Marathi govt jobs   »   Study Materials   »   Fundamental Duties

Fundamental Duties: Article 51A मूलभूत कर्तव्ये: कलम 51A, Study Material for MPSC

Fundamental Duties: In this article we will learn about our Fundamental Duties, Introduction and Amendment of Article 51A. We have provided complete list of our Fundamental Duties.

Fundamental Duties
Category Study Material
Useful for Exam MPSC Grp C and other Competitive Exams
Name Fundamental Duties

Fundamental Duties: Article 51A

Fundamental Duties- Article 51A: MPSC च्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2022 Series. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी योग्य अभ्यासाचे नियोजन असेलच पाहिजे आणि अभ्यासक्रमाप्रमाणे सर्व विषय कव्हर झाले पाहिजे. Adda247 मराठी, सर्व उमेदवारांसाठी उत्तम नियोजनासोबत विविध विषयातील अभ्यासक्रमातील विविध टॉपिकसवर लेख आणत असते. ज्याणेंकरून या लेखांमार्फत उमेदवारांना चांगला अभ्यास करता यावा. तर चला आजच्या या लेखात आपण राज्यशास्त्र या विषयावरील मूलभूत कर्तव्ये: कलम 51A (Fundamental Duties: Article 51A) यावर चर्चा करणार आहोत.

Indian Constitution: Framing, Sources, Parts, Articles and Schedules

Fundamental Rights Of Indian Citizens

Fundamental Duties: Article 51A | मूलभूत कर्तव्ये: कलम 51A

Fundamental Duties- Article 51A: MPSC घेत असलेले सर्व स्पर्धा परीक्षांचे जुने पेपर पाहता राज्यशास्त्र या विषयावर MPSC राज्यसेवा, संयुक्त गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे येणाऱ्या MPSC च्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी मूलभूत कर्तव्ये हा topic खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण मूलभूत कर्तव्ये: कलम 51A (Fundamental Duties: Article 51A) याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणेही अपेक्षित असते. लोकशाहीत लोकांनी केवळ हक्कांचीच मागणी करू नये, तर कर्तव्यांप्रती त्यांनी दक्ष असावे लागते. भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. पुढे 1976 मध्ये 42व्या घटनादुरूस्तीने घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. 2002 मध्ये 86व्या घटनादुरूस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले.

Important Articles of Indian Constitution

Fundamental Duties Article 51A: Introduction | मूलभूत कर्तव्ये कलम 51A: प्रस्तावना

Fundamental Duties- Article 51A: भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत. मात्र, युएसए, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रमुख देशांच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्ये आढळून येत नाही. केवळ जपानच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्ये आढळून येतात. याउलट समाजवादी देशांनी नागरिकांच्या मूलभूत हक्क व कर्तव्यांना सारखेच महत्व प्रदान केले आहे.

Maharashtra Legislature

Fundamental Duties Article 51A: Amendment | मूलभूत कर्तव्ये कलम 51A: घटनादुरूस्ती

Fundamental Duties- Article 51A: आणिबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्यांबाबत सरदार स्वर्ण सिंह समिती स्थापन केली. या समितीने मूलभूत कर्तव्यांचे(Fundamental Duties of India) एक स्वतंत्र प्रकरण घटनेत समाविष्ट करण्याची शिफारस केली. सरकारने ही शिफारस स्विकारून 42व्या घटनादुरूस्ती(1976) अन्वये घटनेत भाग IV A समाविष्ट करण्यात आला. या नवीन भागात कलम 51A हे केवळ एकच कलम टाकण्यात आले. या कलमात 10 मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आली.

10 मूलभूत कर्तव्यांपैकी केवळ आठच कर्तव्यांची शिफारस स्वर्ण सिंह समितीने केली होती. तसेच, समितीने शिफारस केलेल्या इतर काही कर्तव्यांचा समावेश घटनेत करण्यात आला नाही.

11 वे मूलभूत कर्तव्य 86 व्या घटनादुरूस्ती, 2002 ने समाविष्ट करण्यात आले आहे.

Dams in Maharashtra

List of Fundamental Duties | मूलभूत कर्तव्यांची यादी

Fundamental Duties- Article 51A: कलम 51A मध्ये दिल्याप्रमाणे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये(Fundamental Duties of India) पुढीलप्रमाणे आहेत:

 1. घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
 2. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली. त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे.
 3. भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.
 4. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
 5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
 6. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे.
 7. वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबद्दल दया-बुद्धी बाळगणे.
 8. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.
 9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.
 10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी (en-devour and achievements) यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे.
 11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास, त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. (हे मूलभूत कर्तव्य 86 व्या घटनादुरूस्ती, 2002 ने समाविष्ट केले.)

Blood Circulatory System

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

Fundamental Duties: Article 51A, Study Material for MPSC Group C_40.1
Adda247 Marathi App

Other Study Articles

Article Name Web Link App Link
States and Their Capitals Click here to View on Website  Click here to View on App
Internal Structure Of Earth Click here to View on Website  Click here to View on App
Atmosphere Layers Click here to View on Website  Click here to View on App
Parlament of India: Rajya Sabha Click here to View on Website  Click here to View on App
Classical and Folk Dances of India Click here to View on Website  Click here to View on App
Largest Countries in the World by Area 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Nationalized Banks List 2022 Click here to View on Website  Click here to View on App 
World Largest Freshwater lake Click here to View on Website  Click here to View on App 
Important Rivers in Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App 
Census of India 2011 Click here to View on Website  Click here to View on App 
Quit India Movement 1942 Click here to View on Website  Click here to View on App 
Father of various fields Click here to View on Website  Click here to View on App

FAQs Fundamental Duties- Article 51A

Q.1 घटनेमध्ये आणीबाणीचे किती प्रकार दिलेले आहेत?

Ans. घटनेमध्ये आणीबाणीचे तीन प्रकार दिलेले आहेत.

Q.2 राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 मूलभूत कर्तव्ये (Fundamental Duties) यासाठी कोणते कलम वापरले जाते ?

Ans: कलम 51A  हे मूलभूत कर्तव्येसाठी (Fundamental Duties) कलम वापरले जाते.

Q.4  मूलभूत कर्तव्ये याची माहिती कुठे मिळेल?

Ans. मूलभूत कर्तव्ये याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Fundamental Duties: Article 51A, Study Material for MPSC Group C_50.1
adda247 Prime Pack

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Fundamental Duties: Article 51A, Study Material for MPSC Group C_70.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

Fundamental Duties: Article 51A, Study Material for MPSC Group C_80.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.