Table of Contents
शब्दयोगी अव्यये
शब्दयोगी अव्यये: वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्या शब्दांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात.
Title |
Link | Link |
महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना |
अँप लिंक | वेब लिंक |
‘काम’शब्दाला ‘मुळें’ लागण्यापूर्वो ‘काम’चे ‘कामा’ हे सामान्यरूप होते. शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीं आधीच्या शब्दाचे सामान्यरूप करावें लागते.
आणखी उदाहरणे :-
- सायंकाळी मुले घराकडे गेली. घरा हे सामान्यरूप, कडे हे शब्दयोगी अव्यय.
- शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.
आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. शाळे (सारू), समोर (श.अ) गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते. फळ्या
शब्दयोगी अव्ययें मुख्यत: नामाला किंवा नामाचें कार्य करणाऱ्या शब्दाला जोडली जातात. पण कधी कधी तीं क्रियापदें व क्रियाविशेषणें यांनासुद्धां लागतात..
- शब्दयोगी अव्यय शब्दाला लागल्यावर बनलेला जोडशब्द त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो.
- शब्दयोगी अव्यय हे अ-व्यय असल्याने त्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.
- शब्दयोगी अव्यय शब्दाला लागताना, त्या शब्दाचे सामान्य रूप होते.
शब्दयोगी अव्यय प्रकार
- कालवाचक – पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत.
- स्थलवाचक – आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक.
- करणवाचक – मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती
- हेतुवाचक – साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव
- व्यक्तिरेखा वाचक – शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता
- तुलनावाचक – पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस
- योग्यतावाचक – योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम
- कैवल्यवाचक – मात्र, ना, पण, फक्त, केवळ
- संग्रहवाचक – सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त
- संबंधवाचक – विषयी, विशी, विषयी
- साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत
- भागवाचक – पैकी, पोटी, आतून
- विनिमयवाचक – बद्दल, ऐवजी, जागी, बदली
- दिकवाचक – प्रत, प्रति, कडे, लागी
- विरोधावाचक – विरुद्ध, वीण, उलटे, उलट
- परिणाम वाचक – भर
अधिक सरावासाठी महत्वाचे प्रश्न – उत्तरे
Q1. ‘आमच्या घरासमोर एक वडाचे झाड आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
(a) आमच्या
(b) घरासमोर
(c) वडाचे
(d) समोर
S1. Ans. (d)
Sol.
‘आमच्या घरासमोर एक वडाचे झाड आहे.’ या वाक्यात ‘समोर’ हे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आले आहे.
Q2. ‘प्रति, कडे’ कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत ?
(a) परिणामवाचक
(b) विरोधवाचक
(c) दिक् वाचक
(d) संबधवाचक
S2. Ans. (c)
Sol.
‘प्रति, कडे’ शब्दयोगी अव्ययाचे दिक् वाचक (समोरची दिशा ) प्रकार आहे.
Q3. i) त्याच्या घरावर टिन आहेत.
- ii) तो लिफ्टने वर गेला.
अ) विधान i शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे.
ब) विधान i क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे.
क) विधान ii क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे.
ड) विधान ii शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे.
(a) फक्त ब व क बरोबर
(b) फक्त अ व ड बरोबर
(c) फक्त अ व क बरोबर
(d) फक्त ब व ड बरोबर
S3. Ans. (c)
Sol.
i)त्याच्या घरावर टिन आहेत – हे वाक्य शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे.
ii)तो लिफ्टने वर गेला – हे वाक्यक्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे.
Q4.’वाढदिवसा प्रीत्यर्थ अनेक-अनेक शुभेच्छा.’ हे वाक्य शब्दयोगी अव्ययाच्या कोणत्या प्रकारात येते?
(a) हेतुवाचक
(b) व्यतिरेकवाचक
(c) तुलनावाचक
(d) योग्यतावाचक
S4. Ans. (a)
Sol.
‘वाढदिवसा प्रीत्यर्थ अनेक-अनेक शुभेच्छा.’ हे वाक्य शब्दयोगी अव्ययाच्या हेतुवाचक प्रकारात येते.
Q5. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘सुंठीवाचून खोकला गेला. ‘
(a) तुलना वाचक
(b) व्यतिरेक वाचक
(c) योग्यतावाचक
(d) हेतुवाचक
S5. Ans. (b)
Sol.
‘सुंठीवाचून खोकला गेला. ‘ – व्यतिरेक वाचक
Q6. ‘माझ्यापाशी दहा रूपये आहे.’ हायलाईट शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा.
(a) हेतुवाचक
(b) करणवाचक
(c) कालवाचक
(d) स्थलवाचक
S6. Ans. (d)
Sol.
‘माझ्यापाशी दहा रूपये आहे.’ हायलाईट शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार स्थलवाचक हा आहे.
Q7. पासून व पलीकडे या शब्दयोगी अवयांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला आहे?
(a) पंचमी व सप्तमी
(b) द्वितीया, चतुर्थी व पंचमी
(c) तृतीया व षष्ठी
(d) संबोधन व द्वितीया
S7. Ans.(a)
Sol. पासून – पंचमी
पलीकडे – सप्तमी
Q8. ‘शंभरातून एखादाच चांगला.’ ठळक शब्दाच्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा.
(a) भागवाचक
(b) दिक्वाचक
(c) संबंध वाचक
(d) विनीमयवाचक
S8. Ans. (a)
Sol.
‘शंभरातून एखादाच चांगला.’ ठळक शब्द भागवाचक शब्दयोगी अव्यय प्रकारातील आहे.
Q9. शब्दयोगी अव्यये खालीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात?
(a) नाम
(b) क्रियापद
(c) क्रियाविशेषण
(d) वरील सर्व
S9. Ans. (d)
Sol.
शब्दयोगी अव्यये खालीलपैकी नाम, क्रियापद, क्रियाविशेषण (नामाचे कार्य करणाऱ्या)या सर्व शब्दजातीला जोडून येतात म्हणून उत्तर पर्याय क्रं. d वरील सर्व.
Q10. शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्ती प्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात.
उत्तराचा योग्य पर्याय सांगा.
(a) हे संपूर्ण विधान चूक आहे
(b) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
(c) विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे
(d) हे संपूर्ण विधान बरोबर आहे
S10. Ans (b)
Sol. शब्दयोगी अव्ययांना स्वत:चे अर्थ असतात त्यामुळे ते वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात.विभक्ती प्रत्ययाला स्वतःचा अर्थ नसतो त्यामुळे ते वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकत नाहीत.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.