Marathi govt jobs   »   Maharashtra Nagar Palika Bharti 2023   »   नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023

नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 1, 25 ऑक्टोबर 2023, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाच्या परीक्षेचे विश्लेषण

नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023

नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023: नगरपरिषद भरती 2023 अंतर्गत दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी पहिल्या  शिफ्टमध्ये कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 1 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाची परीक्षा सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 25 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टचे नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

नगर परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

नगरपरिषद परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग नगरपरिषद
भरतीचे नाव नगर परिषद  भरती 2023
पदाचे नाव कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी
लेखाचे नाव नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023
नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1, 25 ऑक्टोबर 2023 (कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी)
नकारात्मक गुणांकन पद्धती 1/4 गुण
परीक्षेचा कालावधी 02 तास
एकूण गुण 200

नगरपरिषद परीक्षेचे स्वरूप 2023

नगरपरिषद भरती 2023 अंतर्गत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 15 याप्रमाणे 60 प्रश्न व तांत्रिक विषयातील 40 प्रश्न असे मिळून एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 15 30 02 तास
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बौद्धिक चाचणी 15 30
5 तांत्रिक  40 80
एकूण 100 200  

नगरपरिषद परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

नगरपरिषद परीक्षा 2023 परीक्षा ही 25 ऑक्टोबर 2023 व 03 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. नगरपरिषद परीक्षेची  शिफ्टनुसार वेळ खाली देण्यात आली आहे.

शिफ्ट परीक्षेची वेळ
शिफ्ट 1 सकाळी 09 ते 11
शिफ्ट 2 दुपारी 12.30 ते 02.30
शिफ्ट 3 संध्याकाळी 04.30. ते 06.30

नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)

नगरपरिषद भरती 2023 अंतर्गत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत नकारात्मक गुणांकन पद्धती असल्यामुळे सर्व उमेदवारांनी नेमके येत असलेले प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 10-11 सोपी
2 इंग्रजी भाषा 08-10 सोपी
3 सामान्य ज्ञान  08-10 मध्यम
4 बौद्धिक चाचणी 10-11 मध्यम
5 तांत्रिक  30-32 मध्यम
एकूण 66-74 मध्यम
Saral Seva Mahapack
सरळसेवा महापॅक

विषयानुरूप नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)

नगरपरिषद भरती 2023 अंतर्गत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक या विषयावर एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार पेपर 1 व पेपर 2 मधील विषयांचे विश्लेषण प्रदान केले आहे.

पेपर 1 मधील विषयांचे विश्लेषण

मराठी विषयाचे विश्लेषण

नगरपरिषद भरती 2023 अंतर्गत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने उताऱ्यावरील प्रश्न, अधोरेखित जागी योग्य शब्द, वाक्यांचा योग्य क्रम लावणे इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेत विचारण्यात आलेले सर्व विभागांची माहिती खाली दिली आहे.

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

नगरपरिषद भरती 2023 अंतर्गत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Passage based Questions, Phrases, Para Jumble, इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • Passage based Questions – 03 प्रश्न
  • Synonyms– 01 प्रश्न
  • Antonyms- 01 प्रश्न
  • One Word Substitution – 02 प्रश्न
  • Idoms – 02 प्रश्न
  • Fill in the blanks.
  • Phrases
  • Article
  • Para Jumble – 2-3 प्रश्न
  • Word swapping (2-3 प्रश्न )
  • Misspelt- 2 प्रश्न
  • Error Detection – (2-3 प्रश्न )

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

नगरपरिषद भरती 2023 अंतर्गत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने चालू घडामोडी वर प्रश्न, अर्थ व्यवस्था वर प्रश्न, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

नगरपरिषद भरती 2023 अंतर्गत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने कोडी, बैठक व्यवस्था, अक्षरमाला, विधान व निष्कर्ष, पदावली, नफा व तोटा, शेकडेवारी इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

पेपर 2 मधील विषयाचे विश्लेषण

विषयाशी संबंधित घटकांचे विश्लेषण

नगरपरिषद भरती 2023 अंतर्गत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाच्या परीक्षेत विषयाशी संबंधित घटक या विषयात एकूण 40 प्रश्न विचारण्यात आले होते. विषयाशी संबंधित घटक या विषयात प्रामुख्याने महाराष्ट्राचा भूगोल, मानवी वसाहत, पर्यटन न्याय मंडळ इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • महाराष्ट्राचा भूगोल
  • मानवी वसाहत
  • पर्यटन
  • महाराष्ट्राचा इतिहास
  • राज्यघटना
  • राजकीय यंत्रणा
  • जिल्हा प्रशासन
  • निवडणूक प्रक्रिया
  • प्रशासकीय कायदा
  • कामगार कल्याण
  • न्याय मंडळ
  • माहितीचा अधिकार 2005

परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न खाली दिले आहेत.

  • ई-श्रम पोर्टल ची तारीख?
  • RTS आयुक्तांची नेमणूक कोण करत?
  • भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम राज्यसभेत कधी मांडला?
  • 22 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण?
  • महाराष्ट्रातील शहरी लोकसंखेचे प्रमाण
  • सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या किती आहे?
Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

मी नगरपरिषद परीक्षा विश्लेषण 2023 कोठे तपासू शकतो?

नगर परिषद परीक्षा विश्लेषण 2023 सविस्तर स्वरुपात या लेखात देण्यात आले आहे.

नगरपरिषद परीक्षा कधी घेण्यात येणार आहे?

नगरपरिषद परीक्षा 25 ऑक्टोबर 2023 पासून घेण्यात येणार आहे.

नगरपरिषद परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

नगरपरिषद परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.