Table of Contents
तलाठी भरती नियुक्ती कधी होणार ?
तलाठी भरती नियुक्ती: प्राप्त माहितीनुसार लोकसभा निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे तलाठी पदाच्या नियुक्त्या जून 2024 नंतरच देण्यात येणार आहे. महसूल विभागाने दि. 14 मार्च 2024 पासून सर्व जिल्ह्यांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. व कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पण पूर्ण झाली आहे. तलाठी परीक्षा परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. या लेखात तलाठी भरती नियुक्ती बद्दल सविस्तर माहिती तपासा.
तलाठी भरती 2023-24: विहंगावलोकन
तलाठी भरती सुधारित निवड यादी दि. 14 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
तलाठी भरती 2023 निकाल जाहीर: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | तलाठी भरती सुधारित निवड यादी 2024 जाहीर |
पदाचे नाव | तलाठी |
एकूण पदे | |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 | 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी भरती 2023 निकाल लिंक | सक्रिय |
तलाठी भरती सुधारित निवड यादी 2024 जाहीर | 14 मार्च 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabhumi.gov.in/mahabhumi |
तलाठी भरती नियुक्तीसंदर्भातील बातमी
तलाठी भरती 2023-24 अंतर्गत 4793 पदांसाठी भरती जाहीर झाली होती. या भरतीप्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम अद्याप बाकी आहे. परंतु आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया जून 2024 नंतर होणार असल्याचे समजत आहे. उमेदवार तलाठी भरती नियुक्तीसंदर्भातील बातमी खाली पाहू शकतात.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.