Marathi govt jobs   »   MPSC राज्यसेवा 2023   »   MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम 2023 PDF डाउनलोड (सुधारित)

Table of Contents

MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेसाठी सुधारित MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मराठीत प्रसिद्ध केला आहे. मागील MPSC ने सुधारित MPSC राज्य सेवा (राज्यसेवा) अभ्यासक्रम इंग्रजीत प्रसिद्ध केला होता. या लेखात आम्ही दोन्ही pdf च्या लिंक दिल्या आहेत. अलीकडेच MPSC ने CSAT पेपरचे स्वरूप बदलले आहे आणि त्यानंतर MPSC ने मुख्य परीक्षेचे स्वरूप जाहीर केले आहे. त्यामुळे या बदलांमुळे, MPSC ने अद्यतनित MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम आणि MPSC राज्यसेवा परीक्षा पॅटर्न जारी केला आहे जो MPSC राज्यसेवा परीक्षा 2023 पासून लागू होईल.

या लेखात, आम्ही प्रिलिम्स आणि मुख्यसाठी अपडेटेड MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम प्रदान केला आहे. हा सुधारित MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम MPSC राज्यसेवा 2023 परीक्षेपासून लागू होईल. MPSC राज्यसेवा (राज्यसेवा) परीक्षा उत्तीर्ण करू इच्छिणाऱ्यांसाठी नवीनतम MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम 2023 जाणून घेणे हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या लेखात आम्ही MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम 2023 (सुधारित) मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रिलिम्स आणि मेनसाठी प्रदान केला आहे. उमेदवार एमपीएससी राज्यसेवा अभ्यासक्रम pdf मराठी आणि इंग्रजीमध्ये डाउनलोड करू शकतात.

MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम 2023 PDF डाउनलोड (सुधारित)
संघटनेचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC  राज्यसेवा
परीक्षेचे स्वरूप MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा
परीक्षेचा अभ्यासक्रम MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
Website https://mpsc.gov.in/

MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम: अद्ययावत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 21 जुलै 2022 रोजी सुधारित अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप (जे MPSC राज्यसेवा 2023 पासून लागू होणार आहे) इंग्रजी भाषे  मध्ये जाहीर केले होते आणि आता MPSC ने मराठी भाषेत देखील सुधारित MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम 2023 जाहीर केले आहे. या नवीन परीक्षेच्या स्वरूपानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षेत आधी प्रमाणे 2 पेपर असणार आहे परंतु यातील पेपर 2 (CSAT) हा अहर्ताकारी असणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेत एकूण 9 पेपर होणार आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही एकूण 1750 गुणांची असून मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी ही एकूण 275 गुणांची होणार आहे. याप्रकारे राज्यसेवा मुख्य परीक्षा ही एकूण 2025 गुणांसाठी होणार आहे. सर्व उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंक वरून MPSC राज्यसेवा सुधारित अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप डाउनलोड करू शकतात.

MPSC राज्यसेवा सुधारित अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप इंग्रजी मध्ये

MPSC राज्यसेवा सुधारित अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप मराठीमध्ये

MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम 2023

MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग सर्वसाधारणपणे दरवर्षी राज्यसेवा गट अ आणि गट ब (राजपत्रित) पदांसाठी विविध संवर्गाकरिता स्पर्धा परीक्षा घेते. ही परीक्षा राज्य शासनाच्या सेवेतील विविध पदांकरिता घेण्यात येते. ही पदे शासनाच्या मागणीनुसार आणि पदांच्या उपलब्धतेनुसार दरवर्षी भरली जातात. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांचे सविस्तर अभ्यासक्रम खाली देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे सविस्तर अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, निवड प्रक्रिया इत्यादींबद्दल सविस्तर माहिती असणे खूप गरजेचे असते.

MPSC राज्यसेवा परीक्षा- संपूर्ण अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम मराठी: या लेखात आपण राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत जेणेकरून उमेदवारांना त्यांच्या अभ्यासाचे नियोजन योग्यप्रकारे करता येईल. या परीक्षेत एकूण 3 टप्पे असतात त्यातील पहिला टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा व सर्वात शेवटी मुलाखत असे परीक्षेचे स्वरूप असते. MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप तुम्ही खाली दिलेल्या लेखात पाहू शकता.

अपडेटेड MPSC राज्यसेवा परीक्षा पॅटर्न 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप थोडक्यात खालीलप्रमाणे;

पेपर क्रमांक प्रश्न संख्या  गुण   कालावधी 
पेपर 1 (GS) 100 200 दोन तास
पेपर 2 (CSAT) 80 200 दोन तास
एकूण 400 

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम 

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम: या लेखात आपण राज्यसेवा परीक्षेच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सविस्तरपणे पाहणार आहोत.

adda247

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 01 चा अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 01 चा अभ्यासक्रम: या पेपर ला सामान्यतः सामान्य अध्ययन असे म्हणतात. यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात. खाली आपण पेपर 1 चा मराठी आणि English अश्या दोन्ही भाषेत अभ्यासक्रम पाहुयात.

पेपर 1 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)

  1. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी
  2. भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
  3. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल
  4. महाराष्ट्र आणि भारत राज्यव्यवस्था आणि शासन घटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, सामाजिक धोरणे इत्यादी
  5. आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी
  6. सामान्य विज्ञान
  7. पर्यावरण, परिसंस्था, पर्यावरणीय मुद्दे इत्यादी

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 02 चा अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 02 चा अभ्यासक्रम: या पेपरला सामान्यतः सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा CSAT असे म्हणतात. या मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय येतात. खाली आपण पेपर 2 चा मराठी आणि English अश्या दोन्ही भाषेत अभ्यासक्रम पाहुयात.

पेपर 2 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)

  1. मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन क्षमता
  2. संवाद आणि आंतर-कौशल्ये ज्ञान
  3. निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण
  4. सामान्य बुद्धिमत्ता चाचणी – बैठक व्यवस्था, दिशेचे ज्ञान, आकलन क्षमता, कूट-प्रश्न इत्यादी
  5. मुलभूत संख्याज्ञान आणि गणित, क्षेत्रफळ आणि घनफळ, काळ-काम-वेग, सरासरी, वय, शक्यता, विदा आकलन आणि स्पष्टीकरण, सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज इत्यादी

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम डाऊनलोड करा

MPSC अभ्यासक्रम डाउनलोड: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC अभ्यासक्रम: राज्यसेवा पूर्व परीक्षा

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम: या लेखात आपण MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत. मुख्य परीक्षेचे स्वरूप थोडक्यात खालीलप्रमाणे;

पेपर क्रमांक  विषय  प्रश्नसंख्या  एकूण गुण  कालावधी 
1 भाषा पेपर 1 (मराठी |इंग्रजी)   — 50 + 50 3 तास
2 भाषा पेपर 2 (मराठी |इंग्रजी) 50 + 50 50 + 50 1 तास
3 सामान्य अध्ययन – 01 150 150 2 तास
4 सामान्य अध्ययन – 02 150 150 2 तास
5 सामान्य अध्ययन – 03 150 150 2 तास
6 सामान्य अध्ययन – 04 150 150 2 तास
एकूण  800

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम: वरील भागात दिलेल्या स्वरूपानुसार राज्य सेवा मुख्य परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा – भाषा पेपर 1 चा अभ्यासक्रम 

राज्यसेवा मुख्य परीक्षा – भाषा पेपर 1 चा अभ्यासक्रम: या विषयात उमेदवाराचे मराठी आणि इंग्रजी विषयातील भाषेचे ज्ञान आणि लेखन कौशल्य तपासले जाते.

  • एकूण प्रश्न – 3 (मराठी) + 3 (इंग्रजी)
  • एकूण गुण – 50 (मराठी) + 50 (इंग्रजी)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वर्णनात्मक / पारंपारिक

भाषा पेपर 1 (मराठी आणि इंग्रजी) चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 50+50=100)

पेपर 01    गुण   अभ्यासक्रम 
भाग – 01 (मराठी) 50
  1. निबंध लेखन – दोनपैकी एका विषयावर सुमारे 400 शब्द
  2. भाषांतर इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर, सुमारे अर्धे पान/2 परिच्छेद
  3. सारांश लेखन
भाग – 02

(इंग्रजी)

50
  1. Essay writing- An essay on one out of the two given topics/subject (About 400 words)
  2. Translation – Marathi paragraph to be translated into English, approximately 1/2Page/paragraphs
  3. Precis writing

 

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा – भाषा पेपर 2 चा अभ्यासक्रम 

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा – भाषा पेपर 2 चा अभ्यासक्रम : या विषयात उमेदवाराचे मराठी व इंग्रजी भाषेचे तांत्रिक ज्ञान अर्थात व्याकरण आणि उमेदवाराचा शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार इत्यादींचा अभ्यास तपासला जातो.

  • एकूण प्रश्न – 50 (मराठी) + 50 (इंग्रजी)
  • एकूण गुण – 50 (मराठी) + 50 (इंग्रजी)
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 1 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

भाषा पेपर 2 (मराठी आणि इंग्रजी) चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 50+50=100)

पेपर 02   गुण  अभ्यासक्रम 
भाग – 01 (मराठी) 50
  1. व्याकरण – म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी/विरुध्दार्थी शब्द, शुध्दलेखन/विरामचिन्हे, इत्यादी
  2. आकलन- उताऱ्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
भाग – 02

(इंग्रजी)

50
  1. Grammar Idioms, Phrases, Synonyms/ Antonyms, Correct formation of words and sentences, Punctuation, etc.
  2. Comprehension
adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 01 चा अभ्यासक्रम

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 01 चा अभ्यासक्रम: या विषयात उमेदवाराचे महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासाविषयी तसेच महाराष्ट्र आणि भारताचा भौतिक, आर्थीक, सामाजिक आणि मानवी भूगोल आणि कृषी शास्त्र यांविषयीचे ज्ञान तपासले जाते.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन 01 चा अभ्यासक्रम-

I. इतिहास

  1. ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना
  2. आधुनिक भारताचा इतिहास
  3. प्रबोधन काळ
    1. सामाजिक सांस्कृतिक बदल
  4. वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था
  5. भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास
  6. ब्रिटीश शासनाविरोधी झालेले प्रसिध्द उठाव
  7. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टीकोन
  8. ब्रिटीश प्रशासन अधीन घटनात्मक विकास
  9. सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी
  10. सत्तेच्या हस्तांतरणाकडे
  11. स्वातंत्र्योत्तर भारत
  12. महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक
  13. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा

II. भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)

  1. भूरुपशास्त्र
  2. हवामानशास्त्र
  3. मानवी भूगोल
  4. आर्थिक भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
  5. लोकसंख्या भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
  6. पर्यावरणीय भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
  7. भूगोल आणि आकाश-अवकाशीय / अंतराळ तंत्रज्ञान
  8. सुदूर संवेदन
  9. रिमोट सेन्सिंगची मुलभूत तत्त्वे
  10. एरियल फोटोग्राफी
  11. जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग

III. कृषी 

  1. कृषी परिसंस्था
  2. मृदा
  3. जल व्यवस्थापन
Chief Minister of Maharashtra
Adda247 Marathi App

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 02 चा अभ्यासक्रम

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 02 चा अभ्यासक्रम: या विषयात उमेदवाराचे भारतीय संविधान आणि भारतीय राज्यप्रणाली तसेच काही महत्त्वाच्या कायद्यांचा अभ्यास तपासला जातो आणि यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय प्रणालीविषयी, पंचायत राज इत्यादी विषयीचे ज्ञान तपासले जाते.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन 02 चा अभ्यासक्रम:

  1. भारताचे संविधान
  2. भारतीय संघराज्य आणि राजकीय व्यवस्था (शासनाची संरचना, अधिकार व कार्ये)
  3. भारतीय प्रशासनाचा उगम
  4. राज्यशासन व प्रशासन (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह)
  5. ग्रामीण व नागरी स्थानिक शासन व प्रशासन
  6. जिल्हा प्रशासन
  7. पक्ष आणि हितसंबंधी गट
  8. निवडणूक प्रक्रिया
  9. प्रसार माध्यमे
  10. शिक्षण पद्धती
  11. प्रशासनिक कायदा
  12. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966
  13. काही सुसंबद्ध कायदे
  14. समाज कल्याण व सामाजिक विधीविधान
  15. वित्तीय प्रशासन
  16. कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था
  17. सार्वजनिक सेवा
  18. घटनात्मक आणि वैधानिक संस्था
  19. लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टीकोन आणि सिद्धांत
  20. सार्वजनिक धोरण

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 03 चा अभ्यासक्रम

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 03 चा अभ्यासक्रम: या विषयात उमेदवाराचे मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या विषयातील ज्ञान तपासले जाते. याशिवाय भारत आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना आणि प्रकल्प यांबद्दल माहिती विचारली जाते.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन 03 (मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क) चा अभ्यासक्रम-

I. मानव संसाधन विकास

  1. भारतातील मानव संसाधन विकास
  2. शिक्षण
  3. व्यावसायिक शिक्षण
  4. आरोग्य
  5. ग्रामीण विकास

II. मानवी हक्क 

  1. जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र (युडीएचआर 1948)
  2. बालविकास
  3. महिला विकास
  4. युवकांचा विकास
  5. आदिवासी विकास
  6. सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास
  7. वयोवृद्ध लोकांचे कल्याण
  8. कामगार कल्याण
  9. विकलांग व्यक्तींचे कल्याण
  10. लोकांचे पुनर्वसन (विकास प्रकल्प आणि नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित लोक)
  11. आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना
  12. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019
  13. मुल्ये, नीतितत्त्वे आणि प्रमाणके

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 04 चा अभ्यासक्रम

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 04 चा अभ्यासक्रम:  या विषयात उमेदवाराचे अर्थशास्त्र, नियोजन, कृषी अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान यातील तांत्रिक माहिती तसेच चालू घडामोडी यांविषयीचे ज्ञान तपासले जाते. अर्थशास्त्रात संकल्पना, भारतीय अर्थशास्त्र आणि महाराष्ट्र अर्थव्यवस्था यांवर भर दिला जातो.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन 04 (अर्थशास्त्र, नियोजन, कृषी अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान) 02 चा अभ्यासक्रम

I. समग्रलक्षी अर्थशास्त्र

  1. समग्रलक्षी अर्थशास्त्र
  2. वृद्धी आणि विकास
  3. सार्वजनिक वित्त
  4. मुद्रा / पैसा
  5. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल

II. भारतीय अर्थव्यवस्था 

  1. भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा
  2. भारतीय शेती व ग्रामीण विकास
  3. सहकार
  4. मौद्रिक व वित्तीय क्षेत्र
  5. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
  6. उद्योग व सेवा क्षेत्र
  7. पायाभूत सुविधा विकास
  8. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल
  9. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
  10. कृषी
    1. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व
    2. ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी वित्त पुरवठा
  11. अन्न व पोषण आहार

III. विज्ञान व तंत्रज्ञान विकास

  1. ऊर्जा विज्ञान
  2. संगणक व माहिती तंत्रज्ञान
  3. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान
  4. जैवतंत्रज्ञान
    1. प्रस्तावना
    2. शेतीमध्ये (कृषि) जैवतंत्रज्ञान
    3. वनस्पती उर्जा संवर्धन
    4. प्रतिरक्षा विज्ञान
    5. डीएनए तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरीता उपयोगीता
    6. लसी
    7. किण्वन
    8. जैवनैतिकता
    9. जैवसुरक्षा
    10. एकाधिकार (पेटंट)
  5. भारताचा आण्विक कार्यक्रम
  6. आपत्ती व्यवस्थापन

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम डाऊनलोड करा

MPSC अभ्यासक्रम डाउनलोड: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (मराठी आणि इंग्रजी) डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम मराठी मध्ये

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम इंग्रजी मध्ये

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा दिलेला अभ्यासक्रम तुम्हाला उपयोगी पडेल अशी आम्हाला आशा आहे. तुमच्या पुढील तयारीसाठी Adda247 मराठी सदैव तुमच्यासोबत असेलच. तुमच्या अभ्यासासाठी आणि पुढील तयारीसाठी शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा:

MPSC राज्य सेवा रिक्तपदे 2022-23

MPSC राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप 2023

MPSC राज्यसेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम काय आहे?

अद्ययावत MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम येथे प्रदान केला आहे

मी MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम कुठे मिळवू शकतो?

वरील लेखातून तुम्ही MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम मिळवू शकता