Marathi govt jobs   »   Study Materials   »   Important Days in Maharashtra

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस | Important Days in Maharashtra: Study Material for MHADA Exam

Important Days in Maharashtra: Study Material for MHADA Exam: आपण बर्‍याचदा आपल्या कॅलेन्डर प्रमाणे विविध दिवस आणि तारखा साजरे करतो जे सामाजिक, जागतिक, स्मारक किंवा उत्सवाच्या वतीने महत्वाचे असतात. हे दिवस सामान्य ज्ञानासाठी देखील फार महत्वाचे आहेत कारण प्रत्येक महत्त्वपूर्ण परीक्षेत या महत्त्वपूर्ण दिवस आणि तारखा साजरे करण्याबद्दल किमान एक प्रश्न असतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी कारण्यासऱ्या सर्व विध्यार्थ्यांना या सर्व महत्वाच्या दिवसांची माहिती असणे गरजेचे आहे. आगामी म्हाडा भरतीच्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान विषयावर एकूण 50 विचारले जातील त्यात Important Days in Maharashtra यावर प्रश्न विचारू शकतात. दररोजच्या वाचनाने हे सर्व महत्वाचे दिवस लक्षात ठेवायला सोपे जातात. तर चला आज आपण या लेखात पाहुयात महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस | Important Days in Maharashtra.

Important Days in Maharashtra: Study Material for MHADA Exam | महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस 

Important Days in Maharashtra: Study Material for All Competitive Exams | महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस: महाराष्ट्र शासनाने काही ‘विशेष दिवस’ जाहीर केले आहेत. हे दिवस राज्यात अनेक ठिकाणी साजरे होतात. हे सर्व दिवस प्रादेशिक स्वरूपाचे असून महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहेत. म्हणून येथे आम्ही महाराष्ट्र राज्यातील महत्त्वपूर्ण दिवसांची यादी एकत्रित केली आहे. तर चला या लेखात आपण या महत्वाच्या दिवसांची महिती घेऊयात.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

 1. बालिका दिन- ३ जानेवारी
 • महाराष्ट्र शासनाने बालिका दिन हा ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे.
 • सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ – १० मार्च, इ.स. १८९७) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती.
 • सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

2. पत्रकार दिन- ६ जानेवारी 

 • महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे.
 • बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते.
 • जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.

3. सिंचन दिन- २६ फेब्रुवारी

 • महाराष्ट्र शासनाने सिंचन दिन हा २६ फेब्रुवारी रोजी शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घोषित केला आहे.
 • महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. डाॅ. शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते.

4. मराठी राजभाषा दिन- २७ फेब्रुवारी

 • मराठी भाषा गौरव दिन (मराठी राजभाषा दिन) हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.
 • कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.
 • आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारीइ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.

5. उद्योग दिन- १० मार्च 

 • महाराष्ट्र शासनानेउद्योग दिन हा १० मार्च रोजी लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा करण्यात येतो.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

6. समता दिन- १२ मार्च 

 • यशवंतराव चव्हाणांचा जन्म १२ मार्च रोजी झाला. यास्तव, महाराष्ट्र शासनाने त्यांच्या स्मरणार्थ १२ मार्च हा ‘समता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

7. शिक्षक हक्क दिन- ११ एप्रिल 

 • महाराष्ट्र शासनानेशिक्षक हक्क दिन हा ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे.
 • महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (जन्म: ११ एप्रिल १८२७; मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०), इतर नावे: महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठीलेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.
 • त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

8. ज्ञान दिन- १४ एप्रिल 

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस – १४ एप्रिल हा इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्यात येतो.
 • गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंतीला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते.

9. महाराष्ट्र दिन-  १ मे

 • महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे.
 • या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.
 • महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.

10. सामाजिक न्याय दिन- २६ जून

 • महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय दिन हा २६ जून रोजी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे.
 • शाहू भोसले (जून २६, इ.स. १८७४ – मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते.

11. कृषि दिन- 1 जुलै

 • 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
 • कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा होता

12. शेतकरी दिन- २९ ऑगस्ट 

 • महाराष्ट्र शासनाने शेतकरी दिन हा २९ ऑगस्ट रोजी विठ्ठलराव विखेपाटील यांच्या स्मरणार्थ घोषित केला आहे.

13. रेशीम दिन- १ सप्टेंबर

 • महाराष्ट्र शासनाने रेशीम दिन हा १ सप्टेंबर रोजी घोषित केला आहे.

14. श्रमप्रतिष्ठा दिन- २२ सप्टेंबर

 • महाराष्ट्र शासनाने श्रमप्रतिष्ठा दिन हा २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटिल यांच्या स्मरणार्थ घोषित केला आहे

15. राज्य माहिती अधिकार दिन- २८ सप्टेंबर

 • महाराष्ट्र शासनाने राज्य माहिती अधिकार दिन हा २८ सप्टेंबर रोजी घोषित केला आहे

16. रंगभूमी दिन- ५ नोव्हेंबर

 • महाराष्ट्र शासनाने रंगभूमी दिन हा ५ नोव्हेंबर रोजी विष्णूदास भावे जयंती निमित्त घोषित केला आहे.
 • मराठी रंगभूमीचा परिप्रेक्ष हा किर्तन ,भारुड,दंडार, दशावतार ,पोवाडा, लळीत, भागवतमेळे ,नटवे ,बहुरूपी लोकनाट्य ,तमाशे आदी लोकपरंपरा स्त्रोतातून झालेला आहे.
 • लोकरंगभूमी हीच खर्‍या अर्थाने मराठी रंगभूमीची जननी आहे. क्रमाने विकसित झालेल्या रंगभूमीच्या प्रत्येक विकास टप्प्या मागे लोकरंगभूमीचे स्थान महत्त्वाचे ठरलेले आहे.
 • या पार्श्‍वभूमीवर नाट्य वाङमयाचा विचार करत असताना महाराष्ट्राला फार आदिम अशी लोककलावंतांची परंपरा आहे.त्यातूनच लोकरंगभूमी विकसित झाली.

17. विद्यार्थी दिन-

 • विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.
 • महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला.
 • अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले.

18. जैवतंत्रज्ञान दिन- 

 • महाराष्ट्र शासनाने जैवतंत्रज्ञान दिन हा १४ नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे.

19. हुंडाबंदी दिन-

 • महाराष्ट्र शासनाने हुंडाबंदी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे.
अ.क्र. तारीख  विशेष दिन संदर्भ
1 3 जानेवारी बालिका दिन सावित्रीबाई फुले जयंती
2 6 जानेवारी पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिन
3 26 फेब्रुवारी सिंचन दिन शंकरराव चव्हाण स्मृतिप्रीत्यर्थ
4 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन कुसुमाग्रज जयंती
5 10 मार्च उद्योग दिन लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर स्मृतिप्रीत्यर्थ
6 12 मार्च समता दिन यशवंतराव चव्हाण स्मरणार्थ
7 11 एप्रिल शिक्षक हक्क दिन महात्मा फुले जयंती
8 14 एप्रिल ज्ञान दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
9 1 मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
10 26 जून सामाजिक न्याय दिन शाहू महाराज जयंती
11 1 जुलै कृषि दिन वसंतराव नाईक जयंती
12 29 ऑगस्ट शेतकरी दिन विठ्ठलराव विखेपाटील स्मरणार्थ
13 1 सप्टेंबर रेशीम दिन
14 22 सप्टेंबर श्रमप्रतिष्ठा दिन कर्मवीर भाऊराव पाटिल स्मरणार्थ
15 28 सप्टेंबर राज्य माहिती अधिकार दिन
16 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन विष्णूदास भावे जयंती
17 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मरणार्थ
18 14 नोव्हेंबर जैवतंत्रज्ञान दिन

Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य

Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021)  प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

भारतातील सर्वात लांब पूल 2021
प्रधानमंत्री आवास योजना- शहरी (PMAY-U)
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास- जन्म, स्वराज्याची स्थापना आणि इतर तथ्ये छत्रपती शिवाजी महाराज- लढाया, स्वराज्य विस्तार, राज्याभिषेक, कारभार
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी
जगातील नवीन सात आश्चर्ये
भारताच्या महत्त्वपूर्ण लष्करी संयुक्त युद्धासरावांची यादी | [UPDATED] भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी
National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs: Important Days in Maharashtra

Q1. महाराष्ट्रात कृषि दिन कधी साजरा केला जातो?
Ans. महाराष्ट्रात कृषि दिन 1 जुलै ला साजरा केला जातो.

Q2. महाराष्ट्रात समता दिन कधी साजरा केला जातो?
Ans. महाराष्ट्रात समता दिन 12 मार्च ला साजरा केला जातो..

Q3. महाराष्ट्रात ज्ञान दिन हे कोणाच्या संदर्भात साजरी केला जातो?

Ans: महाराष्ट्रात ज्ञान दिन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या संदर्भात साजरी केला जातो

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस | Important Days in Maharashtra_40.1
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस | Important Days in Maharashtra_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस | Important Days in Maharashtra_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.