Marathi govt jobs   »   Job Notification   »   सिडको भरती 2024

सिडको भरती 2024, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी अधिसुचना जाहीर

सिडको भरती 2024

सिडको भरती 2024: सिडकोतर्फे सहाय्यक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील 101 रिक्त पदे भरण्यासाठी सिडको भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 19 जानेवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण सिडको भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ ज्यात अधिसुचना, पात्रता निकष, वयोमर्यादा, रिक्त पदे यांचा समावेश आहे.

सिडको भरती 2024: विहंगावलोकन

सिडको भरती 2024 अंतर्गत एकूण 101 पदांची भरती होणार आहे. सिडको भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

सिडको भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महामंडळाचे नाव सिडको
भरतीचे नाव सिडको भरती 2024
पदाचे नाव सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
रिक्त पदांची संख्या 101
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ https://cidco.maharashtra.gov.in

सिडको भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

सिडको भरती 2024 अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील 101 रिक्त पदांची भरती होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात सिडको भरती 2024 रिक्त पदांचा तपशील तपासू शकतात.

सिडको भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  
अ.क्र. पदाचे नाव  प्रवर्ग पद संख्या 
1 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) अजा 13
अज 07
विजा 03
भज(ब) 03
भज(क) 04
भज(ड) 02
विमाप्र 02
इमाव 19
इडब्ल्यूएस 10
अराखीव 38
एकूण    101

सिडको भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

सिडको भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सिडको भरती 2024: महत्वाच्या तारखा
सिडको भरती 2024 अधिसूचना 19 जानेवारी 2024
सिडको भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 19 जानेवारी 2024
सिडको भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 फेब्रुवारी 2024

सिडको भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

सिडको भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष 

सिडको भरती 2024 ची पदानुसार पात्रता निकष खालील तक्त्यात दिला आहे.

सिडको भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष 
अ.क्र. पदाचे नाव  पात्रता निकष 
1 सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  • शैक्षणिक पात्रता
    • मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी
    • सॅप इआरपी (टीइआरपी-10) प्रमाणपत्र
  • वयोमर्यादा-
    • खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त असू नये.
    • मागासवर्गीय प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय 43 वर्षापेक्षा जास्त असू नये.

सिडको भरती 2024 अधिसुचना 

सिडकोने सहाय्यक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील एकूण 101 रिक्त पदे भरण्यासाठी सिडको भरती 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सिडको भरती 2024 ची अधिसुचना डाऊनलोड करू शकतात.

सिडको भरती 2024 अधिसुचना

सिडको भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

सिडकोने दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी सहाय्यक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील 101 रिक्त पदे भरण्यासाठी सिडको भरती 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सिडको भरती 2024 साठी अर्ज करू शकतात.

सिडको भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

सिडको भरती 2024: अर्ज शुल्क

सिडको भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सिडको भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क   जीएसटी
खुला प्रवर्ग रु. 1000 180/-
इतर सर्व प्रवर्ग रु. 900 162/-

टीप : माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट.

सिडको भरती 2024: परीक्षेचे स्वरूप

  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.
  • गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. विहित अर्हता/अटी/शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.

  • उमेदवारांच्या अंतिम निवडीकरीता 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा तसेच सॅप प्रमाणपत्राचे 10 गुण, असे एकूण 210 पैकी गुण गृहित धरले जातील.

  • एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दि.02.12.2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.

  • उमेदवाराकडे सॅप प्रमाणपत्र नसल्यास रुजू दिनांकापासून १ वर्षाच्या आत सॅप प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील. तथापि, काही उमेदवारांच्या बाबतीत (व्यवस्थापनाने मान्यता दिल्यास) सॅप प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी परिविक्षा कालावधीच्या अंतिम दिनांकापासून 06 महिन्यापर्यंत वाढवून देण्याची मुभा आहे, सदर वाढीव कालावधीमध्ये उमेदवारांनी सॅप प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील.
पदनाम विषय प्रश्न  गुण माध्यम वेळ
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) इंग्रजी 30 30 मराठी 2 तास
सामान्यज्ञान 30 30 इंग्रजी
आकलन क्षमता 30 30 मराठी व इंग्रजी
व्यावसायिक ज्ञान 110 110
एकूण 200 200

सिडको भरती 2024: वेतनश्रेणी 

सिडको भरती 2024 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) S-15 :41800-132300

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सिडको भरती 2024 कधी जाहीर झाली?

सिडको भरती 2024 19 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

सिडको भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

सिडको भरती 2024 101 पदांसाठी जाहीर झाली.

सिडको भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

सिडको भरती 2024 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी जाहीर झाली?