Marathi govt jobs   »   Job Notification   »   पुणे महानगरपालिका भरती 2024

पुणे महानगरपालिका भरती 2024, 113 पदांसाठी अधिसुचना जाहीर

पुणे महानगरपालिका भरती 2024

पुणे महानगरपालिका भरती 2024: दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी पुणे महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दिनांक 16 जानेवारी 2024 ते 05 फेब्रुवारी 2024 या कालावधीत इच्छुक व पात्र उमेदवार पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करू शकतात. या लेखात आपण पुणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

पुणे महानगरपालिका भरती 2024: विहंगावलोकन

पुणे महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांची भरती होणार आहे. पुणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महानगरपालिकेचे नाव पुणे महानगरपालिका
भरतीचे नाव पुणे महानगरपालिका भरती 2024
पदाचे नाव कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
रिक्त पदांची संख्या 113
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे स्थान पुणे
अधिकृत संकेतस्थळ https://pmc.gov.in/

पुणे महानगरपालिका भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सविस्तर अधिसुचना जाहीर झाली असून रिक्त जागांबाबत माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव प्रवर्ग रिक्त पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) अजा 18
अज 14
विजा 02
भज(ब) 02
भज(क) 03
भज(ड) 02
विमाप्र 02
इमाव 25
इडब्ल्यूएस 15
अराखीव 30
एकूण 113

पुणे महानगरपालिका भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

पुणे महानगरपालिका भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

पुणे महानगरपालिका भरती 2024: महत्वाच्या तारखा
पुणे महानगरपालिका भरती 2024 वृत्तपत्रातील जाहिरात 09 जानेवारी 2024
पुणे महानगरपालिका भरती 2024 सविस्तर अधिसुचना 16 जानेवारी 2024
पुणे महानगरपालिका भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 16 जानेवारी 2024
पुणे महानगरपालिका भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

05 फेब्रुवारी 2024

पुणे महानगरपालिका भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष 

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी पात्रता निकष सविस्तरपणे खाली देण्यात आला आहे.

नागरिकत्व

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

शैक्षणिक अर्हता

  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य शाखेची पूर्णवेळ पदवी/ पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा

  • अराखीव प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल वय 38 वर्ष.
  • मागासवर्गीय/ अनाथ प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल वय 43 वर्ष.
  • दिव्यांग प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल वय 45 वर्ष.
  • अंशकालीन उमेदवार प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल वय 55 वर्ष.

पुणे महानगरपालिका भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

अ.क्र. विषय दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण वेळ
1. मराठी 12 वी मराठी/ इंग्रजी 15 30 2 तास
2. इंग्रजी 15 30
3. सामान्य ज्ञान 15 30
4. बौद्धिक चाचणी 15 30
5. अभियांत्रिकी विषयाशी संबंधित पदवी/पदविका परीक्षेच्या दर्जा सामान इंग्रजी 40 80

पुणे महानगरपालिका भरती 2024 अधिसुचना 

दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी पुणे महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पुणे महानगरपालिका भरती 2024 अधिसुचना डाउनलोड करू शकतात.

पुणे महानगरपालिका भरती 2024 अधिसुचना PDF

पुणे महानगरपालिका भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.

पुणे महानगरपालिका भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय)

पुणे महानगरपालिका भरती 2024: अर्ज शुल्क

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
अराखीव प्रवर्ग रु. 1000/-
इतर सर्व प्रवर्ग रु. 900/-

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

पुणे महानगरपालिका भरती 2024 कधी जाहीर झाली?

पुणे महानगरपालिका भरती 2024 09 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

पुणे महानगरपालिका भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

पुणे महानगरपालिका भरती 2024 कनिष्ठ अभियंता पदासाठी जाहीर झाली.

पुणे महानगरपालिका भरती 2024 किती पदासाठी जाहीर झाली?

पुणे महानगरपालिका भरती 2024 113 पदासाठी जाहीर झाली.