Marathi govt jobs   »   Study Materials   »   अक्षय उर्जा स्त्रोत(Renewable Energy Sources)

अक्षय उर्जा स्त्रोत(Renewable Energy Sources): जिल्हा परिषद परीक्षा 2023 साठी उपयुक्त अभ्यास साहित्य

अक्षय उर्जा स्त्रोत

अक्षय उर्जा स्त्रोत: उर्जा हा मानवी जीवनातील एक महत्वाचा घटक असून आज पर्यंत मानवाने जी प्रगती केली आहे त्यात उर्जेच्या शोधाचा खूप मोठा वाटा आहे. उर्जेचे विविध स्त्रोत हा घटक सामान्य विज्ञान या विषयात येतो. महाराष्ट्रातील आगामी काळातील  जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय आहे. अक्षय उर्जा स्त्रोत या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आज या लेखात आपण अक्षय उर्जा स्त्रोत कोणकोणते आहेत व त्यांचा वापर इ. बद्दल माहिती पाहणार आहोत.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अक्षय उर्जा स्त्रोत: विहंगावलोकन

अक्षय उर्जा स्त्रोत हा जिल्हा परिषद परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असून त्या बद्दल विहंगावलोकन खालील तक्त्यामध्ये दिले आहे.

अक्षय उर्जा स्त्रोत: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता जिल्हा परिषद भरती 2023 व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय सामान्य विज्ञान
लेखाचे नाव अक्षय उर्जा स्त्रोत
लेखात काय दिले आहे?
  • उर्जा स्त्रोत: वर्गीकरण
  • अक्षय उर्जा स्त्रोत: प्रकार
  • अक्षय उर्जा स्त्रोत: फायदे व मर्यादा

उर्जा स्त्रोत: वर्गीकरण  

उर्जेचा शोध हा मानवी इतिहासातील सर्वात महत्वाच्या शोधांपैकी एक आहे. प्राचीन काळापासून मानव निसर्गात मिळणाऱ्या वस्तूंचा उपयोग उर्जेची निर्मिती करण्यासाठी करत आलेला आहे. परंतु आधुनिक काळात मानवाच्या उर्जेची गरज भागवण्यासाठी पारंपारिक उर्जा स्त्रोतांबरोबर अक्षय उर्जा स्त्रोतांचा वापर करणे देखील गरजेचे झाले आहे. त्या अनुषंगाने उर्जेचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

  1. क्षय किंवा पारंपारिक उर्जा स्त्रोत:- क्षय किंवा पारंपारिक उर्जा स्त्रोत म्हणजे उर्जेचे असे स्त्रोत ज्यांची निर्मिती पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली होते. यांच्या निर्मिती मध्ये हजारो वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे हे क्षय पावण्याची किंवा संपण्याची भीती असते. उदा. पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, जीवाश्म इंधने, अणु उर्जा इ.
  2. अक्षय उर्जा स्त्रोत: अक्षय उर्जा स्त्रोत म्हणजे असे उर्जा स्त्रोत जे नव्याने निर्माण होत राहतात व ज्यांचा साठा कधीही संपत नाही. उदा. सौर उर्जा, पवन उर्जा, बायोगॅस, भूऔष्णिक उर्जा इ.
Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

अक्षय उर्जा स्त्रोत: प्रकार 

अक्षय उर्जा स्त्रोत हे आज अतिशय महत्वाचे आहेत. अक्षय उर्जा स्त्रोत म्हणजे असे स्त्रोत ज्यांची निर्मिती नव्याने होते. अक्षय उर्जा स्त्रोतांचे प्रकार खाली दिले आहेत.

सौर उर्जा :

सूर्य हा उर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. पृथ्वीच्या अस्तित्वापासून पृथ्वीला सूर्यापासून उर्जा मिळत. या प्रकारात आपण सौर पॅनेलचा वापर करून उर्जा मिळवू शकतो.

फायदे:-

  1. स्वच्छ व प्रदूषण विरहीत उर्जा मिळते
  2. वर्षातील सर्वकाळ उर्जा मिळते
  3. पुष्कळ उपलब्धता

मर्यादा:-

  1. ढगाळ वातारणात कमी प्रमाणात उर्जा मिळते
  2. प्राथमिक गुंतवणूक जास्त
अक्षय उर्जा स्त्रोत(Renewable Energy Sources)_4.1
सौर उर्जा

पवन उर्जा:

पवन उर्जा हा एक उत्तम स्त्रोत आहे. जगभरातील देशांमध्ये पावन उर्जेचा वापर करून उर्जेची निर्मिती केली जाते. जिथे वाहणाऱ्या वाऱ्याची उपलब्धता आहे, त्या प्रदेशात पवन चक्क्या बसवून वाऱ्यापासून उर्जा निर्माण केली जाते.

फायदे:-

  1. स्वच्छ व प्रदूषण विरहीत उर्जा मिळते
  2. मोठ्या प्रमाणावर उर्जेचे उत्पादन शक्य

मर्यादा:-

  1. भरपूर जागेची आवश्यकता
  2. ठराविक ठिकाणीच उर्जा निर्मिती करता येते
अक्षय उर्जा स्त्रोत(Renewable Energy Sources)_5.1
पवन उर्जा

भूऔष्णिक उर्जा :

या प्रकारात पृथ्वीच्या पृष्ठभागातील उष्णतेचा वापर करून उर्जेची निर्मिती केली जाते. हा उर्जेचा एक दुय्यम स्त्रोत आहे.

फायदे:-

  1. स्वच्छ व प्रदूषण विरहीत उर्जा मिळते

मर्यादा:-

  1. उर्जा निर्मिती साठी लागणाऱ्या उत्पादनांचा खर्च अधिक
अक्षय उर्जा स्त्रोत(Renewable Energy Sources)_6.1
भूऔष्णिक उर्जा

जलविद्युत उर्जा :

या प्रकारात धरण किंवा बंधाऱ्यात साठवण्यात आलेल्या पाण्यापासून उर्जेची निर्मिती केली जाते. जलविद्युत प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात उर्जेची निर्मिती केली जाऊ शकते.

फायदे:-

  1. स्वच्छ व प्रदूषण विरहीत उर्जा मिळते
  2. इंधन म्हणून पाण्याचा वापर
  3. कृषी व्यवसायासाठी फायदेशीर

मर्यादा:-

  1. धरण बांधण्यासाठी खर्च अधिक
  2. ठराविक जागेतच शक्य
अक्षय उर्जा स्त्रोत(Renewable Energy Sources)_7.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
गुरुत्वाकर्षण
भौतिक राशी आणि त्यांचे एकके
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार, कालावधी आणि परिणाम
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP)
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी
राष्ट्रीय आरोग्य अभियान
महाराष्ट्रातील लोकजीवन
भारतीय संविधानाची उद्देशिका
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023)
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

उर्जा स्त्रोत किती प्रकारचे आहेत?

उर्जा स्त्रोत दोन प्रकारचे आहेत.

अक्षय उर्जा स्त्रोत मध्ये कोणकोणते स्त्रोत येतात?

अक्षय उर्जा स्त्रोत मध्ये सौर उर्जा, पवन उर्जा, भूऔष्णिक उर्जा इ स्त्रोत येतात.