Marathi govt jobs   »   RRB ALP भरती 2024   »   RRB ALP पात्रता निकष 2024,

RRB ALP पात्रता निकष 2024, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तपासा

RRB ALP भरती 2024: रेल्वे भरती बोर्डाने (RRB) सहाय्यक लोको पायलट पदासाठी RRB ALP भरती 2024 अधिसूचना जारी केली आहे. उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे, कारण यावेळी, RRB ने एकूण 5696 ALP पदांच्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. RRB ALP भरती 2024 चे पात्रता निकष जाणून घेणे उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ITI/डिप्लोमा/अभियांत्रिकी पदवी असलेले उमेदवार या साठी अर्ज करू शकतात. या लेखात RRB ALP पात्रता निकष 2024 बद्दल सविस्तर माहिती तपासा.

RRB ALP भरती 2024: विहंगावलोकन

RRB असिस्टंट लोको पायलट भरती 2024 द्वारे, बोर्ड CBT I, CBT II, CBAT, आणि कागदपत्र पडताळणी यांसारख्या निवड टप्प्यांद्वारे पात्र उमेदवारांची नियुक्ती करणार आहे. ज्यांची निवड होईल त्यांना प्रारंभिक पगार रु. 19,900 प्रति महिना मिळेल. स्वारस्य असलेले RRB ALP 2024 साठी 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. येथे विहंगावलोकन पहा.

RRB ALP भरती 2024 : विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संघटना रेल्वे भरती बोर्ड
भरतीचे नाव RRB ALP भरती 2024
पदाचे नाव असिस्टंट लोको पायलट
पदसंख्या 5696
अधिकृत संकेतस्थळ https://indianrailways.gov.in/

RRB ALP भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

RRB ALP भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

RRB ALP भरती 2024: महत्वाच्या तारखा
RRB ALP भरती 2024 अधिसूचना 18 जानेवारी 2024
RRB ALP भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 20 जानेवारी 2024
RRB ALP भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

19 फेब्रुवारी 2024

RRB ALP भरती 2024 परीक्षेची तारीख जून/ऑगस्ट 2024

RRB ALP भरती 2024 पात्रता निकष 

अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे RRB ALP भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष खाली तपशीलवार दिले आहेत.
RRB ALP भरती 2024: नागरिकत्व
उमेदवार खालील पैकी कोणत्याही एका देशाचा नागरिक असावा:
1. भारताचा नागरिक
2. नेपाळचा नागरिक
3. भूतानचा नागरिक
4. 01.01.1962 पूर्वी भारतात आलेला तिबेटी निर्वासित,
RRB ALP भरती 2024 वयोमर्यादा (01/07/2024)
किमान वय कमाल वय
18 वर्ष 30 वर्ष

RRB ALP शैक्षणिक अर्हता

पदाचे नाव  शैक्षणिक अर्हता
असिस्टंट लोको पायलट
  • मॅट्रिक / NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त संस्थांमधून आर्मेचर आणि कॉइल वाइंडर / इलेक्ट्रीशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर व्हेईकल / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक टीव्ही / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर / वायरमन या ट्रेड मध्ये SSLC, ITI उत्तीर्ण केलेला उमेदवार
  • किंवा
  • मॅट्रिक / एसएसएलसी, वर नमूद केलेल्या ट्रेडमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेला शिकाऊ उमेदवार
  • किंवा
  • मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असलेला उमेदवार
  • किंवा
  • ITI ऐवजी मान्यताप्राप्त संस्थेतील या अभियांत्रिकी शाखेच्या विविध प्रवाहांचे संयोजन केलेला उमेदवार वर नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखेतील पदवी असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

RRB ALP भरती 2024 वैद्यकीय तंदुरुस्ती

  • अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या वैद्यकीय मानक A-1 सह फिट असले पाहिजेत. ALP पदासाठी अयोग्य किंवा
  • वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य आढळलेल्या उमेदवारांना पर्यायी नियुक्ती मिळणार नाही.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

RRB ALP भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

RRB ALP भरती 2024 5696 पदांसाठी जाहीर झाली

RRB ALP भरती 2024 कधी जाहीर झाली?

RRB ALP भरती 2024 18 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली