Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023

वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023, 11 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या वनरक्षक परीक्षेचे विश्लेषण, शिफ्ट 1

वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023

वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023: वन विभागाने TCS मार्फत 11 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्या शिफ्ट मध्ये वनरक्षक पदाची परीक्षा यशस्वीरीत्या घेतली. त्याचप्रमाणे 11 ऑगस्ट 2023 रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये वनरक्षक पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. या दोन्ही शिफ्टचे विश्लेषण आम्ही लवकरच उपलब्ध करून देऊ. ते विश्लेषण पाहण्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा. वनरक्षक परीक्षेच्या गेलेल्या उमेदवारांच्या मिळालेल्या प्रतिसादानुसार परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात आपण वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात पाहणार आहोत. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

इतर वन विभाग परीक्षा विश्लेषण
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (वनरक्षक) 10 ऑगस्ट 2023
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (वनरक्षक) 08 ऑगस्ट 2023 वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (वनरक्षक) 09 ऑगस्ट 2023
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (वनरक्षक) 07 ऑगस्ट 2023 वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (वनरक्षक) 04 ऑगस्ट 2023
वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (वनरक्षक) 03 ऑगस्ट 2023 वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (वनरक्षक) 02 ऑगस्ट 2023
वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023, (कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक), 01 ऑगस्ट 2023, शिफ्ट 1)
वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (लेखापाल) 01 ऑगस्ट 2023, शिफ्ट 2  
वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (सर्वेक्षक) 31 जुलै 2023, शिफ्ट 1 वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (लेखापाल) 31 जुलै 2023, शिफ्ट 2

वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

वनरक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचरण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. वनरक्षक  पदाच्या वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव वन विभाग भरती 2023
लेखाचे नाव वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023
पदाचे नाव

वनरक्षक

वनरक्षक परीक्षेची तारीख 2023 02 ते 11 ऑगस्ट 2023
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
परीक्षेचा कालावधी 02 तास
एकूण गुण 120
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वनरक्षक परीक्षेचे स्वरूप 2023 (वनरक्षक)

वनरक्षक भरती परीक्षा 2023 अंतर्गत वनरक्षक पदाची परीक्षा एकूण 120 गुणांची होती. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 60 प्रश्न विचारण्यात आले होते. वनरक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 15 30 02 तास (120 मिनिटे)
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बौद्धिक चाचणी 15 30
एकूण 60 120  

वनरक्षक परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

वनरक्षक पदाची परीक्षा 2023 ही 02 ऑगस्ट 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेतल्या जाणार आहे. वनरक्षक पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.

शिफ्ट परीक्षेची वेळ
शिफ्ट 1 सकाळी 08.30 ते 10.30
शिफ्ट 2 दुपारी 12.30 ते 02.30
शिफ्ट 3 संध्याकाळी 04.30 ते 06.30

वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)

वनरक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 12-13 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 12-13 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान  12-13 सोपी ते मध्यम
4 बौद्धिक चाचणी 13-14 सोपी ते मध्यम
एकूण 49-53 सोपी ते मध्यम

विषयानुरूप वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)

वनरक्षक पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 15 याप्रमाणे 60 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांची विषयानुसार वनरक्षक परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

वनरक्षक पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने विशेषण, काळ, प्रयोग, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
विशेषण 01
समानार्थी शब्द 01
विरुद्धार्थी शब्द 02
प्रयोग 01
म्हणीवाक्प्रचार 03
शुद्ध अशुद्ध शब्द 01
इतर विविध टॉपिक 06
एकूण 15

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

वनरक्षक परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Part of Speech, Article, Para Jumble, Error detection, आणि One Word Substitution यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Part of Speech 01
Fill in the Blank 04
Article 01
Para Jumble 01
Synonyms 01
Antonyms 01
Idioms and Phrases 02
Tense 01
Miscellaneous Topics 03
Total 15

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

वनरक्षक पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
इतिहास 02
भूगोल 01
राज्यघटना 02
चालू घडामोडी 02
स्टॅटिक जी.के 04
इतर विविध टॉपिक 04
एकूण 15

वनरक्षक शिफ्ट 1 मधील सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

  • भारतीय असंतोषाचे जनक कोण आहे?
  • मौसमी वारे कोणत्या दिशेकडून वाहतात?
  • गोपीनाथ बारदोली विमानतळ कोठे आहे?
  • 1857 मध्ये भारताचा व्हाईसरॉय कोण होता?
  • कोणत्या नदीच्या मुखाशी नैसर्गिकरित्या खनिज आढळतात?
  • कोकण किनारपट्टी भारताच्या कोणत्या दिशेला आहे?
  • कलमांवर दोन प्रश्न होते.

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

वनरक्षक भरती परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने कोडी, अक्षरमाला, नातेसंबंध, आणि समसंबंध या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

विषय प्रश्न संख्या
अंकमलिका 02
सांकेतिक भाषा 02
अक्षरमाला 03
अंकमालिका 02
दिशा 01
नातेसंबंध 01
आरशातील प्रतिमा 01
बैठक व्यवस्था 02
इतर विविध टॉपिक 01
एकूण 15
Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Test Mate
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

वन विभाग परीक्षा 2023 अंतर्गत कोणत्या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे?

वन विभाग परीक्षा 2023 अंतर्गत वनरक्षक पदाची परीक्षा 02 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

11 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 मी कोठे पाहू शकतो?

11 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 या लेखात दिले आहे.

वनरक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

वनरक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

वन विभाग परीक्षा 2023 मधील वनरक्षक पदाच्या शिफ्ट 1 च्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट किती आहे?

वन विभाग परीक्षा 2023 मधील वनरक्षक पदाच्या पहिल्या शिफ्ट साठी गुड अटेम्प्ट 48-52 आहेत.