Marathi govt jobs   »   Study Materials   »   AMRUT Mission

AMRUT Mission: Study Material for All competitive Exams| AMRUT मिशन

AMRUT Mission: The central government announced the AMRUT Mission, an unwavering urban revitalization and transformation mission for the development of 500 cities across the country, the development of 100 cities as ‘smart cities, and the Pradhan Mantri Awas Yojana for the right roof over the head of everyone in cities by 2022. In this article, you will get detailed information about AMRUT Mission, Objectives of AMRUT Mission. Coverage of Amrut Mission, List of Cities in AMRUT Mision (Maharashtra) in detail which helps for upcoming all Competative Exams.

AMRUT Mission
Category Study Material
Useful for All Competitive Exams
Subject General Knowledge
Article Name AMRUT Mission

AMRUT Mission

AMRUT Mission: देशभरातील 500 शहरांच्या विकासासाठी अटल शहरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन मिशन AMRUT Mission, 100 शहरांचा ‘स्मार्ट शहरे’ म्हणून विकास, आणि सन 2022 पर्यंत शहरांतील प्रत्येकाच्या डोक्यावर हक्काचे छप्पर यासाठी पंतप्रधान आवास योजना अशी शहरविकासाला मोठे बळ देणारी त्रिसूत्री केंद्र सरकारने AMRUT Mission जाहीर केले. अलीकडेच सरकार ने AMRUT 2.0 ची पण घोषणा केली. AMRUT 2.0 घोषणा केल्यामुळे चालू घडामोडी व Static Awareness मध्ये येतो. सोबतच MPSC च्या गट क च्या परीक्षेच्या दृष्टीनेसुद्धा हा घटक महत्वाचा आहे. आज आपण या लेखात अमृत ​​मिशन (AMRUT Mission) म्हणजे काय?, AMRUT Mission उद्दिष्टे, AMRUT Mission ची व्याप्ती व AMRUT 2.0 याबद्दल माहिती पाहणार आहोत. 

AMRUT Mission | AMRUT मिशन 

AMRUT Mission: केंद्र शासनातर्फे लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी, स्वच्छ, शास्वत व पर्यावरणपूर्वक शहरे तयार करण्यासाठी अटल मिशन  फॉर रिज्युवेनेशन अंड ॲण्ड अर्बन  ट्रान्सफॉरमेशन (AMRUT Mission) या महत्वाकांक्षी अभियानाची घोषणा मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते दिनांक 25-06-2015 रोजी करण्यात आली. अमृत ​​योजनेची (AMRUT Mission) काही व्यापक उद्दिष्टे प्रत्येकाला नळाच्या पाण्याची आणि सांडपाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, उद्याने आणि मोकळ्या जागांसारखी हिरवळ व्यवस्थित राखणे, डिजिटल आणि स्मार्ट सुविधा जसे की हवामानाचा अंदाज, इंटरनेट आणि वायफाय सुविधा, प्रोत्साहन देऊन प्रदूषण कमी करणे. या आधी या योजनेचे नाव जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्यूअल मिशन असे होते.

AMRUT Mission: Study Material for MHADA Exam | AMRUT मिशन
AMRUT Mission

Important Revolutions in India

Objectives of AMRUT Mission | AMRUT मिशन चा उद्देश

Objectives of AMRUT Mission: अटल मिशन फॉर रिजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT Mission) चे उद्देश खालीलप्रमाणे आहे

  1. शहरातील रहिवाशांना पाणीपुरवठा, मलनिःसारण, नागरी परिवहन पुरवणे, शहरामध्ये प्रामुख्याने गरिबांसाठी नागरी सुविधांची निर्मिती करून शहरातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारणे
  2. शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे, शहराच्या स्वच्छतेकरिता मलनिःसारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करणे, शहरामध्ये मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, शहरातील परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करून प्रदूषण कमी करणे व इतर सुविधांची निर्मिती करणे
  3. हिरवळ आणि सुस्थितीत मोकळ्या जागा (उदा. उद्याने) विकसित करून शहरांच्या सुविधा मूल्य वाढवणे
AMRUT Mission: Study Material for MHADA Exam | AMRUT मिशन
AMRUT MISSION

अमृत अभियानाची (AMRUT Mission) देशभरात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शक सूचना दिनांक 25-06-2015 रोजी केंद्र शासनाच्या शहरी विकास  मंत्रालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.  त्याअनुषंगाने  केंद शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार AMRUT Mission (अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अंड ॲण्ड अर्बन  ट्रान्सफॉरमेशन)  अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने दिनांक 13 ऑक्टोबर 2015 ला शासन निर्णय काढला.

Coverage of AMRUT Mission | AMRUT मिशन चे कव्हरेज

Coverage of AMRUT Mission: AMRUT Mission अंतर्गत पाचशे शहरांची निवड करण्यात आली आहे. AMRUT Mission अंतर्गत निवडलेल्या शहरांची श्रेणी खाली दिली आहे:

  • कॅन्टोन्मेंट बोर्डांसह (नागरी क्षेत्र) 2011 च्या जनगणनेनुसार अधिसूचित नगरपालिकांसह एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली सर्व शहरे आणि गावे
  • सर्व राजधानी शहरे/राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची शहरे
  • सर्व शहरे/नगरे HRIDAY योजनेअंतर्गत MoHUA द्वारे हेरिटेज सिटी म्हणून वर्गीकृत केली आहेत,
AMRUT Mission: Study Material for MHADA Exam | AMRUT मिशन
AMRUT Focus Area
  • 75,000 पेक्षा जास्त आणि 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली मुख्य नद्यांच्या काठावरील तेरा शहरे
  • डोंगराळ राज्यांमधील दहा शहरे, बेटे आणि पर्यटन स्थळे (प्रत्येक राज्यातून एक शहर).

Important Days In November 2022

Progress made during Phase I | पहिल्या टप्प्यात झालेली प्रगती

Progress made during Phase I: AMRUT Mission अंतर्गत 1.1 कोटी घरगुती नळ कनेक्शन आणि 85 लाख गटार/सेप्टेज कनेक्शन प्रदान करण्यात आले आहेत. 6,000 MLD सांडपाणी प्रक्रिया क्षमता विकसित केली जात आहे, त्यापैकी 1,210 MLD क्षमता आधीच तयार झाली आहे, 907 MLD प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची तरतूद आहे. 3,600 एकर क्षेत्रासह 1,820 उद्याने विकसित करण्यात आली आहेत, तर आणखी 1,800 एकर क्षेत्र हिरवेगार आहे. आतापर्यंत 1,700 पूरस्थिती दूर करण्यात आली आहे. आगामी म्हाडाच्या परीक्षेत AMRUT Mission अंतर्गत किती घरगुती नळ कनेक्शन दिल्या गेले यासारखे प्रश्न विचारू शकतात. त्यासाठी हे आकडेवारी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

List of Cities in AMRUT Mision (Maharashtra) | AMRUT मिशन मधील शहरांची यादी (महाराष्ट्र)

List of Cities in AMRUT Mision (Maharashtra): केंद्र शासनाने  AMRUT Mision अंतर्गत महाराष्ट्रातील मुंबई सह 43 शहरांची निवड करण्यात आली आहे.

टीप: येथे एक बाब लक्षात घ्यावी की AMRUT Mission मध्ये महाराष्ट्रात एकूण 44 शहरांची निवड केल्या गेली आहे. (मुंबई व इतर 43)

AMRUT Mission: Study Material for MHADA Exam | AMRUT मिशन
महाराष्ट्रातील शहरे (AMRUT Mission)

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यातील 43 शहरांमध्ये सदर अभियान राबविण्यात येणार आहे. ती शहरे खालीलप्रमाणे

अनुक्रमांक शहराचे नाव
1 नवी मुंबई महानगरपालिका
2 पुणे महानगरपालिका
3 नागपूर महानगरपालिका
4 ठाणे महानगरपालिका
5 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
6 नाशिक महानगरपालिका
7 कल्याण डोंबिवली महानगरपालिका
8 वसई विरार महानगरपालिका
9 औरंगाबाद महानगरपालिका
10 नवी मुंबई महानगरपालिका
11 सोलापूर महानगरपालिका
12 मीरा भाईंदर महानगरपालिका
13 भिंवंडी –निजामपूर महानगरपालिका
14 अमरावती महानगरपालिका
15 नांदेड – वाघाळा महानगरपालिका
16 कोल्हापूर महानगरपालिका
17 उल्हासनगर महानगरपालिका
18 सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका
19 मालेगाव महानगरपालिका
20 जळगाव महानगरपालिका
21 अकोला महानगरपालिका
22 लातूर महानगरपालिका
23 धुळे महानगरपालिका
24 अहमदनगर महानगरपालिका
25 चंद्रपूर महानगरपालिका
26 परभणी महानगरपालिका
27 इचलकरंजी नगरपरिषद
28 जालना नगरपरिषद
29 अंबरनाथ नगरपरिषद
30 भुसावळ नगरपरिषद
31 पनवेल नगरपरिषद
32 कुळगाव – बदलापूर नगरपरिषद
33 बीड नगरपरिषद
34 गोंदिया नगरपरिषद
35 सातारा नगरपरिषद
36 बार्शी नगरपरिषद
37 यवतमाळ नगरपरिषद
38 अचलपूर नगरपरिषद
39 उस्मानाबाद नगरपरिषद
40 नंदुरबार नगरपरिषद
41 वर्धा नगरपरिषद
42 उदगीर नगरपरिषद
43 हिंगणघाट नगरपरिषद
Adda247 App
Adda247 Marathi Application

Blood Circulatory System: Blood Vessels, Human Blood And Heart

AMRUT 2.0 | अमृत 2.0

AMRUT 2.0: 2025-26 पर्यंत अटल मिशन फॉर रिजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन 2.0 (AMRUT 2.0) (AMRUT Mission) ला मंत्रिमंडळाने ऑक्टोबर 2021 मध्ये आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल म्हणून मान्यता दिली आणि परिपत्रकाद्वारे शहरांना ‘पाणी सुरक्षित’ आणि ‘स्वयं-शाश्वत’ बनविण्याच्या उद्देशाने मान्यता दिली.

AMRUT Mission अंतर्गत केलेल्या उल्लेखनीय प्रगतीला पुढे नेत, सर्व 4,378 वैधानिक शहरांमध्ये घरगुती नळ कनेक्शन प्रदान करून पाणी पुरवठ्याच्या सार्वत्रिक कव्हरेजचे लक्ष्य आहे. 500 AMRUT Mission शहरांमध्ये घरगुती सीवरेज/सेप्टेज व्यवस्थापनाचे 100% कव्हरेज हे इतर उद्दिष्ट आहे. अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी 2.68 कोटी नळ जोडणी आणि 2.64 कोटी गटार/सेप्टेज कनेक्शन देण्याचे मिशनचे लक्ष्य आहे.

AMRUT Mission: Study Material for MHADA Exam | AMRUT मिशन
AMRUT 2.0

AMRUT 2.0 (AMRUT Mission) साठी एकूण सूचक परिव्यय रु. 2,77,000 कोटी आहे ज्यात आर्थिक वर्ष 2021-22 ते आर्थिक वर्ष 2025-26 या पाच वर्षांसाठी रु. 76,760 कोटी केंद्रीय वाटा आहे.

AMRUT 2.0 (U) च्या इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये Pey Jal Survekshan यांचा समावेश आहे जे शहरी जल सेवा बेंचमार्किंगसाठी शहरांमधील स्पर्धेला प्रोत्साहन देईल. मिशन सार्वजनिक-खाजगी सहभागाद्वारे दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये 10% किमतीच्या प्रकल्पांची अंमलबजावणी अनिवार्य करून बाजार वित्तसंस्थेला प्रोत्साहन देईल. मिशन (AMRUT Mission) तंत्रज्ञान उप-अभियानाद्वारे जगातील जल क्षेत्रातील आघाडीचे तंत्रज्ञान आणेल. जल परिसंस्थेमध्ये उद्योजक/स्टार्ट अप्सना प्रोत्साहन दिले जाईल. जलसंधारणाबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी माहिती शिक्षण आणि संप्रेषण (IEC) मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

See Also,

Article Name Web Link App Link
Bird Sanctuary In India 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Important Rivers in Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
States And Their Capitals, 28 States And 8 Union Territories In India 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Types Of Winds Click here to View on Website  Click here to View on App
President’s Rule In A State Click here to View on Website  Click here to View on App
Mahatma Jyotirao Phule Death Anniversary 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Satavahana Dynasty: History, Ruler, And Other Important Facts Click here to View on Website  Click here to View on App
Important Boundary Lines Click here to View on Website  Click here to View on App
Indian Constitution: Framing, Sources, Parts, Articles, And Schedules Click here to View on Website  Click here to View on App
Importance of Plant Nutrients Click here to View on Website  Click here to View on App
Hill Stations In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Important Events Of the Indian Freedom Struggle Click here to View on Website  Click here to View on App
Revolt Of 1857 In India And Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Dams In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Profit And Loss Formula, Sample Questions Click here to View on Website  Click here to View on App
Jnanpith Awards 2022 Click here to View on Website  Click here to View on App
List of Indian Cities on Rivers Banks Click here to View on Website  Click here to View on App
Chief Minister of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Computer Awareness Click here to View on Website  Click here to View on App
River System in Konkan Region of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Fundamental Duties: Article 51A Click here to View on Website  Click here to View on App
List of Prime Ministers of India From 1947-2022 Click here to View on Website  Click here to View on App
Internal Structure Of Earth Click here to View on Website  Click here to View on App
Atmosphere Layers Click here to View on Website  Click here to View on App
Parlament of India: Rajya Sabha Click here to View on Website  Click here to View on App
Classical and Folk Dances of India Click here to View on Website  Click here to View on App
Largest Countries in the World by Area 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Nationalized Banks List 2022 Click here to View on Website  Click here to View on App 
World Largest Freshwater lake Click here to View on Website  Click here to View on App
Census of India 2011 Click here to View on Website Click here to View on App
Quit India Movement 1942 Click here to View on Website Click here to View on App
Father of various fields Click here to View on Website Click here to View on App

 

FAQs AMRUT Mission

Q1. AMRUT Mission मधील AMRUT चा अर्थ काय?

Ans. AMRUT म्हणजे Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation

Q2. AMRUT Mission ची सुरवात कधी झाली?

Ans. AMRUT Mission ची सुरवात 2015 मध्ये झाली.

Q3. AMRUT Mission मध्ये महाराष्ट्रातील किती शहराची निवड झाली?

Ans. AMRUT Mission मध्ये महाराष्ट्रातील 44 शहराची निवड झाली.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247 Prime Pack
adda247 Prime Pack

Sharing is caring!

FAQs

What does AMRUT mean in AMRUT Mission?

AMRUT stands for Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation

When did AMRUT Mission start?

AMRUT Mission started in 2015.

How many cities in Maharashtra were selected for AMRUT Mission?

44 cities in Maharashtra were selected in AMRUT Mission.

Where can I find important articles for MHADA recruitment?

On the official website of Adda247 Marathi you will find complete information regarding MHADA, such as exam study material, exam notification, admission card.