Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Social Reformer Part 3: Dr...

MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 3 | MPSC Social Reformers of Maharashtra – Part 3: Dr. Babasaheb Ambedkar

Table of Contents

MPSC Social Reformers of Maharashtra – Part 3 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 3: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर केली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 परीक्षेच्या तयारीला सर्व उमेदवार लागलेच असतील. तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब पूर्व व मुख्य परीक्षेत अभ्यासक्रमातील बरेच घटक समान आहेत. अशा घटकांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना सोयीचे जावे, यासाठी आपण रोज अभ्यासक्रमातील काही घटकांचा अभ्यास करणार आहोत. MPSC Social Reformers of Maharashtra – Part 3 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 3

MPSC Social Reformers of Maharashtra – Part 3 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 3

MPSC Social Reformers of Maharashtra – Part 3: MPSC साठी इतिहासाच्या अभ्यास करताना समाज सुधारकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. समाज सुधारकांचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. त्यामुळेच राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सुधारक आपण क्रमश: पद्धतीने बघणार आहोत. आजच्या लेखात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास करणार आहोत. आपण याआधी अभ्यास केलेल्या सुधारकांची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 1

MPSC Social Reformers of Maharashtra- Dr. Babasaheb Ambedkar | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर:

MPSC Social Reformers of Maharashtra - Part 3: Dr. Babasaheb Ambedkar_3.1
Dr B. R. Ambedkar

Dr. Babasaheb Ambedkar – Background | डॉ बाबासाहेब आंबेडकर- पार्श्वभूमी 

डॉ. आंबेडकर (1891 – 1956) : 

जन्म महू, इंदोर (मध्य प्रदेश)
मूळ गाव आंबवडे ता.  मंडणगड रत्नागिरी
आई भिमाबाई (मृत्यु- 1896)
वडील भिमा रामजी सपकाळ (मृत्यु – 1913)

शिक्षक : पा. वा. केळुस्कर (आडनाव आंबेडकर ठेवणारे)

प्राथमिक शिक्षण : रत्नागिरी

माध्यमिक शिक्षण : सातारा

1896 : वयाच्या 5 व्या वर्षी आईचा मृत्यु.

1913 : वडीलांचा मृत्यु.

रमाबाईशी विवाह : 1908

रमाबाईंचा मृत्यु : 1935

डॉ. शारदा कबीर यांच्याशी दूसरा विवाह : 1948

डॉ. आंबेडकरांचे गुरु : गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले.

डॉ. आंबेडकरांवर प्रभाव :

धर्मकल्पना बर्क
शासन विषयक सिद्धांत जे एस मिल
सामाजिक स्वातंत्र्य संकल्पना बुकर टी. वाशिंग्टन

निवास :

दिल्लीतील निवासस्थान Hoardings Avenue
मुंबईतील निवासस्थान हिंदू कॉलनी, दादर
राजगृह ग्रंथालय 32,000 ग्रंथांचे भांडार

डॉ. आंबेडकरांना “दलितांचा मुक्तीदाता” ही उपाधी सयाजीराव गायकवाड यांनी दिली.

घोषणा : आम्हाला भीक नको, झगडून हवक हवेत.

स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा संस्कृत असावी, असे त्यांचे मत होते.

Dr. Babasaheb Ambedkar – Higher Education | डॉ बाबासाहेब आंबेडकर- उच्च शिक्षण

1912 : BA (पर्शियन, इंग्रजी) from Elphinston College, मुंबई

शिष्यवृत्ती : सयाजीराव गायकवाड (10 वर्ष नोकरी करण्याच्या अटीवर)

पुढील शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्कला प्रयाण.

वर्ष पदवी विषय
1913 M.A. प्राचीन भारतातील व्यापार
1916 PhD

National Dividend of India- Historical and Analytical Study (Guide: Prof. Selimman.)

1916

London School of Economics ला प्रवेश (शिक्षण अर्धवट सोडावे लागले)

बडोदा संस्थानात नोकरी करण्यासाठी परतले. तेथे Military Secretary पदावर रुजू झाले. परंतू नंतर ती नोकरी सोडली आणि मुंबई मध्ये Stocks & Shares मध्ये सल्ला देणारी कंपनी सुरु केली.

1918 ते 1920 : प्राध्यापक, सिडनेहॅम कॉलेज, मुंबई.

1920 साली शाहू महाराज यांनी शिष्यवृत्ती देवून लंडन येथे पाठवले.

वर्ष पदवी विद्यापीठ विषय
1921 M.Sc. London University

 

Provincial Decentralization of Imperial Finances in India
Duties of Democratic Government in India.
1922 Law Bon University, Germany
1923 D.Sc. London University The problem of Rupee.

The problem of Rupee हा प्रबंध पुढे RBI कडून History of Indian Indian currency & Banking नावने प्रसिद्ध करण्यात आला.

1923 साली भारतात परतल्यावर इंग्रज सरकारची District Judge म्हणून नेमणूकीची तसेच 3 वर्षात High Court Judge म्हणून पदोन्नती देण्याची ऑफर. परंतू डॉ आंबेडकर यांनी हा प्रस्ताव नाकारला.

1919 : साउथबोरो सुधारणा समिती समोर साक्ष:

  • समितीचे इतर सदस्य: चिमणलाल सेटलवाड, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, श्रीनिवास शास्त्री, तेजबहादूर सप्रू
  • सरकारकडून अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त: वि. रा. शिंदे, डॉ. आंबेडकर

1928: सायमन कमिशन समोर साक्ष:

  • पुरुष व स्त्रिया दोघांना समान मताधिकार मिळावा ही मागणी.

Dr. Babasaheb Ambedkar – Some important meetings of the untouchables | डॉ बाबासाहेब आंबेडकर- अस्पृश्यांच्या काही महत्वाच्या सभा

  1. 1920: महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परीषद, माणगाव (अस्पृश्यांची परीषद)
  • अध्यक्ष: डॉ. आंबेडकर
  • संयोजक: अप्पासाहेब दादागोंडा पाटिल
  • तेथे शाहू महाराजांसोबत सहभोजन
  • तेथे त्यांनी दलितांसठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली.
  1. जून 1920: अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, नागपूर
  • अध्यक्ष: शाहू महाराज
  • सचिव: गणेश अवकाजी गवई, किसन फागुजी बनसोडे.
  • Exhibition Ground नागपूरच्या सभेत 10,000 लोक उपस्थित.
  1. 1918: अस्पृश्यता निवारण परीषद, मुंबई
  • अध्यक्ष: सयाजीराव गायकवाड
  1. 1920: अस्पृश्यता निवारण परिषद, नागपुर
  • अध्यक्ष: महात्मा गांधी
  1. 1922: अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद, दिल्ली
  • अध्यक्ष: शाहू महाराज
  • संयोजक: गणेश अक्काजी गवई
  1. 1923: मुंबई इलाखा अस्पृश्यता निवारण परीषद, पुणे
  • ब्राम्हणेतर पक्षाचे अस्पृश्यांना 4 थे अधिवेशन
  • अध्यक्ष: धनजी कूपर
  • अस्पृश्यांना “आदि हिंदू” हा शब्द वापरावा.

Dr. Babasaheb Ambedkar- Established Institutions | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या संस्था

  1. बहिष्कृत हितकारणी सभा (1924-1928)
  • अध्यक्ष: चिमणलाल सेटलवाड
  • कार्याध्यक्ष: डॉ. आंबेडकर
  • कार्यवाह: सीताराम सिवतरकर
  • ब्रीदवाक्य: शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
  • हस्तलिखित: सरस्वती विलास
  • 1924: बहिष्कृत मेळा वृत्तपत्र सुरु केले
  • 1925: सोलापूर येथे वसतीगृह स्थापन
  • 1928: भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ
    • पनवेल, जळगांव येथे येथे वसतीगृहे स्थापन
  • 1929: भारतीय बहिष्कृत समाजसेवी सभा स्थापन
  • तसेच वि. रा. शिंदे यांच्या “निराश्रित सहाय्यकारी मंडळी” संस्थेवर ताबा प्रस्थापित केला.
  1. समता सैनिक दल (1926)
  • सदस्य: पूर्वीचे ब्रिटिशांच्या लष्करातील निवृत्त सैनिक
  • बुधवार: लष्करी कवायतीसाठी
  • 1938: संख्या 2000 सैनिक
  1. समाज समता संघ (1927)
  • जात-पात मोडक मंडळ, पंजाबच्या धर्तीवर
  • श्रीधरपंत टिळक यांच्यासोबत स्थापना
  • अस्पृश्यांसोबबत सहभोजन
  • अस्पृश्यांचे वैदिक विवाह

Dr. Babasaheb Ambedkar – Newspapers | डॉ. बाबासाहेब आंबेडकर- सुरू केलेली वृत्तपत्रे

  1. मूकनायक साप्ताहिक (1920)
  • त्यावर सुरूवातीला “संत तुकाराम” यांचा अभंग
  • संपादक : पांडूरंग भाटकर
  • नंतर संपादक : ज्ञानदेव घोलप
  • का. र. मित्र यांच्या मनोरंजन छापखान्यात छपाई
  1. समता पाक्षिक (1928)
  • संपादक: देवराव विष्णु नाईक
  1. बहिष्कृत समाज पाक्षिक (1927-1928)
  • त्यावर सुरूवातीला “संत ज्ञानेश्वर” यांची वचने.
  • सत दोन वर्षे चालले.
  • 1930 ला पुन्हा सुरु केले.
  • त्यावेळी अग्रलेख: पुनश्च हरीओम.
  • लोकहितवादी यांची शतपत्रे पुन्हा छापली.
  1. मानवता वृत्तपत्र (1928-30)
  2. जनता पाक्षिक (1930-56)
  • अग्रलेख: आम्ही शासनकर्ता जमात बनणार
  • 1956: त्याचे नाव बदलून प्रबुद्ध भारत‘ ठेवले
  • “अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ” आणि “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया”चे अधिकृत वृत्तपत्र

Dr. Babasaheb Ambedkar- Important Agitations under his Leadership | डॉ बाबासाहेब आंबेडकर: नेतृत्वाखाली झालेली महत्वाची आंदोलने

  1. महाडचा सत्याग्रह (20 मार्च 1927)
  • ब्राम्हणेतर पक्षाचे नेते सी. के. बोले यांनी 1923 साली विधीमंडळात सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये, असा ठराव पास करून घेतला.
  • सप्टेंबर 1926 मध्ये महाड नगरपालिकेने तसा ठराव संमत केला. परंतू त्याची अंमलबजावणी झाली नाही, कारण प्रत्यक्षात लोक सवर्णाना भीत होते.
  • महाड नगरपालिका अध्यक्ष: सुरेंद्रनाथ टिपणीस (आगरकर अनुयायी)
  • 19-20 मार्च 1927: कुलाबा जिल्हा बहिष्कृत परीषद, महाड येथे भरली.
  • सभेसाठी जागा फतेह सिंह यांनी दिली.
  • 20 मार्च 1927: बाबासाहेबांनी चवदार तळयाचे पाणी प्राशन केले.
  • भास्करराव जाधव व दिनकर जवळकर पण शामील झाले.
  • सवर्णानी काठ्यांनी मारहाण करून उपद्रव केला.
  1. मनुस्मृती दहन (25 डिसेंबर1927)
  • सत्याग्रह परीषदेचे महाड येथे आयोजन
  • स्वागताध्यक्ष – दिपु संभाजी गायकवाड़
  • गणपत जाधव (मडके दुवा) आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृतीचे प्रत्येक पान श्लोक म्हणून यज्ञकुंडात दहन केले
  1. अंबादेवी मंदिर, अमरावती सत्याग्रह (15 फेब्रूवारी 1928)
  • पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वात.
  • त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही सहभाग.
  1. काळाराम मंदिर सत्याग्रह (1930- 36)
  • मानवी इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा सत्याग्रह (1462 दिवस)
  • 3 मार्च 1930: सत्याग्रहींच्या तुकडया मंदिराच्या दरवाज्यांवर.
  • उत्तर दरवाजावर: पतित पावन दास
  • पश्चिम दरवाजावर: शंकरदास नारायणदास
  • पूर्व दरवाजावर: कचरू साळवे
  • दक्षिण दरवाजावर: पांडुरंग राजभोज
  • जिल्हाधिकारी गॉर्डनचा मंदिर बंद ठेवण्याचा आदेश.
  • 1 एप्रिल 1930: मंदिराचे दरवाजे उघडले.
  • त्यावर 200 अस्पृश्यांची रथयात्रा ज्याला विरोध करण्यासाठी सवर्णांच्या मंदिर प्रवेश प्रतिबंध समितीने हिंसेचा आश्रय घेतला.
  • महारांची घरे जाळली गेली.
  • दिनकर जवळकर जखमी.
  • कलेक्टरने परिसरात कलम 144 लागू केले.
  • एप्रिल 1932: अस्पृश्य स्त्रीयांचा मंदिर प्रवेशाचा निर्धार.
  • नेतृत्व – देवराव नाईक.
  • हजारो स्त्रीयांना अटक.
  • मार्च 1934: पुन्हा सत्याग्रह तीव्र करण्याचा निर्धार परंतु बाबासाहेबांनी त्यांना परावृत्त केले.
  • 1936 ला फक्त स्पृश्य लोकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले गेले.
  • हा सत्याग्रह 5 वर्ष 7 महिने 11 दिवस चालला.

Dr. Babasaheb Ambedkar- Books | डॉ बाबासाहेब आंबेडकर- ग्रंथ संपदा

  1. 1918: Small Holdings in India
  2. 1924: Castes in India
  3. 1937: Annihilation of Caste (जात-पात तोडक मंडळाच्या सभेतील अध्यक्षीय भाषण)
  4. 1940: Thoughts on Pakistan (पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा. त्यातून हिंदूच्या उत्कर्षाचा मार्ग मोकळा होईल असे मत)
  5. 1943: Ranade, Gandhi & Jinnah.
  6. 1945: What Congress & Gandhi have done to untouchables.
  7. 1946: Who were the Shudras? (पूर्वकालीन क्षत्रिय)
  8. 1948: The Untouchables.
  9. 1955: Thoughts on linguistic States.
  10. 1957: Riddles in Hinduism.
  11. 1957: Buddha & His Dhamma. (मृत्युनंतर प्रकाशित ).
  12. आत्मचरीत्र: Waiting for Visa

Dr. Babasaheb Ambedkar – Attended the Round Table Conference | डॉ बाबासाहेब आंबेडकर- गोलमेज परीषदांना हजर

  • 1931- लंडनमध्ये अस्पृश्यांच्या हक्काची मागणी जाहिरनामा मांडला.
  • आंबेडकरांची दलितांनास्वतंत्र मतदार संघाची मागणी.
  • दलितांना प्रोटेस्टंट हिंदू / Non conformist Hindu म्हणावे अशी मागणी.
  • 16 ऑगस्ट 1932: सरकारने अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मान्य केले.(जातीय निवाडा)
  • 20 सप्टेंबर 1932: गांधीचे त्याविरोधात आमरण उपोषण.
  • 25 सप्टेंबर 1932: पुणे करार
  • पुणे करारानुसार प्रांतीय कायदे मंडळात दलितांना 148 जागा तर केंद्रीय कायदे मंडळात 18% राखीव जागा मिळाल्या.

Dr. Babasaheb Ambedkar- Conversion | डॉ. बाबासाहेब आंबेडकर- धर्मांतर

13 ऑक्टोबर 1935:  येवला सभा (नाशिक)

  • स्वागताध्यक्ष: अमृत धोंडीबा रणखांबे
  • घोषणा: मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.
  • त्यानंतर 1 वर्ष बाबासाहेबांनी विविध धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला.
  • 1950: बौद्ध धर्म परीषद, कोलंबो येथे हजर.
  • 1952: बौदध परीषद, रंगूनला हजर.
  • 1956: जागतिक बुद्धिस्त परीषद्, काठमांडू येथे उपस्थित.
  • 14 ऑक्टोबर 1956: नागपुरात बौद्ध धर्माचा स्वीकार (दिक्षा- चंद्रमणी महास्थिवीर यांनी दिली.)
  • 6 डिसेंबर 1956 : दिल्ली येथे निधन – महापरीनिर्वाण.

अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख सुधारकांचा अभ्यास केलेला आहे. उर्वरीत समाज सुधारक आपण या पुढील लेखांमध्ये बघणार आहोत. आम्ही अशीच उपयुक्त माहिती तुमच्यासाठी यापुढेही घेऊन येणार आहोत. त्याचा तुम्हाला अभ्यास करताना नक्कीच खूप फायदा होईल. त्यासाठी Adda247-Marathi च्या संकेतस्थळावर भेट देत रहा. तुम्हाला Adda247-Marathi च्या टीम कडून अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.

FAQS: Dr. Babasaheb Ambedkar – MPSC Social Reformers of Maharashtra

1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? 
उत्तर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू, इंदोर (मध्य प्रदेश) येथे झाला.
2. घटना समितीच्या मसूदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर : घटना समितीच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.

3. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्मात धर्मांतर केले?
उत्तर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केले.
4. MPSC च्या कोणत्या परीक्षा आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारकांवर प्रश्न विचारले जातात?
उत्तर : MSPC च्या अनेक परीक्षा आहेत ज्यात महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर प्रश्न विचारले जातात जसे की MPSC राज्य सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, MPSC संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा, MPSC संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा इत्यादी.

Also Read,

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Maha Pack
Maharashtra Maha Pack

Sharing is caring!

FAQs

Where was Dr. Babasaheb Ambedkar born?

Dr. Babasaheb Ambedkar was born in Mhow, Indore (Madhya Pradesh).

Who was the chairman of the drafting committee of the Constituent Assembly?

Dr. Babasaheb Ambedkar was the Chairman of the Drafting Committee.

Dr. Babasaheb Ambedkar converted to which religion?

Dr. Babasaheb Ambedkar converted to Buddhism.

What are the MPSC exams in which questions are asked on social reformers in Maharashtra?

MSPC has a number of exams which ask questions on social reformers in Maharashtra such as MPSC State Service Pre and Main Exam, MPSC Combined Group B Pre and Main Exam, MPSC Combined Group C Pre and Main Exam etc.