Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज संख्या

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज संख्या, जिल्ह्यानुसार अर्ज संख्या तपासा

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज संख्या

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज संख्या: महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी अर्ज करताना कोणत्या जिल्ह्यासाठी किती अर्ज आले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. आत्तापर्यंत विविध जिल्ह्यांतील एकूण 17641 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 15 एप्रिल 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज संख्या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन 

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

पदाचे नावे
  • पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई चालक
  • कारागृह शिपाई
  • सशस्त्र पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई बँड्समन
रिक्त पदे 17641
एकूण अर्ज संख्या 17,76,000
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (हिंगोली)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (SRPF कुसडगाव, दौंड कॅम्प)

गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय शुद्धिपत्रक

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज संख्या

महाराष्ट्र गृह विभागाअंतर्गत 17641 पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु आहे. 15 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज प्रक्रिया समाप्त झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी एकूण 17,76,000 उमेदवारांनी अर्ज केला आहे. म्हणजेच एका जागेसाठी तब्बल 102 अर्ज आलेले आहेत.  उमेदवार खालील तक्त्यात महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज संख्या जिल्ह्यानुसार पाहू शकतात.

शहर अर्ज संख्या शहर अर्ज संख्या
C.P मुंबई 1,80,000 सातारा जिल्हा पोलीस 8841
नवी मुंबई 9041 सांगली जिल्हा पोलीस 4417
ठाणे शहर पोलीस 20,987 सोलापूर ग्रामीण पोलीस 4012
C.P मीरा-भाईंदर वसई विरार 7987 सोलापूर शहर 4154
S.P ठाणे ग्रामीण 7097 एस पी बुलढाणा जिल्हा पोलीस 6012
S.P सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस 5950 एस पी अकोला जिल्हा पोलीस 9012
S.P रत्नागिरी पोलीस 7547 अमरावती ग्रामीण पोलीस 7123
एस पी रायगड जिल्हा पोलीस 9970 एस पी यवतमाळ जिल्हा पोलीस 4979
C.P पिंपरी चिंचवड 9680 S.P वाशिम जिल्हा पोलीस 5415
पुणे ग्रामीण 19,741 C.P नागपूर शहर 7412
एस पी नागपूर ग्रामीण 5187 जालना जिल्हा पोलीस 3521
भंडारा जिल्हा पोलीस 3898 परभणी जिल्हा पोलीस 3031
चंद्रपूर जिल्हा पोलीस 3912 लातूर जिल्हा पोलीस 2964
वर्धा जिल्हा पोलीस 3381 SRPF गट 1 पुणे 8000
गोंदिया जिल्हा पोलीस 3496 गट 4 नागपूर 14000
C.P छत्रपती संभाजीनगर पोलीस 5947 गट -10 8000
S.P छत्रपती संभाजीनगर पोलीस 4978 गट -12 11000
नांदेड जिल्हा पोलीस 4987 गट -2 13000
धाराशिव जिल्हा पोलीस 4874 गट -3 14000
बीड जिल्हा पोलीस 3912 ठाणे ग्रामीण ड्रायव्हर पोलीस 3140
पुणे ग्रामीण पोलीस ड्रायव्हर 3158 C.P ठाणे रेल्वे ड्रायव्हर 689
पुणे शहर पोलीस ड्रायव्हर 6000 S.P सातारा ड्रायव्हर 1380
मुंबई ड्रायव्हर 50000 C.P मुंबई रेल्वे ड्रायव्हर 890
कोल्हापूर ड्रायव्हर 2500 S.P धाराशिव ड्रायव्हर 1254
लातूर ड्रायव्हर 2500 S.P बीड ड्रायव्हर 1124
C.P पुणे रेल्वे ड्रायव्हर 784 S.P जालना ड्रायव्हर 1074

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 पुढील टप्पा

आगामी लोकसभा निवडणुकांमुळे पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी 20 मे नंतर होणार असल्याचे समजत आहे. तसेच राज्यात उन्हामुळे प्रचंड तापमान असल्याने सदर मैदानी चाचणी सकाळी 6 ते 10 या वेळेतच घेण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यात परीक्षा एकाच आयोजित करण्यात येणार असून 30 ऑगस्ट 2024 च्या आगोदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आयोजन गृह विभागाचे आहे. उमेदवार त्यासंबंधीची सविस्तर बातमी खाली पाहू शकतात.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज संख्या, जिल्ह्यानुसार अर्ज संख्या तपासा_3.1

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पोलीस भरती जयहिंद बॅच
पोलीस भरती जयहिंद बॅच

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी जाहीर झाली

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.