Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2024

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2024, लेखी परीक्षा, मैदानी चाचणीचे स्वरूप पहा

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. पोलीस भरतीसाठी तयारी करत असताना पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप माहित असणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत विविध जिल्ह्यांतील एकूण 17471 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे, उर्वरित जिल्ह्यांची अधिसुचना लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन 

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचे स्वरूप
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

पदाचे नावे
  • पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई चालक
  • कारागृह शिपाई
रिक्त पदे 14294
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (हिंगोली)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (SRPF कुसडगाव, दौंड कॅम्प)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. महाराष्ट्र पोलिस भरती 2024 अंतर्गत महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

पोलीस शिपाई पदासाठी

  1. मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी

पुरुष

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे 15 गुण
गोळाफेक 15 गुण
एकूण गुण 50 गुण

महिला

शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे 15 गुण
गोळाफेक 15 गुण
एकूण गुण 50 गुण

 

पोलीस शिपाई चालक पदासाठी

  1. मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी

पुरुष

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे 30 गुण
गोळाफेक 20 गुण
एकूण गुण 50 गुण

महिला

शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 30 गुण
गोळाफेक 20 गुण
एकूण गुण 50 गुण

वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी

कौशल्य गुण
हलके मोटार चालविण्याची चाचणी 25
जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25
एकूण गुण 50

नोट: शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1 : 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.

  1. लेखी परीक्षा
विषयाचे नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित एकूण 100 प्रश्न एकूण 100 गुण 90 मिनिट
बौद्धिक चाचणी
मराठी व्याकरण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसूचना 01 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 05 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 मार्च 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024शी संबंधित इतर लेख

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी जाहीर झाली

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण ही आहे.