Marathi govt jobs   »   Latest Post   »   IBPS Clerk 2021 Exam Pattern

IBPS Clerk 2021 परीक्षेचे स्वरूप: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचे स्वरूप | IBPS Clerk 2021 Exam Pattern: Prelims and Mains Exam Pattern

IBPS Clerk 2021 Exam Pattern: Prelims and Mains Exam Pattern: IBPS Clerk Exam Pattern उमेदवारांना आगामी IBPS Clerk परीक्षेसाठी चांगली तयारी करण्यास मदत करणार आहे. IBPS Clerk 2021 दरवर्षी Clerk पदासाठी पात्र उमेदवार निवडण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनद्वारे आयोजित केले जाते. IBPS Clerk 2021 या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी, Updated IBPS Clerk Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप) ज्ञान असणे आवश्यक आहे. तर चला या लेखात आपण पाहुयात IBPS Clerk 2021 Exam Pattern | IBPS Clerk 2021 परीक्षेचे स्वरूप.

IBPS Clerk 2021 Exam Pattern: Prelims and Mains Exam Pattern | IBPS Clerk 2021 परीक्षेचे स्वरूप: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचे स्वरूप 

IBPS Clerk Notification 2021 क्लेरिकल कॅडर पदासाठी 6 ऑक्टोबर 2021 रोजी अधिकृत वेबसाइट @ibps.in वर उपलब्ध झाली आहे. IBPS Clerk 2021 ची प्रतीक्षा करत असलेले बँकिंग इच्छुक आता तपशीलवार जाहिरात तपासू शकतात आणि अंतिम तारीख येण्यापूर्वी Online Apply (अर्ज) करू शकतात. यावर्षी 7855 रिक्त पदे जाहीर करण्यात आले असून एकूण 882 पदे महाराषट्रात रिक्त आहेत. महाराष्ट्रातील या रिक्त पदांसाठी Prelims आणि Mains परीक्षा आता English भाषेसोबत मराठी भाषेतही देता येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या वेळेचा सदुपयोग करावा आणि बँकिंग परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी IBPS Clerk 2021 परीक्षेचे स्वरूप: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचे स्वरूप | IBPS Clerk 2021 Exam Pattern: Prelims and Mains Exam Pattern पहावे.

IBPS Clerk 2021 अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

IBPS Clerk 2021 ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. ज्या खाली दिल्या प्रमाणे आहेत

  • Online Prelims Exam (प्राथमिक परीक्षा),
  • Online Mains Exam (मुख्य परीक्षा).

गुणवत्तेच्या यादीत आपले नाव मिळविण्यासाठी उमेदवाराने Prelims Exam आणि mains Exam या दोन्हींसाठी पात्र असणे आवश्यक आहे. Mains Exam नंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे पत्र दिले जाते.

IBPS Clerk 2021 Exam Pattern: Important Points | IBPS Clerk 2021 परीक्षेचे स्वरूप: महत्त्वाचे मुद्दे

IBPS Clerk 2021 Exam Pattern Important Points: IBPS Clerk Exam Pattern and Syllabus 2021 इतर कोणत्याही बँक परीक्षेप्रमाणेच आहे. मुख्य तीन विभाग ज्यावर उमेदवाराला IBPS Clerk 2021 Prelims Exam साठी पूर्ण तयारी करणे आवश्यक आहे,

  • Reasoning
  • Quantitative Aptitude
  • English Language

IBPS Clerk Exam 2021 च्या मुख्य परीक्षेत 4 विभाग असतात ज्यांचा खाली उल्लेख केला आहे:

  • Reasoning Ability & Computer Aptitude
  • Quantitative Aptitude
  • English Language
  • General/ Financial Awareness

IBPS Clerk 2021 ऑनलाईन अर्ज करा

IBPS Clerk Prelim Exam Pattern | IBPS Clerk प्रीलिम्स परीक्षेचा नमुना

IBPS Clerk Prelim Exam Pattern: हे लक्षात घ्याकी, IBPS Clerk Prelims परीक्षेच्या तीन विभागांपैकी प्रत्येक विभागात उमेदवारांना IBPS ने वैयक्तिकरित्या निश्चित केलेले किमान कट-ऑफ गुण मिळवून पात्र व्हावे लागेल. आवश्यकतेनुसार IBPS ने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक श्रेणीतील पुरेशा संख्येने उमेदवारांची ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाईल. टॅब्युलर स्वरूपात IBPS Clerk परीक्षेचा परीक्षा नमुना खाली दिला आहे:

विभाग/Sections

प्रश्नांची संख्या एकूण गुण

कालावधी

इंग्रजी भाषा (English Language)

30 30  20 मिनिटे

संख्यात्मक क्षमता (Numerical Ability)

35 35 20 मिनिटे
तर्क क्षमता (Reasoning Ability) 35 35

20 मिनिटे

एकूण/Total

100 100

60 मिनिटे/ 1 तास

IBPS Clerk मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका PDFs सोल्यूशनसह

IBPS Clerk Mains Exam Pattern | IBPS Clerk मुख्य परीक्षा पॅटर्न

IBPS Clerk Mains Exam Pattern: विभागीय, तसेच एकूण कट ऑफ क्लिअर करून IBPS Clerk Prelims मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना IBPS Mains परीक्षेसाठी बोलावले जाते, ही पात्रता तसेच IBPS Clerk भरतीची स्कोअरिंग परीक्षा दोन्ही आहे. उमेदवार खालील तक्त्यामध्ये IBPS Clerk Mains Exam Pattern तपासू शकतात:

विभाग

प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त गुण

विभागीय कालावधी

सामान्य/ आर्थिक जागरूकता (General/ Financial Awareness)

50 50 35 मिनिटे
सामान्य इंग्रजी (General English)

40

40

35 मिनिटे

तर्कक्षमता आणि संगणक अभियोग्यता (Reasoning Ability and Computer Aptitude)

50 60 45 मिनिटे
क्वांटिटेटिव्ह अँप्टिट्यूड (Quantitative Aptitude) 50 50

45 मिनिटे

एकूण/Total
190 200 160 मिनिटे

टीप – चुकीच्या उत्तरांसाठी नेगेटिव्ह मार्किंग (Prelims आणि Mains परीक्षा या दोन्हींसाठी लागू). प्रत्येक चुकीच्या उत्तराला त्या प्रश्नाला असलेल्या गुणांचे एक चतुर्थांश किंवा 0.25 गुण कापले जातील.एखादा प्रश्न कोरा राहिला तर, म्हणजे कोणतेही उत्तर उमेदवाराने चिन्हांकित केले नाही, तर त्या प्रश्नाचे कोणतेही गुण कमी केले जाणार नाही.

IBPS Clerk 2021 अभ्यासक्रम: Prelims आणि Mains परीक्षेचा विषय निहाय अभ्यासक्रम

IBPS Clerk Final Selection | IBPS Clerk अंतिम निवड

IBPS Clerk Final Selection: IBPS Clerk च्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश करण्यासाठी उमेदवारांना IBPS Clerk च्या दोन्ही स्तरांना म्हणजेच Prelims आणि Mains साठी पात्र ठरणे आवश्यक आहे. तथापि, Prelims Exam केवळ पात्रता स्वरूपाची आहे, म्हणजे उमेदवारांच्या अंतिम गुणवत्तेमध्ये प्रीलिम्स गुणांचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांची अंतिम निवड मुख्य परीक्षेतील उमेदवाराच्या गुणांवर अवलंबून असते. अंतिम यादीत उमेदवारांना 100 पैकी गुण काढले जाते आणि त्यांची अंतिम निवड केली जाते.

IBPS Clerk Apply Online 2021 IBPS Clerk Syllabus
IBPS Clerk 2021 Notification IBPS Clerk Salary
IBPS Clerk Previous Year Question Paper IBPS Clerk Previous Year cut off

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

IBPS Clerk Prelims 2021 Marathi & English Online Test Series
IBPS Clerk Prelims 2021 Marathi & English Online Test Series

Sharing is caring!