Marathi govt jobs   »   Study Materials   »   Forest Survey of India 2019

भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त | Indian Forest Survey Report 2019: Useful for All Competitive Exams

Table of Contents

Indian Forest Survey Report 2019: Useful for all competitive examinations: स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील आवश्यक घटकांचा अभ्यास करणे सोयीचे जावे, यासाठी आपण रोज अभ्यासक्रमातील काही घटकांचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला परीक्षांचा कमीत कमी वेळात अभ्यास करण्यासाठी याचा नक्की फयदा होईल, अशी आम्ही आशा करतो. आपण आज पाहणार आहोत, भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 | Indian Forest Survey Report 2019

Indian Forest Survey Report 2019 | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019

Indian Forest Survey Report 2019: स्पर्धा परीक्षांसाठी भूगोल व पर्यावरण विषयाचा अभ्यास करताना वन सर्वेक्षण अहवालाला अनन्यसाधारण महत्व आहे. वन सर्वेक्षण अहवालाचा अभ्यास महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे व तो परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. त्यामुळेच आजच्या लेखात आपण भूगोल व पर्यावरण विषयातील वन सर्वेक्षण अहवालाचा क्रमश: पद्धतीने अभ्यास करणार आहोत.

भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | Five Year Plans of India (From 1951 to 2017)

संगणक जागरूकता: स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य | Computer Awareness: Study Material for Competitive Exams

Indian Forest Survey Report 2019: Basic Information | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: प्राथमिक माहिती

Indian Forest Survey Report 2019: Basic Information: भारतीय वन सर्वेक्षण अहवाल दर दोन वर्षांनी भारतीय वन सर्वेक्षण संस्थेकडून तयार केला जातो. सध्याचा अहवाल 2017 ते 2019 या कालावधीसाठी बनवला आहे. हा अहवाल 30 डिसेंबर 2019 रोजी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे. 2019 मध्ये भारतीय वन सर्वेक्षण अहवालाची ही आता पर्यंतची 16 वी आवृत्ती आहे.

भारतीय वन सर्वेक्षण संस्था, डेहराडून (स्थापना: 1 जून 1981)

  • झाडांची 10% पेक्षा जास्त छत घनता (Canopy Density) आणि 1 हेक्टरपेक्षा जास्त असणार्‍या क्षेत्राला वन आच्छादन मानले जाते.
  • रेकॉर्ड केलेल्या वन क्षेत्राबाहेरील 1 हेक्टर पेक्षा कमी घनता असलेल्या क्षेत्राला वृक्ष आच्छादन मानले जाते.
  • 2019 च्या सर्वेक्षणासाठी  Ortho Reflected ISS III आणि IRS Resourcesat 2 या उपग्रहांचा वापर करण्यात आला आहे.
  • वन क्षेत्राची विभागणी अत्यंत घनदाट (>70%), मध्यम घनदाट (40-70%) आणि मुक्त जंगल (10-40%) यांमध्ये करण्यात आली आहे.
  • 2019 च्या सर्वेक्षणात प्रथमच राष्ट्रीय वन उत्पादनांची यादी देण्यात आली आहे.
  • तसेच प्रथमच वन आच्छादनाचे गुणात्मक स्वरूपात मूल्यांकन करण्यात आले आहे.

Indian Forest Survey Report 2019: Highlights | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: ठळक बाबी

  • भारतातील वन आच्छादन (Forest Cover): 7,12,249 चौ.कि.मी. (21.67%) [वाढ: 3976 चौ.कि.मी. (0.56%)]
  • भारतातील वृक्ष आच्छादन (Tree Cover): 95,027 चौ.कि.मी.आच्छादन (2.89%) [वाढ: 1212 चौ.कि.मी. (1.29%) ]
  • एकूण आच्छादन (Total Cover): 8,07,276 चौ.कि.मी. (24.56%) [वाढ: 5188 चौ.कि.मी. (0.65%) ]
  • हे प्रमाण राष्ट्रीय वन धोरणाप्रमाणे किमान 33% हवे.
  • भारतातील एकूण खारफुटी आच्छादन: 4975 चौ.कि.मी. (वाढ: 54 चौ.कि.मी.)
  • भारतातील एकूण पानथळ क्षेत्र: 42,466 चौ.कि.मी. (3.8% क्षेत्र)
  • भारतातील एकूण बांबू आच्छादन: 1,60,037 चौ.कि.मी. (वाढ: 3229 चौ.कि.मी.)
  • भारतातील आग प्रवण क्षेत्रात 20% नी घट झाली आहे.

Indian Forest Survey Report 2019: Highest Forest Cover | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: सर्वाधिक वन आच्छादन

खाली दिलेल्या राज्यांत सर्वाधिक वन आच्छादन आहे.

  1. मध्य प्रदेश
  2. अरुणाचल प्रदेश
  3. छत्तीसगढ
  4. ओडिशा
  5. महाराष्ट्र (50,778 चौ.कि.मी.–> 95.56 चौ.कि.मी. वाढ)

Indian Forest Survey Report 2019: Highest Percentage of Forest Cover | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: वनक्षेत्राची सर्वाधिक टक्केवारी

खाली दिलेली राज्ये/कें.प्र.यांनी वनक्षेत्राची सर्वाधिक टक्केवारी नोंदवली आहे.

  1. लक्षद्वीप (90.33%)
  2. मिझोराम
  3. अंदमान व निकोबार
  4. अरूणाचल प्रदेश
  5. मेघालय

–> महाराष्ट्र (16.50%)

Indian Forest Survey Report 2019: The Highest Increase in Forest Cover | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: वन आच्छादनात सर्वाधिक वाढ

खाली दिलेल्या राज्यांनी वन आच्छादनात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे.

  1. कर्नाटक
  2. आंध्र प्रदेश
  3. केरळ
  4. जम्मू आणि काश्मीर
  5. हिमाचल प्रदेश

Indian Forest Survey Report 2019: The Highest Decrease in Forest Cover | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: वन आच्छादनात सर्वाधिक घट

खाली दिलेल्या राज्यांनी वन आच्छादनात सर्वाधिक घट नोंदवली आहे.

  1. मणिपूर
  2. अरुणाचल प्रदेश
  3. मिझोराम
  4. मेघालय
  5. नागालैंड

Indian Forest Survey Report 2019: States with Highest Mangroves Cover | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: सर्वाधिक खारफुटी आच्छादन असलेली राज्ये

खाली दिलेल्या राज्यांमध्ये सर्वाधिक खारफुटीचे आच्छादन आहे.

  1. पश्चिम बंगाल (42.45%)
  2. गुजरात (23.66%)
  3. अंदमान व निकोबार
  4. आंध्र प्रदेश
  5. महाराष्ट्र (6.49%)

खाली दिलेल्या राज्यांनी खारफुटीच्या आच्छादनात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे.

  1. गुजरात (वाढ: 37 चौ.कि.मी.)
  2. महाराष्ट्र (वाढ: 16 चौ.कि.मी.)
  3. ओडिशा (वाढ: 8 चौ.कि.मी.)

Indian Forest Survey Report 2019: States with Highest Wetlands Area | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: सर्वाधिक पानथळ प्रदेश असलेली राज्ये

सर्वाधिक पानथळ प्रदेश असलेली राज्ये खाली दिली आहेत.

  1. गुजरात
  2. मध्य प्रदेश
  3. पश्चिम बंगाल
  4. महाराष्ट्र

Indian Forest Survey Report 2019: States that use Wood the Most for Fuel | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: इंधनासाठी लाकडाचा सर्वाधिक वापर करणारी राज्ये

खालील राज्ये लाकडाचा इंधन म्हणून सर्वाधिक वापर करतात. त्यामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाचे नुकसान होते.

  1. महाराष्ट्र
  2. ओडिशा
  3. राजस्थान

लाकडी इंधनाचा प्रति व्यक्ती सर्वाधिक वापर करणारी राज्ये खाली दिली आहेत.

  1. नागलॅंड
  2. हिमाचल प्रदेश
  3. त्रिपुरा

Indian Forest Survey Report 2019: Area Wise Forest Cover | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: क्षेत्र निहाय वनाच्छादन

  • पहाडी क्षेत्र: भारतात एकूण 140 पहाडी जिल्हे असून त्यांनी 2,84,000 चौ.कि.मी. एवढे वनक्षेत्र व्यापले आहे. ज्याची टक्केवारी 40.30% एवढी आहे. 2017 च्या तुलनेने त्यात 544 चौ.कि.मी.(0.19%) ची वाढ झाली आहे.
  • आदिवासी क्षेत्र: भारतात एकूण 4.22,351 चौ.कि.मी. एवढे वनक्षेत्र आदिवासी क्षेत्राने व्यापले आहे. ज्याची टक्केवारी 37.54% एवढी आहे. 2017 च्या तुलनेने त्यात 741 चौ.कि.मी.ची घट झाली आहे.
  • ईशान्य भारत: ईशान्य भारतातील एकूण 1,70,541 चौ.कि.मी. वनांनी व्यापलेले असून त्याची टक्केवारी 65% एवढी आहे. 2017 च्या तुलनेने त्यात 765 चौ.कि.मी.ची घट झाली आहे.
  • चारा, लहान इमारती लाकूड व बांबू यांसाठी वनांवर सर्वाधिक अवलंबून असलेले राज्य मध्य प्रदेश आहे.

Indian Forest Survey Report 2019: Districts with the highest forest cover in Maharashtra | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: महाराष्ट्रातील सर्वाधिक वन आच्छादन असणारे जिल्हे

महाराष्ट्रातील सर्वाधिक वन आच्छादन असणारे जिल्हे खाली दिले आहेत.

  1. गडचिरोली
  2. रत्नागिरी
  3. चंद्रपूर
  4. अमरावती
  5. ठाणे

Indian Forest Survey Report 2019: Districts with percentage wise Highest Forest Cover in Maharashtra | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: महाराष्ट्रातील टक्केवारीनुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेले जिल्हे

महाराष्ट्रातील टक्केवारीनुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेले जिल्हे खाली दिले आहेत.

  1. गडचिरोली
  2. सिंधुदुर्ग
  3. रत्नागिरी
  4. रायगड
  5. गोंदिया

FAQ: Forest Survey of India 2019

Q1. भारतात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

उत्तर: भारतात सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश राज्यात आहे.

Q2. भारतात टक्केवारी नुसार सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात/ केंद्रशासित प्रदेशात आहे?

उत्तर: भारतात टक्केवारी नुसार सर्वाधिक वनक्षेत्र लक्षद्वीप राज्यात आहे.

Q3. भारतात सर्वाधिक पानथळ प्रदेश असलेले राज्य कोणते?

उत्तर: भारतात सर्वाधिक पानथळ प्रदेश असलेले राज्य गुजरात आहे.

Q4. भारतात सर्वाधिक खारफुटी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर: भारतात सर्वाधिक खारफुटी पश्चिम बंगाल राज्यात आहे.

तुम्ही खालील ब्लॉग्स चा देखील उपयोग करू शकता 

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी

नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलम आणि परिशिष्ट

———-

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Indian Forest Survey Report 2019: Useful for all competitive examinations | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त_3.1
Maharashtra Maha Pack

 

Sharing is caring!

Indian Forest Survey Report 2019: Useful for all competitive examinations | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019: सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त_4.1

FAQs

Which state has the largest forest cover in India?

Madhya Pradesh has the largest forest cover in India.

Which state / UT has the highest percentage of forest cover in India?

Lakshadweep has the highest percentage of forest cover in India.

Which is the largest state with wetlands in India?

Gujarat is the largest state with wetlands in India.

Which state has the highest number of mangroves in India?

West Bengal has the highest number of mangroves in India.