Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024

वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024, अधिकृत सूचना तपासा

वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024

वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024: नागपूर वनवृत्ताने दि 28 फेब्रुवारी 2024 रोजी धावचाचणी बाबत सुधारित जाहीर सूचना जारी केली आहे. 21 आणि 22 फेब्रुवारी 2024 आयोजित धावचाचणी मध्ये ज्या उमेदवारांच्या धावचाचणीवर विपरीत परिणाम झाला त्यांची धाव चाचणी पुन्हा आयोजित केली जाणार आहे. सदर धावचाचणी ही 04 मार्च 2024 रोजी घेण्यात येणार आहे याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. या लेखात वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024: विहंगावलोकन

नागपूर वनवृत्ताने दि 28 फेब्रुवारी 2024 रोजी धावचाचणी बाबत सुधारित जाहीर सूचना जारी केली आहे. वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

वन विभाग भरती 2023-24

लेखाचे नाव वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024
पदांची नावे
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • सर्व्हेअर
  • लेखापाल
  • वनरक्षक
एकूण रिक्त पदे

2417

अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024 अधिकृत सूचना PDF

दि 28 फेब्रुवारी 2024 रोजी नागपूर वनवृत्ताने धावचाचणी बाबत सुधारित जाहीर सूचना जारी केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अधिकृत सूचना pdf डाऊनलोड करू शकतात.

वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024 अधिकृत सूचना PDF

वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

1. दि.21.02.2024 व 22.02.2024 रोजीचे जे उमेदवार पुनःश्च धाव चाचणीत सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी दि.01.03.2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत recruitment2023.nagpurcircle@gmail.com या ई-मेलवर आपली सहमती नोंदविणे अनिवार्य राहील. त्यांचा सुधारीत धाव चाचणीचा कार्यक्रम दि.04.03.2024 रोजी घेण्यात येईल. दि.02.03.2024 व तदनंतर प्राप्त होणाऱ्या ई-मेल बाबत कुठलाही विचार केला जाणार नाही. धाव चाचणीस येतांना ऑनलाईन परिक्षेचे ओळखपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक राहील.

2. जे महिला/पुरुष उमेदवार सुधारीत धाव चाचणीत सहभागी होवुन धावचाचणी पुर्ण करतील त्यांचा सुधारीत धाव चाचणी पुर्ण केल्याचा वेळ अंतिम निकालासाठी ग्राहय धरण्यात येईल. (दि.21.02.24 व 22.02.24 या दिवशीचा धाव चाचणीच्या वेळेचा विचार केला जाणार नाही. अशा आशयाचे बंधपत्र देणे उमेदवाराला आवश्यक राहील)

3. जे उमेदवार या सुधारीत धाव चाचणीच्या कार्यक्रमास इच्छुक नाहीत, अशा उमेदवारांची दि.21.02.24 व 22.02.24 या दिवशीच्या धाव चाचणीची वेळ अंतिम निकालासाठी ग्राहय धरण्यात येईल.

4. दि.23.02.2024 ते 26.02.2024 या कालावधीत धाव चाचणीचा कार्यक्रम विहीत वेळेत पार पडला असल्याने सदर कालावधीतील महिला/पुरुष उमेदवारांना सुधारीत धाव चाचणी कार्यक्रमात भाग घेता येणार नाही.

5. दि.21.02.2024 ते 26.02.2024 या कालावधीत महिला/पुरुष उमेदवार धाव चाचणीकरीता गैरहजर होते, अशा उमेदवारांना सुधारीत धाव चाचणीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संधी देण्यात येत आहे. अशा गैरहजर उमेदवारांनी इच्छुक असल्यास दि.01.03.2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत recruitment2023.nagpurcircle@gmail.com या ई-मेलवर तसे कळविणे अनिवार्य आहे. दि.02.03.2024 व तदनंतर प्राप्त होणाऱ्या ई-मेल बाबत कुठलाही विचार केला जाणार नाही. त्यांचा सुधारित धाव चाचणीचा कार्यक्रम दि.04.03.2024 रोजी घेण्यात येईल. धाव चाचणीस येतांना ऑनलाईन परिक्षेचे ओळखपत्र तसेच विभागाने दिलेले पात्र प्रमाणपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक राहील.

6. जाहीरातीमध्ये नमुद केल्यानुसार उमेदवारांना धाव चाचणी करीता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.

7. उमेदवाराने ई-मेल करताना आपले नाव, गुणवत्ता क्रमांक, चेस्ट क्रमांक, FOG क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे.

8. जे उमेदवार recruitment2023.nagpurcircle@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधाणार नाहीत किंवा इच्छुक असल्याबाबत कळविणार नाही अशा उमेदवारांना वेळेवर धाव चाचणीत सहभागी करुन घेतले जाणार नाही.

9. जे उमेदवार मिहान सेझ, परिसर वर्धा रोड, नागपूर येथे सुरु असलेल्या धाव चाचणीत ई-मेल न करता उपस्थित होतील अशा उमेदवारांची नोंद घेतल्या जाणार नाही.

धाव चाचणीसाठी उपस्थित राहण्याचा पत्ता

सुधारीत धाव चाचणीचा कार्यक्रम मिहान सेझ परिसर, वर्धा रोड, नागपूर येथे घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024 कधी जाहीर झाले?

वनरक्षक धाव चाचणी सुधारित वेळापत्रक 2024 28 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाले.

वनरक्षक धाव चाचणी कधी होणार आहे?

वनरक्षक धाव चाचणी 04 मार्च 2024 रोजी होणार आहे.