Table of Contents
Last Minute Revision Tips for MPSC Rajyaseva Prelims Exam 2022: MPSC State Services Prelims Exam will be held on 21 August 2022. The few days before the exam are very important. These days it is very necessary to revise the studies done to date. It is very important to check Last Minute Revision & Tips before appearing for any exam. In this article, you get Last Minute Revision and Tips for Rajyaseva Prelims Exam 2022, the MPSC Rajya Seva Hall ticket link, and Some Important topics for MPSC Rajyaseva Prelims Exam 2022.
Last Minute Revision and Tips for Rajyaseva Prelims Exam 2022 | |
Organization Name | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
Exam Name | Prelims Exam 2022 |
Exam Date | 21st August 2022 |
Exam Mode | Offline |
Blog Name | Last Minute Revision and Tips for Rajyaseva Prelims Exam 2022 |
Official Website | mpsconline.gov.in |
Last Minute Revision and Tips for Rajyaseva Prelims Exam 2022
Last Minute Revision and Tips for Rajyaseva Prelims Exam 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे (Rajyaseva Prelims) प्रवेशपत्र 12 ऑगस्ट 2022 (Admit Card) 12 ऑगस्ट 2022 रोजी जारी झाले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक खाली देण्यात आली आहे. परीक्षेच्या अगोदरचे काही दिवस फार महत्वाचे असतात. या दिवसात आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी होणे फार आवश्यक आहे. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे (Last Minute Revision & Tips) तपासणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरुन तुमची परीक्षा सुरळीत होईल. आज आपण या लेखात Last Minute Revision and Tips for Rajyaseva Prelims Exam 2022 पाहणार आहोत.
Last Minute Revision and Tips for Rajyaseva Prelims Exam 2022 | राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे
Last Minute Revision and Tips for Rajyaseva Prelims Exam 2022: राज्यसेवा पूर्व परीक्षा (Rajyaseva Prelims) परीक्षा काही दिवसांवर आहे. जसजसा वेळ जवळ येत आहे तसतशी सर्वच परीक्षर्थ्यांमध्ये थोडी चिंता (Tension) आहे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर थोडा गोंधळ होतो जसे की, अजून काय वाचायचे आहे? महत्त्वाचे विषय कोणते? मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेत कोणत्या घटकावर भर देण्यात आला होता? कोणत्या विषयात मला सहज गुण मिळवता येतील? मी माझे प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे का? हे सर्व विचार तुमच्या मनात घोळत असतील. परीक्षेपूर्वी या गोंधळाच्या स्थितीतून मुक्त होण्यासाठी आज आम्ही तुम्हच्यासाठी Last Minute Revision and Tips for Rajyaseva Prelims Exam 2022 हा लेख आणला आहे. ज्याचा आपणास नक्की फायदा होईल.
MPSC State Services Exam Pattern of Prelims Exam Examination | MPSC राज्य सेवा परीक्षेचे स्वरूप – पूर्व परीक्षा
MPSC State Services Exam Pattern of Prelims Exam: MPSC राज्य सेवा परीक्षेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा. सर्वात महत्त्वाचा अशाकरिता की टप्प्यात मुख्य परीक्षा द्यायला परवानगी असलेल्या उमेदवारांचे चयन केले जाते. दरवर्षी साधारण 2 ते 2.5 लाख विद्यार्थी राज्य सेवेचा फॉर्म भरतात त्यातील निहित पदांच्या केवळ 16 पट उमेदवार पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षा द्यायला पात्र असतात. यामुळे पूर्व परीक्षा हा राज्यसेवा परीक्षेचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरतो. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे;
पेपर क्रमांक | प्रश्न संख्या | गुण | माध्यम | कालावधी | स्वरूप |
पेपर 1 | 100 | 200 | मराठी आणि इंग्रजी | दोन तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
पेपर 2 | 80 | 200 | मराठी आणि इंग्रजी | दोन तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
एकूण | 400 |
MPSC Rajyaseva Hall Ticket 2022 Direct Link | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक
MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रवेशपत्र (MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022) MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://mpsc.gov.in वर 12 ऑगस्ट 2022 रोजी जारी करण्यात आले आहे. MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022 डाउनलोड करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. खाली दिलेल्या लिंक वरून सर्व उमेदवार MPSC Rajyaseva Prelims परीक्षेसाठी त्यांचे पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
Download MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket Card 2022
Last-minute tips for Rajyaseva Prelims Exam 2022 | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या शेवटच्या क्षणीच्या टिप्स
Last-minute tips for Rajyaseva Prelims Exam 2022: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या (MPSC Rajyaseva Prelims Exam) दृष्टीने Last-minute tips खाली देण्यात येत आहे.
- मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करा आणि भूतकाळातून शिका: कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. विचारलेल्या प्रश्नाचा प्रकार आणि प्रत्येक प्रकारच्या प्रश्नासाठी लागणारा वेळ तुम्हाला आधीच कळला आहे. जेणेकरून यावेळी तुम्ही तुमचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकाल.
- शहाणे व्हा आणि सुधारणा करा: तुमच्या आजूबाजूला नवीन माहिती मिळत असेल. तुमची तयारी सुलभ करण्यासाठी काही जण नवीन ट्रिक्स सांगून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे स्वागतच करा पण शेवटच्या काही दिवसात ती ट्रिक आत्ता उपयोगी ठरेल का याचा सुद्धा विचार करा. कारण कोणतीही ट्रिक वापरण्यासाठी चांगल्या सरावाची गरज असते. त्यामुळे याचा सुद्धा विचार करणे गरजेचे ठरते
- आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे: तुमच्या ज्ञानाचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी तुम्ही दररोज किमान 8 तास झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परीक्षेच्या अगोदर दिवसभर व रात्रभर जागून वाचन टाळा. कारण परीक्षेदरम्यान एकाग्र करण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होतो. तुम्ही दररोज 15 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न देखील करू शकता कारण त्यामुळे शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहते. हे तुमचा मेंदू रीसेट करते, मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि सुयोग्य विचार आणि धारणा यासाठी तुम्हाला तयार करते.
- शांत राहा आणि परीक्षा द्या: शेवटी, तुमचा आत्मविश्वास चांगला आणि परीक्षेचा ताण घेऊ नका. तुम्हाला वाचवणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुमची पुनरावृत्ती आणि अचूकता. स्मार्ट धोरण आखा. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा त्यांना दिलेल्या वेळेत उत्तर द्या. चांगले खा आणि रात्रीचे उल्लू बनू नका. विश्रांती घ्या आणि पुरेशी झोप घ्या, विशेषतः आगामी दिवसांमध्ये.
- नवीन काहीही वाचू नका: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी शेवटच्या क्षणी या मूलभूत tip म्हणजे नवीन काहीही वाचणे व्यर्थ आहे. यावेळी तुम्ही जे वाचता ते कायम ठेवण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणून, नवीन कव्हर करण्याऐवजी, आपण आधी वाचलेल्या गोष्टी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.
- CSAT साठी महत्त्वाच्या विषयांची उजळणी करा: CSAT पेपरसाठी सराव करण्यासाठी दररोज सुमारे एक तास द्या. तर, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी शेवटच्या काही दिवसात दररोज किमान एक वाचन आकलन सोडवणे कारण या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणे आणि त्यानंतर तर्क आणि परिमाणात्मक योग्यता येते.
Click here to view a detailed Vacancy of MPSC Rajyaseva Prelims Exam 2022
Important Topics for MPSC Rajyaseva Prelims 2022 | राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे Topic
Important Topics for MPSC Rajyaseva Prelims 2022: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उजळणी करतांना काही महत्वाचे घटक (Topic) खालील प्रमाणे आहेत.
इतिहास
- प्राचीन भारताचा इतिहास – सिधू संकृती, मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, वैदिक संस्कृती
- मध्ययुगीन भारताचा इतिहास – दिल्ली सल्तनत, मराठी सत्ता, मुघल,साम्राज्य
- आधुनिक भारताचा इतिहास – 1857 चा उठाव, जहाल व मवाळ कालखंड, गांधी युग, व्हाईसराय, महत्वाचे गव्हर्नर व जनरल, महाराष्ट्रातील
भूगोल
- प्रकृतीक भूगोल
- सामाजिक व आर्थिक भूगोल
- भारताची जनगणना
भारतीय राज्यघटना
- महत्वाचे कायदे
- मुलभूत हक्क
- राष्ट्रपती
- पंतप्रधान
- न्यायव्यवस्था
- मागासवर्गीय आयोग
- पंचायत राज
पर्यावरण
- जैवविविधता
- हवामान व पर्यावरण
- महत्वाचे समिट व संस्था
आर्थिक व सामाजिक विकास
- सामाजिक विकासाचे निर्देशांक
- दारिद्य व बेरोजगारी
- ग्रामीण विकास
सामान्य विज्ञान
- भौतिकशास्त्र
- रसायनशास्त्र
- वनस्पती शास्त्र
- आरोग्य शास्त्र
चालू घडामोडी
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
खालील तक्त्यात मागील 1 वर्षाच्या सर्व मासिक चालू घडामोडीच्या PDF लिंक दिल्या आहेत.
मासिक चालू घडामोडी PDF | लिंक |
July 2022 | Click here to Download PDF |
June 2022 | Click here to Download PDF |
May 2022 | Click here to Download PDF |
April 2022 | Click here to Download PDF |
March 2022 | Click here to Download PDF |
February 2022 | Click here to Download PDF |
January 2022 | Click here to Download PDF |
December 2021 | Click here to Download PDF |
November 2021 | Click here to Download PDF |
October 2021 | Click here to Download PDF |
September 2021 | Click here to Download PDF |
August 2021 | Click here to Download PDF |
Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना
Notice for Candidates: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे
- लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
- उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
- उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे,
- फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
- आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
- यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
- प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
- परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या 1 तास अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Best of Luck for the Exam !!!
Other Blogs Related to MPSC Rajyaseva Exam 2022
- MPSC Rajyaseva (State Services) Exam Pattern (Pre + Mains)
- MPSC Rajyaseva Exam Syllabus 2022
- MPSC Rajyaseva Exam Previous Year Question Papers with Answer Keys PDFs
- MPSC State Services Prelims Exam Subject and Topic wise Weightage
- MPSC RajyaSeva Previous Year Exam Cut Off
FAQs Last Minute Revision and Tips for MPSC Rajyaseva Prelims 2022
Q1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 कधी आहे?
Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022, 21 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्हात आहे.
Q2. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे का?
Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे.
Q3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कालावधी किती आहे?
Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कालावधी 4 तास (पेपर 1 व पेपर 2 दोन्ही मिळून) आहे.
Q4. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?
Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र न्यावे.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of MPSC | https:/mpsc.gov.in/ |