Table of Contents
विषय निहाय MCQs चे महत्व :
महाराष्ट्रातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), पोलिस भरती 2024 व इतर अनेक स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी धोरणात्मक दृष्टिकोन आणि विविध विषयांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे उद्दिष्ट असलेल्या इच्छुकांनी भारतीय इतिहास, भारतीय भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, सामान्य विज्ञान, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घडामोडी, राज्य चालू घडामोडी तसेच लॉजिकल रिझनिंग आणि अंकगणित यासह विविध विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
या लेखात, आम्ही मराठीमध्ये या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश असलेल्या बहु-निवडक प्रश्नांचा (MCQs) काळजीपूर्वक तयार केलेला संग्रह सादर केला आहे. हे MCQs महाराष्ट्र परीक्षा पॅटर्नशी त्यांची प्रासंगिकता आणि उमेदवारांच्या ज्ञानाचे सर्वसमावेशक मूल्यांकन करण्याच्या त्यांच्या क्षमतेच्या आधारावर निवडले गेले आहेत. या प्रश्नांमध्ये गुंतून राहून, इच्छुक उमेदवार प्रत्येक विषयामधील त्यांची प्रवीणता मोजू शकतात आणि त्यांच्या तयारीच्या प्रवासात आणखी लक्ष देण्याची गरज असलेल्या क्षेत्रांना ओळखू शकतात.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये MCQs चे महत्त्व :
आपण आतापर्यंत जे काही शिकलो आहोत, त्याचे सर्वसमावेशक मूल्यमापन : MCQ विविध विषयांवर विविध प्रश्नांची श्रेणी देतात, जे तुमच्यासाठी उमेदवारांच्या विविध विषयांच्या आकलनाचे मूल्यांकन करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या प्रश्नांच्या सोडवण्याचा प्रयत्न करून, उमेदवार मूलभूत गोष्टींवरील त्यांचे आकलन मोजू शकतात.
प्रभावी पुनरावृत्ती साधन: कोणत्याही परीक्षेत तयारीच्या अंतिम टप्प्यात, MCQs हे पुनरावृत्तीचे प्रभावी साधन म्हणून काम करतात. हे इच्छुकांना मुख्य संकल्पना आणि सिद्धांतांचे संरचित पद्धतीने पुनरावलोकन करण्यास सक्षम करतात, ज्यामुळे उमेदवारांचे शिकणे आणि शिकलेल्या सामग्रीचे आकलन मजबूत होते आणि उमेदवारांना प्रश्न नमुना आणि वेळ व्यवस्थापन धोरणे समजून घेण्यास मदत होते.
महाराष्ट्रातील समाजसुधारक MCQs | Social reformer in Maharashtra MCQs : All Maharashtra Exams
Q1. शाहू महाराजांनी कोल्हापूरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या?
(a) अस्पृश्यता व जातीभेद निवारण
(b) बालविवाहास विरोध
(c) पडदा पद्धतीस विरोध
(d) सतीच्या चालीस बंदी
Q2. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?
(a) गुलामगिरी
(b) जातींचा उच्छेद
(c) शेतकऱ्यांचा आसूड
(d) ब्राह्मणांचे कसब
Q3. “भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न” हा ग्रंथ कोणी लिहिला ?
(a) डॉ. बी. आर. आंबेडकर
(b) महात्मा ज्योतिबा फुले
(c) वि.रा.शिंदे
(d) भास्करराव जाधव
Q4. ते लहूजींचे शिष्य होते.
लहूजींना त्यांचा अभिमान होता.
ते लहूजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालविणे इत्यादी शिकले.
त्यांचा कल समाजिक सुधारणांकडे होता.
ते कोण ?
(a) महात्मा ज्योतीबा फुले
(b) मेघाजी लोखंडे
(c) यशवंत फुले
(d) नारायण लोखंडे
Q5. खालील व्यक्तींपैकी कोणी फर्ग्यूसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते?
(1) बी.जी. टिळक
(2) जी. के. गोखले
(3) धों. के. कर्वे
पर्याय :
(a) (1), (2) फक्त
(b) (1), (3) फक्त
(c) (2), (3) फक्त
(d) (1), (2), (3)
Solutions
S1. Ans (a)
Sol.शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश शाहूंनी कोल्हापूर संस्थानात काढला होता. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली होती.
S2. Ans (b)
Sol. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड , ब्राह्मणांचे कसब ही पुस्तके महात्मा फुलेंनी लिहिली आहेत. तर
जातींचा उच्छेद हे पुस्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे.
S3. Ans (c)
Sol. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ वि.रा.शिंदे यांनी लिहिला आहे .
त्यांची अजून काही पुस्तके- 1) Untouchable of India
2) माझ्या आठवणी व अनुभव
3) कानडी – मराठी संबंध
4) मराठ्यांची पूर्वपीठिका
5) भागवत धर्माचा विकास
6) History of Parihars
S4. Ans (a)
Sol. वरील वर्णन महात्मा ज्योतीबा फुले यांचे आहे.
S5. Ans (d)
Sol. बी.जी. टिळक, जी. के. गोखले, धों. के. कर्वे या सर्वांनी फर्ग्यूसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.