Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   महाराष्ट्र पोलीस पात्रता निकष 2024

महाराष्ट्र पोलीस पात्रता निकष 2024, शैक्षणिक, शारीरिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासा

महाराष्ट्र पोलीस पात्रता निकष 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याआधी तुम्हाला पोलीस शिपाई पदासाठी पात्रता निकष माहित असणे आवश्यक आहे.  आत्तापर्यंत विविध जिल्ह्यांतील एकूण 14294 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे, उर्वरित जिल्ह्यांची अधिसुचना लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस पात्रता निकष 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन 

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

पदाचे नावे
  • पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई चालक
  • कारागृह शिपाई
रिक्त पदे 14294
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसूचना 01 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 05 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 मार्च 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: पात्रता निकष

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी पात्रता निकष खाली देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

  • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, 1965 (1965 चा कायदा 41) अंतर्गत विभागीय मंडळाद्वारे आयोजित HSC (वर्ग 12 वी) उत्तीर्ण किंवा मंडळाद्वारे मान्यताप्राप्त त्याच्या समकक्ष.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले आणि प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेले किंवा विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाने दिलेली पदवी आणि समतुल्य.
  • ज्यांनी 15 वर्षे लष्करी सेवा पूर्ण केली आहे त्यांच्या बाबतीत, त्यांनी इयत्ता 10 वी नागरी परीक्षा किंवा IASC (भारतीय लष्कराचे विशेष शिक्षण प्रमाणपत्र) उत्तीर्ण केलेले असावे.

शारीरिक पात्रता

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक आवश्यकता निकष: पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर या पदांसाठी शारीरिक आवश्यकता खाली नमूद केल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक आवश्यकता निकष
श्रेणी पुरुष महिला
उंची 165सेमी 158सेमी
छाती 79 सेमी पेक्षा कमी नसावी N/A

शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील एसटी उमेदवारांसाठी किंवा पोलीस वार्ताहर, पोलीस पाटील किंवा नक्षल हल्ल्यात किंवा नक्षलविरोधी कारवायांमध्ये शहीद झालेले किंवा गंभीर जखमी झालेले पोलीस कर्मचारी यांच्या मुलांपैकी असलेल्या उमेदवारांसाठी, शारीरिक आवश्यकता. खाली नमूद केल्याप्रमाणे शिथिल केले आहे.

  • उंची: पुरुष आणि महिला दोघांसाठी, 4सेमी शिथिल केले आहे.
  • छातीचे मोजमाप आवश्यक नाही.

 वयोमर्यादा

महाराष्ट्र पोलीस भरती वयोमर्यादा: महाराष्ट्र पोलीस भरती वयोमर्यादा 18-28 वर्षांच्या दरम्यान आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी ही किमान आणि कमाल वयोमर्यादा आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात काही सूट देण्यात आली आहे जी खाली नमूद केली आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: वयोमर्यादा
श्रेणी वयोमर्यादा
मागासवर्गीय/अनाथ उमेदवार/गृहरक्षक/पोलीस बालक/महिला आरक्षण 18-33 वर्षे
प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त 18-45 वर्षे
खेळाडू 18-38 वर्षे
माजी सैनिक सवलत सशस्त्र दलातील उमेदवाराच्या सेवेच्या कालावधीच्या बरोबरीने अधिक 3 वर्षे असेल.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024शी संबंधित इतर लेख

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी जाहीर झाली

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण ही आहे.