Marathi govt jobs   »   Job Notification   »   महापारेषण भरती 2024

महापारेषण भरती 2024, एकूण 444 तंत्रज्ञ पदांसाठी अधिसूचना जाहीर

महापारेषण भरती 2024

महापारेषण भरती 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 444 पदांच्या भरतीसाठी महापारेषण भरती 2023 जाहीर झाली आहे. सदर भरती ही केवळ महापारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झाली आहे. महापारेषण भरती 2024 साठी इच्छुक आणि पात्र  उमेदवार 09 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आज या लेखात आपण महापारेषण भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती दिली आहे 

महापारेषण भरती 2024: विहंगावलोकन

वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 या पदांच्या भरतीसाठी महापारेषण भरती 2024 जाहीर झाली  आहे. महापारेषण भरती 2024 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महापारेषण भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कंपनीचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित  (MahaTransco)
भरतीचे नाव महापारेषण भरती 2024
पदांची नावे
  • वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
  • तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)
  • तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)
एकूण रिक्त पदे 444
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महापारेषण भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महापारेषण भरती 2024 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 31 जानेवारी 2024 सुरु झाली असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे महापारेषण भरती 2024 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

महापारेषण भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
महापारेषण भरती 2024 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 31 जानेवारी 2024
महापारेषण भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024
महापारेषण भरती 2024 साठी परीक्षेची तारीख (तात्पुरती) फेब्रुवारी/मार्च 2024

महापारेषण भरती 2024: अधिसुचना 

महापारेषण भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 444 पदांची भरती होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित तर्फे अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. महापारेषण भरती 2024 अंतर्गत पदानुसार अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महापारेषण भरती 2024: अधिसूचना
पदाचे नाव  अधिसूचना PDF
वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महापारेषण भरती 2024 मधील रिक्त पदांचा  तपशील

महापारेषण भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील 444 पदांची भरती होणार आहे. महापारेषण भरती 2024 मधील पदानुसार रिक्त पदाचा तपशील खाली देण्यात आला आहे.

महापारेषण भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 
पदाचे नाव रिक्त पदे
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 98
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 137
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 209
एकूण 444

महापारेषण भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष

महापारेषण भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याबाबत पदानुसार माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
महापारेषण भरती 2024: पात्रता निकष 
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
  • शिकाऊ उमेदवारी कायदा-1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
  • किंवा
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
  • सहाय्यक तंत्रज्ञ (सा) या पदाचा एकूण ०६ वर्षाचा अनुभव
  • किंवा
  • एकूण 04 वर्षे अनुभवापैकी तंत्रज्ञ-२ (पारेषण प्रणाली) या पदाचा 02 वर्षांचा अनुभव
  • किंवा
  • तंत्रज्ञ-1 (पारेषण प्रणाली) या पदाचा एकूण 02 वर्षाचा अनुभव
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)
  • शिकाऊ उमेदवारी कायदा-1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
  • किंवा
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
  • सहाय्यक तंत्रज्ञ (सा) या पदाचा एकूण 04 वर्षाचा अनुभव
  • किंवा
  • तंत्रज्ञ-२ (पारेषण प्रणाली) या पदाचा एकूण 02 वर्षाचा अनुभव
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)
  • शिकाऊ उमेदवारी कायदा-1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
  • किंवा
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
  • सहाय्यक तंत्रज्ञ (सा) या पदाचा एकूण 02 वर्षाचा अनुभव

महापारेषण भरती 2023 वेतनश्रेणी 

  • वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. 30810-1060-36110-1160- 47710-1265-88190 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
  • तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. 29935-155-34710-1060- 45310-1160-82430 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
  • तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. 29035-710-32585-955-42135- 1060-72875 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
  • मुळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागु राहतील.

महापारेषण भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

महापारेषण भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज 31 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहेत. अधिकृत अधिसूचनेत ऑनलाईन अर्जाचा कालावधी आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती दिली असेल. महापारेषण भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

महापारेषण भरती 2024 अर्ज लिंक

महापारेषण भरती 2024: निवड प्रक्रिया

महापारेषण भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरती साठी इच्छुक उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

महापारेषण भरती 2024: परीक्षेचे स्वरूप 

अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तूनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणीक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Apptitude) यावर आधारित राहील. ऑनलाईन परिक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील:-

महापारेषण भरती 2024: परीक्षेचे स्वरूप 
अ.क्र. विषय/उपविषय  प्रश्न  गुण  कालावधी 
1. वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान 50 110 120 मिनिटे
2. तर्कशक्ती 40 20
3. संख्यात्मक अभियोग्यता 20 10
4. मराठी 20 10
एकूण  130 150

उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती / दंड (Penalty) असेल. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकुण गुणांच्या 1/4 (0.25%) इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि, उमेदवाराने एखादया प्रश्नाचे उत्तर न दिल्यास / रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती / दंड (Penalty) लागणार नाही.

महापारेषण भरती 2024: परीक्षा शुल्क 

महापारेषण भरती 2024 परीक्षा शुल्क खालील तक्त्यात दिला आहे.

महापारेषण भरती 2024:परीक्षा शुल्क
पदाचे नाव खुला प्रवर्ग   इतर प्रवर्ग 
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 600 300
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 600 300
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 600 300

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

महापारेषण भरती 2024 बद्दल अपडेट मला कोठे मिळू शकेल?

महापारेषण भरती 2024 बद्दल वेळोवेळी अपडेट आपण या लेखात तपासू शकता.

महापारेषण भरती 2024 अंतर्गत किती पदांची भरती जाहीर झाली आहे?

महापारेषण भरती 2024 अंतर्गत एकूण 444 पदांची भरती जाहीर झाली आहे.

महापारेषण भरती 2024 भरती कधी जाहीर झाली?

महापारेषण भरती 2024 भरती 31 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.