Table of Contents
River System in Konkan Region of Maharashtra, In this artile you wil get detailed information about River System in Konkan Region of Maharashtra. River System in Konkan Region of Maharashtra and Important Confluence of Rivers in Konkan.
Important Rivers in Maharashtra | |
Category | Study Material |
Useful for | Competitive Exam |
Subject | Maharashtra Geography |
Name | River System in Konkan Region of Maharashtra |
River System in Konkan Region of Maharashtra
River System in Konkan Region of Maharashtra: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021, MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि तसेच गट क संयुक्त इ. परीक्षेत भूगोलाच्या विषयात महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील महत्त्वाच्या नद्यावर (River System in Konkan Region of Maharashtra) बऱ्याच द्या प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. River System in Konkan Region घटकाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. कोकण प्रदेशातील नद्यांचा (River System in Konkan Region of Maharashtra) उगम कुठे होतो, नद्यांची लांबी किती आहे, कोकणातील नद्यांवरील धरणे, कोकणातील खाड्या, नद्या आणि जिल्हे. ही सर्व महत्वाची माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.
River System in Konkan Region of Maharashtra | महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली
River System in Konkan Region of Maharashtra: सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2021 Series, Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आजच्या या लेखात आपण कोकण प्रदेशातील नद्यांचा (River System in Konkan Region of Maharashtra) याबद्दल चर्चा करणार आहे.

River System in Konkan Region of Maharashtra | कोकण नदीप्रणाली
River System in Konkan Region of Maharashtra: महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेल्या कोकण किनारा आणि सह्याद्री पर्वत यांदरम्यान वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचा समवेश कोकण नदीप्रणालीत होतो. कोकणातील नद्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
- अरुंद कोकण किनारपट्टी आणि पश्चिमेकडे तीव्र उतार असलेला सह्याद्री यामुळे कोकणातील नद्यांची लांबी खूप कमी आहे. (साधारण – 49 किमी ते 155 किमी)
- त्या अतिशय वेगाने वाहत येत असल्याने खूप कमी गाळ वाहून आणतात
- बहुतेक सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात.
- यांच्या मुखाजवळ खाड्या निर्माण झाल्या आहेत
Parliament of India: Lok Sabha
Parliament of India: Rajya Sabha
Important Rivers in Kokan
कोकणातील महत्त्वाच्या नद्या खालीलप्रमाणे:
- वैतरणा नदी
- उगम: – त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी डोंगराच्या पश्चिमेला
- लांबी: – 154 किमी
- कोकणातील सर्वात मोठी नदी (लांब नदी)
- वाडा, शहापूर आणि पालघर या तालुक्यातून वाहते
- उपनद्या: – डाव्या तीराने – तानसा, दहरेजा
उजव्या तीराने – सूर्या, पिंजाळ
- उल्हास नदी
- उगम: – रायगड जिल्ह्यातील राजमाची तेकड्याच्या उत्तर भागात
- लांबी: – 122 किमी (लांबीनुसार दुसरा क्रमांक)
- रायगड, ठाणे पालघर अशी वाहते
- उपनद्या: – उजव्या तीराने – मुरबाडी, काळू, भातसा
डाव्या तीराने – बारवी, भिवपुरी
- पाताळगंगा नदी
- उगम: – गडबाद डोंगर, बोर घाट
- लांबी: – 45 किमी
- रायगड जिल्ह्यातून धरमतर च्या खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते
- उपनदी: – डाव्या तीराने – भोगवती
- अंबा नदी
- उगम: – राजमाची डोंगर, जांभूळपाडा
- लांबी: – 74 किमी
- रायगड जिल्ह्यातील सुधागड व पाली तालुक्यातून वाहते
- धरमतर च्या खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते
- कुंडलिका नदी
- उगम: – सुधागड, हिरडेवाडी
- लांबी: – 65 किमी
- सुधागड व रोहा तालुक्यातून वाहते
- रोह्याच्या खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते
- सावित्री नदी
- उगम: – महाबळेश्वर
- लांबी: – 38 किमी
- उपनद्या: – उजव्या तीराने – काळ, गंधार, घोड
- रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते
- बाणकोटच्या खाडीजवळ अरबी समुद्राला मिळते
- वशिष्ठी नदी
- उगम: – सह्याद्री पर्वतरांग, रत्नागिरी जिल्हा
- लांबी: – 68 किमी
- उपनद्या: – डाव्या तीराने – गडगडी
उजव्या तीराने – जगबुडी
- दाभोळ च्या खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते.
Rivers System in Konkan and their sources | कोकणातील नद्या व त्यांची उगमस्थाने
Rivers in Konkan and their sources: खालील तक्त्यात कोकणातील नद्या (River System in Konkan Region of Maharashtra) व त्यांची उगमस्थाने दिली आहे.
अनु.क्र. |
नदीचे नाव | उगमस्थान |
01 | सूर्या |
बापगाव |
02 |
दमणगंगा | पेठ |
03 | तानसा |
मेंगलपाडा |
04 |
काळू | माळशेज घाट |
05 | उल्हास |
लोणावळा |
06 |
अंबा | जांभूळपाडा |
07 | काळ |
लिंगणा किल्ला |
08 |
सावित्री | महाबळेश्वर |
09 | शस्त्री |
कुंभार्ली घाट |
10 |
काजळी | विशालगड |
11 | वाघोठाण |
खारेपाटण |
12 |
गड | कणकवली |
13 | आचरा |
कणकवली |
14 |
पिंजाळ | नाशेर |
15 | वैतरणा |
ब्रह्मगिरी पर्वत |
16 |
भातसा | कसारा |
17 | मुरबाडी |
किमलीवली |
18 |
पाताळगंगा | खंडाळा |
19 | कुंडलिका |
हिरडेवाडी |
20 |
गांधार | लिंगाणा किल्ला |
21 | गायत्री |
महाबळेश्वर |
22 |
बाव | अंबाघाट |
23 | मुचकुंदी |
विशालगड |
24 |
देवगड | शिरोळा |
25 |
कर्ली | देवगड |
26 | तेरेखोल |
गुंटेवाडी |
River System in Konkan Region of Maharashtra: Important Confluence of Rivers in Konkan | कोकणातील नद्यांची महत्त्वाची संगमस्थळे
Important Confluence of Rivers in Konkan: खालील तक्त्यात कोकणातील नद्यांची (River System in Konkan Region of Maharashtra) महत्त्वाची संगमस्थळे दिली आहे.
अनु.क्र. |
नद्या | संगमस्थळ |
01 | सूर्या – पिंजाळ |
वाडा |
02 |
सूर्या -वैतरणा | मासवण |
03 | उल्हास – काळू |
टिटवाळा |
04 |
गांधार – सावित्री | महाड |
05 | शास्त्री – सोनवी |
संगमेश्वर |
River System in Konkan Region of Maharashtra: Dams on Konkan rivers | कोकणातील नद्यांवरील धरणे
Important Confluence of Rivers in Konkan: खालील तक्त्यात कोकणातील नद्यांवरील धरणे (River System in Konkan Region of Maharashtra) दिली आहे.
क्र. |
धरणाचे नाव | नदी (जिल्हा) |
01 | धामणी (सूर्या) |
सूर्या (पालघर) |
02 |
वैतरणा | मोडकसागर (ठाणे) |
03 | भातसा |
भातसई (ठाणे) |
04 |
तानसा | तानसा (ठाणे) |
05 | मोर्बे |
धावारी (रायगड) |
06 |
डोलावहल | कुंडलिका (रायगड) |
07 | बारवी |
बारवी (ठाणे) |
Revolt Of 1857 In India And Maharashtra
River System in Konkan Region of Maharashtra: Creeks, Rivers and Districts in Konkan | कोकणातील खाड्या, नद्या आणि जिल्हे
Creeks, Rivers and Districts in Konkan: खालील तक्त्यात कोकणातील खाड्या, नद्या आणि जिल्हे (River System in Konkan Region of Maharashtra) दिली आहे.
क्र. |
खाडीचे नाव | नदीचे नाव | जिल्हा |
01 | दातीवरा | वैतरणा |
पालघर |
02 |
वसई | उल्हास | पालघर |
03 | ठाणे | उल्हास |
ठाणे |
04 |
मणोरी | दहिसर | मुंबई |
05 | मालाड | ओशिवरा |
मुंबई |
06 |
माहीम | मिठी | मुंबई |
07 | धरमतर | पाताळगंगा व अंबा |
रायगड |
08 |
रोहा | कुंडलिका | रायगड |
09 | राजापुरी | काळ |
रायगड |
10 |
बाणकोट | सावित्री | रायगड व रत्नागिरी ची सीमा |
11 | केळशी | भारजा |
रत्नागिरी |
12 |
दाभोळ | वशिष्ठी | रत्नागिरी |
13 | जयगड | शास्त्री |
रत्नागिरी |
14 |
भाट्ये | काजळी | रत्नागिरी |
15 | पूर्णगड | मुचकुंदी |
रत्नागिरी |
16 |
जैतापूर | काजवी | रत्नागिरी |
17 | विजयदुर्ग | शुक |
रत्नागिरी व सिंधुदुर्ग ची सीमा |
18 |
देवगड | देवगड | सिंधुदुर्ग |
19 |
आचरा |
आचरा |
सिंधुदुर्ग |
20 |
कलावली | गड | सिंधुदुर्ग |
21 | कर्ली | कर्ली |
सिंधुदुर्ग |
22 |
तेरेखोल | तेरेखोल |
सिंधुदुर्ग |
Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
Study Material for All MPSC Exams: तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs: River System in Konkan Region of Maharashtra
Q1. दमणगंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे?
Ans. दमणगंगा नदीचे उगमस्थान पेठ आहे.
Q2. मालाड नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते?
Ans. मालाड नदी मुंबई जिल्ह्यातून वाहते
Q3. केळशी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते?
Ans. केळशी नदी कोणत्या रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते
Q4. सूर्या – पिंजाळ नदीचे संगमस्थळ कोणते?
Ans. सूर्या – पिंजाळ नदीचा संगम वाडा येथे होतो.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
