Marathi govt jobs   »   Job Notification   »   GMC नागपूर भरती 2024

GMC नागपूर भरती 2024, 680 पदांसाठी अर्ज करा

GMC नागपूर भरती 2024

GMC नागपूर भरती 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी  गट ड संवर्गातील एकूण 680 रिक्त पदे भरण्यासाठी GMC नागपूर भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 30 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण GMC नागपूर भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

GMC नागपूर भरती 2024: विहंगावलोकन 

GMC नागपूर भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

GMC नागपूर भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
भरतीचे नाव

GMC नागपूर भरती 2024

पदांची नावे गड ड मधील पदे
एकूण पदे 680
नोकरीचे ठिकाण नागपूर
अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org

GMC नागपूर भरती 2024: अधिसुचना 

GMC नागपूर भरती 2024 अंतर्गत गट ड या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

GMC नागपूर भरती 2024 अधिसुचना PDF

GMC नागपूर भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

GMC नागपूर भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. गट ड अनुसूचित जाती 100
अनुसूचित जमाती 54
विमुक्त जाती (अ) 31
भटक्या जाती (ब) 19
भटक्या जाती (क) 37
भटक्या जाती (ड) 19
विशेष मागास प्रवर्ग 19
इतर मागास प्रवर्ग 160
ईडब्ल्यूएस 73
अराखीव 168
एकूण 680

GMC नागपूर भरती 2024: पात्रता निकष

GMC नागपूर भरती 2024 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

  • भारतीय नागरिकत्व
  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 30/12/2023 असेल.
  • जाहिरातीत नमुद केलेल्या गट ड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष असावे व खुल्या प्रवर्गासाठी कमाल 38 वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापेक्षा) जास्त नसावे.
  • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्षा पर्यंत
  • पात्र खेळाडूंच्या बाबतीत 43 वर्षा पर्यंत
  • पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत 55 वर्षा पर्यंत
  • तथापी, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय स.न. वि. 2023/प्र.क्र. /14/ कार्य-92/दिनांक 03/03/2023 अन्वये दि.31/12/2023 पुर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्ष शिथीलता दिलेली असल्याने वर नमुद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्ष इतकी शिथीलता असेल.
  • शैक्षणिक अर्हता
GMC नागपूर भरती 2024: शैक्षणिक अर्हता
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
गट ड
  • 10वी उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

GMC नागपूर भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

GMC नागपूर भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

GMC नागपूर भरती 2024: महत्वाच्या तारखा
GMC नागपूर भरती 2024 अधिसूचना 26 डिसेंबर 2023
GMC नागपूर भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 30 डिसेंबर 2023
GMC नागपूर भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 जानेवारी 2024

GMC नागपूर भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

GMC नागपूर भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

  • सर्व पदांसाठी मराठी / इंग्रजी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चीत केलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल.
  • संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ते नुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण माध्यम दर्जा  कालावधी
1 मराठी भाषा 25 50 मराठी दहावी 2 तास
2 इंग्रजी भाषा 25 50 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान 25 50 मराठी व इंग्रजी
4 बुद्धीमापन चाचणी 25 50
एकूण 100 200      

सदर परिक्षा हि संगणक आधारीत (Computer Based Online Examination) घेण्यात येणार असुन प्रत्येक सत्राच्या प्रश्न पत्रीका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असुन एकापेक्षा जास्त सत्रात परिक्षा आयोजीत करण्यात येणार आहे. पहिले सत्र ते अंतिम सत्र या मधील प्रश्नपत्रीकेचे स्वरुप व त्याचीकाठीण्यता यांचे समाणीकरण करण्याचे (Normalisation) पध्दतीने गुणांक निश्चीत करुन निकाल जाहीर करण्यात येईल. सदर समाणीकरण (Normalisation) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहिल. याची सर्व परिक्षार्थीनी नोंद घ्यावी. सदर समाणीकरण (Normalisation) सुत्र माहितीसाठी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

GMC नागपूर भरती 2024 अभ्यासक्रम

अ.क्र.

घटक व उपघटक 

1. मराठी

  • सर्वसाधारण शब्दसंग्रह
  • वाक्यरचना 
  • व्याकरण 
  • म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग 
  • उताऱ्यावरील प्रश्न 
2. इंग्रजी

  • General Vocabulary 
  • Sentence Structure 
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension
3. सामान्य ज्ञान

  • चालू घडामोडी – महाराष्ट्रातील.
  • नागरीकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
  • इतिहास – महाराष्ट्राचा इतिहास
  • भूगोल – (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जनमनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नदया, उदयोगधंदे, इत्यादी.
  • अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उदयोग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व वेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी.
  • तसेच शासकीय अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  • सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), जिवशास्त्र (Biology),
4. बौद्धिक चाचणी

  •  बुध्दीमापन चाचणी- किती लवकर आणि अचूकपणे उमेदवार विचार करू शकतो
  • अंकगणित आधारीत प्रश्न

GMC नागपूर भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

GMC नागपूर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

GMC नागपूर भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय) 

GMC नागपूर भरती 2024: वेतनश्रेणी 

GMC नागपूर भरती 2024 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
गट ड S-1 :15000-47600

GMC नागपूर भरती 2024: अर्ज शुल्क

GMC नागपूर भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

GMC नागपूर भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SSC GD भरती 2023  SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

GMC नागपूर भरती 2024 कधी जाहीर झाली?

GMC नागपूर भरती 2024 26 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

GMC नागपूर भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

GMC नागपूर भरती 2024 680 पदांसाठी जाहीर झाली.

GMC नागपूर भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

GMC नागपूर भरती 2024 680 पदासाठी जाहीर झाली.