Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Study Material for MPSC Gazetted Combined Exam 2023 | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015 is also known as Maharashtra Right to Public Service Act, 2015. This Act provides that the citizens shall be provided services by the State Government in a transparent, efficient, and time-bound manner. In this article, you get detailed information about Maharashtra Lokseva Hakka Adhiniyam 2015, The Maharashtra State Commission For Right To Public Services, and PDF of Maharashtra Lokseva Hakka Adhiniyam 2015.
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015 is a revolutionary law that gives citizens the right to service in the state of Maharashtra. Under this law, the citizens of the state have got the right to get transparent, dynamic and time-bound services.
The Maharashtra Right to Public Service. Act, 2015.
Commissioner of Lokseva Hakk Aayog
Shri. Dilip Shinde
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: महाराष्ट्रात MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (General Studies) हा खूप महत्वाचा विषय आहे. जर आपण MPSC राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (MPSC Civil Services Exam 2023) तयारी करत असाल तर आपणास माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) हे दोन अधिनियम खूप महत्वाचे आहेत असे लक्षात येईल. याआधी आपण Right to Information Act 2005 बदल माहिती पहिली. सोबतच इतर सर्व स्पर्धा परीक्षेत यावर प्रश्न विचारल्या जातात. आज या लेखात आपण Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015 (महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015) याबद्दल माहिती पाहणार आहे.
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015 | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) विहित सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना इच्छित सेवेसाठी अर्ज करणे, शुल्क भरणा, अर्जाचा मागोवा घेणे आदी बाबी घरबसल्या करता येणार आहेत. सेवा प्राप्त करतानाच्या एकंदर प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास हेल्पलाईनद्वारे सहाय्यही उपलब्ध आहे.
सेवा हमी अधिनियमांतर्गत (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) 224 सेवांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात त्यापैकी आवश्यक 46 सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभाग, महसूल, पाणीपुरवठा, वन विभाग, मुद्रांक आणि नोंदणी आणि कामगार विभागांच्या सेवांचा समावेश आहे.
The Maharashtra State Commission For Right To Public Services | महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग
The Maharashtra State Commission For Right To Public Services: महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015). या कायदयान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) स्थापना करण्यात आली. राज्याचे माजी अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे हे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, महाराष्ट्र (अतिरिक्त कार्यभार) म्हणून कार्यरत आहेत.
या कायद्यांतर्गत (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती आपण आर.टी.एस. महाराष्ट्र या मोबाईल अँप वर किंवा आपले सरकार वेब पोर्टल वर पाहू शकता व सेवा प्राप्त करण्याकरिता ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम अपील, द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करू शकतात.
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Features | वैशिष्ट्ये
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Features: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) नुसार नागरिकांना घरबसल्या सेवांचा लाभ घेता येतो. Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015 ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
जलद सेवा: लोकसेवा मिळवण्याची प्रक्रिया झाली जलद. दिलेल्या कालावधीत अधिसूचित सेवा मिळण्याची हमी. विलंब झाल्यास अथवा अर्ज फेटाळला गेल्यास अपील करण्याची संधी.
सेवा आपल्या दारात: लोकसेवा प्राप्त करण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. घर बसल्या ‘आपले सरकार’ पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा.
सहज पोहोच: विविध विभागांच्या सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध. अपीलही ऑन-लाईन करता येणार.
सोपी शुल्कभरणा: सेवा शुल्क अत्यंत सोप्या व सुरक्षित पद्धतीने पोर्टल द्वारे जमा करण्याची सुविधा.
वापरण्यास सोपे: माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण केलेली वापरण्यास सोपी कार्यपद्धती. अर्ज करणे, कागदपत्र जोडणे, अर्जाचा मागोवा घेणे सोपे.
वेळेची बचत: कमीत कमी कागदपत्रांसह ऑन-लाईन अर्ज करण्याच्या सुविधेमुळे वेळ आणि पैशांची बचत. पाठपुराव्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Online Services | ऑनलाईन सेवा
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Online Services: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) अंतर्गत विविध सेवा पुरवल्या जातात. त्या सर्व सेवांची नावे व त्यांच्याशी संबंधित विभाग खाली दिले आहेत. ज्याचा आगामी परीक्षेत आपणास नक्कीच फायदा होईल.
जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून औद्योगिक प्रयोजनासाठीचे बिगरसिंचन पाणी आरक्षण मंजूर करणेबाबत
शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय
भाग 2- राजपत्र जाहिरात (नावात बदल)
भाग 2- राजपत्र जाहिरात (जन्मतारखेत बदल)
भाग 2- राजपत्र जाहिरात (धर्मात बदल)
भाग 2- संकीर्ण
कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग
नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी
सेवानियोजकाची नोंदणी
वन विभाग
तेंदू व्यापारी/उत्पादकांची नोंदणी
बांबू पुरवठ्यासाठी बुरूड समाजाची नोंदणी
वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या गुरांसाठी मंजूर करायची नुकसान भरपाई
वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या अथवा अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना मंजूर करावयाचे वित्तीय सहाय्य
वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी मंजूर करायची नुकसान भरपाई
पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (मंडल स्तर)
पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (एका पेक्षा जास्त मंडल)
आरा गिरणी अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणासंदर्भात अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांच्या निर्णय कळविणे
सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार अनुसूचित जमातीच्या भोगवटादारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार बिगर आदिवासी अर्जदारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
नोंदणी व मुद्रांक विभाग
शोध उपलब्ध करणे
मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये,ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: PDF: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 pdf स्वरुपात डाउनलोड करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी अड्डा247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही अड्डा247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला किंवा अँप ला भेट देत रहा.
इतर अभ्यास साहित्य
लेखाचे नाव
वेबलिंक
अँप लिंक
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
When was the Maharashtra Public Service Right Act enacted?
The Maharashtra Public Service Rights Act was enacted in 2015.
Who is the Commissioner of Maharashtra Public Service Rights Commission?
Commissioner of Maharashtra Public Service Rights Commission, Shri. There is Swadhin Kshatriya.
Which portal was launched under the Maharashtra Public Service Rights Act?
The 'Aaple Sarkar' portal was launched under the Maharashtra Public Service Rights Act.
Where can I find such an important article?
On the official website of Adda 247 Marathi you will find notifications of all competitive examinations, syllabus, previous year's question papers and study materials.