Marathi govt jobs   »   Study Materials   »   Viceroys of India after 1857

1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय | Viceroys of India after 1857 | Study Material for MPSC

Table of Contents

Viceroys of India after 1857: महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021 यापरीक्षेची जाहिरात नोव्हेंबर मध्ये निघणार आहे. MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी एकूण 390 रिक्त पदांसाठी आयोगाने जाहिरात दिली आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ही 2 जानेवारी 2022 ला होणार आहे. त्याचप्रमाणे MPSC ने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021, इ स्पर्धा परीक्षांची लवकरच जाहिरात निघणार आहे. तर या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2021 Series, Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या अंतर्गत आपण दररोज सामान्य ज्ञान विषयातील परीक्षेला उपयोगी असे विविध Topics चा अभ्यास करणार आहोत. तर चला आजच्या या लेखात आपण इतिहास या विषयावरील 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय | Viceroys of India after 1857 यावर चर्चा करणार आहोत.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा कशी क्रॅक करावी | How to crack MPSC State Services Prelims Exam

Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय

Viceroys of India after 1857: MPSC घेत असलेले सर्व स्पर्धा परीक्षांचे जुने पेपर पाहता इतिहास या विषयावर MPSC राज्यसेवा, संयुक्त गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे येणाऱ्या MPSC च्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी भारतातातील व्हॉईसरॉय  हा topic खूप महत्वाचा आहे.या आधीच्या लेखात आपण ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल पाहिले आहेत. त्यामुळे आजच्या लेखात आपण 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय (Viceroys of India) याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

नोव्हेंबर 1858 च्या राणीच्या जाहिरनाम्यानुसार भारतातील कंपनीची राजवट संपुष्टात येऊन राज्यकारभाची सुत्रे ब्रिटिश पार्लमेंटकडे आली. भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय बनला. ब्रिटिश शासनाने तूर्तास राज्यविस्ताराचे धोरण थांबवून सत्ता बळकट करण्यास प्राधान्य दिले.  1857 च्या उठावावेळी गव्हर्नर जनरलपदी असलेला लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला.

Viceroys of India after 1857- Lord Canning | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड कॅनिंग

Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय_40.1
लॉर्ड कॅनिंग

Viceroys of India after 1857: लॉर्ड कॅनिंग (1856-1858 या काळात गव्हर्नर जनरल, 1858-62 या काळात व्हाईसरॉय) याच्या कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • भारताचा पहिला व्हाईसरॉय (1858-1862)
 • 1857 चे बंड मोडून काढले.
 • 1856-1857 मध्ये आय. सी. एस्. परीक्षेची भारतात सुरूवात केली.
 • 1857 मध्ये मुंबई, मद्रास, कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना केली.
 • खालसा धोरण रद्द केले.
 • 1860 मध्ये आग्रा व लाहोर येथे दरबार भरवून संस्थानिकांना त्यांच्या सनदा परत करण्याची घोषणा केली.
 • 1836 मध्ये लॉर्ड मेकॉलेने तयार केलेल्या ‘इंडियन पीनल कोड’ ला 1860 मध्ये कॅनिंगने मान्यता दिली.
 • 1861 च्या “Indian High-court Act’ नुसार मुंबई, मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयांची स्थापना केली
 • भारतमंत्री चार्ल्स वूडच्या सल्ल्यानुसार 1859 मध्ये भारतातील प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते सुरू केले.
 • 1861 मध्ये कोलकाता अहमदाबाद लोहमार्ग सुरू केला.
 • 1861 चा कौन्सिल ॲक्ट संमत केला.
 • 1959 मध्ये शेतकऱ्यांसाठी हितकारक असा ‘बंगाल रेंट ॲक्ट ‘ संमत केला.

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या 

Viceroys in India after 1857- Sir John Lawrence | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- सर जॉन लॉरेन्स

Viceroys of India after 1857: सर जॉन लॉरेन्सच्या (1864-69) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • शेतकऱ्यांच्या हितासाठी पंजाब, अवध येथे ‘टेनन्सी ॲक्ट’ पास केले.
 • 1868 मध्ये दुष्काळ आयोगाची (फॅमिन कमिशन) स्थापना केली.
 • जलसिंचन खाते निर्माण करून त्यावर रिचर्ड स्ट्रेंची या तज्ज्ञाची नियुक्ती केली.
 • पाटबंधारे खाते सुरू केले. सिमला हे उपराजधानीचे ठिकाण निर्माण केले.
 • अफगाणिस्तानबरोबर उत्कृष्ट निष्क्रीयता धोरण राबविले.

Viceroys of India after 1857- Lord Mayo | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड मेयो

Viceroys of India after 1857: लॉर्ड मेयोच्या (1869-1872) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
 • 14 डिसेंबर 1870 चे आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले. (प्रांतिक स्वायत्ततेची सनद)
 • 1872 मध्ये मेयोने पहिली जनगणना केली. याच्या काळात वहाबी चळवळ, कुका चळवळ क्रियाशील झाल्या.
 • 1872 मध्ये अंदमान येथे शेरअलीने लॉर्ड मेयोचा खून केला

Viceroys of India after 1857- Lord Northbrook | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉड नॉर्थबुक

Viceroys of India after 1857: लॉड नॉर्थबुकच्या (1872-1876) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • बिहारमधील दुष्काळ, अफगाणिस्तानसंबंधी धोरण यावरून विवादास्पद
 • 1875 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सची भारतभेट

भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव

Viceroys of India after 1857- Lord Litton | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लार्ड लिटन

Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय_50.1
लार्ड लिटन

Viceroys of India after 1857: लार्ड लिटनच्या (1876-1880) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • 1876-78 च्या दुष्काळावर उपाय सुचविण्यासाठी रिचर्ड स्ट्रेंची आयोग नेमला.
 • 1 जानेवारी 1877- दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास ‘भारताची सम्राज्ञी’ (कैसर-ए-हिंद) पदवी दिली.
 • मार्च 1878- देशी वृत्तपत्र कायदा (व्हर्नाक्यूलर प्रेस ॲक्ट) संमत करून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली.
 • 1878 चा शस्त्रबंदी कायदा. (विनापरवाना शस्त्रे बाळगण्यास भारतीयांवर बंदी)
 • 1879 चा ‘स्टॅट्यूटरी सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट’ संमत करून परीक्षेची कमाल वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे केली.
 • 1883 ची दुष्काळ संहिता (Famine Code)
 • मीठाच्या व्यापारावर जाचक कर लादले.

Viceroys of India after 1857- Lord Ripon | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड रिपन

Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय_60.1
लॉर्ड रिपन

Viceroys of India after 1857: लॉर्ड रिपनच्या (1880-1884) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 •  म्हैसूर, बडोदा या राज्यांची पुनर्स्थापना (1881).
 • 1881- फॅक्टरी ॲक्ट संमत के ला (7 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी)
 • 19 जानेवारी 1882 व्हर्नाक्यूलर प्रेस ॲक्ट रद्द केला.
 • 1882- प्राथमिक शिक्षणासंबंधी विचारार्थ विल्यम हंटर कमिशन नेमले. हाच भारतीय शिक्षण आयोग होय.
 • 18 मे 1882- स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला.
 • 2 फेब्रुवारी 1883- इलबर्ट विधेयक मंजूर केले. त्यानुसार भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळाला.
 • रमेशचंद्र मित्तर यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती केली.(पहिले भारतीय)
 • नागरी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा 19 वरून पुन्हा 21 वर्षे केली.
 • मानवतावादी दृष्टीकोन व भारताबद्दलची आस्था यामुळे रिपनला भारतात कमालीची लोकप्रियता लाभली.

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे

Viceroys in India after 1857- Lord Dufferin | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड डफरिन

Viceroys of India after 1857: लॉर्ड डफरिनच्या (1884-1888) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना.
 • जानेवारी 1886- उत्तर ब्रम्हदेश भारतात विलिन करून घेतला. (3 रे बर्मा युध्द)
 • 1886- चार्लस् अचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना.
 • 1887- पंजाब कुळकायदा संमत.
 • 36 फेब्रुवारी 1887- व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहणाच्या 50 व्या वर्धापनदिनाचे आयोजन. डफरिन यांच्या पत्नीने भारतीय स्त्रियांच्या आरोग्यासाठी लेडी डफरिन फंड स्थापन केला.
 • इंपिरिअल सर्व्हिस टुप्स योजनेंतर्गत संस्थानिकांना स्वतःचे सैन्य ठेवण्यास परवानगी. (पंजदेह प्रकरण)

Viceroys in India after 1857-Lord Curzon | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड कर्झन

Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय_70.1
लॉर्ड कर्झन

Viceroys of India after 1857: लॉर्ड कर्झनच्या (1899-1905) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • 1899- भारतीय चलन कायदा संमत, भारतासाठी सुवर्ण परिमाणाचा स्वीकार
 • 1900- कोलकाता महापालिका विधेयक मंजूर करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रणे लादली.
 • 1900- लॉर्ड मॅक्डोनलच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमला.
 • 1901- शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी ‘पंजाब लँड एलीनेशन’ कायदा संमत.
 • सर्वाधिक रेल्वेमार्गांची निर्मिती.
 • 1901- सिमला येथे शिक्षणपरिषद,
 • 1901- वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती.
 • 1901- रॉयल नेव्हीची स्थापना.
 • 1901- संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षणासाठी ‘इंपिरिअल कॅडेट कोअर ची स्थापना.
 • 1901- राणी व्हिक्टोरियाच्या स्मृतिप्रित्यर्थ कोलकाता येथे ‘व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल’ स्मारक
 • 1901- ब्रिटिश वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी दिल्ली दरबार भरवला.
 • 1901 -भारतीय रेल्वेची स्थिती अभ्यासण्यासाठी कर्झन याने ‘थॉमस रॉबर्टसन’ आयोगाची नियुक्ती केली. या आयोगाच्या शिफारशींनुसार 1905 मध्ये भारतात रेल्वे बोर्डाची’ स्थापना.
 • 1902- अँड्रू फ्रेझर याच्या अध्यक्षतेखाली पोलिस सेवेतील दोष शोधण्यासाठी समिती नेमली.
 • 1904- विद्यापीठ कायदा संमत करून उच्च शिक्षणपध्दतीवर निर्बंध आणले.
 • 1904- भारतातील पहिला सहकारी पतपेढी विषयक कायदा संमत केला.
 • 1904- भारतातील प्राचीन स्मारकांचा संरक्षण कायदा संमत केला.
 • 19 जूलै 1905- बंगालच्या अन्याय्य फाळणीची अधिसूचना. फाळणीची मूळ कल्पना- सर विल्यम वॉर्ड (1896) फाळणीस विरोध- सर हेन्री कॉटन
 • स्वदेशी चळवळीस प्रारंभ : 17 ऑगस्ट 1905
 • 16 ऑक्टोबर 1905- बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा.
 •  लष्करी अधिकाऱ्यांसाठी क्वेट्टा येथे प्रशिक्षण केंद्र उभारले.
 • लोकमान्य टिळकांनी कर्झनची तुलना औरंजेबाशी केली.

पंतप्रधान: अधिकार व कार्यें आणि मंत्रिमंडळ 

Viceroys in India after 1857- Lord Minto 2 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड मिंटो दुसरा 

Viceroys of India after 1857: लॉर्ड मिंटो दुसरा च्या (1905-1910) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • बंगाल विभाजनचा विरोध व स्वदेशी आंदोलन.
 • काँग्रेसचे विभाजन (1907) सुरत.
 • 1906- ढाका येथे मुस्लीम लीगची स्थापना झाली.
 • 1909- मोर्ले – मिंटो सुधारणा
 • 1908- वृत्तपत्र अधिनियम
 • 1911- बंगालची फाळणी रद्द केली, याबाबतची घोषणा इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याने केली.
 • 1911- किंग जॉर्ज पाचवा व क्वीन मेरीचा राज्याभिषेक दरबार दिल्ली येथे भरविण्यात आला
 • 1911- राजधानी कलकत्याहून दिल्लीला.
 • 1915- हिंदू महासभेची स्थापना.
 • 1915- गदर पार्टी सॅनफ्रेंन्सिस्को

Viceroys of India after 1857-Lord Chelmsford | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड चेम्सफोर्ड

Viceroys of India after 1857: लॉर्ड चेम्सफोर्डच्या (1916-1921) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • 1916-होमरूल लीग
 • 1916- काँग्रेसचे लखनौ अधिवेशन  – काँग्रेस व लीग समझौता.
 • 1919- माँटफोर्ड सुधारणा.
 • मार्च 1919 – जालियनवाला बाग.
 • असहकार व खिलाफत चळवळ.
 • 1916- पुणे येथे महिला विद्यापीठ- कर्वे.
 •  बिहारचे गर्व्हनर म्हणून एस. पी. सिन्हा (गव्हर्नरपदी जाणारे पहिले भारतीय ).
 • 1917- शिक्षण सुधारणा आयोग – सैडलर
 • 1918- इंडियन लिबरल फेडरेशनची स्थापना.

लिपिक टंकलेखक, महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2011-2019

Viceroys in India after 1857- Lord Riding | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड रिडिंग

Viceroys of India after 1857: लॉर्ड रिडिंगच्या (1921-1925) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • सर्व व्हॉईसरॉयपैकी एकमेव यहूदी
 • 1921- मोपलांचे बंड
 • 1922- चौरीचौरा
 • 1922- काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष व ज्येष्ठ नेते. – दास
 • 1923-आयसीएसची परीक्षा एकाचवेळी- दिल्ली व लंडन येथे घेण्याचा निर्णय
 • 1925- नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना
 • 1925- काकोरी ट्रेन
 • 1926- स्वामी श्रद्धानंदाची हत्या.
 • क्रिमिनल लॉ दुरुस्ती विधेयक

Viceroys of India after 1857- Lord Irwin | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय-

Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय_80.1
लॉर्ड आयर्विन

Viceroys of India after 1857: लॉर्ड आयर्विनच्या (1926-1931) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • 1928- सायमन कमिशन
 • 1927- हरकोर्ट बटलोर भारतीय राज्य आयोग (Indian states commission)
 • 1929- लाहोर अधिवेशन  – पूर्ण स्वराज्याची मागणी
 • 1930- मिठाचा सत्याग्रह.
 • साँडर्सची हत्या – असेंब्ली हॉल (दिल्लीत) – बॉम्य स्फोट,
 • लाहोर कट खटला व जतीनदासचा तुरुंगात उपोषणाने मृत्यू
 • ट्रेन- दिल्लीत बॉम्ब अपघात.
 • 1930- सविनय कायदेभंग चळवळ,
 • 1930- प्रथम गोलमेज परिषद

RBI ची पतनियंत्रणाची साधन

Viceroys of India after 1857- Lord Willingdon | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड विलिंग्डन

Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय_90.1
लॉर्ड विलिंग्डन

Viceroys of India after 1857: लॉर्ड विलिंग्डनच्या (1931-1936) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • 1931-दुसरी गोलमेज परिषद
 • पुन्हा सविनय कायदेभंगाची चळवळ 1934 ला आंदोलन मागे.
 • 1932- पुणे करार
 • 1935 चा भारत सरकार अधिनियम.
 • 1935- आरबीआयची स्थापना (RBI)
 • 1935- भारतापासून बर्मा वेगळा.
 •  काँग्रेस समाजवादी पक्ष (1934) आचार्य नरेंद्र देव – जयप्रकाश नारायण.
 • 1936- अखिल भारतीय किसान सभा

Viceroys of India after 1857- Lord Linlithgow | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड लिनलिथगो

Viceroys of India after 1857: लॉर्ड लिनलिथगोच्या (1936-1943) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • 1937 ला अनेक प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळे आली, नंतर 1939 ला युद्धाच्यावेळी राजीनामे दिले.
 • सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडली व फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना.
 •  मुस्लीम लीगचा लाहोर जाहीरनामा, येथेच जीनांच द्विराष्ट्र सिद्धांत.
 • ऑगस्ट घोषणा (१९४०) लीगने स्वीकारली. काँग्रेसने नाकारली.
 • चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून नियुक्त.
 • सुभाषचंद्र बोस – भारताबाहेर (1941)- आयएनएची स्थापना.
 • 1942- क्रिप्स मिशन- ‘डोमिनियन स्टेटस’ – गांधीनुसार- Post dated check.
 •  चलेजाव चळवळीची घोषणा.
 • लीगचे कराची अधिवेशन-‘फोडा आणि राज्य करा’- घोषणा

उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2017-2019

Viceroys of India after 1857- Lord Wavell | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड वेव्हेल

Viceroys of India after 1857: लॉर्ड वेव्हेलच्या (1943-1947) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • सी राजगोपालाचारी द्वारा सीआर फॉर्म्युला -बोलणी अयशस्वी (गांधी-जीना).
 • वेव्हेल योजना – सिमला संमेलन
 • आयएनए – खटला व नौसैनिक विद्रोह.
 • कॅबिनेट मिशन योजना काँग्रेस व लीगकडून योजनेची स्वीकृती.
 • मुस्लीम लीगचा प्रत्यक्ष कृती दिन 17 ऑगस्ट 1946 (Direct Action Day).
 •  संविधान सभेसाठी निवडणूक – अंतरिम सरकार.
 •  20 फेब्रु. 1947- भारत सोडण्याची ब्रिटिश पंतप्रधान ॲटलींची घोषणा

Viceroys of India after 1857- Lord Mountbatten | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय- लॉर्ड माऊंटबॅटन

Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय_100.1
लॉर्ड माऊंटबॅटन

Viceroys of India after 1857:  लॉर्ड माऊंटबॅटनच्या (1947-1948) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:

 • 3 जून 1947- माऊंटबॅटन योजनेची घोषणा – भारताचे विभाजन.

15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला.आणि 5 मार्च 1948 ला सी. राजगोपालचारी यांची भारताचे पहिले आणि शेवटचे गर्व्हनर जनरल म्हणून नेमणूक झाली.

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तुम्हाला हेही बघायला आवडेल

ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल

भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी, 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश 2021

RBI ची पतनियंत्रणाची साधन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य 

राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या

हिमालयातील महत्वाच्या खिंडी

भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव 

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये- वने व वनांचे प्रकार 

भारतातील सर्वात मोठे राज्य 2021: क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार सर्व राज्यांची यादी

पंतप्रधान: अधिकार व कार्यें आणि मंत्रिमंडळ

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers in Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds and Types of clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks in India – State-wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List of Countries and their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Latest Job Alert:

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या रिक्त पदसंख्येत वाढ

IBPS Clerk 2021 अधिसूचना जाहीर | IBPS Clerk 2021 Notification Out

SBI PO अधिसूचना 2021 | SBI PO Notification 2021

FAQs Viceroys of India after 1857

Q.1 व्हॉईसरॉय या टॉपिक वर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेवर प्रश्न येतात का ?

Ans. हो, व्हॉईसरॉय या टॉपिक वर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेवर प्रश्न येतात.

Q.2 इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 बंगालची फाळणी कोणत्या व्हॉईसरॉय च्या काळात झाली ?

Ans: बंगालची फाळणी  लॉर्ड कर्झनच्या काळात झाली ?

Q.4 व्हॉईसरॉय याची माहिती कुठे मिळेल?

Ans. व्हॉईसरॉय याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय_110.1
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय_130.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय_140.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.