Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय | Supreme Court : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

सर्वोच्च न्यायालय | Supreme Court

कलम 124(1) अन्वये, भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल, ज्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील. घटनेने अन्य न्यायाधीशांची संख्या किती असावी हे ठरविण्याचा अधिकार संसदेला दिला आहे.

Title 

Link  Link 

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना 

Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan

अँप लिंक वेब लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

अँप लिंक वेब लिंक

सर्वोच्च न्यायालय- सरन्यायाधीशांची आणि न्यायाधीशांची  नेमणूक

Supreme Court: Appointments and Qualifications of Judges, Independence of SC: सर्वोच्च न्यायालयाच्या जेष्ठतम न्यायाधीशाची नेमणूक सरन्यायाधीश म्हणून करण्याचा संकेत पाळला जातो. सर्वोच्च न्यायालयातील(Supreme Court) प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक(Appointments) राष्ट्रपती करतात:

  • राष्ट्रपतींमार्फत सरन्यायाधीशाची नेमणूक त्यांना आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार घेऊन केली जाते.
  • राष्ट्रपतींमार्फत अन्य न्यायाधीशांची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश तसेच त्यांना आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार घेऊन केली जाते.
  • सरन्यायाधीश वगळता अन्य सर्व न्यायाधीशांची नेमणूक करतांना सरन्यायाधीशाचा विचार घेणे, हे राष्ट्रपतींवर बंधनकारक असते.

सर्वोच्च न्यायालय- न्यायाधीशांसाठी पात्रता आणि शपथ किंवा प्रतिज्ञा

Supreme Court: Appointments and Qualifications of Judges, Independence of SC: न्यायाधीशपदावर नेमल्या जाणाऱ्या  व्यक्तीसाठी घटनेत पुढील पात्रता(Qualifications) सांगण्यात आल्या आहेत:

  • ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी, आणि
  • त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयांत सलग किमान 5 वर्षे न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असावा, किंवा
  • त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयांत सलग किमान 10 वर्षे वकील म्हणून काम करण्याचा अनुभव असावा, किंवा
  • राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असावी.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीस आपले पदग्रहण करण्यापूर्वी शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. ही शपथ राष्ट्रपतींमार्फत किंवा त्यांनी त्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या व्यक्तीमार्फत दिली जाते.

सर्वोच्च न्यायालय- न्यायाधीशांचा पदावधी

Supreme Court: Appointments and Qualifications of Judges, Independence of SC: घटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा पदावधी निश्चित केलेला नाही. मात्र, त्याबद्दल पुढील तीन तरतुदी केल्या आहेत:

  • न्यायाधीश आपले पद वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात.
  • न्यायाधीश राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात.
  • राष्ट्रपती न्यायाधीशास त्याच्या पदावरून संसदेच्या शिफारशीनुसार दूर करू शकतात.

सर्वोच्च न्यायालय- हंगामी सरन्यायाधीशाची नेमणूक

Supreme Court: Appointments and Qualifications of Judges, Independence of SC: घटनेच्या कलम 126 अन्वये, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशाची नेमणूक(Appointments) हंगामी सरन्यायाधीश म्हणून करू शकतात. जेव्हा,

  • भारताच्या सरन्यायाधीशाचे पद रिक्त असेल, किंवा
  • भारताचे सरन्यायाधीश तात्पुरत्या कारणामुळे अनुपस्थित असतील, किंवा
  • भारताचे सरन्यायाधीश आपल्या पदाच्या कर्तव्यांचे पालन करण्यास असमर्थ असतील, तेव्हा

सर्वोच्च न्यायालय- तदर्थ/ तात्पुरत्या सरन्यायाधीशाची नेमणूक

Supreme Court: Appointments and Qualifications of Judges, Independence of SC: घटनेच्या कलम 127 अन्वये  सर्वोच्च न्यायालयात तदर्थ / तात्पुरत्या (ad hoc) न्यायाधीशाच्या नेमणुकीची तरतूद आहे. जर एखाद्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे एखादे सत्र (session) भरण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी लागणाऱ्या गणसंख्येइतके न्यायाधीश उपलब्ध नसतील तर, भारताचे सरन्यायाधीश एखाद्या उच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशास तात्पुरत्या काळासाठी सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीश म्हणून नेमू शकतात. अशी नेमणूक करण्याशी संबंधित बाबी पुढीलप्रमाणे:

  • भारताचे सरन्यायाधीश तदर्थ न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने आणि संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा विचार घेतल्यानंतरच करू शकतात.
  • असा न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्याच्या दृष्टीने पात्रता धारण करणारा असावा.
  • तदर्थ न्यायाधीश म्हणून कार्य करेपर्यंत त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे सर्व अधिकारक्षेत्र, अधिकार व विशेषाधिकार प्राप्त होतात.

सर्वोच्च न्यायालय- निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती

Supreme Court: Appointments and Qualifications of Judges, Independence of SC: कलम 128 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकींमध्ये निवृत्त न्यायाधिशांच्या उपस्थितीबाबत तरतुदी आहेत. त्या पुढीलप्रमाणे:

  • कोणत्याही वेळी भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या निवृत्त न्यायाधीशास किंवा उच्च न्यायालयाच्या एखाद्या निवृत्त न्यायाधीशास सर्वोच्च न्यायालयात तात्पुरते न्यायाधीश म्हणून कार्य करण्यासाठी विनंती करू शकतात.
  • अशी विनंती करण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपतींची पूर्वसंमती तसेच  त्या व्यक्तीचीही पूर्व संमती घेणे आवश्यक असेल.
  • असे कार्य करणारी व्यक्ती राष्ट्रपतींनी निर्धारित केलेले भत्ते (allowances) मिळण्यास पात्र असेल.
  • तसेच, अशा व्यक्तीस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सर्व अधिकारक्षेत्र अधिकार व विशेषाधिकार प्राप्त होतील, मात्र एरव्ही ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असल्याचे मानले जाणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य

Supreme Court: Appointments and Qualifications of Judges, Independence of SC: भारताच्या संघराज्य पद्धती घटनेच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून घटनेत विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत.

नेमणुकीची पद्धत: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते. राष्ट्रपती मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कार्य करतात. मात्र, घटनेमध्ये अशा नेमणूका करतांना राष्ट्रपतींवर सर्वोच्च व उच्च न्यायालयांतील त्यांना आवश्यक वाढतील एवढ्या न्यायाधीशांचा विचार घेण्याचे बंधन टाकले आहे. अशा रीतीने, न्यायाधीशांच्या नेमणुकांवरील सरकारचा पूर्णाधिकार कमी करण्यात आला असून त्यातील राजकीय हस्तक्षेप नष्ट करण्यात आला आहे.

पदावधीची सुरक्षा: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावधीची सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्यांची नेमणूक जरी राष्ट्रपतींमार्फत होत असली तरी, ते राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करीत नाही. त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत घटनेत दिलेली आहे, जी एक अवघड प्रक्रिया आहे.

निश्चित सेवाशर्ती: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पगार, भत्ते, विशेषाधिकार, रजा आणि पेन्शन संसदीय कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित केले जातात. न्यायाधीशाच्या नेमणुकीनंतर वरील बाबींमध्ये त्यांना नुकसानकारक होईल असा बदल (वित्तीय आणीबाणीचा कालावधी वगळता) करता येत नाही. अशा रीतीने, त्यांच्या सेवाशर्ती त्यांच्या पदावधी दरम्यान कायम राहतात.

संचित निधीवर प्रभारित: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सर्व अधिकारी/सेवकांचे पगार, भत्ते व पेन्शन, यांबरोबरच सर्वोच्च न्यायालयाचा सर्व प्रशासकीय खर्च, हा भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतो. म्हणजेच, त्यावर संसदेत चर्चा होऊ शकते, मात्र मतदान होत नाही.

संसदेतील चर्चेवर निर्बंध: कलम 121 अंन्वये, घटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणुकीबाबत संसदेत किंवा राज्य विधीमंडळांमध्ये कोणतीही चर्चा करण्यावर प्रतिबंध घातले आहेत. (अशी चर्चा केवळ त्यांना पदावरून दूर करतेवेळी केली जाऊ शकते.)

निवृत्तीनंतर वकिली करण्यावर बंदी: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास निवृत्तीनंतर भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही प्राधिकाऱ्यासमोर वकिली करण्यास बंदी घालण्यात आली आहे. न्यायाधीशांनी नि:स्पृहपणे काम करावे यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार: कलम 129 अन्वये, सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या अवमानाबद्दल कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, कोणीही सर्वोच्च न्यायालयाच्या कृती व निर्णयांवर टिका करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा प्राधिकार व सन्मान राखण्यासाठी हा अधिकार देण्यात आला आहे.

आपल्या स्टाफची नेमणूक करण्याचे स्वातंत्र्य: भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांची व सेवकांची नेमणूक कार्यकारी मंडळाच्या कोणत्याही हस्तक्षेपाविना करू शकतात. ते त्यांच्या सेवाशर्तीसुद्धा निश्चित करू शकतात.

अधिकारक्षेत्र घटविता येत नाही: संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र व अधिकार घटविण्याचा अधिकार नाही. घटनेनेच सर्वोच्च न्यायालयाला विविध प्रकारची अधिकारक्षेत्रे प्रदान केलेली आहेत. संसद या अधिकारक्षेत्रात घट घडवून आणू शकत नाही, मात्र त्यात वाढ घडवून आणू शकते.

सर्वोच्च न्यायालय- न्यायाधीशांना पदावरून दूर करणे

Supreme Court: Appointments and Qualifications of Judges, Independence of SC: कलम 124(4) अन्वये राष्ट्रपतींच्या आदेशाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाला पदच्युत करता येते. न्यायाधीशाच्या निलंबनासाठी बोलावलेल्या अधिवेशनानंतर संसदेने असा प्रस्ताव राष्ट्रपतीला सादर केल्यास राष्ट्रपती पदच्युतीचा आदेश देऊ शकतात. संसदेच्या प्रत्येक सभागृहातील विशेष बहुमताने (म्हणजे त्या सभागृहातील एकूण सदस्यांपैकी 2/3 सदस्यांची उपस्थिती आणि प्रस्तावाच्यावेळी त्या सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांचे बहुमत) प्रस्तावाला पाठिंबा दिलेला असला पाहिजे. गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता सिद्ध झाली असेल तर या दोन आधारांवर न्यायाधीशाला पदच्युत करता येते.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या पदच्युतीची प्रक्रिया न्यायाधीश चौकशी कायद्याने (1968) नियंत्रित केलेली आहे. ती पुढीलप्रमाणे:

  • पदच्युती प्रस्तावावर लोकसभेतील 100 सदस्यांनी किंवा राज्यसभेतील 50 सदस्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर तो प्रस्ताव सभापती/अध्यक्ष यांना सादर केला जातो.
  • सभापती/अध्यक्ष हा प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात.
  • सभापती/अध्यक्षाने प्रस्ताव स्वीकारला तर न्यायाधीशांवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ते तीन सदस्यीय समिती नियुक्त करतात.
  • या समितीमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश असतो: i) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा एक न्यायाधीश, ii) एखाद्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, आणि iii) एक निष्णात कायदेपंडीत
  • जर समितीच्या चौकशीमध्ये न्यायाधीश गैरवर्तणूक किंवा अक्षमतेच्या कारणावरून दोषी असल्याचे आढळले, तर सभागृह त्यांना पदावरून दूर करण्यासाठीचा प्रस्ताव विचारात घेऊ शकते.
  • संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने प्रस्ताव मंजूर केला तर तो पदच्युतींचा प्रस्ताव राष्ट्रपतींना सादर केला जातो.
  • अंतिमतः न्यायाधीशाला पदमुक्त करण्याचा आदेश राष्ट्रपती देतात.

आतापर्यंतच्या घटना: आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या एकाही न्यायाधीशाला पदावरून दूर करण्यात आलेले नाही. मात्र, 1993 मध्ये न्या. व्हि. रामास्वामी यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. चौकशी समितीने त्यांना गैरवर्तणुकीच्या कारणासाठी (पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतांना) दोषी घोषित केले. मात्र, त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव लोकसभेत पारित होऊ शकला नाही.

  • सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश- न्यायमूर्ती हरिलाल कनिया
  • सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश – 2024 पर्यंत, भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेली एकही महिला नाही. सध्याचे आणि 50 वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड आहेत, ज्यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारला.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते?

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती नियुक्त करतात.

मला राज्यशास्त्रावरील माहिती कोठे मिळेल?

Adda247 मराठीच्या ॲप आणि वेबसाइटवर राज्यशास्त्र विषयाची माहिती मिळेल.

मला सर्वोच्च न्यायालयाची माहिती कोठे मिळेल?

Adda247 मराठीच्या ॲप आणि वेबसाइटवर सर्वोच्च न्यायालयाच्या विषयावर माहिती मिळेल.