Marathi govt jobs   »   Study Materials   »   Classification of Living Organisms Part 1

सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती | Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants

सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती | Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants | Revision Material for MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर केली आहे. गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा ही 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. MPSC Group B Combined पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र 25 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) द्वारे जारी करण्यात आले आहे. या लेखात आपण पाहुयात; Classification of Living Organisms | सजीवांचे वर्गीकरण.

संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र

Classification of Living Organisms (Microorganisms and Plants)

Classification of Living Organisms (Microorganisms and Plants) | सजीवांचे वर्गीकरण भाग -1  (सूक्ष्मजीव आणि वनस्पती): MPSC गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. आता या कमी वेळात जेवढा जास्त सराव आणि उजळणी करता येईल तेवढा जास्त सराव आणि उजळणी केली पाहिजे. तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे; Classification of Living Organisms (Microorganisms and Plants) | सजीवांचे वर्गीकरण (सूक्ष्मजीव आणि वनस्पती).

महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते: घाटाचे नाव व जोडली जाणारी ठिकाणे | Important Passes in Maharashtra

Classification of Living Organisms (Microorganisms and Plants) | सजीवांचे वर्गीकरण भाग -1  (सूक्ष्मजीव आणि वनस्पती)

सभोवताली असणाऱ्या करोडो सजीवांचा एकत्रित अभ्यास करणे व तो लक्षात ठेवणे हे अत्यंत अवघड असते. यासाठी विविध शास्त्रज्ञांनी सजीवांचे वर्गीकरण करून त्यांचा अभ्यास केला. रॉबर्ट व्हिटाकर या अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ यांनी 1969 साली सजीवांची 5 गटांत विभागणी केली. त्यानुसार या लेखात आपण सूक्ष्मजीव आणि वनस्पती वर्गीकरण पाहणार आहोत आणि पुढच्या लेखात आपण प्राणी वर्गीकरण पाहणार आहोत. राज्यसेवेच्या सर्वच परीक्षांना हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असतो. विषेशत: गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेत या टॉपिक वर दरवर्षी कमीतकमी 2 प्रश्न विचारले जातात.

 • वर्गीकरणाचा पदानुक्रम (Hierarchy of Classification)

सृष्टी→संघ→वर्ग→गण→कुल→प्रजाती→जाती

Kingdom→Phylum→Class→Order→Family→Genus→Species

उदा.मानव= Animalia→Chordata→Primates→Hominidae→Homo→sapiens

 • कार्ल लिनीअस ची द्विनाम पध्दती

पहिली संज्ञा प्रजाती(Genus) आणि दुसरी संज्ञा जाती (species)

उदा. होमो सेपियन्स (मानव), कॅनिस फॅमिल्यरिस (कुत्रा)

 • वर्गीकरण इतिहास:
 1. कार्ल लिनिअस (1735) – वनस्पती (Vegetabilia) आणि प्राणी (Animalia) असे विभाजन
 2. हेकेल (1866) – प्रोटेस्टा, वनस्पती आणि प्राणी असे वर्गीकरण
 3. चॅटन (1925) – आदीकेंद्रीकी व दृश्यकेंद्रीकी असे विभाजन
 4. कोपलॅंड (1938) – मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी असे वर्गीकरण
 5. रॉबर्ट व्हिटाकर (1969) – पंचसृष्टी विभाजन
 • रॉबर्ट व्हिटाकर यांच्या वर्गीकरणाचे निकष:

1) पेशीची जटिलता: – आदीकेंद्रीकी व दृश्यकेंद्रीकी

2) सजीवांचा प्रकार/जटिलता: – एकपेशीय व बहुपेशीय

3) पोषणाचा प्रकार: – स्वयंपोषी व परपोषी

4) जीवनपद्धती: – उत्पादक-वनस्पती, भक्षक-प्राणी

5) वर्गानुवांशिक संबंध: – आदीकेंद्रीकी ते दृश्यकेंद्रीकी; एकपेशीय ते बहुपेशीय

 • पंचसृष्टी वर्गीकरण:
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_40.1
सजीवांचे पंचसृष्टी वर्गीकरण

सृष्टी 01- मोनेरा:

 • सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश
 • एकपेशीय सजीव
 • स्वयंपोषी किंवा परपोषी
 • आदिकेंद्रिकी
 • पटलबद्ध केंद्रक नसते
 • पेशीअंगके नसतात
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_50.1
सृष्टी 01 – मोनेरा

सृष्टी 02- प्रोटिस्टा

 • एकपेशीय सजीव
 • पटलबद्ध केंद्रक असते
 • प्रचलनासाठी छ्द्मपाद / रोमके/ कशाभिका असतात
 • स्वयंपोषी किंवा परपोषी असतात
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_60.1
सृष्टी 02 -प्रोटिस्टा

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) | Important rivers in Maharashtra (origin, length, area, tributaries)

सृष्टी 03- कवके

 • परपोषी आणि असंश्लेषी असतात. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत.
 • हे दृश्यकेंद्रीकी एकपेशीय असतात
 • कायटीनची पेशीभित्तिका असते
 • लैंगिक व अलैंगिक (द्विखंडीभवन आणि मुकुलायन) पद्धतीने प्रजनन
 • आकार- 10 मायक्रोमीटर  ते 100 मायक्रोमीटर
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_70.1
कवके – बुरशी

सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे:

Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_80.1
सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

1) जीवाणू (Bacteria): 

 • आकार – 1 मायक्रोमीटर ते 10  मायक्रोमीटर
 • एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते
 • आदिकेंद्रिकी असतात
 • पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात
 • पेशिभित्तिका असते
 • द्विखंडीभवन प्रजनन
 • अनुकूल परिस्थितीत वेगाने वाढ
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_90.1
जीवाणू

2) आदिजीव (Protozoa): 

 • आकार – सुमारे 200 मायक्रोमीटर
 • दृश्यकेंद्रीकी
 • एकपेशीय सजीव
 • द्विखंडीभवन प्रजनन
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_100.1
काही आदिजीवांची उदाहरणे

महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली | River System in Konkan Region of Maharashtra

3) शैवाल (Algae):

 • आकार -10 मायक्रोमीटर  ते 100 मायक्रोमीटर
 • पाण्यात वाढतात
 • दृश्यकेंद्रीकी
 • एकपेशीय आणि बहुपेशीय
 • स्वयंपोषी
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_110.1
शैवालांची उदाहरणे

4) विषाणू (Viruses)

 • सजीव-निर्जीवांच्या सीमेवर आहेत
 • आकार – 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर
 • स्वतंत्र कणांच्या स्वरुपात आढळतात
 • डीएनए किंवा आरएनए पासून बनलेले लांब रेणू असतात
 • प्रथिनांचे आवरण असते
 • वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतात
 • यजमान पेशींना नष्ट करून स्वत:च्या नवीन प्रतिकृती तयार करतात
 • सजीवांना विविध रोग होतात
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_120.1
विषाणू उदाहरणे

सृष्टी 04 – वनस्पती

वनस्पती वर्गीकरणाचा आधार: – अवयवसंस्था→स्वतंत्र ऊतीसंस्था→बिया धारण करण्याची क्षमता→फळांचे आवरण→बीजपत्रे संस्था

एचर – वनस्पतींचे अबीजपत्री आणि बीजपत्री असे वर्गीकरण केले

उपसृष्टी: – अबीजपत्री (Cryptogams)

विभाग 1: – थॅलोफायटा

 • वनस्पती सृष्टीतील सर्वात मोठा विभाग
 • प्रामुख्याने पाण्यात वाढतात (गोड्या किंवा खाऱ्या)
 • मूळ-खोड-पान-फूल असे अवयव नसतात
 • स्वयंपोषी (शैवाल), परपोषी (कवके)
 • उदा. स्पायरोगायरा, उल्वा, युलोथ्रीक्स, इत्यादी
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_130.1
थॅलोफायटा वनस्पती

विभाग 2: – ब्रायोफायटा

 • वनस्पती सृष्टीचे उभयचर
 • ओल्या मातीत वाढतात
 • प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते
 • बीजाणू निर्मितीने प्रजनन होते
 • रचना चपटी व लांब असते
 • पानासारख्या रचना व मुळासारखे मुलाभ असतात
 • पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात
 • निम्नस्तरीय व स्वयंपोषी असतात
 • बहुपेशीय असतात
 • उदा. मॉस, मर्केंशिया, रिक्सिया इत्यादी.
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_140.1
ब्रायोफायटा वनस्पती

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे)

विभाग 3: – टेरिडोफायटा

 • मुळे,खोडे, पान असे सुस्पष्ट अवयव असतात
 • पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात
 • फुले-फळे येत नाहीत
 • पानांच्या मागील बाजूवरील बीजाणूद्वारे अलैंगिक प्रजनन
 • सुस्पष्ट संवहनी संस्था असते
 • उदा. नेचे, मार्सेलीया, टेरीस इक्विसेटम इत्यादी
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_150.1
टेरिडोफायटा वनस्पती

उपसृष्टी:बीजपत्री (Phanerogams) 

 • प्रजननासाठी विशिष्ठ ऊती असते
 • बिया निर्माण करतात

विभाग 1: – अनावृत्तबीजी (Gymnosperms)

 • सदाहरित, बहुवार्षिक, काष्ठमय वनस्पती
 • फांद्या नसतात
 • पानांचा मुकुट तयार होतो
 • नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात
 • बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते
 • फळे येत नाही
 • उदा. सायकस, पिसिया, थुन्जा, देवदार इत्यादी.
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_160.1
अनावृत्तबीजी वनस्पती – सायकस

विभाग 2: – आवृत्तबीजी (Angiosperms) 

 • फुले ही प्रजननासाठी असतात
 • बियांवर आवरण असते
 • फळे येतात
 • दोन प्रकार: – द्वीबीजपत्री आणि एकबीजपत्री असे प्रकार पडतात
 • द्वीबीजपत्री- ठळक प्राथमिक मूळ/ सोटमुळे असतात; खोड मजबूत व कठीण असते; पानाचा शिराविन्यास जाळीदार असतो; 4 किंवा 5 भागांचे फूल असते. उदा. वड इत्यादी
 • एकबीजपत्री– तंतुमुळे असतात; पोकळ/ आभासी/चकती सारखे खोड असते; पानाचा शिराविन्यास समांतर असतो; 3 किंवा 3 च्या पटीत भाग असणारे फुले येतात. उदा. बांबू, केळी, कांदा, मका इत्यादी
Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_170.1
एकबीज आणि द्वीबीज पत्री वनस्पती

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण सजीवांचे वर्गीकरण भाग -1 (सूक्ष्मजीव आणि वनस्पती) या प्रकरणाची उजळणी करू शकता. येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेत या घटकावर आधारित कमीत कमी दोन प्रश्न विचारले जातात त्यामुळे या लेखाचा आपल्याला फायदा होईल.

तुम्ही खालील ब्लॉग्स चा देखील उपयोग करू शकता 

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी

नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलम आणि परिशिष्ट

————————————————————————————————————————–

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_180.1
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_200.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants_210.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.