Marathi govt jobs   »   Study Materials   »   RBI and its Functions

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य | RBI and its Functions | Study Material for MPSC

RBI and its Functions: MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी एकूण 390 रिक्त पदे जाहीर केले आहेत. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ही 2 जानेवारी 2022 ला घेणार आहे. त्याचप्रमाणे MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021, इ. परीक्षा MPSC लवकरच जाहीर करणार आहे. तर या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2021 Series, Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या अंतर्गत आपण दररोज सामान्य ज्ञान या विषयातील परीक्षेला उपयोगी असे विविध Topics चा अभ्यास करणार आहोत. तर चला आजच्या या लेखात आपण पाहुयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य | RBI and its Functions.

HOW TO CRACK MPSC STATE SERVICES PRELIMS EXAM | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा कशी क्रॅक करावी

RBI and its Functions | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य

RBI and its Functions: MPSC घेत असलेले सर्व परीक्षांचे जुने पेपर पाहता अर्थशास्त्र या विषयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य यावर बरेच प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या MPSC च्या सर्व पूर्व परीक्षेत तसेच मुख्य परीक्षेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

RBI and its Functions-Overview | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य-प्रस्तावना

RBI and its Functions-Overview: भारतातील सर्वात महत्वाच्या वित्तीय संस्थांपैकी एक म्हणजे “रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)” ज्याला सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. हे सर्व व्यावसायिक बँकांच्या मूळ संस्थेप्रमाणे आहे आणि आपल्या देशातील पैशाशी संबंधित सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यापासून ते चलनापर्यंत आणि पैशावर नियंत्रण ठेवण्यावर नियंत्रण ठेवते, संपूर्ण बाजार RBI ने ठरवलेल्या धोरणांवर काम करतो. चलनवाढीला कारणीभूत न होता पुरेशा पैशाचा पुरवठा आहे याची आरबीआय खात्री करते. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित बँकेची कामे आणि कोणतीही बँक स्वतःचे नियम आणि नियमन मांडू शकत नाही.

RBI and its Functions-History | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य-इतिहास

RBI and its Functions-History: 1926 मध्ये जॉन हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्यारॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स या आयोगाने एक स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन करून तिला रिझर्व बँक ऑफ इंडिया असे नाव द्यावे ही शिफारस केली होती. RBI कायदा 1934,  या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935 रोजी आरबीआयची स्थापना करण्यात आली. ही देशाची मध्यवर्ती बँक आहे आणि 1 जानेवारी 1949 ला राष्ट्रीयीकरण झाले आणि तेव्हापासून ते पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीचे आहे. सुरुवातीला भारतीय रिझर्व्ह बँकेचे केंद्रीय कार्यालय कलकत्ता येथे स्थापन करण्यात आले परंतु नंतर ते 1937 मध्ये कायमस्वरूपी मुंबईला हलवण्यात आले.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या)

RBI and its Functions- Structure | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य- संघटन

RBI and its Functions- Structure: व्यवस्थापनाची जबाबदारी  तिच्या  मुख्यालय ठिकाणी असलेल्या मध्यवर्ती संचालक मंडळाकडे(Central Board of Directors) असते. मंडळाच्या काही सदस्यांची नियुक्ती भारत सरकारने भारतीय रिझर्व्ह बँक कायद्यानुसार केली आहे. त्यांची नियुक्ती/नामांकन चार वर्षांच्या कालावधीसाठी केले जाते.

अधिकृत संचालक: पूर्णवेळ: गव्हर्नर आणि चारपेक्षा जास्त डेप्युटी गव्हर्नर

सध्या: शक्तिकांत दास (गव्हर्नर)

श्री डॉ एम डी पात्रा (डेप्युटी गव्हर्नर)

श्री एम के जैन (डेप्युटी गव्हर्नर)

श्री रबी शंकर (डेप्युटी गव्हर्नर)

श्री राजेश्वर राव (डेप्युटी गव्हर्नर)

  • RBI चे पहिले गव्हर्नर श्री. ऑसबॉर्न अर्कल स्मिथ (1 एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७) हे होते.
  • पहिले भारतीय गव्हर्नर श्री. सी. डी. देशमुख (११ ऑगस्ट १९४३ ते ३० जून १९४९) हे होते. सी.डी.देशमुख यांनी १९४४ च्या ब्रेटनवुड परिषदेमध्ये भारताचे प्रातिनिधीत्व केले. तसेच त्यांच्या कालखंडातच भारताची फाळणी होऊन रिझर्व्ह बँकेच्या मालमत्ता व देयतांचे विभाजन भारत व पाकिस्तान मध्ये करण्यात आले.त्यांच्या कालखंडातच रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  • सर्वाधिक काळासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून बेनेगल रामाराव (1 जुलै 1949 ते 14 जानेवारी 1957) यांनी काम केले आहे.

RBI and its Functions- Functions Of RBI | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य- RBI चे कार्य

RBI and its Functions- Functions of RBI :RBI ची कार्ये पुढीलप्रमाणे :

RBI and its Functions- Functions Of RBI | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य- RBI चे कार्य
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य- RBI चे कार्य

अ) आरबीआयची परंपरागत कार्ये :

  • चलन निर्मितीची मक्तेदारी: एक रुपयाचे नाणे, एक रुपयाची नोट व इतर नाणी बघता सर्व चलन छापण्याचा तसेच प्रस्तुत करण्याचा मक्तेदारीचा अधिकार देण्यात आला आहे.
  • सरकारची बँक म्हणून कार्य (Banker to the Government): RBI कायद्याने “केंद्र सरकारची बँक” म्हणून तर राज्य सरकारशी करार करून राज्य सरकारची बँक, म्हणून (सिक्किम वगळता) कार्य करते .
  • बँकांची बँक म्हणून कार्य (Bankers Bank): ज्याप्रमाणे व्यापारी बँका आपल्या ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध करून देतात त्याप्रमाणे RBI बँकांना विविध सेवा उपलब्ध करून बँकांची बँक म्हणून RBI पुढील कार्ये करते:

i) बँकांच्या रोख राखीव निधीचा सांभाळ करणे: प्रत्येक बँकेला आपल्या एकूण ठेवींपैकी काही प्रमाणात ठेवी RBI कडे रोख राखीव निधी म्हणून ठेवावा लागतो. तसेच बँकांजवळील ज्यादा शिल्लक पैशाचा सांभाळ सुद्धा RBI दिलेला करते.

ii) कर्जे व अग्रिमे देणे: RBI व्यापारी बँकांच्या हुंड्या व वचनचिठ्यांची पुनर्वटवणी करून त्यांना वित्तीय मदत करते. तसेच, बँकांच्या मान्यताप्राप्त भारतीय प्रतिभूतींच्या ( eligible securities) तारणावर RBI त्यांना कर्जे देते.

iii)बँकांना मार्गदर्शन करणे, सल्ला देणे: RBI बँकांना बँक कोटी व्यवसायाबद्दल उदा. ठेवी स्विकारणे, कर्ज देणे इ. बाबतचे धोरण, सल्ला व मार्गदर्शन करीत असते.

iv) अंतिम ऋणदाता / अंतिम त्राता (Lender of Last Resort) म्हणून कार्य: RBI ही देशातील अंतिम कर्ज देणारी संस्था आहे. तिला निर्वाणीचा रोकडदाता असेही म्हणतात. तसेच, ती संकटग्रस्त बँकांना मदत करत असल्याने तिला अंतिम त्राता असेही म्हणतात.

v)निरसन गृह/समाशोधन गृह (Clearing House):आंतर बँक व्यवहारांची पूर्तता करणारे केंद्र म्हणजे निरसन गृह होय. भारतात जथ RBI ची शाखा आहे तेथे RBI तर जेथे RBI ची शाखा नाही तेथे RBI ची प्रतिनिधी म्हणून SBI निरसन गृहाचे कार्य करते.

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे 

  • पतनियंत्रण (Credit Control): व्यापारी बँका ठेवी स्विकारून त्यातून कर्ज देत असतात. या प्रक्रियेत बँका पतनिर्मिती करीत असतात. व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य RBI करते.
  • परकीय चलन साठ्याचा नियंत्रक (Custodian of Foreign Exchange): RBI देशाच्या परकीय चलनसाठ्याचा सांभाळ करते. चलनाचे अंतर्गत तसेच बहिर्गत मुल्य स्थिर राखण्याचे कार्य RBI ला करावे लागते. RBI परकीय चलनसाठा सुरक्षित ठेवून त्याचा वापर व्यवहारतोल (Balance of Payments) संतुलित ठेवण्यासाठी तसेच, रुपयांचा विनिमय दर स्थिर राखण्यासाठी करते.

ब) पर्यवेक्षणात्मक कार्ये (Supervisory Functions):RBI ला व्यापारी बँकांवर पर्यवेक्षण व नियंत्रणाचे विस्तृत अधिकार प्राप्त झाले आहे.

  • बँकांना परवाना देणे:  RBI च्या परवान्याशिवाय भारतात कोणीही बँक व्यवसाय करू शकत नाही. त्यामुळे बँक व्यवसायाचा विकास बँकिंगच्या यथायोग्य मार्गदर्शक तत्वाचे पालन करून होण्यास मदत झाली आहे. तसेच अजबाबदार व्यक्तींच्या हाती बँक व्यवसाय जाऊन लोकांच्या फसवणुकीच्या व्यवहारांना आळा बसला आहे. RBI ला परवाना देण्याचे नाकारण्याचा तसेच, परवाना रद्द करण्याचा अधिकार आहे,
  • शाखा परवाना पद्धती: बँकांना नवीन शाखा काढण्यासाठी तसेच, शाखेची जागा बदलविण्यासाठी गावातच/शहरातच जागा बदलण्याचे ती घ्यावी लागते, अशी संमती भारतीय बँकांना परदेशात शाखा काढण्यासाठीही घ्यावी लागते.
  • बँकांची तपासणी : RBI ला कोणत्याही बँकेचा जमाखर्च, लेखे, बँकविषयक कागदपत्रे तसेच, बँकेच्या कार्यपद्धतीचे परीक्षण करण्याचे अधिकार आहेत. 
  • बँकांच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण : बँकांनी ठी आपल्याजवळील निधीचा अयोग्य, अविचारी वापर करू नये. नीत तसेच, बँकांच्या कार्यपद्धतीमध्ये गुणात्मक बदल घडून येण्यासाठी RBI त्यांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवते.
  • बँकेच्या व्यवस्थापनावरील नियंत्रण: RBI चे बँकांच्या पाठी संचालक मंडळाच्या रचनेवर नियंत्रण असते. खाजगी बँकेच्या अध्यक्ष तसेच, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (तसेच, परकीय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची) नेमणूक, पुनर्नेमणूक केंग तसेच, सेवामुक्तीसाठी RBI ची संमती घ्यावी लागते. तसेच, संचालकांची संख्या, त्यांचे पगार, सेवाशर्ती इत्यादीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी RBI ची पूर्वसंमती घ्यावी लागते.
  • बँकांच्या विलिनीकरण/पुनर्रचना इत्यादींवर नियंत्रण: बँकांच्या ऐच्छिक विलिनीकरणासाठी RBI च्या संमतीची आवश्यकता असते. तसेच, अक्षम, आजारी, गैरव्यवस्थापन असलेल्या बँकांचे सक्तीने विलिनीकरण (तिच्या सदस्य किंवा कर्जदारांच्या संमतीशिवाय) घडवून आणण्याचा अधिकार RBI ला आहे.
  • वित्तीय पर्यवेक्षण मंडळ तसेच पर्यवेक्षण विभागाची स्थापना: RBI ने भारतीय वित्तीय व्यवस्थेचे काटेकोर पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यासाठी 16  नोव्हेंबर 1994 रोजी वित्तीय पर्यवेक्षण मंडळाची (Board for Financial Supervision) स्थापना केली. त्या मंडळाचा अध्यक्ष RBI चा गव्हर्नर असतो व सदस्यांचा कालावधी दोन वर्षांचा असतो.

पंतप्रधान: अधिकार व कार्यें आणि मंत्रिमंडळ

क) प्रवर्तनात्मक कार्ये (Promotional functions):RBI ची महत्वाची प्रवर्तनात्मक कार्ये पुढीलप्रमाणे –

  • व्यापारी बँक व्यवसायाचे प्रवर्तन: RBI ने लोकांमध्ये बँकिंगच्या सवयी वाढविण्यासाठी आणि बँक व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत. तसेच, व्यापारी बँकव्यवसायाची सशक्तता साध्य करण्यासाठी RBI चे प्रयत्न सतत सुरु असतात.
  • सहकारी बँकव्यवसायाचे प्रवर्तनः भारतात सहकारी बँक व्यवसायाचा प्रत्यक्ष तसचे, अप्रत्यक्षपणे विस्तार घडवून आणण्याचे कार्य RBI ने घडवून आणले आहे. RBI सहकारी बँकांना प्रत्यक्ष तसेच, अप्रत्यक्षपणे वित्तपुरवठा करीत असते.
  • कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचे प्रवर्तन: कृषी व ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक कर्जपुरवठा करण्यासाठी RBI कायद्याने RBI वर विशेष जबाबदारी टाकली आहे.
  • औद्योगिक वित्तपुरवठ्याचे प्रवर्तनः उद्योग क्षेत्रास दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा प्राप्त व्हावा यासाठी RBI च्या मार्गदर्शनासाठी अनेक संस्थांची स्थापना करण्यात आली. उदा. IFCI, IDBI, SFCs, SIDCs, SIDBI इत्यादी.
  • निर्यात वित्तपुरवठ्याचे प्रवर्तनः RBI ने निर्यात वृद्धिसाठी बँकांना व वित्तीय संस्थांना विविध योजनांच्या अंतर्गत पुनर्वित्त पुरवठा (refinance) केला आहे. 1982 मध्ये भारत सरकारने EXIM बँकेची स्थापना केली. ती परकीय व्यापारास वित्तपुरवठा होण्यासाठी शिखर बँक म्हणून कार्य करते.

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तुम्हाला हेही बघायला आवडेल

राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या

हिमालयातील महत्वाच्या खिंडी

भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव 

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये- वने व वनांचे प्रकार 

भारतातील सर्वात मोठे राज्य 2021: क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार सर्व राज्यांची यादी

पंतप्रधान: अधिकार व कार्यें आणि मंत्रिमंडळ

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers in Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds and Types of clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks in India – State-wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List of Countries and their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Latest Job Alert:

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या रिक्त पदसंख्येत वाढ

IBPS Clerk 2021 अधिसूचना जाहीर | IBPS Clerk 2021 Notification Out

SBI PO अधिसूचना 2021 | SBI PO Notification 2021

FAQs RBI and Its Functions

Q.1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय कोठे आहे?

Ans. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय मुंबई ला आहे.

Q.2 अर्थशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. अर्थशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना केंव्हा झाली?

Ans. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली.

Q.4 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य याची माहिती कुठे मिळेल?

Ans. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा

	

Sharing is caring!

FAQs

Where can I find information on the topic of Economics?

Information on the topic of Economics can be found on Adda247 Marathi's app and website.

Where can I find the information about RBI and Its Functions?

RBI and Its Functions can be found on Adda247 Marathi's app and website.

Where is the headquarters of Reserve Bank of India?

The Reserve Bank of India is headquartered in Mumbai.

When was the Reserve Bank of India established?

The Reserve Bank of India was established on 1 April 1935.