Marathi govt jobs   »   Study Materials   »   Blood Circulatory System

Blood Circulatory System: Blood Vessels, Human blood and Heart | रक्ताभिसरण संस्था: रक्तवाहिन्या, मानवी रक्त आणि हृदय

Blood Circulatory System

Blood Circulatory System: The blood circulatory system, also known as the cardiovascular system, is a vital network of organs and vessels that transport blood throughout the body. This system is responsible for delivering oxygen, nutrients, hormones, and other essential substances to every cell and tissue in the body, as well as removing waste products and carbon dioxide. The heart, blood vessels, and blood itself all play important roles in the circulatory system. Understanding how this system works can help us appreciate the complexity of our bodies and the importance of maintaining a healthy lifestyle to keep it functioning properly. In this blog, we will explore the anatomy and function of the blood circulatory system in detail.

Blood Circulatory System
Category Study Material
Article Name Blood Circulatory System
Subject Biology
Useful for Talathi & Other Competitive Exams

Blood Circulatory System: Blood Vessels, Human blood and Heart | रक्ताभिसरण संस्था: रक्तवाहिन्या, मानवी रक्त आणि हृदय

Blood Circulatory System: तलाठी, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांचे जुने पेपर पाहता विज्ञान या विषयावर बरेच प्रश्न विचारले जातात त्यामुळे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी रक्ताभिसरण संस्था हा topic खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण रक्ताभिसरण संस्था याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आजच्या या लेखात आपण विज्ञान या विषयावरील Blood Circulatory System (रक्ताभिसरण संस्था) पाहुयात. ज्याचा आपणास आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत नक्कीच फायदा होईल.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

Blood Circulatory System: Blood Vessels, Human blood and Heart | रक्ताभिसरण संस्था: रक्तवाहिन्या, मानवी रक्त आणि हृदय

Blood Circulatory System: रक्ताभिसरणाचा शोध सर्वप्रथम विलियम हार्वे यांनी लावला. जगातील जवळपास सर्व प्राण्यामध्ये रक्ताभिसरणाचे संस्था अस्तित्वात असते, त्यापैकी काही प्राण्यामध्ये विविधता दिसून येते. याच्यावरून प्राण्यामध्ये रक्ताभिसरणाचे मुख्य दोन प्रकार असतात.

Types of Blood Circulatory System
Types of Blood Circulatory System
  1. खुली रक्ताभिसरण संस्था (Open Blood Circulatory System)
  2. बंद रक्ताभिसरण संस्था (Closed Circulatory System)
खुली रक्ताभिसरण संस्था/Open Blood Circulatory System बंद रक्ताभिसरण संस्था/Closed Circulatory System
यांच्यात विशिष्ट अशा रक्तवाहिन्या नसतात ज्या शुद्ध व अशुद्ध रक्ताचे वहन करतात. विशिष्ट रक्तवाहिन्या (Blood vessels) असतात. ज्या शुद्ध व अशुद्ध रक्ताचे वहन करतात.
यांच्यात शुद्ध व अशुद्ध रक्त एकत्र मिसळते. यांच्यात शुद्ध व अशुद्ध रक्त हे शरीरात एकत्र मिसळत नाही
उदा. संघ मोलुस्का व संघ अथ्रोपोडा उदा. झुरळ, गोगलगाय, विंचू इत्यादी उदा. सरपटणारे, उभयचर व पृष्ठवंशीय प्राणी. उदा. माणूस, मासे, बेडूक, पक्षी इत्यादी

मराठी व्याकरण ओळख व व्याकरणाची व्याख्या

 

Blood Circulatory System- Closed circulatory system in the human body | मानवी शरीरातील बंद रक्ताभिसरण संस्था

Blood Circulatory System- Closed circulatory system in the human body: मानवी शरीरात बंद रक्ताभिसरण संस्था (Closed circulatory system) असते, म्हणजेच मानवामध्ये अशुद्ध व शुद्ध रक्तासाठी वेगवेगळ्या रक्त वाहिन्या असतात, म्हणजेच रक्त एकत्र मिसळत नाही

मानवी रक्ताभिसरण संस्थेत मुख्यतः तीन घटक येतात.

  1. रक्तवाहिन्या (Blood vessels)
  2. रक्त (Blood)
  3. हृदय (Heart)

Blood Circulatory System- Blood vessels | रक्तवाहिन्या

Blood Circulatory System- Blood Vessels: मानवी शरीरात त्यांच्या वाहनानुसार तीन रक्तवाहिन्या असतात.

Blood Circulatory System- Blood vessels
Blood Circulatory System- Blood vessels
  • धमनी (Artery)
  • शिरा (Veins)
  • केशवाहिन्या (Capillaries)

धमणी (Artery): ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून दूर शरीराकडे जातात त्यांना धमणी म्हणतात. धमण्या साधारणत: ऑक्सिजनयुक्त (Oxy-genated) रक्ताचा पुरवठा करतात. परंतु फुप्फुस धमणी (Pulmonary Artery) ही अशुद्ध रक्ताचे वहन करते.

धमणीची प्रमुख वैशिष्ट्ये

  • धमण्या शिरांपेक्षा (Veins) खोलवर पसरलेल्या असतात. (Deeply situated in body)
  • धमण्यांना झडपा (Valve) नसतात.
  • रक्तदाब हा धमण्यांमध्ये जास्त असतो (Blood Pressure) i.e. 100 mmHg
  • धमण्याच्या भित्तिका (Walls) स्थितीस्थापक (Elastic) व स्नायूयुक्त (Mascular) असतात.
  • तसेच धमण्याची भित्तिका ही साधारणत: शिरापेक्षा जाड (Thick) असते कारण येथे रक्तदाब जास्त असतो. म्हणूनच धमण्याची आतून पोकळी (Lumen) शिरापेक्षा छोटी असते.

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये

शिरा (Vein): जी रक्तवाहिनी शरीराच्या भागाकडून हृदयाकडे, वापरलेल्या अशुद्ध रक्ताचे Deoxygenated Blood) वाहन करते, त्याला शिरा असे म्हणतात. (अपवाद फुफ्फुसभीगा शिर (Pulmonary vein) ज्यामध्ये शुद्ध रक्त असते.

शिरांची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • शिरा या शरीराच्या त्वचे लगतच म्हणजेच धमण्यांपेक्षा वर असतात. (Superficially situated)
  • शिरा या कमी दाब व गुरुत्वाच्या विरुद्ध दिशेने रक्ताचे वहन करतात म्हणून त्यांना झडपा (Valve) असतात.
  • शिरांमध्ये रक्तदाब हा खूप कमी असतो. (10-20mmHg)
  • शिरा या कमी स्थितीस्थापक (Elastic) असतात.
  • शिरांच्या भित्तिका पातळ (Thin) असतात. म्हणूनच आतून पोकळी जास्त असते.

केशवाहिनी (Capillary): या अशाप्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत ज्यांच्यातून रक्त हे पेशीशी संबंधात येते. म्हणजेच धमणी व शिरा यांना जोडणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणता येईल.

केशवाहिन्याची प्रमुख वैशिष्ट्ये

  • केशवाहिन्याची भित्तिका (Wall) खूपच पातळ असते, ती भित्तिका एका थराने (Layer) बनलेली असते. (i.e. Endothelium layer)
  • पेशीशी संबंधीत रक्त हे केवळ केशवाहिन्या मार्फतच येते.
  • रक्त आणि पेशी यांच्यातील वायूची, अन्नाची व उत्सर्जित पदार्थाची दिवाणघेवाण हि केवळ केशवाहिन्यांमार्फत घडते.

Blood Circulatory System- Human Blood | रक्ताभिसरण संस्था- रक्त

Blood Circulatory System- Blood: मानवी रक्त मुख्यतः दोन घटकांनी बनलेले असते.

  1. रक्तपेशी (Blood cells)
  2. रक्तद्रव (Plasma)
Blood Circulatory System: Blood
Blood Circulatory System: Blood

1. रक्तपेशी (Blood Cells/ Corpuscles): या 3 प्रकारच्या असतात त्या पुढीलप्रमाणे

i. RBC Red Blood Cell/Corpuscles (लाल रक्त पेशी/लोहित रक्त पेशी) :

  • गोलाकार, द्विअंतर्वक्र (Circular, Biconcave) आणि केंद्रक नसलेल्या (Non-nucleated)
  • यांना Erythrocytes असे म्हणतात.
  • आकाराने खूप लहान असतात म्हणजेच 7 मायक्रोमीटर व्यास, 2.5 मायक्रोमीटर जाडी असते.
  • Haemoglobin (हिमोग्लोबीन) नावाच्या घटकामुळे RBC ला लाल रंग प्राप्त होतो.
  • RBC 127 दिवस जगतात.
  • त्या प्लीहा (Spleen) मध्ये जाऊन मरतात. (i.e. Grave Yard of RBC)
  • गर्भामध्ये (Foetus) RBC या यकृतात (Liver) किंवा प्लीहा (Spleen) मध्ये तयार होतात.
  • प्रौढ माणसात (Adult) RBC या अस्थिमज्जेत (Bone marrow) तयार होतात.
  • RBC मधील महत्त्वाचा घटक- हिमोग्लोबिन (Hemoglobin): एका RBC मध्ये लाखो हिमोग्लोबीन असतात. हिमोग्लोबीनमध्ये हिम (Heme) म्हणजे लोह (Iron) व ग्लोबीन (globin) म्हणजे प्रथिन होय. ऑक्सिजनचे वहन हिमोग्लोबीन द्वारे केले जाते. सामान्यतः पुरुषामध्ये 13-18gm/100ml व स्त्रीयामध्ये 11.5-16.5gm/100ml हिमोग्लोबीनचे प्रमाण असते.हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे अनेमिया नावाचा रोग होतो, तर हिमोग्लोबीन जास्त झाल्यामुळे पॉलीसायथेमीया नावाचा रोग होतो.
Adda247 App
Adda247 App

ii. WBC-White Blood Cell/ Corpuscles (पांढऱ्या रक्त पेशी / सैनिकी पेशी /श्वेत रक्त पेशी):

  • आकाराने मोठ्या, अमिबासदृश, केंद्रक असलेल्या आणि रंगहीन पेशी आहेत.
  • या आकाराने RBC पेक्षा मोठ्या असतात. म्हणजेच 8 ते 15 मायक्रोमीटर व्यास असतो. साधारणत: रक्तात 5000 ते 11000 प्रती घनमिमी WBC असतात.
  • WBC लो Leucocytes असेही म्हणतात.
  • कुठल्याही प्रकारच्या रोगामध्ये प्रथम WBC ची संख्या वाढते आणि जेव्हा WBC ची संख्या 2 लाख प्रति घनमीमी पर्यंत वाढते त्याला रक्ताचा कर्करोग (Leukemia) म्हणतात.
  • WBC या अस्थिमज्जा (Bone marrow) तसेच प्लीहा (Spleen)) मध्ये तयार होतात.
  • 3-4 दिवस जगतात.
  • WBC चे 5 प्रकार आहेत
White Blood Cell
White Blood Cell
  1. Neutrophils- सूक्ष्मजीवाला मारतात
  2. Acidophils- ॲलर्जी मध्ये यांची संख्या वाढते
  3. Basophils- हिपॅरीन व हिस्टामाइन यांचे वहन करणे
  4. Lymphocytes- प्रतिकार क्षमतेत प्रतिद्रवे (Antibody) तयार करतात.
  5. Monocytes- मृत सजीवांना खातात.

जीवशास्त्र भाग-1 (वनस्पतीची रचना व कार्ये)

iii. Platletes (रक्तपट्टीका / रक्तबिंबीका):

  • यांचा आकार द्विबहीर्वक्र (Biconvex) असतो, तसेच रंगहीन असतात.
  • या रक्तपेशी फक्त सस्तन प्राण्यातच (Mamallian Animal) आढळतात.
  • यांना Thrombocytes असे पण म्हणतात, यांना केंद्रक नसते.
  • या अतिशय लहान (2.5 ते 5 मायक्रोमीटर व्यास) व तबकडीसारख्या असतात.
  • रक्तपट्टीका 5 ते 10 दिवस जगू शकतात.
  • साधारणतः रक्तामध्ये 2.5 ते 4.5 लाख प्रति घन मिमी एवढ्या रक्तपट्टीका असतात.
  • रक्त गोठण्याच्या (Coagulation) प्रक्रियेत मदत करतात.
  • या अस्थिमज्जा मध्येच तयार होतात.
  • डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या रोगात यांचे प्रमाण कमी होते.

2. रक्तद्रव: रक्तातील रंग नसलेला किंवा फिकट पिवळसर अल्कली माध्यम (Alkaline/Basic medium) असलेला द्रव म्हणजे रक्तद्रव होय.

रक्तद्रव्याची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

  • एकूण रक्ताच्या 55% भाग म्हणजे रक्तद्रव (Plasma) होय.
  • रक्तद्रव म्हणजे 90% पाणी, 7% प्रथिने (Protein) आणि उर्वरित 3% भाग म्हणजे असेंद्रिय घटक (Non organic substances) होय.
  • रक्तद्रव्यात मुख्यतः 4 प्रकारचे प्रथिने आढळतात.
  1. Globulin- प्रतिद्रवे (Antibody) तयार करणे. प्रतिकार क्षमता नियंत्रित करणे.
  2. Albumin- शरीरातील पाण्याचा समतोल राखणे. (Osmotic Balance)
  3. Prothrombin-रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.
  4. Fibrenogen-रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.
  • याव्यतिरिक्त रक्तद्रवात (Plasma) ग्लुकोज, अमिनो आम्ल, मेद आम्ल (Fatty acid), युरिआ व विविध प्रकारचे वायू असतात.
  • शरीरातील जास्तीत जास्त (70%) कार्बनडाय ऑक्साइड हा रक्तद्रवामध्ये बायकार्बोनेटच्या (Bicarbonate) स्वरूपात वहन होते.

Blood Circulatory SystemHeart | रक्ताभिसरण संस्था– हृदय

Blood Circulatory System- Heart: स्नायूंनी बनलेले हृदय परिहृद आवरणाखाली छातीच्या पिंजऱ्यात संरक्षित असते. लहान मुलांचे हृदय त्यांच्या मुठीइतके असते. मानवी हृदयाचे वजन सुमारे 360 ग्रॅम असते. प्रौढ व्यक्तीचे हृदय दोन मुठीइतके असते.

Human Heart
Human Heart

हृदयाची रचना: 1706 साली रेमंड-डि-व्हिसेन्स या फ्रेंच शरिररचना संशोधकाने सर्वप्रथम हृदयाची रचना स्पष्ट केली. हृदयाच्या चार कप्प्यांपैकी वरच्या दोन कर्णिका (Atrium) व खालच्या दोन जवनिका (Ventricles) असतात.

  1. उजवी कर्णिका (उजवे अलिंद): उर्ध्वमहाशिर व अधोमहाशिर या दोन मोठ्या रक्तवाहिन्या शरीराच्या सर्व भागातील अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त उजव्या कर्णिकत आणतात.
    उजवी कर्णिका व उजवी जवनिकादरम्यान असलेल्या ‘त्रिदल झडपे’मुळे उजव्या कर्णिकेतून रक्त उजव्या जवनिकेत जाऊ शकते परंतू उलट मार्गाने ते उजव्या कर्णिकत येत नाही.
  2. उज़वी जवनिका (उजवे निलय): ‘फुफ्फुसधमनी’ ही मोठी रक्तवाहिनी या कप्प्यातून निघून उजव्या कर्णिकेतील अल्पऑक्सिजनयुत रक्त फुफ्फुसात नेते. फुफ्फुसधमनीच्या आरंभी बाजूला तीन अर्धचंद्राकृती झडपा असतात. त्यामुळे या धमनीतून फुफ्फुसात गेलेले रक्त माघारी फिरत नाही.
  3. डावी कर्णिका (डावे अलिंद): फुफ्फुसातील ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त घेऊन येणाऱ्या चार फुफ्फुसशिरा या कप्प्यात उघडतात.
  4. डावी जवनिका (डावे निलय): ‘महाधमनी’ नावाची मोठी रक्तवाहिनी या कप्प्यातून निघते व आपल्या शाखांमार्फत शरीराच्या सर्व भागांना शुद्ध रक्ताचा पुरवठा करते.

दुहेरी अभिसरण: हृदयाच्या एका ठोक्याच्या काळात अभिसरणांच्या (दुहेरी अभिसरण) दोन क्रिया घडतात.

फुफ्फुसी अभिसरण (Pulmonary Circulation): या क्रियेद्वारे विनॉक्सिजनित किंवा अल्पऑक्सिजन रक्त हृदयाकडून फुफ्फुसाकडे नेले जाते व तेथे रक्त ऑक्सिजनयुक्त झाल्यावर ते पुन्हा हृदयाकडे आणले जाते.

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल-1 (महाराष्ट्रातील वने)

देह अभिसरण (Systemic Circulation): या क्रियेद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडून शरीराच्या सर्व पेशींकडे, ऊतीकडे पोहचविले जाते व पेशींमधील विनॉक्सिजनित व कार्बन डाय-ऑक्साईडयुक्त रक्त हृदयाकडे पोहचविले जाते.

हृदयाचे ठोके (Heart Beats) : लयबद्ध रीतीने हृदयाचे आकुंचन व त्यानंतर त्वरित शिथिलता येणे यास हृदयाच एक ठोका म्हणतात.

  • सामान्य (निरोगी) प्रौढ व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके: 60 ते 100 प्रति मिनिट
  • Tachycardia: वेगात पडणारे हृदयाचे ठोके (100 प्रतिमिनिट)
  • Bradycardia: हळूवार पडणारे हृदयाचे ठोके (60 प्रतिमिनिट)
  • झोपेत मनुष्याच्या हृदयाचे ठोके संथगतीने (40 ते 50 प्रतिमिनिट) पडतात.
  • Arrhythmia: हृदयाचे अनियमित पडणारे ठोके.
  • मानवी हृदयाचे 24 तासात सुमारे 1 लाख ठोके पडतात.
  • मानवी हृदय 24 तासात सुमारे 10 हजार लिटर रक्त पम्प करू शकते.
  • मानवी हृदय प्रत्येक ठोक्यास (Heart beat) सुमारे 75 मिलि रक्त पम्प करते.
  • रक्ताचे शरीरभर रक्ताभिसरण होण्यासाठी अवघे 20 सेकंद लागतात.
  • मानवी शरीरात दर मिनिटास 3 वेळा सुमारे 5.6 लिटर रक्त प्रवाहित केले जाते.
  • मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग पाहता, एका दिवसात रक्त सुमारे 12,000 मैलांचा प्रवास करते.
  • हृदय केवळ रक्त पम्प (Pump) करण्याचे कार्य करते. रक्ताचे शुद्धीकरण यकृत, फुफ्फुस, किडनी यामध्ये होते.
MPSC Group C Post List
Adda247 Marathi Telegram

Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देत रहा. यामुळे तुम्हाला MPSC च्या आगामी सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

For More Study Articles, Click here

FAQs Blood Circulatory System

Q.1 मानवी शरीरात किती  रक्तवाहिन्या असतात?

Ans: मानवी शरीरात तीन धमनी (Artery), शिरा (Veins), केशवाहिन्या (Capillaries) असतात.

Q.2 विज्ञान या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. विज्ञान या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 WBC आणि RBC यामध्ये कोणाला केंद्रक असते ?

Ans: WBC ला केंद्रक असते.

Q.4  रक्ताभिसरण संस्था याची माहिती कुठे मिळेल?

Ans. रक्ताभिसरण संस्था याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

लेखाचे नाव लिंक
भारताची जणगणना
माहितीचा अधिकार अधिनियम 2005
भारतीय नागरिकत्व
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

How many blood vessels are there in the human body?

The human body has three arteries, veins and capillaries.

Where can I find information on science topics?

Information on the topic of science can be found on Adda247 Marathi's app and website.

Which blood cell has nucleus?

WBC has a nucleus.

Where can I get information about circulatory system?

nformation about the circulatory system can be found on Adda247 Marathi's app and website.