Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग – समृद्धी महामार्गाचे मुख्य मुद्दे, उद्देश आणि वैशिष्ठ्ये

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपुरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा  520 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा, नागपूर आणि शिर्डी यांना  जोडतो. महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे राहणीमान सुधारावे याकरिता स्थानिक भागांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची आखणी केली. महाराष्ट्रातील सरळ सेवा जसे कि, तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, पशुसंवर्धन विभाग भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. हा चालू घडमोडी मधील महत्वाचा टॉपिक आहे. आज या लेखात आपण Maharashtra Smruddhi Mahamarg बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग: विहंगावलोकन

समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे प्रकल्प हे पंतप्रधानांचे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. खालील तक्त्यामध्ये महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बद्दल विहंगावलोकन मिळवा.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
एकूण लांबी 701 किमी
इतर नावे नागपुर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे
अधिकृत नाव हिंदू हृदयसम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे (महासंपर्क द्रुतगती महामार्ग) प्रकल्प आहे. सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा 701 किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती महामार्ग, भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्गांपैकी एक आहे. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रामधून जातो. या द्रुतगती महामार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांमधला संपर्क वाढण्यातही मदत होईल, परिणामी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यात मदत होईल. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग  महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग हा एक महत्त्वाचा ‘गेम चेंजर’ प्रकल्प  आहे. या लेखात समृद्धी महामार्गाबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग - समृद्धी महामार्गाचे मुख्य मुद्दे, उद्देश आणि वैशिष्ठ्ये_40.1
Maharashtra Samruddhi Mahamarg

महाराष्ट्र राज्याचे नाव कसे पडले

समृद्धी महामार्ग: ठळक मुद्दे

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाबद्दल परीक्षेच्या दुष्टीने ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • एकूण लांबी 701 कि.मी
  • रस्त्यांची रुंदी 120 मीटर (डोंगराळ भागांसाठी 90 मी )
  • मार्गिका – 3+3 (दोन्ही बाजूस तीन मीटर रुंद पेव्हड शोल्डर आणि दोन मीटर रुंदीच्या मातीच्या शोल्डरसह )
  • वाहन वेग प्रस्तावित (डिझाईन स्पीड) – ताशी 150 कि.मी. (डोंगराळ भागासाठी ताशी 120 कि.मी. )
  • इंटरचेंजेस – 25
  • द्रुतगती मार्गालगत उभारण्यात येणारी नवनगरे- 18
  • .मोठे पूल (तीस मीटरपेक्षा जास्त लांबीचे ) – 33
  • लहान पूल(तीस मीटरपेक्षा कमी लांबीचे ) – 274
  • बोगदे – 6
  • रेल्वे ओव्हर ब्रीज – 8
  • व्हाया डक्ट / फ्लायओव्हर – 65
  • कल्व्हर्ट – 672
  • वे-साईड अ‍ॅमिनिटीज- 21 (दोन्ही बाजूस प्रस्तावित)

सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सविस्तर माहिती मिळावा

समृद्धी महामार्गाचा उद्देश

महामार्ग पायाभूत सुविधा देशाच्या आर्थिक-सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हे नमूद करण्यास अभिमान वाटतो की, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक आहे. महाराष्ट्र हा जसा गावकुसांच्या अनवट घाटवाटांचा प्रदेश आहे. तसाच तो महानगरांच्या वेगवान महामार्गाचाही प्रदेश आहे. यामध्ये समाविष्ट असलेले राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्य महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते, इतर जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते आणि शहरांतर्गत रस्ते असे रस्त्यांचे अखंड विणलेले जाळे आज संपूर्ण महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेत आहेत. आंतरराष्ट्रीय शहर अशी ओळख मोठ्या अभिमानाने मिरवणारे मुंबई असेल किंवा वेगाने प्रगतीच्या दिशेने झेपावणारी राज्याची उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गाची वैशिष्ठ्ये

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची वैशिष्ठ्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • एकूण 120 मीटर रुंदीचा सहा पदरी द्रुतगती मार्ग.
  • 10 जिल्हे, 26 तालुके आणि आसपासच्या 392 गावांना जोडणारा महामार्ग आहे
  • या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त 8 तासात कापणे शक्य आहे
  • या महामार्गावर प्रस्तावित वाहन वेग (डिझाईन स्पीड) असेल ताशी 150 किमी
  • महामार्गालगत होणार 19 कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती करण्यात आली
  • भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे 11 लाख 31 हजार वृक्षांची होणार लागवडहोणार आहे.
  • महामार्गाच्या प्रत्येकी पाच किमी अंतरावर असणार सीसीटीव्ही कॅमेरे आणि विनामूल्य दूरध्वनी सेवा पुरविण्यात येणार
  • समृद्धी महामार्गात अत्याधुनिक वाहतुकीचे जाळे निर्माण करुन विविध संरचनाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 65 उड्डाणपूल, 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, 25 इंटरचेंजेस, 6 बोगदे, 189 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 110 भुयारी मार्ग, पाळीव प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी 209 भुयारी मार्ग, वन्यजीवांसाठी 3 भुयारी मार्ग आणि 3 उन्नत मार्गाचा समावेश असेल.
  • समृद्धी महामार्गावर बोगद्यात विद्युत रोषणाई, पूल सुशोभिकऱण, सुधारीत पथदिवे, आणि डिजीटल संकेत (सिग्नल) यांचा वापर करण्यात येणार आहे
  • समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारा महामार्ग आहे. या महामार्गामुळे अभयारण्ये, ऐतिहासिक पर्यटनस्थळ, व्याघ्र प्रकल्प सफारी, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे अशा प्रमुख पर्यटनस्थळी जाणे पर्यटकांना सहज शक्य होणार आहे.समृद्धी महामार्ग आणि त्यासाठी २४ ठिकाणी बांधण्यात येणार असलेले जोडरस्ते (इंटरचेंज) यामुळे राज्यातील अनेक पर्यटन स्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. लोणारचे सरोवर, वेरूळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबीका मकबरा इत्यादी पर्यटन स्थळे नजीक येणार आहेत.
  • समृद्धी महामार्गावर ठराविक ठिकाणी वीजेवर चालणार्‍या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स, तसेच 138.47 मेगावॅट उर्जा निर्मिती करणारे सौर उर्जा प्रकल्प असतील.
  • उत्तम डिजिटल सेवा आणि अन्य महत्त्वाच्या सेवा पुरवण्यासाठी द्रुतगती मार्गासह ऑप्टिकल फायबर केबल्स (ओएफसी केबल्स), गॅस पाइपलाइन, वीजवाहक तारा आणि सुविधा केंद्रे इत्यादीचे नियोजन केले आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग - समृद्धी महामार्गाचे मुख्य मुद्दे, उद्देश आणि वैशिष्ठ्ये_50.1
Adda247 Marathi App

समृद्धी महामार्गाचा नकाशा

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नकाशा खाली देण्यात आला आहे ज्यात नागपूर ते मुंबई मधील सर्व महत्वाच्या शहरांच्या अंतराविषयी माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग - समृद्धी महामार्गाचे मुख्य मुद्दे, उद्देश आणि वैशिष्ठ्ये_60.1
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नकाशा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग - समृद्धी महामार्गाचे मुख्य मुद्दे, उद्देश आणि वैशिष्ठ्ये_70.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम
लेखाचे नाव लिंक
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग - समृद्धी महामार्गाचे मुख्य मुद्दे, उद्देश आणि वैशिष्ठ्ये_80.1
Maharashtra Test Mate

Sharing is caring!

FAQs

समृद्धी म्ह्मार्गाचा पहिला टप्पा कधी सुरु झाला?

समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2022 रोजी सुरू होईल. पहिला टप्पा (502 किमी) नागपूर-शिर्डी.मुंबईला जोडतो.

समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो?

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे जिल्ह्यांमधून जातो

समृद्धी महामार्गावरील वेग मर्यादा किती आहे?

द्रुतगती मार्गांवर कारसाठी सध्याची कमाल वेग मर्यादा 120 किमी ताशी आहे आणि राष्ट्रीय महामार्गांवर, कमाल वेग मर्यादा 100 किमी प्रतितास आहे.

Download your free content now!

Congratulations!

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग - समृद्धी महामार्गाचे मुख्य मुद्दे, उद्देश आणि वैशिष्ठ्ये_100.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग - समृद्धी महामार्गाचे मुख्य मुद्दे, उद्देश आणि वैशिष्ठ्ये_110.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.