Marathi govt jobs   »   Study Materials   »   उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

उभयान्वयी अव्यय 

उभयान्वयी अव्यय  : दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्‍या अविकारी शब्दाला अभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात. समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये. असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये.

Title 

Link  Link 

महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना

अँप लिंक वेब लिंक 

उभयान्वयी अव्यय : विहंगावलोकन 

उभयान्वयी अव्यय : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महानगरपालिका भरती परीक्षा 2024 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव उभयान्वयी अव्यय
लेखातील प्रमुख मुद्दे
  • उभयान्वयी अव्यय या बद्दल सविस्तर माहिती.

उभयान्वयी अव्यये

उभयान्वयी अव्यये: दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्‍या अविकारी शब्दाला अभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात.

समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये.
असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये: यांचे पुढील 4 प्रकार पडतात.

1. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय: दोन प्रधान किंवा मुख्य वाक्ये व, अन्, शिवाय यांसारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडून त्याचा मिलाफ किंवा समुच्चय करतात अशा उभयान्वयी अव्ययांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा व, आणि

2. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय: जेव्हा वाक्यांना जोडणारी अथवा, वा, की, किंवा, ही उभयान्वयी अव्यये दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एकाची अपेक्षा दर्शवितात म्हणजेच हे किंवा ते किंवा त्यापैकी एक असा अर्थ सूचित करतात अशा अव्ययांना विकल्प बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. की, किवा, अगर

3. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय: जेव्हा दोन वाक्यांना जोडणारी पण, परंतु, परी, बाकी, ही अव्यये पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव, कमी, दोष असल्याचा आशय किंवा भाव व्यक्त करतात अशा अव्ययांना न्यूनत्व बोधक उभयन्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. परंतु, पण, बाकी, किंतु

4. परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय: जेव्हा दोन वाक्यांना जोडणार्‍या उभयान्वयी अव्ययामुळे घडलेल्या एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यावर झाल्याचा बोध होत असेल तर अशी वाक्य जोडणार्‍या अव्ययांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, याकरिता, सबब

असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये: यांचे पुढील 4 प्रकार पडतात.

1. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय: उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्ये करतो त्या अव्ययास स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, म्हणजे, की

2. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय: जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे हे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतु दर्शविला जातो तेव्हा त्यास उद्देश बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, सबब, यास्तव

3. करणबोधक उभयान्वयी अव्यय: जेव्हा कारण, व, का, की या अव्ययांमुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अव्ययांना कारण बोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात. उदा. कारण, का, की इत्यादी.

4. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय:  जेव्हा मुख्य गौण वाक्ये जर-तर किंवा जरी-तरी या उभयान्वयी अव्ययामुळे जोडली जाऊन तायातून संकेत व्यक्त होत असेल त्या अव्यवयांना संकेत बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. जर-तर.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

अव्यय चे किती प्रकार पडतात?

अव्यय चे 4 प्रकार पडतात.