Marathi govt jobs   »   Job Notification   »   महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024, 468 पदांसाठी अर्ज करा.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: दि. 01 मार्च 2024 पासून कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी  कनिष्ठ सहाय्यक (लेखा) संवर्गातील एकूण 468 रिक्त पदे भरण्यासाठी महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: विहंगावलोकन 

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ
भरतीचे नाव महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024
पदांची नावे कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
एकूण पदे 468
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: अधिसुचना 

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 अधिसुचना PDF

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. कनिष्ठ सहाय्यक (लेखा) अनुसूचित जाती 72
अनुसूचित जमाती 47
विमुक्त जाती (अ) 14
भटक्या जाती (ब) 07
भटक्या जाती (क) 18
भटक्या जाती (ड) 17
विशेष मागास प्रवर्ग 04
इतर मागास प्रवर्ग 116
ईडब्ल्यूएस 71
अराखीव 102
एकूण 468

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: पात्रता निकष

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 29/12/2023 असेल.

  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 17 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
  • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षाची राहील.
  • खेळाडूंसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत 05 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील.
  • महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र. सनिव-2023/प्र.क्र.14/कार्या-12, दिनांक 03 मार्च, 2023 अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेत 02 वर्षे इतको शिथिलता देण्यात येत आहे.
  • “अनाथ” आरक्षणाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमर्यादा 05 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरीता पात्र ठरत असल्यास पात्र सवलतीपैकी अधिकत्तम वयाची सवलत अनुज्ञेय राहील.
  • परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर, मागासवर्गीय उमेदवारांसाठी विहित केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक अटी/ निकषांसंदर्भात कोणतीही सूट/सवलत घेतली असल्यास अशा उमेदवाराचा अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही.
  • वयोमर्यादेकरीता एस.एस.सी. प्रमाणपत्रावर दर्शविलेली / नोंदविलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल.
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024
पदाचे नाव पात्रता निकष
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) शैक्षणिक अर्हता

  • B.Com/ BMS/ BBA MSCIT किंवा समतुल्य.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: महत्वाच्या तारखा
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 अधिसूचना 29 डिसेंबर 2023
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 01 मार्च 2024
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 मार्च 2024

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तूनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणीक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Apptitude) यावर आधारित राहील. ऑनलाईन परिक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील:-

महावितरण भरती 2023: परीक्षेचे स्वरूप 
अ.क्र. विषय/उपविषय  प्रश्न  गुण  कालावधी 
1. व्यवसायातील विषयाचे ज्ञान 50 110 120 मिनिटे
2. तर्कशक्ती 40 20
3. संख्यात्मक अभियोग्यता 20 10
4. मराठी 20 10
एकूण  130 150

उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती / दंड (Penalty) असेल. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकुण गुणांच्या 1/4 (0.25%) इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि, उमेदवाराने एखादया प्रश्नाचे उत्तर न दिल्यास / रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती / दंड (Penalty) लागणार नाही.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक लवकरच सक्रीय होईल.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: मानधन

  • कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदासाठी
    • प्रथम वर्ष – एकत्रित मानधन रुपये 19000/- दरमहा,
    • द्वितीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये 20000/- दरमहा आणि
    • तृतीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये 21000/- दरमहा एवढे राहील.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: अर्ज शुल्क

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 500 + GST
इतर सर्व प्रवर्ग रु. 250 + GST

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
GMC नागपूर भरती 2024 SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 सोलापूर महानगरपालिका भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 कधी जाहीर झाली?

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 विद्युत सहाय्यक पदासाठी जाहीर झाली.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 किती पदासाठी जाहीर झाली?

महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 468 पदासाठी जाहीर झाली.