर्म (मृत्यूनंतर प्रकाशित)

Social Reformers of Maharashtra- Part 5 (राजर्षी शाहू महाराज)

Mahatma Jyotirao Phule: Death | ज्योतिबा फुले यांचे निधन

 • 1886: ग्रामजोश्यांच्या हक्कासंबंधी जुन्नर कोर्टाचा निर्णय.
 • 1887: धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचे जतन करण्यासाठी स्वतःचे विधी स्वतः करण्याचा निर्णय घेतला व स्वतःचे मृत्युपत्र तयार केले.
 • 28 नोव्हेंबर 1990: पुणे येथे निधन.
 • महात्मा फुले यांच्या कार्याने सर्जनशील विध्वंसाची प्रचंड उर्जा निर्माण केली. त्यातूनच पुढे ब्राम्हणेतर व इतर विविध चळवळींचा उगम झाला.

Social Reformers of Maharashtra- Part 6 (सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई)

Mahatma Jyotirao Phule Biography, Activities, Social work, Quotes_60.1
Adda247 Marathi Telegram

See Also,

Article Name Web Link App Link
Satavahana Dynasty: History, Ruler, And Other Important Facts Click here to View on Website  Click here to View on App
Important Boundary Lines Click here to View on Website  Click here to View on App
Indian Constitution: Framing, Sources, Parts, Articles, And Schedules Click here to View on Website  Click here to View on App
Importance of Plant Nutrients Click here to View on Website  Click here to View on App
Hill Stations In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Important Events Of the Indian Freedom Struggle Click here to View on Website  Click here to View on App
Revolt Of 1857 In India And Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Dams In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Profit And Loss Formula, Sample Questions Click here to View on Website  Click here to View on App
Jnanpith Awards 2022 Click here to View on Website  Click here to View on App
List of Indian Cities on Rivers Banks Click here to View on Website  Click here to View on App
Chief Minister of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Computer Awareness Click here to View on Website  Click here to View on App
River System in Konkan Region of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
List of Bird Sanctuaries in India Click here to View on Website  Click here to View on App
Fundamental Duties: Article 51A Click here to View on Website  Click here to View on App
List of Prime Ministers of India From 1947-2022 Click here to View on Website  Click here to View on App
States and Their Capitals Click here to View on Website  Click here to View on App
Internal Structure Of Earth Click here to View on Website  Click here to View on App
Atmosphere Layers Click here to View on Website  Click here to View on App
Parlament of India: Rajya Sabha Click here to View on Website  Click here to View on App
Classical and Folk Dances of India Click here to View on Website  Click here to View on App
Largest Countries in the World by Area 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Nationalized Banks List 2022 Click here to View on Website  Click here to View on App 
World Largest Freshwater lake Click here to View on Website  Click here to View on App
Important Rivers in Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Census of India 2011 Click here to View on Website Click here to View on App
Quit India Movement 1942 Click here to View on Website Click here to View on App
Father of various fields Click here to View on Website Click here to View on App

 

FAQs: Mahatma Jyotirao Phule

Q1. महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म कधी झाला?

Ans. महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला.

Q2. महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुहे सुरु केली?

Ans. महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरु केली.

Q3. महात्मा फुले यांच्या मनावर कोणत्या पुस्तकाचा प्रभाव पडला?

Ans. महात्मा फुले यांच्या मनावर थॉमस पेन यांच्या “Rights of man” या पुस्तकाचा प्रभाव पडला.

Q4. महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली?

Ans. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Mahatma Jyotirao Phule Biography, Activities, Social work, Quotes_70.1
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

FAQs

When was Mahatma Jyotirao Phule born?

Mahatma Jyotirao Phule was born on 11 April 1827.

Where did Mahatma Jyotirao Phule and Savitribai Phule start their first school for girls?

Mahatma Jyotirao Phule and Savitribai Phule started the first school for girls at Bhidewada in Pune.

Which book influenced the mind of Mahatma Phule?

Mahatma Phule was influenced by Thomas Payne's book "Rights of Man".

Which society was founded by Mahatma Phule?

Mahatma Phule founded Satyashodhak Samaj.

Download your free content now!

Congratulations!

Mahatma Jyotirao Phule Biography, Activities, Social work, Quotes_90.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Mahatma Jyotirao Phule Biography, Activities, Social work, Quotes_100.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.