Marathi govt jobs   »   Result   »   IBPS PO निकाल 2023

IBPS PO निकाल 2023 जाहीर

IBPS PO निकाल 2023 

IBPS PO निकाल 2023: इंस्टीट्युट बँकिंग पर्सोनल सिलेक्शन(IBPS) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (@ibps.in) दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी IBPS PO निकाल 2023 जाहीर करणार आहे. जे IBPS PO प्रीलिम्स परीक्षेला बसले होते ते खाली दिलेल्या लिंकद्वारे त्यांचा IBPS PO प्रीलिम्स निकाल 2023 पाहू शकतात. IBPS PO प्रिलिम्स निकाल तपासण्यासाठी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक, रोल नंबर आणि पासवर्ड/DOB प्रविष्ट करणे आवश्यक आहे. जे उमेदवार IBPS PO प्रिलिम्स परीक्षेसाठी पात्र ठरतील त्यांना IBPS PO मुख्य परीक्षा 2023 ला बसण्याची संधी मिळेल. या लेखात आपण IBPS PO निकाल 2023 लिंक व डाउनलोड करण्याच्या स्टेप्स पाहणार आहोत.

IBPS PO निकाल 2023: विहंगावलोकन 

IBPS PO निकाल 2023: विहंगावलोकन 
श्रेणी निकाल
संस्थेचे नाव इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS)
पोस्टचे नाव प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO)
रिक्त पदांची संख्या 3849
लेखाचे नाव IBPS PO निकाल 2023 जाहीर
IBPS PO निकाल 2023 लिंक सक्रीय
IBPS PO प्रिलिम्स परीक्षा 2023 23, 30 सप्टेंबर 2023
IBPS PO निकाल 2023 18 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.ibps.in

IBPS PO निकाल 2023 डाउनलोड लिंक

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) च्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच www.ibps.in वर प्रिलिम्स परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार IBPS PO निकाल 2023 18 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केला आहे. जे उमेदवार त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते अधिकृत वेबसाइटवरून नोंदणीच्या वेळी तयार केलेल्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून भरती प्रक्रियेची त्यांची पात्रता स्थिती तपासण्यास सक्षम आहेत. आम्ही खाली IBPS PO निकाल डाउनलोड लिंक नमूद केली आहे.

IBPS PO निकाल 2023 डाउनलोड लिंक

IBPS PO निकाल 2023 कसा तपासायचा?

उमेदवार खाली नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करून IBPS PO निकाल 2023 तपासू शकतात:

  1. IBPSच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या- ibps.in
  2. त्यानंतर “CRP-PO>>Common Recruitment Process for Probationary Officer” वर क्लिक करा.
  3. नंतर एक नवीन पृष्ठ प्रदर्शित होईल, त्यामध्ये “Click here to Check Qualifying Status for Interview for IBPS PO-XII” असे शोधा.
  4. आता तुमचा IBPS PO परीक्षा 2023 चा निकाल तपासण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि पासवर्ड/DOB भरा.
  5. नंतर कॅप्चा कोड सत्यापित करा आणि स्क्रीनवर IBPS PO स्कोअर कार्ड 2023 प्रदर्शित होईल.
  6. तुमचा IBPS PO प्रीलिम्स निकाल 2023 डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या.
Adda247 App
Adda247 App

IBPS PO निकाल 2023 वर उल्लेख केलेला तपशील

उमेदवारांनी IBPS PO पूर्व निकाल 2023 वर नमूद केलेले सर्व तपशील काळजीपूर्वक तपासले पाहिजेत. खाली आम्ही उमेदवारांनी तपासण्याची यादी देत आहोत.

  1. उमेदवाराचे नाव
  2. उमेदवाराचा रोल नंबर
  3. उमेदवाराचा नोंदणी क्रमांक
  4. परीक्षा/मुलाखतीची तारीख
  5. उमेदवाराची श्रेणी
  6. उमेदवाराने अर्ज केलेला राज्य
  7. विषयानुसार स्कोअर
  8. एकूण गुण मिळाले
  9. कट ऑफ स्कोअर
  10. पात्रता स्थिती इ.
Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

IBPS PO निकाल 2023 कधी जाहीर होणार आहे?

IBPS PO निकाल 2023 18 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर होणार आहे.

IBPS PO परीक्षा2023 कधी झाली?

IBPS PO परीक्षा 2023 23 व 30 सप्टेंबर 2023 रोजी झाली.

IBPS PO निकाल 2023 चे अपडेट मला कोठे मिळतील?

IBPS PO निकाल 2023 चे अपडेट या लेखात मिळतील.