Marathi govt jobs   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024   »   मराठी व्याकरण - विभक्ती,वाक्याचे प्रकार व...

मराठी व्याकरण – विभक्ती,वाक्याचे प्रकार व शब्दसिद्धी | Maharashtra Karagruh Bharti Exam : Last Minute Revision

विभक्ती

विभक्ती: नामे सर्वनाम यांचा क्रियापदाशी व इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

नामाचा क्रियापदाशी किवा इतर शब्दांशी असणारा संबंध एकूण आठ प्रकारचा असतो म्हणून विभक्तीचे आठ प्रकार मानले जातात तर कार्यकार्थ एकूण सहा मानले जातात. कार्यकार्थात षष्टी व संबोधन यांचा समावेश होत नाही.

विभक्ती प्रत्ययाचा तक्ता
विभक्ती विभक्तीचे प्रत्यय कारकार्थ
एकवचन अनेकवचन
प्रथमा कर्ता
व्दितीया स, ला, ते स, ला, ना, ते कर्म
तृतीय ने, ए, शी नी, शी, ई, ही करण (साधन)
चतुर्थी स, ला, ते स, ला, ना, ते संप्रदान (दान/भेट)
पंचमी ऊन, हुन ऊन, हुन अपादान (दुरावा/वियोग)
षष्टी चा, ची, चे, च्या चा, ची, चे, च्या संबंध
सप्तमी त, ई, आ त, ई, आ अधिकरण (स्थळ/वेळ)
संबोधन नो हाक

वाक्य व त्याचे प्रकार

वाक्याचे प्रकार: मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

  • अर्थावरून पडणारे प्रकार
  • स्वरूपावरुण पडणारे प्रकार

अर्थावरून पडणारे प्रकार:

विधांनार्थी वाक्य: ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. श्यामआंबा खातो.

प्रश्नार्थी वाक्य: ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोन आहे हा?

उद्गारार्थी वाक्य:  ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. अबब ! केवढा मोठा हा साप

होकारार्थी वाक्य:  ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात . उदा. मी गाणे गातो.

नकारार्थी वाक्य: ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी क्रिकेट खेळत नाही.

स्वार्थी वाक्य: ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. त्याने चित्र लिहिले.

आज्ञार्थी वाक्य: ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. सर्वांनी शांत बसावे.

विधार्थी वाक्य: जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.  उदा. विद्यार्थ्याने नियमित अभ्यास करावा.

संकेतार्थी वाक्य: जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.

स्वरूपावरुण पडणारे प्रकार 

केवल वाक्य: ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. राम आंबा खातो.

संयुक्त वाक्य: जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.

मिश्र वाक्य: जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. तो आजारी असल्यामुळे आज आला नाही.

शब्दसिद्धी

सिद्ध शब्दांचे प्रकार  

सिद्ध शब्दांचे चार प्रकार पडतात

  • तत्सम शब्द – जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना ‘तत्सम शब्द’ असे म्हणतात. उदाहरणार्थ कवि, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, इत्यादी
  • तद्भव शब्द – जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना ‘ तद्भव शब्द’ असे म्हणतात. उदाहरणार्थ कान, चाक, आग, पान, इत्यादी
  • देशी किंवा देशज शब्द – महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना ‘देशी शब्द’ असे म्हणतात. उदाहरणार्थ झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, इत्यादी.
  • परभाषीय शब्द – संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ‘परभाषीय शब्द’ असे म्हणतात. याचे दोन उपप्रकार पडतात.

अ. परकीय किंवा विदेशी शब्द

इंग्रजी शब्द –  टेबल, पेपर, मार्क, मोटर, कडक्टर, स्टेशन, पोस्ट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पैंट, बटन, बट, बॉल, ड्रेस, ग्लास इत्यादी.

पोर्तुगीज शब्द – बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, कोबी, हापूस, फणस इत्यादी.

फारसी शब्द – खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडणवीस इत्यादी.

अरबी शब्द – अर्ज, इनाम, हुकूम, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, वाद, मदत, बदल इत्यादी

ब. स्वदेशी शब्द ( परप्रांतीय भारतीय शब्द )

कानडी शब्द – तूप, कुंची, हंडा, भांडे, अक्का, गाजर, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ इत्यादी

गुजराती शब्द – घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा इत्यादी

तामिळी शब्द – चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा इत्यादी

तेलगु शब्द – ताळा, शिकेकाई, अनरसा, किडूकमिडूक, बंडी, डबी इत्यादी

हिंदी शब्द – भाई, बेटा, बच्चा, मिलाप, दाम, करोड, बात, दिल, तपास, और, नानी, मंजूर, इमली इत्यादी

शब्दसिद्धी: साधित शब्द

साधित शब्द: सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून ‘साधित शब्द’ तयार होतो. कर यासारख्या सिद्ध धातूपासून करू, करून, कर्ता, करणारा, होकार, प्रतिकार, यासारखे शब्द बनवितात त्यांना साधित शब्द असे म्हणतात.

शब्दसिद्धी: साधित शब्दांचे प्रकार

साधित शब्दांचे पुढील चार प्रकार पडतात.

  • उपसर्गघटित शब्द: मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवितात. या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना ‘उपसर्ग घटित शब्द’ असे म्हणतात. उदा.  आ + हार = आहार, याचप्रमाणे विहार, परिहार इत्यादी
  • प्रत्ययघटित शब्द: त्ययघटीत शब्द शब्दांच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्‍या शब्दांना ‘प्रत्ययघटित शब्द’ असे म्हणतात. उदा.  जनन, जनक, जननी, जनता, झोपाळू, ओढा
  • अभ्यस्त शब्द: एखाद्या शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना ‘अभ्यस्त शब्द’ असे म्हणतात. घरघर, हळूहळू, शेजारीपाजारी, दगडबीगड, यासारख्या शब्दात एकाच शब्दाचा किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती किंवा वित्व होऊन हे शब्द बनलेले असतात.
  • अनुकरणवाचक शब्द: ज्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. काही शब्दात एखाद्या ध्वनीवाचक शब्दाची पुनुरुक्ती साधलेली असते. उदाहरणार्थ बडबड, किरकिर, गुटगुटीत, कडकडाट, गडगडाट अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात.
  • सामासिक शब्द: जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्या शब्दाला ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात. उदा.  देवघर, पोळपाट इ.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

विभक्तीचे प्रकार किती ?

विभक्तीचे प्रकार 8 आहेत.

तद्भव शब्द म्हणजे काय?

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना ‘ तद्भव शब्द’ असे म्हणतात.

हापूस हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला?

हापूस हा शब्द मराठीत पोर्तुगीज भाषेतून आला आहे.