SSC CHSL अधिसूचना 2023
SSC CHSL अधिसूचना 2023 जाहीर: कर्मचारी निवड आयोगाने संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (CHSL, 10+2) साठी 9 मे 2023 रोजी SSC CHSL 2023 अधिसूचना प्रकाशित केली आहे. कर्मचारी निवड आयोगाने सुधारित निवड प्रक्रिया आणि परीक्षेच्या तारखेसह सुमारे 1600 रिक्त पदांसाठी SSC CHSL 2023 अधिसूचना PDF जारी केली आहे. कर्मचारी निवड आयोग ही अग्रगण्य सरकारी संस्थांपैकी एक आहे जी देशाच्या सेवेसाठी उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी जबाबदार आहे. SSC दरवर्षी पदवीधर, 12वी उत्तीर्ण आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अनेक परीक्षा घेते. ज्या पदांसाठी SSC CHSL परीक्षा घेतली जाते त्यात लोअर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांचा समावेश आहे. या लेखात SSC CHSL अधिसूचना PDF, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, रिक्त पदे, निवड प्रक्रिया, आणि इतर महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
SSC CHSL अधिसूचना 2023 | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | कर्मचारी निवड आयोग (SSC) |
परीक्षेचे नाव | संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (CHSL, 10+2) 2023 |
पदांचे नाव | लोअर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर |
SSC CHSL 2023 टियर 1 परीक्षेची तारीख | 2 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 |
एकूण रिक्त पदे | 1600 |
आवेदन करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | www.ssc.nic.in |
SSC CHSL अधिसूचना 2023
SSC CHSL अधिसूचना 2023: कर्मचारी निवड आयोग किमान 10+2 उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांसाठी SSC CHSL 2023 च्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना PDF 9 मे 2023 रोजी जाहीर केले आहे. SSC दरवर्षी लोअर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर च्या भरतीसाठी मोठ्या संख्येने रिक्त जागा जारी करते.
SSC CHSL अधिसूचना 2023 PDF
SSC CHSL अधिसूचना 2023 PDF: SSC ही एक नामांकित संस्था आहे जी SSC उच्च माध्यमिक स्तर (CHSL, 10+2) परीक्षा उच्च माध्यमिक पात्रताधारक विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभाग आणि कार्यालयांमध्ये निवडण्यासाठी घेते. या भरतीद्वारे, पात्र उमेदवारांची विविध सरकारी विभाग, कार्यालये आणि मंत्रालयांमध्ये JSA, PA, LDC, DEO आणि SA सारख्या विविध पदांसाठी भरती केली जाते. उमेदवार SSC CHSL 2023 भरती अधिसूचना PDF खाली दिलेल्या लिंकवर क्लिक download करून करू शकतात
SSC CHSL अधिसूचना 2023 अधिकृत PDF

SSC CHSL 2023: महत्त्वाच्या तारखा
SSC CHSL 2023 महत्त्वाच्या तारखा: SSC CHSL 2023 परीक्षेचे वेळापत्रक SSC द्वारे त्याच्या अधिकृत SSC Calendar 2023 सोबत प्रकाशित केले आहे. SSC CHSL 2023 टियर 1 परीक्षेची ऑनलाइन परीक्षा 2 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 दरम्यान होणार आहे. कृपया SSC CHSL 2023 परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा.
SSC CHSL अधिसूचना 2023: महत्त्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
SSC CHSL अधिसूचना 2023 प्रकाशन तारीख | 9 मे 2023 |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 9 मे 2023 |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 8 जून 2023 |
SSC CHSL टियर-1 परीक्षेची तारीख | 2 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 |
SSC CHSL टियर-2 परीक्षेची तारीख | नंतर सूचित केले जाईल |
SSC CHSL पात्रता निकष
SSC CHSL पात्रता निकष: अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिसूचना PDF मध्ये SSC ने जारी केलेल्या तपशीलवार पात्रता निकषांमधून जाणे आवश्यक आहे. पात्रता पूर्ण करण्यासाठी वय आणि शैक्षणिक पात्रता ही महत्त्वाची बाब आहे ज्याची माहिती खाली देण्यात आली आहे.

SSC CHSL: शैक्षणिक पात्रता
उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करतो त्यानुसार शैक्षणिक पात्रता बदलते. अर्ज केलेल्या रिक्त पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
For LDC/ JSA, PA/ SA, DEO (except DEOs in C&AG): उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
For Data Entry Operator (DEO) in the Office of Comptroller and Auditor General of India (C&AG): मान्यताप्राप्त बोर्डातून गणित या विषयासह विज्ञान प्रवाहात 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.
SSC CHSL 2023: वयोमर्यादा
- उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे असावे.
- उमेदवाराचे कमाल वय 27 वर्षे असावे.
SSC CHSL 2023: अर्ज फी
- SSC CHSL साठी अर्ज करताना भरावे लागणारे अर्ज शुल्क रु. 100/-
- महिला, SC, ST, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि माजी सैनिक उमेदवारांना फी भरण्याची आवश्यकता नाही कारण त्यांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
SSC CHSL परीक्षेचे स्वरूप 2023
SSC CHSL ऑनलाइन अर्ज लिंक
SSC CHSL 2023 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 09 मे 2023 रोजी SSC CHSL अधिसूचना 2023 च्या प्रकाशनासह सुरू करण्यात आली होती. SSC CHSL 2023 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2023 आहे. SSC CHSL 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
SSC CHSL संबधी इतर लेख | |
SSC CHSL अधिसूचना 2023 अधिकृत PDF | SSC CHSL ऑनलाइन अर्ज 2023 लिंक |
SSC CHSL 2023 ची परीक्षा मराठीमध्ये होणार | SSC CHSL परीक्षेचे स्वरूप |
SSC CHSL मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका |
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
