Marathi govt jobs   »   Job Notification   »   महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024, 5347 पदांसाठी अर्ज करा.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: दि. 01 मार्च 2024 पासून विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी  विद्युत सहाय्यक संवर्गातील एकूण 5347 रिक्त पदे भरण्यासाठी महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: विहंगावलोकन 

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ
भरतीचे नाव महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024
पदांची नावे विद्युत सहाय्यक
एकूण पदे 5347
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: अधिसुचना 

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अंतर्गत  विद्युत सहाय्यक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसुचना PDF

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. विद्युत सहाय्यक अनुसूचित जाती 673
अनुसूचित जमाती 491
विमुक्त जाती (अ) 150
भटक्या जाती (ब) 145
भटक्या जाती (क) 196
भटक्या जाती (ड) 108
विशेष मागास प्रवर्ग 108
इतर मागास प्रवर्ग 895
ईडब्ल्यूएस 500
अराखीव 2081
एकूण 5347

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: पात्रता निकष

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 29/12/2023 असेल.

  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 17 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
  • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षाची राहील.
  • महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचा-यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.
  • तदर्थ मंडल/तथा म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण/महानिर्मिती/महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षण कालावधी एवढी कमाल वयोमर्यादा शिथिलक्षम राहील.
  • खेळाडूंसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत 05 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील.
  • महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र. सनिव-2023/प्र.क्र.14/कार्या-12, दिनांक 03 मार्च, 2023 अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेत 02 वर्षे इतको शिथिलता देण्यात येत आहे.
  • “अनाथ” आरक्षणाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमर्यादा 05 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरीता पात्र ठरत असल्यास पात्र सवलतीपैकी अधिकत्तम वयाची सवलत अनुज्ञेय राहील.
  • परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर, मागासवर्गीय उमेदवारांसाठी विहित केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक अटी/ निकषांसंदर्भात कोणतीही सूट/सवलत घेतली असल्यास अशा उमेदवाराचा अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही.
  • वयोमर्यादेकरीता एस.एस.सी. प्रमाणपत्रावर दर्शविलेली / नोंदविलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024
पदाचे नाव पात्रता निकष
विद्युत सहाय्यक शैक्षणिक अर्हता

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
  • आणि
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: महत्वाच्या तारखा
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसूचना 29 डिसेंबर 2023
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 01 मार्च 2024
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 मार्च 2024

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तूनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणीक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Apptitude) यावर आधारित राहील. ऑनलाईन परिक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील:-

महापारेषण भरती 2023: परीक्षेचे स्वरूप 
अ.क्र. विषय/उपविषय  प्रश्न  गुण  कालावधी 
1. वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान 50 110 120 मिनिटे
2. तर्कशक्ती 40 20
3. संख्यात्मक अभियोग्यता 20 10
4. मराठी 20 10
एकूण  130 150

उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती / दंड (Penalty) असेल. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकुण गुणांच्या 1/4 (0.25%) इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि, उमेदवाराने एखादया प्रश्नाचे उत्तर न दिल्यास / रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती / दंड (Penalty) लागणार नाही.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक लवकरच सक्रीय होईल.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: मानधन

  • विद्युत सहाय्यक या पदासाठी
    • प्रथम वर्ष – एकत्रित मानधन रुपये 15000/- दरमहा,
    • द्वितीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये 16000/- दरमहा आणि
    • तृतीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये 17000/- दरमहा एवढे राहील.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: अर्ज शुल्क

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 250 + GST
इतर सर्व प्रवर्ग रु. 125 + GST

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
GMC नागपूर भरती 2024 SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 सोलापूर महानगरपालिका भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 कधी जाहीर झाली?

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 विद्युत सहाय्यक पदासाठी जाहीर झाली.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 किती पदासाठी जाहीर झाली?

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 5347 पदासाठी जाहीर झाली.